व्यवहार,खोटेपणा, त्यामुळे संपलेली विश्वासार्हता आणि त्यामुळे आलेली बधिरता : श्रीधर तिळवे नाईक 

मानवी जीवनाच्या व्यवहारांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आजारपणात घेतली गेलेली दुसऱ्याची काळजी आणि अडचणीत सापडलेल्या माणसाला केली गेलेली मदत ! हेल्प,शेअरिंग आणि केअरिंग असे हल्ली आपण त्याला म्हणतो माणसाच्या उत्क्रांतीचा मुळात पायाच शेअरिंग हा आहे जर का माणसाने आपण शिकलेली गोष्ट शेअर केली नसती तर संपूर्ण मानव जात अशी पुढे गेली नसती . प्रत्येक पिढी आपले ज्ञान संक्रमित करत असते म्हणूनच ती जात वाढत जाते इतरांच्या मध्ये ही संक्रमण करण्याची क्षमता भाषेच्या चिन्हाच्या चिन्हंकीच्या अभावामुळे कमी पडत गेली आणि माणसांमध्ये ती प्रचंड वाढतच गेली कारण माणसाने आपली चिन्हंकी सुद्धा शेअर करायला सुरुवात केली आणि या चिन्ह की द्वारे अनेक गोष्टी शेअर केल्यानेच माणसाचे एक मानव जात म्हणून संपूर्ण ज्ञान वाढताना दिसते यासाठी माणसाने खास शिक्षण व्यवस्था सुद्धा बनवली आणि शिक्षण व्यवस्थेचा तिच्या व्यवहाराचा मुख्य आधार पुढच्या पिढीला मदत, आपल्यापर्यंत जे चालत आहेत त्याचे शेअरिंग आणि भविष्याच्या दृष्टीने त्याचे केअरिंग हाच आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण शिक्षणाच्या संदर्भात विचार करतो तेव्हा तेव्हा या तीन मूलभूत गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे प्रत्यक्ष होते आहे असे की दैनंदिन जीवनात जिथे व्यवहार पार पाडले जातात त्या कुटुंब व्यवस्थेतच अलीकडे या तीन गोष्टींचा मुडदा पडला जात आहे . तुम्ही जर का कुटुंब व्यवस्थेत या तीन गोष्टींचे संस्कारच करणार नसाल तर तुमची शिक्षण व्यवस्था यासंदर्भातले व्यवहार अत्यंत निर्लज्जपणाचे करत जाणार हे उघड आहे . जगातलीस प्रत्येक शिक्षण व्यवस्था ही प्रथम कुटुंबात सुरू होते याचाच विसर अनेक कुटुंबांना पडलेला दिसतो. जर का तुमच्या पूर्वजांनी ज्ञान केवळ पैशाच्या आधारेच पुरवले असते तर तुमच्यापर्यंत कदाचित ज्ञान पोहोचले समजते याचे भान अनेकांना आजही नाही . याचे एक मोठे कारण अलीकडे असे दिसते की ज्ञान आणि मदत यांचे नातेस संपलेले आहेत अनेकांना तर ज्ञान म्हणजे माहिती असे वाटते आणि ती इंटरनेटवर प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे माहिती प्राप्त झालेले लोक स्वतःला ज्ञान प्राप्त झाले असे समजत असतात . त्यामुळे जेव्हा अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा अनेकदा आपणाला या लोकांच्या वागण्यातला व्यवहार फापडलेला दिसतो . 

अपवादात्मक वेळेला आपणाला असेही दिसते की मनुष्य या ज्ञानाच्या जीवावर अनेकदा साम्राज्य निर्माण करतो . जो जिंकतो तो अनेकदा स्वतःकडे जास्त ज्ञान आहे असे गृहीत धरतो आणि प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती असत नाही अनेकदा असेही घडले आहे की रानटी लोकांनी सुसंस्कृत सभ्य लोकांना मात दिलेली आहे कारण शेवटी संख्या आणि शस्त्रांची भक्कमता या गोष्टी महत्त्वाच्या होत जातात आणि या दोन्ही गोष्टींचा संबंध सुसंस्कृतपणाशी असेलच असे नाही आणि म्हणूनच अनेकदा युद्धामध्ये जो अधिक रानटी तो विजयी झालेला दिसतो अमेरिकेने अणुबॉम्ब टाकण्याचा रानटीपणा दाखवला म्हणूनच जापानचा रानटीपणा पराभूत झाला हे साधे सरळ सत्य असते . पण कधी कधी असे होते की हे ज्ञान आक्रमणामुळे सुद्धा वाढलेले असते वाढलेली आहे कारण आक्रमण झाले आणि आक्रमक विजयी झाले तेव्हा ते विजयी का झाले हे शोधण्यासाठी म्हणून मग आपोआपच काही वाटा तयार केला जातात आणि त्यातून मग त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आपण सुद्धा प्राप्त केले पाहिजे या जाणिवेने मग ज्यांचा पराभव झाला त्यांनी ते ज्ञान आत्मसात केलेले आपणाला दिसते .

आजच्या घडीला सर्वात मोठी विचित्र गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे शेअरिंग आणि केरिंग हे फक्त चिन्हकी मधूनच व्हायला लागले आणि प्रत्यक्ष मासल गोष्टी ज्या आहेत तिथे मात्र हे कमी पडायला लागले . आणि यातून अलीकडे बरेचसे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेले दिसतात .

म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोणाला मदत न करणे . स्वतःचा डबा सुद्धा शेअर करू न देणे वगैरे वगैरे प्रश्न असा आहे की हे सर्व घडले कसे ? 

याच्या बेसिक मध्ये आपण जर का गेलो तर आपल्याला फक्त खोटेपणा दिसतो . खोटे बोलणाऱ्या लोकांनी सर्वात जास्त हानिकारक काय केले असेल तर ते म्हणजे त्यांनी दोन माणसांच्या संभाषणातली आणि व्यवहारामधली विश्वासार्हता (ट्रस्ट )संपवली . याचा दुष्परिणाम असा झाला की जो माणूस मदत मागतो आहे त्या माणसाला खरोखर मदतीची गरज आहे की तो आपणाला लुटतो आहे त्याची आवश्यकता किती की हा त्याचा आपल्याला लुबाडण्याचा प्लॅन आहे ? अशा प्रकारच्या शंका यायला लागल्या आणि लोकांनी मोकळ्या हाताने मदत करणे कमी केले याच वेळेला चिन्हसृष्टीने सर्वच्या सर्व गोष्टी चिन्हंकीच्या हाताखाली आणून अनेक गोष्टी अशा होत्या की ज्या फक्त चिन्हांच्यामुळे शक्य होत्या त्या आता अचानक इंटरनेटवर आरामात करता येऊ लागल्या आणि त्यामधला माणसाचा हात गहाळ व्हायला लागला . मानवी स्पर्शच गायब झाल्याने आणि डिजिटल स्पर्श वाढत गेल्याने एक प्रकारे एक स्पर्शाबद्दलची एका बाजूला अतिशय नको तितकी डोळल गर्दी वाढली आणि दुसरीकडे प्रत्यक्ष स्पर्श जो त्वचेचा त्वचेला होता तो कमी झाला. डोळा इतका केंद्रस्थानी आला की आपण आता फक्त त्वचेला डोळ्यांनीच अनुभवत बसतो स्पर्श कमी करत जातो . या सगळ्याचा एक परिणाम असा झालेला आहे की सर्व काही डोळसच झालेले आहे आणि हे आरटीफिशियल डोळसपण माणसाला आंधळे बनवते आहे .

दुसरी गोष्ट वाटून खाणे हा तर जवळजवळ संपलेला प्रकार आहे त्यापेक्षा टीमवर्क जास्त महत्त्वाचे झाले आणि टीमचे टार्गेट महत्वाचे झाले आणि हे टार्गेट अचिव करताना खुद्द टीम मध्येच स्पर्धा सुरू झाली . शेवटी क्रेडिट कोणाला मिळते असा एक महाप्रश्न निर्माण झाला आणि ते मिळावे म्हणून मग एकाच वेळेला टीम वर्क करायचे पण एकमेकांवर कुरघोडी सुद्धा करायची अशा प्रकारचे काहीतरी स्पर्धावर्तन आपल्याकडून घडायला लागले . यातूनच मग मैत्री हा प्रकार फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रस्थानी आला आणि मुख्य म्हणजे व्यवहारांमध्ये नातेवाईकांची गरज कमी होत गेली किंबहुना जो आपल्या टीम मध्ये फिट बसतो तो चांगला नातेवाईक आणि जो आपल्या टीम मध्ये फिट बसत नाही तो वाईट नातेवाईक अशा प्रकारची व्यवस्था तयार झाली . नातेसंबंधातला हा बलगरपणा, वलगर पणा आणि थिल्लरपणा एका स्पर्धात्मक ताणामध्ये जगायला लागला. 

हे सर्व विश्वासार्हता संपल्याने झाले आणि ही विश्वासार्हता संपण्याचे सर्वात मोठे कारण आपण एकमेकांशी खोटे बोलायला लागलो . दिसायला सुरुवातीला अतिशय नाजूक असणारे हे खोटेपणाचे बांधकाम नंतर मात्र संपूर्ण बिल्डिंग कोसळवण्याला कारणीभूत ठरायला लागले . दिलेला शब्द पाळला पाहिजे असे तर आता कोणालाच वाटत नाही यामुळे आपली विश्वासार्हता संपते हे अनेकांच्या लक्षात येत नाही . कसाही शब्द दिला तरी चालतो कारण ज्याला आपण शब्द दिला त्याच्या संदर्भात खरा मुद्दा हाच आहे की त्याची खरोखर आपणाला गरज आहे की नाही जर त्याची गरज आहे असे वाटले तर शब्द पाळायचा आणि गरज नसेल तर शब्द पाळायचा नाही असा प्रकार चाललेला दिसतो . आणि समोरचा जर भोळा सांब असेल तर मग काय बघायलाच नको त्याला दिलेला शब्द पाळण्याची गरज नाही कारण आपण त्याला कधीही वापरू शकतो असा कॉन्फिडन्स अनेकांना आलेला दिसतो या सगळ्यांमध्ये व्यवहार पूर्णपणे फाफलत चाललेला आहे आणि ते अनेकांना कळत नाही . स्वार्थाने सर्वांनाच बधिर केलेले दिसते . सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या बधिरपणाचे काही परिणाम भविष्यात आपल्याला दिसणे अटळ आहे .

तेव्हा निदान आपले दैनंदिन जीवनातील व्यवहार अत्यंत विश्वासार्ह कसे होत जातील ते प्रत्येकाने पाहणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे दिलेली टाईम पाळणे दिलेला शब्द पाळणे इथून जरी आपण सुरुवात केली तरी आपण बरेच काही विश्वासार्हतेसाठी करू शकतो . तेव्हा बघा स्वतःला तपासून ! 

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती