Final वैदिक विरुद्ध हिंदू भाग दोन मी वैदिक विरुद्ध हिंदू ही द्विध्रुवात्मकता का स्वीकारली नाही संदर्भ आदिम टोळ्या, मांत्रिकी आणि शहाणपण श्रीधर तिळवे नाईक
वैदिक धर्म आणि हिंदू धर्म यांच्या संदर्भात मागील भागामध्ये आपण काही गोष्टींची चर्चा केल्यानंतर आणखी काही गोष्टींची चर्चा करणे आवश्यक आहे
माणसाचा इतिहास पूर्व कालखंड काय होता हा अलीकडच्या काळातला सर्वात मोठा प्रश्न झालेला आहे कारण एकंदरच पुन्हा एकदा आपण या आदिमतेकडे परतलेलो आहोत
माणसाला स्वतःला जाणायचे असेल तर प्रथम त्याने स्वतःची आदिमता जाणली पाहिजे स्वतः मधला प्राणी जाणला पाहिजे आपण होमो सेपियन आहोत म्हणजे काय आहोत हेच जाणले पाहिजे आपला होमो सेपियन म्हणून कसा विकास झाला तेही जाणले पाहिजे असे काहीतरी आता सध्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये विशेषता समाज विज्ञानाच्या संदर्भामध्ये झालेले दिसते त्यामुळे साहजिकच इतिहास सुद्धा अलीकडे इतिहास पूर्व कालखंड या अंगाने खूप वेळा तपासला जात आहे आणि आपला इतिहास खरोखर वैदिक संस्कृतीच्या संदर्भात सुरू करता येईल का असा प्रश्न अलीकडे निर्माण झालेला आहे किंबहुना इतिहास वैदिक कालखंडापासून सुरू व्हावा अशी अनेक वैदिक लोकांची इच्छा दिसते त्याप्रमाणे सिल्याबस मध्ये सुद्धा फरक केलेला दिसतो परंतु प्रत्यक्षामध्ये असा फरक करता येईल का हा एक फार मोठा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे .
भारताच्या इतिहासामध्ये स्पष्टपणे शैव श्रुती अथवा तंत्र श्रुती आणि वैदिक श्रुती अशी द्विध्रुवात्मक मांडणी सातत्याने केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून शेवटी हिंदू विरुद्ध वैदिक अशी मांडणी 1960 नंतर पुढे यायला लागली या सर्व मांडणीमध्ये वैदिक श्रुती हा शब्द मात्र अनेकदा स्थिरावलेला दिसतो परंतु दुसरा जो ध्रुव आहे त्यामध्ये मात्र नेमका कोणता शब्द वापरला पाहिजे याबद्दल बहुजन लोकांच्या मध्येच भांडण सुरू आहे की काय अशी शंका येते आहे किंवा जाणीवपूर्वक हे भांडण निर्माण केलेले आहे काय अशी ही शंका येत आहे एकमेकाला टक्कर देताना अनेकदा पुढच्या इतिहासामध्ये या श्रुती दिसतात पण या मांडणीमध्ये अनेकदा काही गडबड झालेल्या गोष्टी पण दिसतात त्यातील एक म्हणजे धर्म आणि मोक्ष यांच्यामध्ये फरक नाही ही पुरोगामी कालखंडामध्ये पसरलेली गैरसमजुत ! त्यामुळेच अगदी ओशो रजनीश यांच्यासारखा विद्वान मनुष्य सुद्धा मोक्षजागी अनेकदा धर्म हा शब्द बिन दिक्कत वापरतो आणि यामुळेच अनेक सावळे गोंधळ निर्माण झालेले दिसतात त्यांनी कधी कधी रिलिजिअसनेस असा शब्दही वापरलेला आहे म्हणजे मी रिलीजन शिकवत नाही तर मी रेलिजिअसनेस शिकवतो असे म्हटलेले आहे . प्रश्न असा आहे की इतिहास पूर्व काळात सुद्धा अशी परिस्थिती होती का आणि अशी जर परिस्थिती अशी होती तर तिचे नेमके काय परिणाम झाले तेही बघावे लागते
आपल्याकडे एक फार मोठा पसरलेला कुठला गैरसमज असेल तर तो म्हणजे रीलिजनचा आधार मोक्ष आहे त्यातूनच महंमद पगार यांच्या आयुष्यात पैगंबर यांच्या आयुष्यात मोक्ष होता अशी कल्पना अगदी स्वामी विवेकानंदांना सुद्धा सुचलेले प्रत्यक्ष कुराण वाचले की अशा प्रकारची कोणतीही गोष्ट त्यांना माहित नव्हती हे स्पष्ट होते परंतु सुफी लोकांनी केलेल्या अपप्रचारामुळे या गोष्टी प्रचलित झालेल्या दिसतात प्रत्यक्षामध्ये इस्लाम पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ही युक्ती वापरली गेलेली आहे जेणेकरून आपली साधना सुरक्षित राहावी आपली परंपरा सुरक्षित राहावी एका अर्थाने आजच्या काळात सुद्धा ही इस्लाममध्ये गरज असू शकते कारण आजही ती कट्टरता गेलेली नाही परंतु भारतात जन्म घेतलेल्या इंडियन धर्मांनी ही गोष्ट का करावी किंवा पाश्चिमात्य रिलीजन म्हणजे आपल्याकडचा धर्म होय अशी चुकीची कल्पना का बाळगावी ? वास्तविक रिलिजन आणि धर्म या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत मग त्या एक कधी झाल्या ? यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागते
रेलिजन म्हणजेच धर्म ही संकल्पना इस्लामच्या नंतर आलेली आहे म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर इस्लामचे आक्रमण असे आहे इस्लामच्या आक्रमणानंतर अचानकपणे धर्म म्हणजेच मोक्ष अशी काहीतरी गैरसमजूत प्रथम इस्लामने आणि नंतर वैष्णव धर्माने पसरवली याचे कारण मोक्षाची साधना करणारे लोक ठामपणे वर्ण जात विरोधात उभे राहतात हे ब्राह्मण धर्माच्या वैष्णव लोकांच्या आता लक्षात यायला लागले आणि त्यांनी मग दिशाभूल करण्यासाठी म्हणून धर्म आणि मोक्ष एकत्र करायला सुरुवात केली आणि या सगळ्यांनाच मिळून धर्म अशी संज्ञा दिली जेणेकरून मोक्षावर सुद्धा आणि मोक्ष मिळवलेल्या लोकांच्यावर सुद्धा आपले धार्मिक नियंत्रण राहावे . युरेशियन लोकांचे हे राजकारण पूर्णपणे यशस्वी झाले हे नंतरच्या संत साहित्यावरून स्पष्ट होते . या संत परंपरेत वाढलेल्या देशी लोकांनी साहजिकच मग मोक्ष आणि धर्म यांच्यातला फरक संपुष्टात आणला आणि पुरोगामी कालखंडामध्ये या दोन गोष्टी जणूकाय एकच आहेत अशा पद्धतीने मांडल्या गेल्या .
वास्तविक अशा प्रकारचे कुठलेच प्रतिपादन प्राचीन काळामध्ये केले जात नव्हते वैदिक श्रुतीमध्ये सुरुवातीच्या ऋग्वेदिक काळात तर मोक्ष हा शब्द सुद्धा आढळत नाही याचे कारण वैदिक हे सुरुवातीला जेव्हा भारतात आले तेव्हा फक्त टोळीरूप श्रद्धा ही त्यांचा कणा होती आणि ही फक्त एक टोळी नव्हती तर अनेक टोळ्या आल्या होत्या आणि त्यांचे सर्व उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये मिळतात . मात्र एका विशिष्ट प्रदेशातच यांची वाढ झाल्याने त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची समानता निर्माण झालेली होती त्यामुळे श्रद्धेमध्ये काही समान घटक सुद्धा आपणाला सहजरीत्या दिसतात त्या सर्वांचे संकलन होणे गरजेचे होते आणि म्हणूनच मग हे सर्व संकलन अतिशय पद्धतशीरपणे करण्याची जबाबदारी वेद व्यासांनी उचलली आणि ती पार पाडली .
जगातल्या कुठल्याही मनुष्य समुदायांमध्ये प्रत्येक टोळीचा जो आधार असतो तो अनुभवातून येणारे शहाणपण हा असतो किंवा मग मांत्रिकी असतो . दुर्दैवाची गोष्ट अशी असते की या शहाणपणाचा किंवा ज्याला फिलॉसॉफी म्हणतात त्याचा कारभार फार काळ टिकत नाही विशेषता दुष्काळ किंवा तत्सम नैसर्गिक संकटे आली की अचानक मग तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफी लयाला जाते शहाणपण लयाला जाते आणि माणसे अचानक मांत्रिकांच्या नादाला लागतात कारण नैसर्गिक गोष्टी आवाक्या बाहेर असतात आणि कदाचित मग मंत्र त्यांना आवाक्यात आणू शकतील असे वाटायला लागते आता मंत्रांना ही ताकद मिळाली कशी त्यासाठी पुन्हा आपल्याला इतिहासातच जावे लागते
टोळीच्या या अवस्थेत असतानाच लागलेला सर्वात मोठा शोध जर कुठला असेल तर तो म्हणजे भाषेचा होता चिन्हाचा होता . या लोकांना हा शोध इतका महत्त्वाचा वाटत होता की भाषा म्हणजे एक पवित्र गोष्ट होऊन गेली त्यामुळे साहजिकच त्या पवित्र गोष्टीचा काही ना काही परिणाम होत असणार अशी ठाम समजूत होत गेली आणि त्यातूनच मंत्रांचा आणि मांत्रिकीचा उदय झाला . मुख्य म्हणजे मंत्रांच्या साहाय्याने रोग बरे करता येतात असे वाटण्याजोगे अनेक अपघात या टोळ्यांच्या आयुष्यात घडल्याने साहजिकच मांत्रिकी हळूहळू प्रचलित होत गेली त्यामुळेच अनेक आदिवासी टोळ्या आज सुद्धा मांत्रिकीच्या आधारे चालत असतात . अनेक टोळ्या अशाच आहेत ज्यांच्याकडे शहाणपण सुद्धा आता उरलेले नाही त्या फक्त मांत्रिकीच्या आधारे आयुष्य काढताना दिसतात अर्थात सर्वच टोळ्यांच्या मध्ये मंत्रांना मंत्र हा शब्द नव्हता
प्रत्येक टोळीमध्ये मंत्राला वेगळा वेगळा शब्द होता तसा तो वैदिक टोळ्यांच्या मध्ये सुद्धा मंत्रांसाठी होता हा शब्द म्हणजे ब्रह्म किंवा ऋचा होय . एका अर्थाने ऋचे मध्ये असलेली जादू म्हणजे ब्रह्म होय या ब्रह्माच्या आधारेच म्हणजेच मंत्रांच्या आधारेच वैदिक श्रुती निर्माण झाली होती . हे ब्रह्म म्हणजे ऋचा रचणारे जे लोक होते त्यांना ऋषी असे म्हटले जाई. आणि जे लोक या मंत्रांना जतन करत त्यांची प्रॅक्टिस करत त्यांना समन किंवा शामन असे म्हटले जाई. संपूर्ण युरेशियन संस्कृतीमध्ये तुम्हाला हा समन शब्द थेट युरोप रशियापासून इंडियापर्यंत आढळेल काही ठिकाणी हा शब्द शामण असा आलेला आहे आणि यातूनच युरोशियन ख्रिश्चन धर्मामध्ये साम म्हणजेच प्रार्थना आल्या तर युरेशियन वैदिक धर्मामध्ये सामवेद आला . ऋचा समूहाला सुक्त असे नाव पडले आणि हे जे नाव भारतात पडलेले आहे ते मूळचे शैव परंपरेतले आहे मूळ शब्द सूत असा आहे आणि त्याचा संबंध कापसाची आहे कारण कापसामुळे कापड तयार होते तसेच प्रत्येक ऋचा म्हणजे एक तंतू आहे आणि तिच्यामुळे एक भाषेचे कापड तयार होते कापूस सिंधू संस्कृतीतले सुद्धा मुख्य पीक होते आणि कापड बनवण्यात हे लोक मास्टरच होते या कापडावर काय काय लिहिले गेले हे आता उपलब्ध नाही पण कधी ना कधीतरी या संदर्भात काहीतरी सापडेलच दुसरे साधन अर्थातच लाकूड आहे त्यावर जे सुत लिहायचे त्यांना शैव लोक सुतार म्हणायला लागले मानायला लागले हळूहळू हा शब्द लाकडापासून काहीही तयार करणाऱ्या माणसाला लागू झाला सुतार हा प्राचीन काळी कंपल्सरी लाकडातला तज्ञ होता त्यामुळे झाडाची मुळे फळे पाने फुले यांच्या विषयी तो अधिक जाणत होता यातूनच पुढे माळी समाज तयार झाला कारण आता बाग कशी तयार करायची हेही हळूहळू कळायला लागले . पूर्वी लाकूडतोडे आणि सुतार वेगवेगळे नव्हते ते नंतर होत गेले या सुतारांच्या वरून आणि त्यांनी सुते लिहिली त्यावरून सूत हा शब्द आला जो पुढे सुत्त झाला आणि त्यावरून पुढे सुक्त झाला
भारतामध्ये जे इंडस शैव लोक नंतर झाले त्यांच्या आधी सुद्धा अशा प्रकारची मांत्रिकी अस्तित्वात होती आणि हे लोक मांत्रिकीसाठी मंत्र असाच शब्द वापरत होते म्हणजे मंत्र हा शब्द मुलत: भारतीय आहे हे मंत्र ज्यांना रचता येत होते त्यांना भगत म्हटले जाई. तुम्हाला भारतीय आदिवासी समाजामध्ये अनेक आदिवासी टोळ्यांच्या मध्ये आज सुद्धा भगत दिसतील अनेकदा आपल्याला असे दिसते की अनेक प्रकारच्या भारतीय समाजांमध्ये भगत आज सुद्धा अस्तित्वात आहेत . हे लोक मांत्रिक असल्याने मंत्रांच्या साहाय्याने रोग बरे करतात अशी अंधश्रद्धा असते त्यामुळेच अनेकदा त्यांचा प्रभाव पडतो प्रत्यक्षात खरी गोष्ट अशी होती की भगत हे वैदू सुद्धा होते आणि झाडपाला आणि ज्याला आज आपण आयुर्वेद म्हणतो त्याची प्राथमिक ओळखतांना होती आणि त्याच्या जीवावर हे लोक बरे करत होते पण पुढे पुढे या झाडापालाशी असलेला त्यांचा संबंध संपला आणि केवळ मंत्र उरले आणि हे लोक कालबाह्य होत गेले
म्हणजेच मांत्रिकीच्या या इसवी सन पूर्व 1500 ते नंतर या टप्प्यामध्ये आपणाला असे दिसते की शैव संस्कृतीमध्ये भगत होते आणि वैदिक संस्कृतीमध्ये ऋषी होते या भगतांचा सामना पुढे भारतात आलेल्या युरेशियन लोकांच्या शामन लोकांशी होणे अटळ होते कारण या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी तयार होत आकार घेत होत्या . त्यातील जी भारतीय होती इंडियन होती ती संस्कृती ऑलरेडी तयार झालेली होती प्रस्थापित झालेली होती तर तिला टक्कर देण्यासाठी मात्र अजूनही मागासलेले असलेले काही प्रमाणात रानटी असलेले आणि वेळ प्रसंगी मनुष्यबळी (वेदा मधला शब्द नरमेध )देताना सुद्धा अजिबात घाबरत नव्हते असे युरेशियन लोक आलेले होते या दोघांच्यात टक्कर होणे अटळ होते आणि तशीच ती झाली बाहेरून आलेल्या युरेशियन लोकांच्या लक्षात आले की आपल्याला शिकण्याजोग्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यांनी त्या गोष्टी शिकायला सुरुवात सुद्धा केली किंबहुना ज्याला आज वैदिक श्रुती मधला वैदिक काळ म्हटले जाते तो वैदिक काळ हा शिकण्याचा कालखंड आहे आणि ते शैव संस्कृती पासून अनेक गोष्टी शिकत होते त्यातली एक मुख्य गोष्ट म्हणजे मोक्ष होय .
वैदिक टोळ्यांच्या मध्ये फक्त दोनच लोक होते एक ऋषी आणि दुसरे विश ते आले तेव्हा कोणताही तिसरा वर्ग तयार नव्हता आणि हे दोन्ही वर्ग जन्माधिष्ठित नव्हते तर कामाप्रमाणे होते . ऋग्वेदामध्ये त्यामुळे वर्ण व्यवस्था प्रस्थापित झालेली नाही आणि जी आहे ती कर्माप्रमाणे आहे म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की वैदिक श्रद्धेशी आपला झगडा नाही तिच्यामध्ये जे चांगले आणि वाईट गुणधर्म आहेत ते इथल्या संस्कृतीमध्ये सुद्धा होते . इथल्या मातृसत्ताक पद्धतीमध्ये सुद्धा भगत लोकांनी हळूहळू एक भागवत महाश्रद्धा नावाची महाश्रद्धा प्रस्थापित केली होती आणि त्यातूनच पुढे मग भागवत धर्म प्रस्थापित केला होता आणि हे लोक मातृसत्ताक असल्याने प्रामुख्याने भगवतीची पूजा करत होते . हा एक पारंपारिक महाश्रद्धेचा म्हणजे रिलीजनचा प्रकार होता .
युरेशियन लोकांनी इथल्या भारतातल्या स्थानिक लोकांच्याकडे आश्रय मागितला आणि त्यांना हा आश्रय देण्यात आला पण दुर्दैवाने मूळचा जो युरोशियन टोळीवाले लोकांचा धुर्तपणा असतो तो काही लोकांच्यामध्ये तसाच्या तसा राहिला होता आणि याच लोकांनी नंतर फार मोठ्या वर्चस्ववादी कारस्थानांना सुरुवात केली .
इथे आल्यानंतर झालेला जो काही मोठा बदल होता तो म्हणजे जे मांत्रिक होते आणि जे फक्त ऋषी होते त्यांच्यामध्येच आता तीन प्रकार झाले
१ मुनी या लोकांनी शैव संस्कृतीतला मोक्ष स्वीकारला आणि त्याप्रमाणे स्वतःची साधना सुरू केली . यामध्ये सर्वात महत्त्वाचे लोक असतातच ज्ञानतंत्राकडे वळले कारण हे मूळचेच ज्ञानपींड असलेले लोक होते ज्ञानतंत्रामध्ये जो मोक्षाला उपलब्ध होणारा सिद्ध असतो त्याला नाथ म्हणतात आणि म्हणूनच अनेकदा यातूनच नाथ संप्रदाय निघालेले दिसतात यामध्ये आदिनाथ , महावीर नाथ ज्याच्यातून पुढे जैन धर्म तयार झाला आणि नवनाथ हे तीन नाथ संप्रदाय आजही भारतामध्ये आपले महत्त्व टिकवून आहेत
२ ऋषी या लोकांनी आता मंत्र रचणे बंद केले त्या ऐवजी यांचे सगळे लक्ष हे ज्ञानाकडे वळायला लागले . जे काही मंत्र रचले गेले होते तेच पुरेसे आहेत आणि आता आणखी काही वैदिक मंत्र किंवा वेद रचण्याची गरज नाही असे यांना वाटायला लागले होते आणि त्यामुळेच या लोकांनी यज्ञ प्रथा जारी ठेवली परंतु नवीन मंत्रांची भर घालण्याची गरज या लोकांना आता वाटत नव्हती त्याऐवजी या जगाचे ज्ञान कसे मिळवता येईल याविषयीचे प्रश्न त्यांना पडायला लागले
यांच्यामध्ये सुद्धा नंतर विभागणी झाली आणि ब्रह्मर्षी , राजर्षी आणि महर्षी असे तीन प्रकार झाले त्यातील जे ब्रम्हर्षी होते त्यांच्याकडे काही नवीन ब्रम्ह मंत्र रचता येण्याची क्षमता होती आणि यासंदर्भामध्ये सर्वात गाजलेला वाद जर कुटलेला कुठला असेल तर तो म्हणजे विश्वामित्र हा राजर्षी असल्यामुळे त्याला ब्रम्ह रचण्याचा अधिकार आहे की नाही? विश्वामित्राने हा अधिकार कमावल्यामुळेच त्याच्या नावाने एक संपूर्ण मंडल आपणाला ऋग्वेदामध्ये दिसते . अर्थात नंतरच्या कथा वरून स्पष्टपणे दिसते की त्याला मंडल रचनेपाशी थांबता आले नाही किंबहुना तो थांबला नाही कारण त्याला सत्याचा शोध घ्यायचा होता आणि त्यातूनच मग तो शेवटी शैव संस्कृतीला येऊन मिळाला आणि त्याने मोक्षाची साधना सुरू केली . त्यामुळेच अनेकदा वेदांच्यातला विश्वामित्र आणि पुराना मधला विश्वामित्र यांच्यामध्ये फरक पडलेला दिसतो कारण जो पहिला आहे तो वैदिक आहे तर जो दुसरा आहे तो मोक्षिक आहे एकाच माणसाच्या आयुष्यातल्या या दोन अवस्था आहेत परंतु त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्वीकारणे ब्राह्मण लोकांना अतिशय जड झाले पण शेवटी त्यांना ते स्वीकारावे लागले . अर्थातच विश्वामित्र हा पहिला नव्हता त्याच्याही आधी अगस्तीच्या बाबतीत हेच घडलेले होते. आजही अगस्तीचे मंडल होते की नाही हा एक फार मोठा वादाचा विषय आहे कारण त्याच्या फक्त एक दोन ऋचाच आता आपणाला ऋग्वेदामध्ये शिल्लक असलेल्या दिसतात बाकी मोक्षाची साधना करूनच तो फार पुढे गेलेला दिसतो . किंबहुना विंध्य पर्वताचे उल्लंघन करून दक्षिणेकडे येऊन दक्षिणात्य होणारा तो पहिला माणूस आहे . त्याने पुढे बाकीच्या युरोशियन लोकांनीही तमिळ शिकावी म्हणून तमिळ भाषेचे व्याकरण तयार केले .
एकेकाळी ज्यांच्याजवळ ही मांत्रिकी आहे अशा लोकांना ऋषी म्हटले जात होते किंबहुना ऋषी म्हणजे मंत्र रचना रचणारा असाच अर्थ होता तो आता बदलत जाऊन ऋषी म्हणजे विद्वान किंवा तज्ञ असा अर्थ होऊ लागला कारण हे लोक शिकण्यासाठी उत्सुक होते त्यातच या लोकांची अंतर धर्मीय लग्न होऊ लागली आणि यांच्या लग्नामधून जी संतान निर्मिती झाली ती दोन्ही संस्कृतीमध्ये समतोल साधण्यासाठी धडपडायला लागली त्याचे सर्वात उत्तम उदाहरण महर्षी व्यास आहे त्यामुळेच आपणाला त्यांनी जेव्हा ऋग्वेदाचे संकलन केले तेव्हा या दोन्ही संस्कृतींचा संगम करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे दिसते
महर्षी व्यासांनी सुक्त हा शब्द जाणीवपूर्वकच वापरला कारण त्यांना हा संस्कृती संगम हवा होता ते स्वतःच मुलत: संस्कृती संगमाचे उत्तम उदाहरण होते त्यांचे पिता पाराशर वैदिक होते तर माता सत्यवती नावाडी मल्लांह समाजातील निषाद शैव होती . त्यामुळे आपण जर ऋग्वेद पाहिला तर तो अनेकदा संस्कृती संगमातून जन्मलेला ऋग्वेद आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे मुळातच सुरुवातीच्या काळामध्ये नाशैव कट्टर होते ना वैदिक ! वर्णसंकराची कुणाला भीती वाटत नव्हती . याचे मुळातच एक कारण असे होते की जे बाहेरून आले होते त्यांच्या टोळ्यांच्या मध्ये स्त्रियांची संख्या कमी होती. साहजिकच स्त्रिया कमी पडत होत्या आणि त्यामुळे इथे असलेल्या स्थानिक स्त्रियांशी लग्न करून संतान निर्मिती करणे हे त्यांना गरजेचे बनले आणि त्यातूनच मग वर्णसंकर अपरिहार्य झाला जेव्हा अशा स्त्रियांची पर्याप्त संख्या झाली ज्या वैदिक श्रुतीच्या आवरणाखालीच वाढलेले आहेत तेव्हा मात्र धोरण बदललेले आहे कारण आता जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली होती आणि हळूहळू स्त्रिया आवश्यक अशा निर्माण झालेल्या होत्या याचे एक नैसर्गिक कारण अर्थातच स्त्रियांची संख्या नेहमीच जास्त जन्मते हे होते त्यामुळे जेव्हा या वर्णसंकराची गरज संपली आंतरजातीय आंतरधर्मीय लग्नाची गरज संपली तेव्हा काही लोकांना जे स्वतःला फार शुद्ध समजत होते वर्ण संकर अडचणीचा वाटायला लागला त्यातूनच पुढे या वर्ण संकराला स्पष्ट आणि ठाम विरोध भगवान श्रीकृष्ण यांनी केला आणि पुन्हा एकदा जन्मदत्त वर्णव्यवस्था रिस्टोर केली . संपूर्ण भगवद्गीतेचा एकमेव अजेंडा हा वर्णसंकराला विरोध करणे हा आहे . मात्र मोक्षाचा त्याग करण्याची गरज मात्र वाटलेली दिसत नाही . पण मूळ उद्देश सनातन वैष्णव धर्म विजयी करणे हाच आहे .
या गोष्टींची रचना ज्यांनी केली त्या व्यासांचा उल्लेख सुद्धा अनेकदा कृष्ण रंगाचे म्हणूनच केला जातो अनेकदा त्यांना कृष्णव्यास असेही म्हटले गेलेले आहे याचे कारण त्यांची माताजी सत्यवती होती आणि तिचा सावळा रंग त्यांच्यात उतरणे हेच स्वाभाविक होते . अलीकडे आपल्याकडे अनेकदा तिचा रंग गोरा दाखवला जातो पण त्यात तथ्य नाही तिच्या अंगाला माशाचा वास येत होता आणि तो वास नाहीसा केला अशी ही कहाणी नंतर सांगितली जाते पण या सर्व कथाकल्पना आहेत मूळ मुद्दा इतकाच होता की व्यास कृष्ण रंगाचे होते आणि त्यांनीच आत्ताचा ऋग्वेद रचला या ऋग्वेदामध्ये तुम्हाला वर्ण व्यवस्थेचे जास्त समर्थन दिसणार नाही कारण मुळात व्यास हेच संकरित आहेत . माझा स्वतःचा अंदाज असा आहे की त्यामुळेच ऋषी म्हणून ब्रम्हर्षी व्हायला ज्यांना नकार दिला गेला त्या क्षत्रिय असलेल्या विश्वामित्रांचे आख्खे मंडल ऋग्वेदामध्ये त्यांनी समाविष्ट करून टाकलेले आहे . व्यास हे स्वतः कुठलेही मंडल रचत नाहीत ते फक्त संकलनाचे काम करत आहेत . हे संकलन नेमके कुठल्या शतकात झाले हे सांगणे आता आवघडून बसलेले आहे. शक्य आहे की मुळात महाभारत आणि ऋग्वेद या दोन्ही ग्रंथांवरचे काम ते एकत्रच करत होते . प्रथम ऋग्वेदावर संकलनाचे काम झालेले आहे ज्यामध्ये जन्मदत्त वर्ण व्यवस्था मान्य नाही आणि त्यानंतर महाभारताचे काम झालेले आहे ज्यामध्ये वर्णसंकरावरून युद्ध झालेले आहे त्यामुळेच आपण जर का महर्षी वेदव्यास यांचे शेवटचे उद्गार पाहिले तर ते उद्बोधक आहेत. व्यास म्हणतात धर्म लयाला गेलेला आहे . याचा अर्थ प्रत्यक्षामध्ये वर्ण जात व्यवस्था न मानणारा वर्ण संकर आनंदाने स्वीकारणारा वैदिक धर्म लयाला गेलेला आहे आणि वर्ण संकराला ठाम नकार देणारा त्यावर अजिबात विश्वास न ठेवणारा वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा वैष्णव धर्म आता जन्मलेला आहे असा आहे . त्यांच्या या सगळ्या शब्दांमध्ये प्रचंड हळहळ आहे त्याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही . महाभारतामध्ये त्यामुळेच दोन्ही धर्म सादर होत राहतात कारण प्रत्यक्ष त्या काळामध्ये हे दोन्ही धर्म जिवंत होते सळसळत होते. एकीकडे ब्रह्म धर्म वेदांत धर्म आणि सांख्य धर्म यांनी युक्त वैदिक धर्म होता तर दुसऱ्या बाजूला श्रुतीस्मृतीपुराणोक्त ब्राह्मण धर्म स्वीकारणारा वैष्णव भागवत धर्म होता . याशिवाय शैव-धर्मातले सर्व धर्म महाभारतामध्ये उपस्थित असतात याचे कारण त्याचाही प्रभाव पडलेला होता .
ऋग्वेदाच्या संदर्भातला सर्वात मोठा गुंतागुंतीचा जर कुठला प्रश्न असेल तर तो म्हणजे शंकराने नंतर राजे लोकांच्या संदर्भातल्या ज्या तीन परंपरा दिल्या होत्या त्यापैकी मरुद आणि इंद या दोन परंपरांचा ऋग्वेदावर परिणाम आहे का ? भारताची जी मुख्य ओळख जगभर दिसते ती इंद हीच आहे याच्यामुळेच इंडिया आलेला आहे इंडिका आलेला आहे आणि चीनमध्ये सुद्धा हाच शब्द थोडासा बदलून आलेला आहे . ही जी इंदुमती म्हणजेच शंकराची मती आहे म्हणजेच बुद्धिमत्ता आहे तिला एक प्रकारचा आदरच दिला गेलेला दिसतो .
प्रश्न असा आहे की यातील जो मरूद आहे ज्याचा संबंध थेट मरुत गणाशी आहे आणि ज्याच्या प्रमुखाला ऋग्वेदिक लोकांच्या मध्ये रुद्र म्हटले जात होते त्याचा ऋग्वेदावर किती परिणाम आहे ?
आणि असाच दुसरा शब्द म्हणजे इंद परंपरेतील राजाला जे नाव होते त्याचेच नंतर इंद्र झाले आहे का ? ही शक्यता नाकारता येत नाही .
प्रश्न असा आहे की मग नेमके झाले काय ?
मी मागेच म्हटल्याप्रमाणे देवगण हा शंकरांच्या काळापासूनच अस्तित्वात आहे आणि याच देव गणा मधून पार्वती आलेली आहे. हा हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशांमध्ये होता आणि तो एक अफाट संख्येचा गण आहे . याने सुद्धा खुद्द शिव शैवधर्म स्वीकारला होता यांचा जो मुख्य ऋषी कश्यप तोही शिवभक्त झाला त्यानंतर या गणाचा इतिहास बदलला . याच गणा मधला ब्रह्मदेव हा शंकराकडे शिष्य म्हणून आला आणि शंकराने त्याला जे शिकवले त्यालाच आता आपण ब्रह्मसूत्र असं म्हणतो . त्यातूनच मग बमन परंपरा तयार झाली जिचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखावर आहे . त्यांच्या मधूनच पुढे मग एक वर्ग तयार झाला तो म्हणजे बमन पंडित होय
अर्थातच या काळामध्ये देव गणामधील सर्वांनी शिव स्वीकारला नाही शैव श्रुती स्वीकारली नाही हे सर्व लोक पराभूत झाल्यामुळे स्थलांतरित झाले आणि ते थेट इराण मध्ये पोहोचले तिथे त्यांनी आपला मूळ वेद जतन केला मात्र त्यांच्या दुर्दैवाने किंवा सुर्देवाने एका विशिष्ट कालखंडामध्ये साधारण इसवी सन पूर्व 2000 च्या आसपास झरतृष्ट झाला आणि त्याच्यातून जो धर्म निर्माण झाला त्याच्यामुळे या वर्णाला या लोकांना पुन्हा एकदा भारतात परतावे लागले हे मग म्हणजे नंतरचे होते हे जेव्हा भारतात आले तेव्हा विलक्षण नम्र होते परंतु हळूहळू त्यांनी आपला स्वतःचा वेद भारतामध्ये आणला या वेदाचा आणि भारतामधल्या वेदाचा संगम होऊन आत्ताचा ऋग्वेद तयार झालेला आहे . गोरा रंग म्हणजे फक्त बाहेरून आलेला असे काहीतरी विचित्र समीकरण काही लोकांच्या डोक्यात असते पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की हिमालयाच्या पायथ्याशी असणारे लोक बर्फामुळे आपोआपच गोरे होत गेले आणि गोरा हा रंग सुद्धा इंडियन आहे या देव गणा मधूनच जे एकेकाळी मांत्रिक लोक होते तेच नंतर पंडित झाले. पुढे मग ब्राह्मण लोकांनी ज्यांनी शैव धर्म नस्वीकारायला नकार दिला होता त्यांनी पंडित लोकांना आत्मसात करायला सुरुवात केली तर पंडित भगत लोकांनी ब्राह्मणांना आत्मसात करायला प्रारंभ केला आणि यातूनच आत्ताचा ब्राह्मण धर्म आणि ब्राह्मण वर्ण तयार झालेला आहे . त्यामुळे ऋग्वेद हा एकाच वेळेला भारतीय वाटतो आणि बाहेरून आलेला आहे असेही वाटतो . प्रत्यक्षामध्ये तो या दोन संस्कृतींच्या संगमाचा परिणाम आहे . आपल्याकडे फालतूमध्ये गंगा जमुना तहजीब म्हणतात प्रत्यक्षामध्ये गंगा सरस्वती तहजीब आहे मिलन आहे . यातील सरस्वती ही युरेशियन परंपरेमधून आलेली आहे तर गंगा ही शैव परंपरेमधून आलेली आहे. दोन्ही नावे नदीसाठी वापरली जातात .
शैव धर्मापासून स्वतःला स्वतंत्र ठेवण्याचा हा ब्राह्मण लोकांचा अट्टाहास नेमका कशासाठी चाललेला आहे हे उघड आहे . या लोकांना वर्णव्यवस्थेतले सर्वोच्च स्थान सोडायचे नसते आणि म्हणूनच सर्व ब्राह्मण लोक अत्यंत आदराने आणि मानाने स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेत असतात . पंडित म्हणवून घेतले तर सन्मान मिळणे शक्य नाही असे त्यांना वाटते .
पुरोगामी कालखंडामध्ये गोष्टी बदलल्या आणि पंडित शब्द अधिक सन्माननीय झाला तर ब्राह्मण हा शब्द हळूहळू कारस्थानी माणसासाठी वापरला जायला लागला . आज हा शब्द द्वेष निर्माण करतो . त्या उलट पंडित हा मात्र जगभरात सर्व भाषांच्या मध्ये हळूहळू स्वीकारला जात आहे . कारण सर्वांनाच माहिती आहे की पंडित लोकांनी वर्ण जात व्यवस्था निर्माण केलेली नाही ती ब्राह्मण लोकांनी निर्माण केलेली आहे.
हे सर्व इतके धगधगते राहण्याचे आणखी एक कारण असे होते की युरोशियन मधून जे लोक आले होते त्यांच्यामध्ये जे शामन लोक होते त्यांनी ब्राह्मण म्हणून काम करायला सुरुवात केली हे फक्त इथेच थांबले नाही तर जे ग्रीक लोकांच्या मधून पुरोहित लोक आले त्यांनी सुद्धा सुरुवातीला शैव धर्म स्वीकारला पण हळूहळू स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणे सुरू केले म्हणजेच एका अर्थाने युरेशिया इराण ग्रीस यामधून मायग्रेट झालेल्या लोकांनी स्वतःची उच्च ओळख प्रस्थापित करण्यासाठी म्हणून ब्राह्मण धर्म निर्माण केला आणि तो धगधगता ठेवला . अलेक्झांडर बरोबर आलेले अनेक ग्रीक किंवा वेगवेगळ्या भूप्रदेशात त्याने जमा केलेले विद्वान लोक हे शेवटी ब्राह्मण बनले . यांना मांत्रिकीच पटलेली होती आणि ती त्यांना सोडायची गरज वाटत नव्हती म्हणूनच आज सुद्धा त्यांना वेद सोडायचे नसतात प्रत्यक्षात वेद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून यातूचे मंत्र आहेत . अथर्ववेद हा सुद्धा इथल्या शैव भगत पंडित लोकांनी निर्माण केलेला वेद आहे . यांनीच आपल्या भागवत परंपरेमधून भगत परंपरेमधून चालत आलेले अनेक मंत्र संस्कृत मध्ये भाषांतरित करत हा अथर्ववेद निर्माण केला . म्हणजेच आता आपण असे म्हणू शकतो की ब्राह्मण धर्म आणि परंपरा ही भारतातून इराणमध्ये गेलेले आणि पुन्हा परतलेले हिमालयन ब्राह्मण , युरोशियन समाजातून आलेले युरोशियन शामन , ग्रीक प्रदेशातून आलेले मांत्रिक पुरोहित लोक आणि भारतातल्याच शैव मांत्रिक परंपरेतले भगत लोक या सर्वांनी मिळून निर्माण केलेली आहे .
याच लोकांनी मग स्मृतींच्या साहाय्याने कायदा व्यवस्था दिली. विधीविधान दिले .
ज्या लोकांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला आहे त्यांच्यासाठी हे विधी विधान म्हणजेच कायदे व्यवस्था लागू आहे . शैव लोकांशी मात्र त्याचा काडीचाही संबंध नाही आणि त्यांना ती लागू नाही किंबहुना ती कधीच लागू नव्हती . ती तशी लागू होते असा गैरसमज नेमका का पसरवला गेला हा एकोणिसाव्या शतकामधला सर्वात मोठा प्रश्न आहे
याच ब्राह्मण परंपरेमधून मग महर्षी वेदव्यास यांनी ऋग्वेद निर्माण केला त्यामागचा उद्देश दोन्ही बाजू मांडणे असा होता त्यांच्या या ऋग्वेदाच्या आधारे नंतर मग अनेकांनी सामवेद आणि यजुर्वेद रचले तर त्यांच्या महाभारतावर अनेक गोष्टी रचल्या गेल्या
आपण जर बारकाईने पाहिले तर मांत्रिकीचा प्रभाव काही महर्षी व्यासांच्या मनातून ओसरलेला दिसत नाही . किंबहुना महर्षी व्यास यांचा या मांत्रिकीवर विश्वास आहे असे स्पष्ट दिसते . त्यामुळेच महाभारताने मांत्रिकी परंपरा अधिक दृढ केली आणि या मांत्रिक परंपरेच्या नादाला लागल्यामुळेच भारताचा ऱ्हास झाला .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment