आण्विक्षिकी , ज्ञानाची प्रोसेस आणि सुमारियन लोक श्रीधर तिळवे नाईक 


भारतामध्ये शास्त्र हा शब्द शैव लोक फक्त गणित भूमिती आणि तर्कशास्त्र यांच्या पुरतेच वापरतात आणि या शास्त्राच्या आधारे प्रज्ञा शक्तीची सारी उठाठेव उभी करतात .


दुर्दैवाने युरेशियन धर्मामधल्या पुरोहितांनी हा शब्द नंतर विपरीत आणि विकृत केला आणि याचा एक तोटा असा झाला की तर्कशास्त्र थांबले आणि शास्त्रांच्या नावाखाली फक्त अंधश्रद्धा प्रचलित केल्या गेल्या. तथ्याची गती तपासण्या ऐवजी स्वतःला सोयीस्कर वाटणारे तथ्य प्रमाण मानले जायला लागले. वैष्णवांच्या वर्चस्वानंतर या देशांमध्ये शास्त्रामध्ये काहीही प्रगती झालेली दिसत नाही. उलट कर्मकांड करणाऱ्या आणि सांगणाऱ्या गोष्टींना लोक शास्त्र म्हणायला लागले. त्याचा परिणाम काय झाला हे स्पष्टच आहे प्रथम मुस्लिम जिंकले आणि नंतर इंग्रज ! अर्थात वैष्णव धर्मातल्या लोकांना याची लाज नाही ते कसा तुकाराम निर्माण झाला ते सांगण्यात मग्न आहेत. असो.


कुठल्याही जगामध्ये ही तर्कशास्त्राची जी प्रक्रिया असते ती फार महत्त्वाची असते आणि मुख्य म्हणजे ती अमूर्त असल्याने तिचे प्रशिक्षण मेंदूला मिळणे अत्यंत आवश्यक असते. माणसाचे जे आतले प्रज्ञाचे वैभव आहे ते अदृश्यवैभव आहे आणि ते कमवावे लागते . त्याचे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र आण्विक्षीकीमध्ये आणि तिच्या शिक्षणात असते कारण अमूर्तता आणि कल्पना यांचा अतिशय चांगला असा युगमीय आकार तिच्यामध्ये आणि तिचाच एक भाग असलेल्या तर्कशास्त्रामध्ये तयार झालेला असतो . 


अगदी आपली भाषा सुद्धा सगुनात्मक तर्कशास्त्र वापरतच आकार घेत असते . एकाच वेळेला सगुणता आणि तर्क यांचा समावेश तिच्यामध्ये असतो भाषेच्या अंगाने आपण तर्कशास्त्राची व्याख्या तर्कशास्त्र म्हणजे निर्गुण भाषा म्हणून करू शकतो . न्यायाच्या संदर्भामध्ये तर्कशास्त्र सर्वाधिक महत्त्वाचे असते आणि म्हणूनच न्यायाच्या दिशेने चाललेले शास्त्र म्हणजे न्यायशास्त्र होय आणि शास्त्र आणि न्यायशास्त्र मिळून आण्विक्षीकी तयार होते . जेव्हा आपण न्याय देतो तेव्हा आपण प्रत्यक्षामध्ये निर्णय घेत असतो म्हणजेच निर्णय हा न्यायाचा भाग असतो आणि दैनंदिन आयुष्यातल्या जवळजवळ सर्वच घटनांच्या मध्ये आपणाला निर्णय घ्यावे लागतात आणि आपण घेत असलेले निर्णय योग्य आहे की नाही हे तर्कशास्त्राच्या आधारे तपासावे लागते . अन्यथा आपण त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करत राहतो .


जर का माणसाला आयुष्यामध्ये योग्य निर्णय घ्यायचे असेल तर ही आण्विक्षिकी त्याच्या मेंदूमध्ये सतत कार्यरत असणे आवश्यक असते आणि अलीकडच्या काळामध्ये या आण्विक्षिकीच्या अंगाने ज्ञानाच्या या प्रोसेस माणसाच्या मेंदूमध्ये कशा आकार घेतात या दृष्टीने संशोधन केले असता काही वेगळ्या गोष्टी सापडायला लागलेल्या आहेत ज्यामुळे आपण चिंता करायला हवी. 


अलीकडे असे स्पष्ट होते आहे की आण्विक्षिकीची ही प्रोसेस तयार होत नाहीये. परिणाम असा झालाय की तर्क शुद्ध विचार करण्याची जी मेंदूला लागणारी सवय आहे ती हळूहळू कमी पडत आहे आणि याचा परिणाम निर्णय घेण्याच्या क्षमतेवर कौशल्य प्राप्त करण्याच्या क्षमतेवर होत आहे 


आपली एक अशी समजत होती की सर्व काही दृश्यात्मक झाले की जास्तीत जास्त सोपे होईल परंतु दृश्यात्मकतेच्या या सोपेपणाचा जो दुष्परिणाम झालेला आहे तो असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट दृश्यात्मक नसते तेव्हा जो मेंदूमध्ये अमूर्त असा तर्कशास्त्रीय आकार तयार होत जातो जो प्रत्यक्षात एखादा नवा आकार निर्माण करण्याची सुद्धा क्षमता ठेवतो तो आता पूर्वीच्या क्षमतेने मुलांच्या मेंदूमध्ये तयार होत नाहीये आणि ही स्थिती जर अशीच राहिली तर बहुदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिवाय जगणे माणसाला अशक्य बनत जाईल . ते तसे बनावे म्हणून उत्पादक प्रयत्न करतील परंतु प्रश्न असा आहे की एकदा आपण असे जर का झालो आणि आपल्या मेंदूची मूलभूत आण्विक्षिकीची तर्कशास्त्रीय प्रणाली आपण जर का नष्ट केली तर त्याचा आपल्यावर अत्यंत वाईट परिणाम होणार आहे हा वाईट परिणाम नेमका काय होणार आहे? 


जर का आपली निर्णय क्षमताच आपण गमावली तर मग आपण फक्त मशीनचे ऐकत राहू किंवा मग मशीन आपल्याला आपल्याही नकळत त्याचे निर्णय डिक्टेट करायला लागेल किंवा मग आपल्यासाठी फक्त मशीन निर्णय घेत राहील . हे भविष्यात परवडणार आहे का हा फार मोठा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण जे सर्वकाही दृश्यात्मक दाखवण्याचे उद्योग करत असतो ते उद्योग करावेत की नाही असा प्रश्न पडत असतो माझ्या वर्गामध्ये मी कधीही दृश्यात्मकतेचा आधार घेत नाही याचे सर्वात मोठे कारण मला याबाबतीतली कल्पना फार प्राचीन काळापासून आहे त्यामुळे २०१४ पासूनच अत्यंत मोठा दबाव असून सुद्धा मी दृश्यात्मकता टाळलेली आहे त्यापेक्षा वर्गामध्ये पूर्णपणे अमूर्त विचारसरणी देत राहायची आणि त्याच वेळेला मोबाईल वापरायची अनुमती द्यायची अशा प्रकारचा एक मध्यम मार्ग मी काढला होता . पण उद्या जर का मी प्राथमिक शाळेमध्ये गेलो तर मी कदाचित मोबाईल सुद्धा वापरण्याची संधी देणार नाही कारण हा तोच काळ असतो ज्या काळामध्ये आपण अमूर्त विचार करणे , विचार करायला शिकणे गरजेचे असते अनेकदा आपण हे केले नाही तर मग आपण फार कच्चे पडत जातो . निर्गुण भाषा आणि सगुण भाषा या दोन्ही आपल्या मेंदूमध्ये कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर मग सर्वच्या सर्व निर्णय हे फक्त सगुनात्मक भाषेकडून घेतले जाऊन इमोशनल होऊन जातात . आणि कधीकधी त्यामधून इमोशनल अत्याचार निर्माण होत जातात. हे इमोशनल अत्याचार फक्त दुसऱ्यांच्या वर आपण करूया याची कसली खात्री नाही कदाचित आपण ते सर्व स्वतःवरच करत बसू आणि यातून स्वतःचेच नुकसान करत बसू . म्हणजे एक अर्थाने आपण स्वतःसाठी आणि दुसऱ्यांच्यासाठी नरकच निर्माण करत राहू आता हे करणे चांगले की वाईट हे ठरवण्याची वेळ आलेली आहे  


अलीकडचे आपले जे भक्ती प्रधान धर्म आहेत त्यांनी तर तर्कशास्त्र खुंटीला टांगायचेच ठरवलेले दिसते याचे कारण उघड आहे लोकांनी विचार करू नये अशीच अलीकडच्या राज्यकर्त्यांची इच्छा आहे फार प्राचीन काळापासून शासक लोक सत्ताधारी लोक अत्यंत जाणीवपूर्वक भक्तीचा प्रचार आणि प्रसार करत असतात भक्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात कारण त्यांना ज्ञान धर्म क्रियाधर्म शरीर धर्म योगधर्म नकोच असतात पूर्वीच्या काळी ब्राह्मणांची अशी इच्छा असायची त्यातूनच मग शब्द प्रमाण हे सर्वाधिक महत्त्वाचे अशी भूमिका ब्राह्मण धर्माने घेतली होती आणि याचा परिणाम असा झाला की शेवटी यादव काळामध्ये जवळजवळ 2000 च्या आसपास व्रत वैकल्ये शोधली गेली जेणेकरून माणसाचे सगळे आयुष्य व्रत वैकल्ये करण्यात जावे . अगदी अल्लाउद्दीन खिलजी चे आक्रमण झाले तेव्हा सुद्धा मराठी माणूस व्रत वैकल्ये करण्यात मग्न होता भविष्यात सुद्धा हेच आपणाला रिपीट करायचे आहे का हे एकदा आपण स्वतःला विचारावे.


आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या रूपाने नवीन आर्टिफिशल ब्राह्मण जर येणार असतील तर इसवी सन एक हजार नंतर आपल्याकडे जे वैष्णव धर्माने केले तेच पुन्हा एकदा ही कृत्रिम बुद्धिमत्ता करेल आणि त्यातूनच गोंधळ तयार होईल .


हे जर काय होऊ नये असे वाटत असेल तर आपल्या मुलांना आत्तापासूनच जास्तीत जास्त अमूर्त विचार सुद्धा करायला शिकवले पाहिजे आणि त्यासाठी त्यांना दृश्यात्मकते पासून अधून मधून वंचित ठेवले पाहिजे अन्यथा सर्व दृश्यात्मक होत इमोशनल होऊन जाईल आणि हे परवडणारे नाही .


अलीकडे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये फार थोडी माणसे योगदान देताना दिसतात पण लोकसंख्येच्या प्रमाणात जर का आपण संख्या तपासली तर गुणवत्तेच्या पातळीवर आपण मार खाताना दिसतो याचा सर्वाधिक मोठा परिणाम जर कशावर झाला असेल तर तो आपल्या शिक्षण संस्थांच्या वर झाला आहे शिक्षण संस्थांच्या मध्ये अत्यंत सुमार लोक भरती झालेले दिसतात याचे कारण त्यांना भरती करणारे पण सुमार आहेत आणि यामुळे सुमारियन नावाची एक नवीन जमात तयार झालेली आहे जिचे सध्याच्या शिक्षण संस्थेत आणि शिक्षण व्यवस्थापनामध्ये केंद्रीय स्थान बनलेले दिसते . याचे कारण निर्गुणात्मक भाषा या लोकांना कळत नाही तर्कशास्त्र कळत नाही न्यायशास्त्र कळत नाही त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आणि हितसंबंध इमोशनली कळतात आणि याचा एक परिणाम असा झालेला आहे की काहीही केले तरी चालते असे मानणारा एक सुमार पंथ तयार झालेला आहे .


आता या शिक्षण संस्थांच्या मधून निघणारे विद्यार्थी भविष्यात काय लायकीचे असणार ? म्हणजे इथे मग जे जन्मदत्त काही तर्क प्रधान घेऊन आलेले आहेत तेवढेच लोक भविष्यात शिकत जातील आणि ती त्यांची क्षमता असेल आणि उरलेले मात्र त्यांनी तयार केलेल्या मशीन्सच्या हाताखाली काम करतील हे जन्मदत्त वाले आत्ताच ज्या स्कूलमध्ये फारसे दृश्यात्मक नाही तंत्रात्मक नाही अशा ठिकाणी आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी घालत आहेत . कारण त्यांना आण्विक्षिकीची ताकद व्यवस्थित माहिती आहे.



श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती