राहुल गांधी ,मनुस्मृती, कुराण आणि स्त्रिया श्रीधर तिळवे नाईक
ब्राह्मण धर्मी हिंदुत्वाने हळूहळू संपूर्ण हिंदुत्वावरच करत आणलेला कब्जा आणि राहुल गांधी यांचे मनःस्मृती संदर्भातले उद्गार यांचा एक कार्यकारण संबंध आहे हिंदुत्ववादी लोकांना इस्लामचे भय आहे तर पुरोगामी लोकांना मनुस्मृति आणि ब्राह्मण धर्म परत येईल याचे भय आहे याचा एक परिणाम असा झालेला आहे की संपूर्ण देशच आता भयग्रस्त झालेला आहे आणि जो भयग्रस्त होणार नाही त्याला घाबरवता येईल म्हणून काय करता यावे काय करावे काय करता येईल अशा तऱ्हेचे प्रश्न घाबरवणाऱ्या लोकांच्या मनामध्ये येत आहेत . ते नवीन नवीन तंत्र शोधत आहेत . मला वाटते जगाच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत कधीही भय एवढे केंद्रस्थानी नव्हते.
मुळातच राजकारणाचा आधार सुरक्षितता आहे असलेल्या आणि काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या शत्रूंच्या पासून संरक्षण करणे हे प्रत्येक गणासाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी आवश्यक असल्याने त्यासाठी एक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असते आणि या व्यवस्थेचे नियंत्रण ज्याच्या हातात ठेवले जाते तो नियंत्रक म्हणजे सत्ताधारी राजकारणी होय. साहजिकच राजकारणामध्ये, असलेला, होऊ शकेल असा किंवा काल्पनिक असा शत्रू दाखवावा लागतो . त्याशिवाय राजकारण पुढे सरकत नाही . अशावेळी खरा शत्रू कुठला आणि काल्पनिक शत्रू कुठला आणि संभाव्य शत्रू कुठला हे तुम्हाला वारंवार व्यवस्थित सांगावे लागते. अनेकदा असे होते की एखादा शत्रू काल्पनिक वाटतो पण प्रत्यक्षात तो खरा असतो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना चायना पासून भय आहे धोका आहे चायना आपला शत्रू आहे हे फार व्यवस्थित कळले होते परंतु आक्रमण होईपर्यंत पुरोगामी लोकांना विशेषता डाव्या पुरोगाम्यांना हा शत्रू काल्पनिक वाटत होता. मोदींच्या राजवटीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या शत्रूंची वाढलेली संख्या . मित्र कमी होत जाणे आणि शत्रू वाढत जाणे हे तुमचे धोरण अपयशी झाल्याचे लक्षण असते.
याबाबतीतली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ब्राह्मणी हिंदुत्वाने अलीकडे बहुजन समाजालाच शत्रू करायचे ठरवलेले आहे असे दिसते. त्यामुळेच मनुस्मृती वाद पुन्हा एकदा बोकाळलेला दिसतो . आपण हे करून हिंदुत्वाच्या पायावर कुराड मारतो आहोत इतके सुद्धा भान उरलेले नाही . तुम्ही जशी मनुस्मृति बघता तशी ती बहुजन समाज बघत नाही या मनुस्मृतीच्या परिणामामुळेच बहुजन समाजाला गेली हजार वर्षे प्रचंड त्रास झालेला आहे तो त्रास न बघता तुम्ही फक्त तुमचा फायदा बघतात आणि तुम्ही असे सिद्ध करू पाहता की तुमच्या या फायद्याला बहुजन समाजाने मदत करावी . हे कसे शक्य आहे ? शोषित माणूस शोषक ग्रंथांना का पाठिंबा देईल ? कि शोषकाची अजूनही मानसिकता मनुस्मृतीमध्येच अडकलेली आहे असे शोषित लोकांनी समजावे ?
अनेक लोक मनुस्मृतीमुळे भारतात पहिल्यांदा लिखित स्वरूपात कायदा झाला असे प्रतिपादन करत असतात पण त्याच्यातही ऐतिहासिक तथ्य दिसत नाही पहिले लिखित कायदे हे बाहेरच झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे कायद्याची मौखिक सुरुवात मात्र भारतातच झालेली आहे. अनुशासन आणि शिलव्यवस्था ही देणगी भारताचीच आहे आणि जे काही भविष्यात पुढे मौखिक किंवा आत्ताच्या सिंधू संस्कृतीमधील लिपीमध्ये कायदे निर्माण झाले ते पूर्णपणे यांच्या आधारित निर्माण झाली म्हणजे कायद्याचा फाउंडेशन स्टोन हा भारतातच टाकला गेलेला आहे याबद्दल शंका असण्याचे कारण नाही प्रश्न असा आहे की हे फाउंडेशन स्टोन हलवून त्या जागी मनुस्मृती आणण्याचे कारस्थान नेमके कधी सुरू झाले आणि ते कोणी सुरू केले . कौटिल्याला सुद्धा या स्मृतीचा आधार असावा असे स्पष्ट दिसते कारण तो सुद्धा वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करताना दिसतो . वेगवेगळ्या वर्गासाठी वेगवेगळी कायदे स्पष्टपणे अर्थशास्त्रामध्ये नोंदवलेली आहेत तेव्हा आम्ही काहीतरी फार सज्जन होतो असे दाखवण्याचा जो प्रयत्न काही सनातन हिंदू करत आहेत तो सफल होणे शक्य नाही कारण पुरावे तुमच्या बाजूने नाहीत. उलट त्यामुळेच हिंदुत्ववादी लोकांच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांची प्रतिमा खोटारडे अशी तयार होत जाते . एकदा सर्व हिंदुत्ववादी लोकांनी नीट बसून याचा विचार करावा आणि खरोखरच आपली खोटारडी अशी प्रतिमा तयार करायची आहे का आणि आपण ती तयार केली तर खरोखर टिकणार आहे का आपण 21व्या शतकात आलेलो आहोत याची जाण आपल्याला आहे का असे प्रश्न विचारावेत असे प्रश्न स्वतःला विचारणे आता फार गरजेचे झालेले आहे आत्मपरीक्षण टाळणारे लोक मुठभर आलेल्या मुस्लिम लोकांच्याकडून सुद्धा पराभूत झालेले दिसतात कारण आपलं काय चुकतंय हे बघायचं नाहीये आम्ही जन्मजातच हुशार आणि बरोबर आहोत अशी धारणा आहे अशी धारणा असली की मग काय होते त्याचा नमुना म्हणजे आत्ताचा ब्राह्मणी हिंदुत्ववाद आहे
त्यामुळे याच ब्राह्मणी हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर आपणाला राहुल गांधी यांचे भाषण बघावे लागते .मनुस्मृतीचा विषय पुन्हा एकदा राजकीय पटलावर आणल्यामुळे साहजिकच त्यावर चर्चा होणे स्वाभाविक होते ज्या सभेत सर्व घडले ती सभा आश्चर्यकारक रित्या फक्त स्त्रियांच्या साठी होती की काय अशी शंका यावी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांची लोकसंख्या आली होती .
यानिमित्ताने पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे राहुल गांधी फक्त हिंदू लोकांची स्मृती पुढे करतात परंतु ज्यू (यहुदी ) आणि ख्रिश्चन लोकांना प्रमाण असणारा कायदा आणि याच कायद्यांच्या आधारे उभे राहिलेले इस्लामचे शरीयत यावर मात्र टीका करत नाहीत वास्तविक ही टीका योग्य आहे परंतु तिची कसलीही दखल पुरोगामी लोक कधीही घेत नाहीत कारण हे सगळेच्या सगळे परसंस्कृतीधार्जिणे आहेत . ते तसे का आहेत याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या लोकांचा एक फार मोठा गैरसमज असा आहे की युरोपियन संस्कृतीची जी प्रगती झाली ती ही या धर्मांच्या मुळे झाली. वास्तविक वस्तुस्थिती वेगळी आहे युरोपची जी काही वैज्ञानिक प्रगती झाली ती या धर्मांना अत्यंत ठामपणे विरोध केल्यामुळे झाली . अगदी तुर्कस्तान मध्येसुद्धा कमाल पाशा अतिशय प्रभावी ठरला होता त्याचे कारण त्याने सरळ सरळ शरीयत बाजूला काढले आणि तो एकमेव मुसलमान नेता असा होता जो पुरोगामी होता आणि ज्याने इस्लाम नाकारला. आपल्याकडे अशाच प्रकारचे काम सर्व पुरोगामी लोकांनी केले केले असते तर आज जे काही घडते आहे ते घडले नसते परंतु भारताची सर्वात मोठी शोकांतिका पुरोगामी शोकांतिका कुठले असेल तर आपले पुरोगामी लोक अर्धवट पुरोगामी होते त्यामुळेच भारतातले सर्व धर्म आणि भारतात आलेले सर्वधर्म नाकारायला हवे होते ते या पुरोगामी वादामध्ये नाकारले गेले नाहीत. उलट धर्मनिरपेक्षता सेक्युलर वाद ही एक अत्यंत धूर्तपणाने भांडवलशाहीने खेळलेली खेळी होते हे सुद्धा या लोकांच्या लक्षात आले नाही . त्यामुळेच धर्म नाकारण्यासाठी जे करायचे असते ते आपल्या संविधानाच्या निर्मात्या लोकांनी केले नाही हीच वस्तुस्थिती आहे त्याची कारणे मग काहीही असोत भारतातला एकही पुरोगामी संपूर्ण पुरोगामी असत नाही सगळे अर्धवट पुरोगामी असतात आपले संविधान बनवणारे लोक सुद्धा त्याला अपवाद नाहीत त्यामुळेच संविधान बनवताना धर्माच्या कायद्याचा धार्मिक ग्रंथांचा कारण नसताना आदर केला गेला आधार घेतला गेला . आता ही गोष्ट दुरुस्त करण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी लोकांच्यावर होती पण ही जबाबदारी घेणे दूर उलट या काळातील ब्राह्मणी हिंदुत्ववादाने मनुस्मृती व इतर स्मृतींना प्रमाण मानण्याचा अधिकार आग्रह धरला या लोकांनी उलट हिंदू कायदे मनुस्मृतीचे कायदे परत आले पाहिजेत अशा प्रकारच्या प्रतिपादनांना सुरुवात केली आणि म्हणूनच मग त्याचा कळत नकळत दबाव संविधान निर्माण करणाऱ्या लोकांच्या वर पडल्या पडल्या म्हणजेच एका अर्थाने पुरोगामी आणि हिंदुत्ववादी असे दोन्ही लोक आत्ताच्या संविधानाला जबाबदार आहे त्या संविधानामधील धार्मिक गोष्टींना जबाबदार आहेत .
गेली कित्येक वर्षे हिंदुत्ववादी लोकांना सत्ता मिळाली नाही पण अलीकडे शैव हिंदुत्व वादाने मदत केल्याने हिंदुत्ववाद सत्तेवर आला आणि या शैव हिंदुत्ववादाने केलेले उपकार विसरून ब्राह्मणी हिंदुत्ववादाने पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि शैव हिंदुत्व कुंभमेळ्या पुरते मर्यादित करून टाकले . त्यामुळे तिथे सुद्धा हळूहळू जय श्रीराम गुंजायाला लागले आणि सत्तेवर शैव हिंदुत्व आहे कुठे असा प्रश्न निर्माण झाला. बहुजन समाजाला कसलीही जागा द्यायची नाही अशी जण प्रतिज्ञा केल्यासारखे लोक वागायला लागले . आपण बहुजन समाजाच्या शैव हिंदुत्वाच्या आधारे सत्तेवर आलेलो आहोत याचा विसर खुद्द हिंदुत्ववादी लोकांना पडला आणि अचानक मग एकापेक्षा एक प्रचार सुरू झाले आणि हे सर्व प्रचार ब्राह्मण धर्मीय हिंदुत्वाचे होते त्यामुळे खरोखर या देशांमध्ये मनुस्मृति येते की काय अशी शंका काही लोकांच्या मनात यायला लागली विशेषतः पुरोगामी लोकांच्या मनामध्ये ती जास्त यायला लागली
त्यामुळेच राहुल गांधी यांना अशा प्रकारची प्रतिक्रिया देणे भाग पडले . पण ही प्रतिक्रिया देताना कळत नकळत राहुल गांधी सुद्धा एकतर्फी झाले. राहुल गांधींना एका गोष्टीचा विसर पडलेला दिसतो तो म्हणजे भारतामध्ये काही कट्टर लोक इस्लामचे कायदे आले पाहिजेत असे म्हणणारे आहेत तर त्यांना सुद्धा तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे पण इथेच काँग्रेसचा अल्पसंख्यांक तूष्टीकरण वाद येतो . त्यामुळे भारतीय जनतेची अवस्था आता विशेषता बहुजन लोकांची अवस्था आता इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे. जेव्हा दोन्ही बाजूंना धार्मिक मूर्खपणा उभा असतो तेव्हा शहाण्या माणसाला त्या मूर्खपणाचे काय करायचे असाच प्रश्न पडत असतो . यातूनच मग राहुल गांधी इस्लाम वर बोलत नाहीत जुडाईक धर्मावर बोलत नाहीत. प्रश्न असा आहे की पुरोगामी लोकांचे हे नेमके काय होते असे नेमके का होते तर यामागे काही गृहीतके आहेत ही गृहीतके कोणती तर ती पुढील प्रमाणे
१ धार्मिक टीका करणाऱ्याने फक्त स्वतःच्या धर्मावर टीका करावी धार्मिक टीका करणाऱ्या माणसाचा स्वतःचा धर्म बघितला जावा
२ धार्मिक टीका करणाऱ्या माणसाने दुसऱ्याच्या धर्मावर टीका करू नये
वास्तविक हे गृहीतकच अत्यंत चुकीचे आहे आणि सेक्युलर वादामध्ये ज्या काही विचित्र गोष्टी तयार झाल्या विचित्र गैरसमज तयार झाले त्यामध्ये ही गृहीतके आहेत . पुरोगामी लोकांच्या केंद्रस्थानी अनेकदा प्रत्येक पुरोगामी वादाने स्पॉन्सर केलेला प्रगती वाद असतो . त्यामुळेच एकदा आर्थिक सामाजिक प्रगती झाली राजकीय प्रगती झाली की आपोआपच धार्मिक प्रगती सुद्धा होऊन मुस्लिम सुधारतील इस्लाम सुधारेल अशी काहीतरी भ्रामक समजूत पुरोगामी लोकांची झालेली आहे प्रत्यक्षामध्ये मुस्लिम जाऊ द्या हिंदू लोक सुद्धा प्रगतीमुळे फार सुधारले असे म्हणवत नाही . मुळातच हे गृहीतक चुकीचे आहे कारण प्रत्येक क्षेत्र हे वेगळे असते आणि धर्म तर खूपच वेगळा असतो त्यामुळे तुम्हाला धर्माच्या क्षेत्रात लोक बदलावेत असे वाटत असेल तर तुम्हाला धार्मिक क्रांतीच करावी लागते किंवा मग धर्म हाच मोठा भ्रम आहे असे सांगून धर्म हटवून त्या जागी मोक्ष आणावा लागतो त्याचे पंचशील किंवा द्वादशशील आणावे लागते . पण ते राहिले बाजूला धर्मनिरपेक्षता वादाच्या नावाखाली पुरोगामी लोक अनेकदा दुसऱ्या धर्मावर टीका सुद्धा करायची अनुमती नाकारतात की काय अशी शंका येते. त्यामुळे हे लोक आमचा धर्म हिंदू आहे म्हणून आम्ही हिंदू धर्मावर टीका करणार अशी काहीतरी विचित्र भूमिका घेत असतात वास्तविक तुम्ही पुरोगामी असता तेव्हा कुठल्या धर्माचे नसता तुम्ही नास्तिक असता तुम्ही कुठल्याच धर्माचे असण्या ऐवजी तुम्ही फक्त पुरोगामी असता. त्यामुळे प्रत्येक धर्मावर तुम्ही टीका केली पाहिजे तरच तुम्ही खरे पुरोगामी आहात किंबहुना एखादा मनुष्य पुरोगामी आहे की नाही हे तपासायचे असेल तर तो स्वतःच्या आणि इतरांच्या धर्मावर टीका करतो की नाही हे पाहावे दूध का दूध पानी का पानी होऊन जाते . अनेकदा तर धर्मटीकेपासूनच पुरोगामी वाद सुरू होतो आपल्याकडे बसवेश्वर याचे उत्तम उदाहरण आहे .
आपण जर का एकदा टीका करण्याचे स्वातंत्र्य दिले तर ते सर्वांना दिले गेले पाहिजे अन्यथा स्वातंत्र्याला काहीही अर्थ उरत नाही . कुठल्याही आयडिओलॉजी वर जशी टीका करण्याचे स्वातंत्र्य असते तसेच धर्मावर सुद्धा टीका करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे याचे कारण धर्म हा स्वतःच पॉलिटिकल आयडियालॉजी आहे आपल्याकडे अजूनही ही गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही हे खरोखर आश्चर्यकारक आहे फक्त इस्लाम बाबत त्याचे राजकारण जास्त स्पष्टपणे कळते पण वस्तुस्थिती अशी आहे की ब्राह्मणधर्म असो त्यांची स्मृती असो किंवा इस्लाम असो इस्लामचे शरीयत असो या सर्वच प्राचीन राजकीय विचारसरणी आहेत . त्यामुळेच राहुल गांधी यांनी आता टीका करताना दोन्हींच्यावर टीका करावी अन्यथा मग राहुल गांधी सुद्धा राजकारणच करत आहेत असे म्हणावे लागेल आणि हे राजकारण अल्पसंख्यांकांचे लाड याच केंद्रबिंदूभोवती फिरते . काँग्रेसने केलेली ही मूलभूत चूक हिंदुत्ववाद्यांच्यासाठी फायद्याची ठरली हे मी खूपदा सांगितलेले आहे आता पुन्हा एकदा तीच चूक तुम्ही करणार असाल तर तुम्हाला शैव लोकांनी मते का द्यावीत ?
राहुल गांधींच्या बाबतीत तर वस्तुस्थिती पण वेगळी आहे म्हणजे असे की त्यांच्या आईचा धर्म ख्रिश्चन असल्यामुळे ख्रिश्चन धर्मावर तरी किमान टीका त्यांना करता आलीच असती मुळातच जुड्याइक धर्मांचा कायदा जो आहे तो जू लोकांच्यापासून सुरू होतो आणि खुद्द मुस्लिम लोकांच्या पवित्र कुराण या पुस्तकामध्ये सुद्धा बरीचशी उसनवारी या ज्यू लोकांच्या ओल्ड टेस्टमेन्ट मधून केलेली आहे. त्यामुळे खरे तर हा कायदा ज्यू म्हणजेच यहूदी लोकांच्या संदर्भातच प्रथम तपासला पाहिजे अनेकांचा असा समज आहे की मुस्लिम लोकांचा जो काही हिंसात्मक दृष्टिकोन आहे तो थेट कुराणा मधून आलेला आहे प्रत्यक्षामध्ये त्याची सर्व बीजे यहुदी लोकांच्या कायद्यामध्ये आहेत. हेच कायदे पुढे ख्रिश्चन धर्माने स्वीकारलेले आहेत आणि काही बदल पण केलेले आहेत नंतर मग इस्लामने पण काही बदल केले आणि महंमद पैगंबर यांच्या उत्तर कालखंडामध्ये युद्धांच्या मुळे फार मोठ्या प्रमाणात नंतर जिहादी कायद्यांची भर घातली गेली. आपल्याकडे धर्म चुकला किंवा धर्म संस्थापक चुकला असे म्हणण्याची सोय नाही त्यामुळे सर्वजण धर्माला आणि धर्म संस्थापकांना सांभाळून घेत असतात तो मानवी स्वभाव आहे आणि त्यामागे आपला जीव जाईल किंवा धार्मिक लोक आपला जीव घेतील ही भीती असते . अलीकडे आपल्या पुरोगामी लोकांच्या मध्ये सुद्धा अशाच प्रकारची टीका पुरोगामी संस्थापकांच्यावर केली तर ती चालत नाही त्यामुळे या लोकांना सांभाळून घेऊन या लोकांच्यावर टीका करणे टाळून मांडणी करावी लागते . पण याचा एक दुष्परिणाम असा झालेला आहे की स्वातंत्र्य म्हणजे फक्त धर्माव्यतिरिक्त इतर गोष्टींच्या वर टीका करण्याचे स्वातंत्र्य अशी व्याख्या झालेली आहे . धार्मिक स्वातंत्र्याला काहीही अर्थ उरलेला नाही वास्तविक नास्तिक लोकांना त्यांचा नास्तिक वाद मांडण्याचा आणि त्या नास्तिकवादाचा मंडन करण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे त्यांना इतरांच्या धार्मिक विचारप्रणालीवर राजकीय विचारप्रणालीवर टीका करण्याचा सुद्धा पूर्ण अधिकार आहे राहुल गांधी हे सिलेक्टिव अधिकार बनवताना दिसतात म्हणून ही टीका होते आहे. एक गोष्ट आता सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे कारण अनेकांना पुरोगामी वाद आपोआपच अलगद धर्माच्या दिशेने चालत आला असे वाटते प्रत्यक्षात असे घडलेले नाही.
जवळजवळ बाराशे पर्यंत युरोप वर याच ज्युदाइक धार्मिक कायद्यांनी राज्य केलेले आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे कोणी काहीही बोलत नाही कारण असा बोलण्याचा अधिकार नाही असा काहीतरी गैरसमज अनेकांचा झालेला आहे . धर्मनिरपेक्षता म्हणजे अब्राहमिक धर्मांना आंदण दिलेला फार मोठा प्रदेश आहे अशी काहीतरी ठाम गैरसमजुत सगळ्यांचीच झालेली आहे यातून आता ज्या काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या मात्र काही पुरोगामी लोकांना हँडल करता येत नाहीत किंबहुना त्यांना त्या हँडल करायच्या नाहीत त्यांना असे वाटते की इस्लामचा प्रश्न पोस्टपोन केला तर आपोआप सुटेल पण प्रत्यक्षात तो टाळून सुटणार नाही कारण तो आता दारात आलाय आणि हळूहळू तो काही ठिकाणी तर घर ताब्यात घेऊन बसलाय
राहुल गांधी कधीही या जुड्याइक धर्माच्या कायद्यांना हात घालत नाहीत जणूकाय या कायद्यांच्या मध्ये काय आहे हे त्यांना माहित नाही त्यांना कोणी तरी जाऊन हे सांगितले पाहिजे की ज्या उदारमतवादी धोरणाच्या बाजूने लिबरल डेमोक्रसीच्या बाजूने आणि आधाराने ते लढत आहेत ते उदारमतवादी धोरण धर्माच्या विरोधात लढून मिळालेले आहे त्यासाठी अनेकांना आपल्या आयुष्याचे बलिदान द्यावे लागलेले आहे तेव्हा ख्रिश्चन धर्म म्हणजे उदारमतवाद वगैरे अशी काही त्यांची गैरसमजुत असेल तर त्यांनी ती काढलेली बरी! इस्लाम तर ख्रिश्चन धर्म इतका ही उदार नाही आणि हिंदू लोकांचे विचाराल तर हिंदू लोकांच्या पैकी 99% लोकांना मनुस्मृति काय आहे ही भानगडच माहीत नाही मात्र ब्राह्मण धर्मातील लोकांना मग ते ब्राह्मण असो की क्षत्रिय मनुस्मृति म्हणजे काय हे नीट माहिती आहे त्यामुळे राहुल गांधी जे सांगत आहेत हे नेमके कोणाला सांगितले जाते तर ते ब्राह्मण हिंदुत्ववाद मांडणाऱ्या ब्राह्मणी हिंदुत्ववाद मांडणाऱ्या हिंदुत्ववादी लोकांना सतत सांगितले जाते आणि या लोकांच्या नावाने भय निर्माण करून मते मिळवणे हेच त्यामागचे उद्दिष्ट असते अन्यथा मनुस्मृती ही कधीही १२०० पर्यंत भारतामध्ये मुख्य कायदा नव्हती अपवाद फक्त केरळ होता आणि म्हणूनच केरळमध्ये ख्रिश्चन धर्म पसरला केरळ मध्ये सुद्धा हा कायदा असण्याचे सर्वात मोठे कारण तिथे मनुस्मृतीचा प्रभाव होता कारण केरळ वैष्णव झाला होता आणि शंकराचार्य हे केरळचे असल्याने त्यांचा प्रचंड प्रभाव पडत त्यांच्या नावाने श्रुती स्मृती पुराणोक्त धर्म स्वीकारला गेला आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झाला ताबडतोब ज्यांना या धर्मामध्ये शूद्र म्हणून जगायचे नव्हते त्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि केरळमध्ये ख्रिश्चन लोकांची संख्या वाढत गेली पुढे मग वैष्णव धर्म संपूर्ण भारतभर पसरला आणि संपूर्ण भारतभर मुस्लिम धर्म स्वीकारला जाण्याचे सर्वात मोठे कारण वैष्णव धर्माने आणलेली वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था होती .वैष्णव धर्म आज सुद्धा या गोष्टीची जबाबदारी घेत नाही कारण ब्राह्मणांना मुळात जबाबदारी घ्यायची नाही. याबाबतीत इस्लाम मधल्या चुकीच्या गोष्टींचे जबाबदारी न घेणारे मुस्लिम आणि ब्राह्मण आणि वैष्णव धर्मातल्या चुकीच्या गोष्टींची जबाबदारी न घेणारे ब्राह्मण एकाच टाईपचे आहेत. आपल्या धर्मातल्या चुका स्वीकारण्याची दोघांचीही तयारी नाही याला अपवाद आहेत पण ते अपवादच नियम सिद्ध करतात
आपल्याकडच्या उच्च लोकांना असे वाटते की खालच्या लोकांनी शूद्रच राहावे अतिसुद्रच राहावे आणि तरी धार्मिक हिंदुत्ववादी बनावे या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. हे शक्य नाही माणसे काही तुमची गुलाम बनायला जन्मलेली नाहीत . त्यामुळे तुम्ही जर काय त्यांना गुलाम म्हणून वागवाल तर ती आज ना उद्या धर्मांतर करणारच . तेव्हा ही जी आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी प्रवृत्ती आहे ती बदलली पाहिजे कोणीच कोणाचे काही झाकू नये आणि प्रत्येकाने दुसऱ्या मध्ये काय चांगले काय वाईट ते बघावे कारण व्यवहार करताना शेवटी या सर्व गोष्टी बघाव्या लागतात तिथे झाकण गिरी चालत नाही. मोक्षाचे एक नाव पारदर्शकता सुद्धा आहे . आणि कायद्याने पारदर्शकता जपली पाहिजे तरच कायदा कायदा राहतो अन्यथा तो अत्याचार बनत जातो.
मग राहुल गांधी यांची भीती अनाठायी आहे का ? तर नाही . हेही खरे की वर्णवादी मानसिकता आता पुन्हा एकदा प्रवेश करत आहे आणि काही ठिकाणी करून बसलेली आहे लोक पुन्हा एकदा एकमेकांचे वर्ण आणि जात विचारायला लागलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे स्त्रियांचे आहे आणि म्हणूनच राहुल गांधी यांनी जे मुद्दे मांडले ते फार महत्त्वाचे आहेत आणि ते महात्मा फुले यांच्यापासून अनेकांनी मांडलेले आहेत तेव्हा या मुद्द्यांच्या बद्दल शंका नाहीच आहे म्हणून मनुस्मृती ही जितक्या लवकर आपल्याला विसरता येईल तितक्या लवकर विसरावी हे बरे अन्यथा मुस्लिम आणि हिंदू लोकांच्यात काहीही फरक राहणार नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की उत्तर आधुनिकतेने संस्कृती केंद्रस्थानी आणली पुरोगामी व्यवस्थेला शह देण्यासाठी गेलेला हा एक उद्योग होता आणि हा उद्योग आता प्रचंड महागात पडताना दिसत आहे. कारण या संस्कृतीच्या नावाखालीच मुळात धर्म कम बॅक करून बसला अनेकांच्या हे लक्षातच आलेले नाही की संस्कृतीचा आधारच अनेकदा धर्म श्रद्धा असते अनेक लोक उत्तर आधुनिकतेच्या प्रेमात असतात कारण त्यांना उत्तर आधुनिकतेने नेमके ताटात काय वाढले आहे हेच कळत नाही आणि आमच्या सारखे जे लोक सुरुवातीपासून तिचा विरोध करत आहेत ते का विरोध करत आहेत हे सुद्धा पुरोगामी लोकांच्या लक्षात येत नाही तुम्हाला विरोध सर्व धर्मांनाच करावा लागेल फक्त हिंदू मतदारांच्या विरोधात बोलले की अल्पसंख्यांक लोकांची मते मिळतील हे जे पुरोगामी गणित आहे ते खूप जुने झाले. त्याने काही फायदा झालेला नाही त्यामुळे राहुल गांधी यांनी आता यापुढे फक्त मनुस्मृति दाखवू नये पवित्र कुराणामधील आयत सुद्धा दाखवावी किंवा जर का श्लोक किंवा आयत म्हणायचे नसेल तर निदान अर्थ काय आहे तो लक्षात घेऊन त्या अर्थासंदर्भात गोष्टी बोलाव्यात इस्लामचे संकट दारात आहे ही वस्तुस्थिती! याबाबतीत हिंदुत्ववाद्यांच्यावर टीका करण्यात काय फायदा ? कारण हे संकट काही फक्त हिंदुत्ववादी लोकांच्या दारात नाही ते सर्व समस्त शैव वैदिक वैष्णव ब्राह्मण ख्रिश्चन पारसी जैन बौद्ध शीख लिंगायत सगळ्यांच्या दारात आहे
उलट अशा तऱ्हेने फक्त एकतर्फी सगळा युक्तिवाद होत गेला तर पुढची निवडणूक तुम्ही पुन्हा हरणार आहात हा मुद्दा टाळून निवडणूक जिंकता येईल असा जो काही तुमचा अंदाज आहे तो खरा होण्याची शक्यता फार कमी आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हिंदुत्ववादी लोकांनी हिंदू लोकांच्या साठी आवश्यक असणारे समान नागरी कायदा अल्पसंख्यांक लोकसंख्या नियंत्रण कायदा या सारखे कायदेच केले नाहीत. आपण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत हे सुद्धा या लोकांच्या लक्षात आलेले नाही दुर्दैव एवढेच आहे की या सगळ्याची किंमत समस्त भारतीय लोकांना चुकवावी लागेल .
दोन्ही बाजूने बोंब असली की सत्याने काय करावे हा एक नेहमीच प्रश्न असतो . वाईट गोष्ट ही आहे की आपल्याकडचे भलेभले पुरोगामी लोक हल्ली इस्लामवर टीका करायला घाबरायला लागलेले आहेत वास्तविक आपण मुसलमान लोकांना भारतीय समजत असू तर त्यांचे भले कशात आहे हे त्यांना ठामपणे सांगितले पाहिजे त्यांना सांगितले पाहिजे की समान नागरी कायदा तुमच्या कल्याणासाठी आहे आता होते आहे असे की नवीन कायद्यांचा फायदा सर्व पुरुष मुसलमान लोकांना होतो आणि मुस्लिम स्त्रियांचा अपवाद वगळता जुन्या कायद्यांचा तोटा मात्र सहन करावा लागत नाही म्हणजे दोन्ही बाजूने कायदेशीर पातळीवर लाभ घेणे आणि खाणे सुरू आहे . याला आमच्या गावाकडे दोन्ही बाजूंनी ऊस खाणे म्हणतात अल्पसंख्यांक लोक हा प्रकार करत आहेत आणि म्हणूनच मेजॉरिटी हिंदू लोकांच्या मनामध्ये अल्पसंख्यांक लोकांच्या बद्दल एवढा तिरस्कार दाटायला लागला . भारतामध्ये मेजॉरिटी असणे हाच जणू काय क्राईम आहे अशा थाटामध्ये ट्रीटमेंट मिळायला लागली त्याचा राग आहे आणि त्यातून तिरस्कार निर्माण झालेला आहे त्या तिरस्काराचे नेमके कारण शोधण्याऐवजी काहीतरी भलत्याच गोष्टी अंडर लाईन करत बसणे असा एक नसता उद्योगच काही लोकांचा चालू असतो . त्याने काहीही साधणार नाही उलट पुरोगामी लोक म्हणजे भुरट्या लोकांचा अड्डा अशी ठाम समजूत दृढ होत जाते . हिंदुत्ववादी लोकांच्या प्रचाराला जो काही आधार , जोर आणि जोश मिळाला त्याला कारण हा काही मोजक्या भुरट्या लोकांचा भुरटेपणा आहे.
पण इस्लाम राजवट आल्यानंतर काय होते हे आता अफगाणिस्तान पाकिस्तान सिरिया सिद्ध झालेले आहे. बांगलादेशमध्ये किंवा भारतामध्ये बुरखा घालणारी स्त्री ही आपली भारतीयच आहे ती काही परकी नाही तेव्हा तिला बुरखा घालायचा की नाही याचे स्वातंत्र्य मिळायलाच पाहिजे जर का तिला कैटरीना कैफ सारखी बिकनी घालावीशी वाटत असेल तर तिला ते स्वातंत्र्य मिळाले पाहिजे त्या दिशेने तुम्ही तुमच्या विचाराचे बांधकाम बांधणार आहात की नाही? आपल्याकडच्या अनेक पुरोगामी लोकांचे प्रत्यक्षामध्ये मुस्लिम लोकांच्या वर काडीचेही प्रेम नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा फक्त मतदानाचा गट आहे
ज्याच्या मनामध्ये सर्व माणसांच्या विषयी प्रेम आहे करुणा आहे तो माणूस कधीही चुकीच्या कायद्यांच्या बाजूने उभा राहणार नाही मग ते कायदे कुठूनही येवोत उद्या जर का हिंदुत्ववादी लोकांनी स्वातंत्र्याचा गळा घोटणारे कायदे आणायला सुरुवात केली आणि त्यांची अंमलबजावणी तशी दिसायला लागली तर त्याचा सुद्धा निक्षून विरोध करावा लागेल . मी तो वेळोवेळी केलेलाही आहे कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसलीही गदा येता कामा नये याबाबतीत ब्राह्मणी हिंदुत्वाने जे उद्योग सुरू केलेले आहेत त्यामुळे त्याला रिएक्शन म्हणून स्मृतीला राजकीय विरोध सुद्धा आता सुरू होणे अटळ आहे आपण मुद्दे देत आहोत हे सुद्धा मनुस्मृतीवादी लोकांच्या लक्षात येत नाही आपण पूर्वी गंडवले तसे पुन्हा एकदा बहुजन समाजाला गंडवू शकतो असा एक कॉन्फिडन्स सुद्धा या लोकांना आलेला दिसतो हे लोक खरे तर हिंदुत्वाचे शत्रू आहेत . पण खुद्द हिंदुत्ववादी लोकांना हे कळते आहे का? जर कळाले असते तर पूर्वीच या लोकांना आवर घातला गेला असता पण आज स्थिती अशी आलेली आहे की हिंदुत्ववादी लोकांनाच ब्राह्मण लोकांनी लिहिलेले ब्राह्मण धर्माने स्पॉन्सर केलेले ब्राह्मणी हिंदुत्व आणायचा आहे असा समज हळूहळू पसरत चाललेला आहे आणि हा समज जर का खरा ठरणारा असेल तर तुमची ही हकालपट्टी अटळ आहे .
तेव्हा चुका दोन्ही बाजूंनी सुरू आहेत आणि दोन्ही बाजूंनी त्या दुरुस्त व्हाव्यात भारताचे भले आणि जगाचे भले त्यात आहे मुख्य म्हणजे मुसलमान समाजाचे भले तो किमान पुरोगामी निदान आधुनिक होण्यातच आहे हे त्याच्या वारंवार लक्षात आणून दिले पाहिजे . मुख्य म्हणजे एकदा सगळ्या मुस्लिम लोकांना शरीयत काय सांगते हे सांगणे आवश्यक आहे आणि हे कायदे चालणार आहेत का असा प्रश्न विचारावा बहुतेक मुसलमानांचा याला नकार आहे हा माझा अनुभव आहे . बहुतेकांना आत्ताचेच संविधानातले फौजदारी कायदे हवे आहेत . तेव्हा हा जो मोठा बागुलबुवा निर्माण केलेला आहे तो दुरुस्त केलेलाच बरा अन्यथा तो मोठा होत जाऊन भारताचाही पाकिस्तान अफगाणिस्तान व्ह्यायला वेळ लागणार नाही .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment