स्वातंत्र्य , निवड( चॉईस )आणि व्यवहार श्रीधर तिळवे नाईक
गेले कित्येक वर्षे मी एक आचार्य म्हणून शेकडो कुटुंबांना अनेक पालकांना पाहतो आहे आणि या पालकांच्या मुलांच्या आयुष्याचे काय झाले आहे तेही पाहत आहे. सर्वसाधारणपणे मोक्षाच्या पातळीवर निवडीचा प्रश्न येतच नाही तुम्ही सहज रित्या स्वाभाविकरीत्या choiceless जगत जाता. कारण मोक्ष हा असा चॉईस असतो की तो आपोआपच घडत जातो तिथे निवडीचे स्वातंत्र्य वगैरे प्रश्न येतच नाही एखाद्या प्राण्याला त्याचे भोजन जसे सहज कळते तसे तुम्हाला सहजपणे कळत जाते की आता काय करायला हवं परंतु अर्थ आणि काम यांच्या बाबतीत असे म्हणता येईल का? हा एक फार मोठा प्रश्न आहे
निवडीचे स्वातंत्र्य ही वस्तुस्थिती आहे का हा एक नेहमीच विसाव्या शतकामध्ये प्रचंड चर्चेला घेतला गेलेला प्रश्न आहे आपल्याकडे जे कृष्णमूर्तींनी याची चर्चा केली होती आणि ती करताना त्याने चॉईसलेस जगणे अशी संकल्पना मांडलेली होती एका अर्थाने अस्तित्व वादावर आणि समूहवादावर जे कृष्णमूर्ती यांनी केलेला हा प्रहार आहे कारण आधुनिक अस्तित्व वादाने नेहमीच माणसाला फक्त निवडीचे स्वातंत्र्य असते अशी भूमिका घेतलेली आहे . त्या उलट त्याचा प्रतिवाद करताना तुमची निवड सुद्धा समाज किंवा संस्कृती नियंत्रित करत असतो अशी भूमिका समूहवादी लोकांनी घेतलेली आहे समूह कुठलाही असला तरी त्यामध्ये आपल्याला आपली Passion फॉलो करता आली पाहिजे असे व्यक्तीवादाचे अस्तित्ववादाचे म्हणणे असते . अनेक कुटुंबामध्ये आपल्या मुलांना त्यामुळेच स्वातंत्र्य दिले जाते पण अलीकडे माझ्या असे लक्षात आलेले आहे की सर्वच मुलांना त्यांना मिळालेले स्वातंत्र्य हाताळता येत नाही अनेक मुले वाया गेलेली आहेत. त्यांनी आयुष्यामध्ये काहीही अचिव केलेले नाही अनेकांच्या बाबतीत तर गोष्ट अशी आहे की त्यांना आपली Passion काय आहे शेवटपर्यंत कळलेलं नाही याचा अर्थ असा की त्यांना अर्थ हा अक्ष नीट हाताळता आलेला नाही मोक्षाबाबत चॉईस लेस हे बरोबर आहे परंतु अर्थाचे आणि कामाचे काय ? हा प्रश्न या लोकांच्या अपयशामुळे निर्माण होतो . इथे यश आणि अपयश सामाजिक अंगाने मोजत नाही तर त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या अंगाने मी पाहतो आहे . वासुदेव गायतोंडे यांना यश मिळाले असेच मी मानतो भले त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आर्थिक यश फार मोठे मिळाले नाही आता त्यांना जे मिळते आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही याबद्दलच मला शंका आहे . येथे यश म्हणजे तुम्ही तुमच्या पॅशनचे रूपांतर कामांमध्ये करणे ही व्याख्या आहे . म्हणजे जर का संगीत ही तुमची पॅशन असेल तर संगीताच्या बाबतीत तुम्ही काय केले हा महत्त्वाचा प्रश्न आहे समाजाने मान्यता दिली की नाही हा प्रश्न नाही . त्यामुळे आपल्या मुलांना आपली फॅशन निवडता आली पाहिजे त्यांना तसेच स्वातंत्र्य आपण दिले पाहिजे. प्रश्न असा आहे की पॅशन ही निवड असते की चॉईसले असते स्पष्ट सांगायचे तर अनेकदा ती चॉईसलेस असते स्वाभाविक असते . तुम्हाला काही कोणी सांगत नाही की ही तुमची पॅशन आहे तुम्हाला स्वतःला आपोआपच जगताना कळत जाते की ही आपली पॅशन आहे . अनेकदा आपली मुले लेटेस्ट फॅशन काय आहे त्याप्रमाणे चालायला बघतात अशावेळी त्यांना सांगावे लागते की बाई ग किंवा बाबा रे तुला काय हवे आहे ते करण्यामध्ये तुला खरोखरच आनंद मिळतो का म्हणजे अभिनयाकडे प्रसिद्धी आहे म्हणून जाणे हे महत्त्वाचे नाही तर अभिनय करताना तुला खरोखर आनंद मिळतो की नाही हा खरा प्रश्न आहे तू तहान भूक विसरून अनेक तास सहजरीत्या तुझे काम म्हणजेच अभिनय हा इथे प्रश्न असेल तर अभिनय करताना अनेक तास तहानभूक विसरून काम करू शकतोस का हा खरा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्हाला तहानभूक विसरायला लावत नाही ती गोष्ट तुमची पॅशनच नव्हे तेव्हा आधी खरोखर पॅशन ही पॅशन आहे की नाही हे पहा हे मुलांना समजवावे लागते आणि सांगावे लागते की "आधी तू व्यवस्थित पॅशन आणि चॉईस या दोन गोष्टी समजून घे . केवळ अमुक एक गोष्ट फॅशनमध्ये आहे म्हणून तू ती करावी याला काहीही अर्थ नाही इथे त्याला मग निवड करणे म्हणजे काय हे शिकवावे लागते . अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्धी हा एक असा फॅक्टर बनलेला आहे की तोच अनेकदा Passion बनलेला दिसतो प्रत्यक्षामध्ये मग ज्या मार्गाने प्रसिद्धी मिळेल तो मार्ग खरा अशी अनेकांची गैरसमजुत होते यातून मग अनेक लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्षामध्ये त्या गोष्टीसाठी किती कष्ट करावे लागतात ते कळत नाही तेव्हा मग हे लोक त्या मेहनतीला कंटाळून निघून जातात . अनेकांना एका रिल पुरती किंवा एका फिल्म पुरती प्रसिद्धी मिळते परंतु ही टिकत नाही याचे कारण अनेकदा ती Passion नसते त्यामुळे त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी नसते.
काम या अक्षाबाबत सर्वात मोठा प्रश्न नेहमीच पार्टनरची निवड असतो ही निवड खरोखर प्रत्येकाला व्यवस्थित जमते का आपण स्वातंत्र्य दिले तरी या संदर्भात स्वातंत्र्य नीट हाताळले जाते का? अनेक मुले आणि मुली चुकीची निवड सुद्धा करतात असा अनुभव आहे . अशा वेळेला सर्वसाधारणपणे चूक सुद्धा आपली पाहिजे कारण आयुष्य आपले आहे असे समर्थन करता येते किंबहुना करावे लागते कारण पालकांची निवड सुद्धा बरोबरच निघेल याची कसलीही खात्री कुठल्याच समाज व्यवस्थेत नसते . मग निदान मी चूक केली असेल तर इतके समाधान असते की मी माझी चूक निवडली . पालकांना सुद्धा हात झटकता येतात आणि म्हणता येते की मी तुम्हाला स्वातंत्र्य दिले होते निवड तुम्ही केली त्यामुळे त्या निवडीच्या सगळ्या चांगल्या आणि वाईट पॅकेज डील विषयी आता तुम्ही जबाबदार आहात . अनेकदा असेही झालेले पाहिले आहे की लोकांना भलतेच व्यसन लागलेले असते आणि त्या व्यसनापोटी निवड नावाची गोष्ट खरोखर शिल्लक असते का असा प्रश्न पडतो किंबहुना व्यसन हे Passion चे शत्रू आहे असा माझा अनुभव आहे . दारू पिणे आणि दारूचे व्यसन लावून घेणे ही निवड असू शकते का ? आपल्या मुलांना आपण स्वातंत्र्य द्यायचे म्हणजे नेमके काय करायचे व्यसनाधीन होऊ द्यायचे ? मुलांना लहानपणापासूनच या संदर्भामध्ये ट्रेनिंग देणे गरजेचे आहे स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजावून देणे आवश्यक आहे निवड म्हणजे काय असते हे समजावून देणे आवश्यक असते माझ्या पाहण्यामध्ये अलीकडे एक अशी व्यक्ती आहे जिच्या वडिलांनी अक्षरश: पोलीसी खाका दाखवत आपल्या पोराला डॉक्टर होणे भाग पाडले आणि आता हा डॉक्टर मुलगा स्पष्ट म्हणतो की माझा बाप बरोबर होता सुरुवातीची पाच वर्षे त्याने आपल्या वडिलांना शिव्या दिल्या होत्या पण आता गेली 20 वर्षे आपल्या बापाने कसे आपले कल्याण केले हे तो सांगत असतो आता इथे बापाने निवड हातात घेतलेली आहे आणि ती हातात घेताना तुला समाज कळत नाही मला चांगला रीतीने कळतो असे सांगितले ज्या दिशेने ही व्यक्ती जात होती त्या दिशेमध्ये तिने जे करिअर पाहिले होते त्यासाठी लागणारी प्रतिभा या व्यक्तीकडे होती का? तर नव्हती जी काही प्रतिभा होती ती मर्यादित होती तिला त्या क्षेत्रामध्ये अपयश आले असते किंबहुना तसे ते आलेले नंतर मी स्वतः पाहिले त्यामुळे निवड या एका मुद्द्याला महत्त्व देता येणार नाही प्रतिभा आणि सक्षमता यांना सुद्धा पाहिले पाहिजे नुसते आवडीने काम होत नाही त्या क्षेत्राविषयी आवड पाहिजेच पण त्याचबरोबर आवडीला विकसित करायला लागणारे टॅलेंट आणि मेहनत करायची तयारी संघर्ष करायची तयारी या गोष्टी सुद्धा असाव्या लागतात माझ्या स्वतःच्या अनुभवात बॉलीवूड मधली अनेक तथाकथित अभिनय ही पॅशन असणारी मंडळी मला भेटलेली आहेत पण प्रत्यक्षात व्यवहारांमध्ये मी त्यांना स्वतःचे आयुष्य वाया घालवलेले पाहिलेले आहे विशेषता दारू मध्ये ड्रगमध्ये स्वतःच सगळं अभूतपूर्व अभिनयाचे टॅलेंट असलेल्या माणसाने आयुष्य वाया घालवलेले मी पाहिलेले आहे शेवटी आम्हालाच त्याच्या दारूचे पैसे द्यायला लागायचे आणि तो मी दारूला पैसे देत नाहीये माहित असल्याने माझ्या मित्रांच्या कडून माझे नाव घेत पैसे घ्यायचा आता इथे अभूतपूर्व प्रतिभा आहे तो खरोखरच नसिरुद्दीन शहापेक्षा सरस अभिनेता होता माझ्या रूममध्ये माझ्या घरामध्ये मी त्याच्या अभिनयाचे अतोनात आविष्कार पाहिलेले आहेत पण गडी कामावर जायचा नाही नऊच्या शिफ्टला दारूच्या नशेत अकरा वाजता पोहोचायचा याचा परिणाम व्हायचा तोच झाला आता इथे पॅशन माहित आहे त्या पॅशनला लागणारे टॅलेंट आहे आणि तरीसुद्धा काहीही झालेले दिसत नाही याचे कारण स्वातंत्र्य नुसते मिळून चालत नाही स्वातंत्र्य व्यवस्थित हाताळता आले पाहिजे अनेकांच्याकडे ही क्षमता नसते हा माझा अनुभव आहे. यावर उपाय काय असा नेहमीच प्रश्न विचारला जातो मी माझ्या आसपास असणाऱ्या सर्व पालकांना एकच गोष्ट सांगतो की पॅशनला नाही म्हणू नका त्या passion च्या उपासनेसाठी सर्व प्रकारची मदत करा कौशल्य शिकण्यासाठी मदत करा पण त्याचबरोबर त्याला पैसे मिळवण्यासाठी म्हणून दुसरे कार्यक्षेत्र सुद्धा शिकवा जे समाजमान्य असेल आणि ज्याची शक्यता जास्त असेल हे सांगताना त्याला हेही सांगा की "तुझ्या पॅशन बरोबरच तुझी सुरक्षितता महत्त्वाची आहे जर का पॅशन आणि सुरक्षितता एकत्र गेले तर ते जास्त आरोग्यदायक आहे निदान पक्षी स्वतःची कमाई स्वतः कमावता येण्याइतपत सुरक्षित असणे आवश्यक असणे गरजेचे आहे" त्याला हे पटवून दिले पाहिजे आपल्याकडे अनेक लोक स्वतःला खूप शहाणे समजत आयुष्य वाया घालवतात या आयुष्य वाया घालवणाऱ्या लोकांचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न असतो मुलांच्या बाबतीत तर हा पुन्हा पुन्हा येतो . मला असा एक हुशार मुलगा माहित आहे की जो आरामांत खूप प्रचंड शिकला असता पण ज्याने आपल्या आई वडिलांच्या पासून आपण शिक्षण सोडलेले आहे हेच लपवले आणि त्याने प्रत्यक्षात दहावीनंतर शिक्षण सोडले होते हे शिक्षण का सोडले याची साधी चर्चा केली नाही आणि मग निदान पक्षी स्वतःची कुठलीतरी passion फॉलो करायला हवी ती सुद्धा या माणसाला निश्चित करता आली नाही आणि संपूर्ण आयुष्य वाया गेले सुदैवाने तिचा थोरला भाऊ आई वडिलांच्या कडे लक्ष देण्याइतपत पैसा कमवत होता म्हणून घराला प्रॉब्लेम झाले नाही पण जर का याला भाऊ नसता तर काय झाले असते आई-वडिलांचे काय झाले असते ? अनेकदा आज काल गोष्टी अशा घडत असतात फक्त पॅशन असून चालत नाही लायकी असावी लागते योग्यता असावी लागते पात्रता समाज ठरवतो परंतु योग्यता तरी किमान कमावली पाहिजे आपल्याकडे अनेक लोक असे असतात जे योग्यता कमवत नाहीत हा माझा अनुभव आहे अशा वेळेला सांगावे लागते की फक्त आस पुरत नाही तहान सुद्धा तेवढीच असावी लागते आणि त्याचबरोबर स्वतःचे पाणी स्वतः तयार करण्याचे कौशल्य आणि श्रम त्याचबरोबर प्लॅनिंग असावे लागते .खूप लोक अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींच्यावर कमी पडतात पण सर्वसाधारणपणे भारतीय लोकांच्या बाबतीत माझा अनुभव असा की आळस हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि यासंदर्भामध्ये लहानपणापासूनच जे संस्कार करायला हवे ते आपण करत नाही आळसाचा उल्लेख माणसाचा आणि त्याच्या करिअरचा सर्वात मोठा शत्रू म्हणून लहानपणापासूनच केला पाहिजे आणि मुलांना काम करायला लावले पाहिजे आपण लहानपणी काम करायला लावत नाही आणि मग मुले आळशी आणि अपवादात्मक वेळा अस्वच्छ झाली की त्यांना नावे ठेवायला लागतो त्यापेक्षा कार्य संस्कृती नावाची गोष्ट कुटुंबामध्येच शिकवली गेली पाहिजे आजकाल आई-वडील आपल्या करिअरसाठी म्हणून मुलांना हवे तेवढे स्वातंत्र्य देतात मुले कार्य संस्कृती शिकत नाही आणि परिणाम असा होतो की ही मुले प्रचंड आळशी बनत जातात आणि मग त्यांच्याकडून काहीही होत नाही धरणीला आणि कुटुंबाला भार होऊन जातात तेव्हा संस्कार करताना आळस शिरणार नाही आणि रुजणार नाही याची फार मोठी काळजी पालकांनी घेणे आत्ताच्या काळामध्ये आवश्यक आहे कारण मोबाईल पाहणे टीव्ही पाहणे याला addict होत असताना अनेक लोक स्वतःचे काम स्वतः करणे विसरत जातात . हा सरळ सरळ आळस असतो आणि या आळसाचे अत्यंत निर्लज्ज समर्थन केले जाते तेव्हा याबाबतीत सावध असणे गरजेचे आहे. त्यामुळेच फक्त pasion चालत नाही त्यासाठी कौशल्य शिकावे लागते संघटन शिकावे लागते आणि श्रम करावे लागते . अनेक मुलांच्या मध्ये अहंकार इतका मोठा असतो की आपल्याला मिळालेले आवडीचे काम सुद्धा हे लोक नीट करत नाहीत अनेक अभिनेते असे मी पाहिलेले आहेत की ज्यांना काम मागण्याची लाज वाटते वास्तविक अभिनय ही जर का तुमची passion असेल तर काम मागण्याची तुम्हाला कधीही लाज वाटणार नाही पण ज्या अर्थी तुम्हाला काम मागण्याची लाज वाटते त्याअर्थी तुमच्या पॅशन पेक्षा तुमचा अहंकार मोठा आहे . अगदी मोक्षाची साधना करताना सुद्धा मी ही गोष्ट पाहिलेली आहे की अनेक साधक इतका मोठा अहंकार घेऊन बसलेले असतात की ते एखाद्या ठिकाणी जाऊन जर का आपणाला ध्यानाला बसायचे असेल तर ते साधी रिक्वेस्ट पण करत नाहीत अहंकार आडवा येतो वास्तविक ज्या टाइमिंगला तुमची साधना आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते त्या टायमिंगला तुम्ही सरळ सांगितले पाहिजे की बाबा रे मी आता मेडिटेशन ला जाणार आहे अनेकदा लोक तुम्हाला झक्की समजतात पण लोक काय समजतात यापेक्षा तुम्ही तुमच्या साधने बाबत passionet आहात ही जास्त महत्त्वाची गोष्ट असते आळस आणि अहंकार हे तुमच्या passion चे सर्वात मोठे शत्रू असू शकतात हे त्यांना लहानपणापासूनच सांगावे लागते .
त्यामुळे फक्त स्वातंत्र्य देऊ नका त्याबरोबर शिस्त म्हणजेच अनुशासन श्रम करण्याची तयारी या ही गोष्टी शिकवा . आणि अनेकदा शिस्तीची सुरुवात सकाळी किती वाजता तुम्ही उठता आणि किती वाजता झोपता त्यापासून होते . मुद्दा शिस्तीचा असतो स्वातंत्र्याचा असत नाही . तेव्हा मुलांच्या टॅलेंट चा शोध त्यांना घेऊ द्या पण फक्त टॅलेंट पुरेसे नाही हेही समजावणे फार आवश्यक आहे . त्यांना स्पर्धात्मक बनवू नका त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू नका त्यांना त्यांची निवड त्यांची passion निवडू द्या पण त्याचबरोबर त्यांना शिस्तशील आणि कार्यशील बनवा . जे कृष्णमूर्ती यांच्या नादाला लागू नका ते जे काही सांगत असतात चॉईसलेस जगणे हे फक्त मोक्षाच्या क्षेत्रामध्येच लागू होते . ज्यांना मोक्षाची साधना करायची आहे त्यांना चॉईसलेसच जगावे लागते . त्या जगण्यामध्ये एक मजा आहे मी स्वतः ती अनुभवलेली आहे परंतु तिचा त्रास इतरांना होता कामा नये याची काळजी घ्यावी लागते आणि ती खूपच घ्यावी लागते. जे कृष्णमूर्ती यांना कसलेही व्यवहारिक चटके बसलेले नाहीत कारण ते एका अत्यंत सुरक्षित अशा कोशामध्ये वाढवले गेले होते जिथे समाज त्यांना स्पर्शसुद्धा करत नव्हता . हीच गोष्ट ओशो यांच्या बाबतीत सुद्धा आहे. जे माझ्यासारखे सामान्य साधक आहेत त्यांना संघर्ष अटळ असतो जीवन संघर्ष सहजरित्या वाव देत नसतो तेव्हा चॉईसलेस जगण्याच्या संदर्भातल्या रिस्क या जास्त वाढीव असतात . संत तुकाराम हा प्रचंड भावतो याचे सर्वात मोठे कारण त्याची साधना ही सामान्य माणसाच्या जीवनाशी जास्त निगडित आहे . पण त्याला जे सोसावे लागलेले आहे ते सोसण्याची तयारी प्रत्येक साधकाची असली पाहिजे त्यांच्या सोसण्याच्या कविता झाल्या पण कविता वाचणे वेगळे आणि प्रत्यक्षामध्ये ती ती परिस्थिती तो तो संघर्ष निकराने जगणे वेगळे हे सोसणे त्याच माणसाला शक्य आहे ज्याला खरोखरच मोक्षाची तळमळ आहे . ज्याला मोक्षाची पिसे लागलेली असतात त्याला मात्र अशा प्रकारचे संघर्ष हे संघर्ष वाटत नसतात हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो . तेव्हा प्रत्येक माणसाची जीवनशैलीच अनेकदा साधना शैली बनते आणि तिच्यामध्ये अनेकदा तिच्या भोवतालच्या कुटुंबीयांचा फार मोठा वाटा असतो . ऍनी बेझंट नसती तर जे कृष्णमूर्तींची जी जीवनशैली आणि साधना शैली तयार झाली ती साधनाशैली आणि जीवनशैली तयार झाली नसती . तेव्हा साधना करताना सुद्धा आपला आसमंत आणि आपण काय आहोत हे सर्वात प्रथम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे . बुद्ध कसा निर्वाणाला पोहचला आणि जे कृष्णमूर्ती कसे मोक्षाला पोहोचले यांच्या मधले कसे अनेकदा काही प्रमाणात सुरुवातीला मार्गदर्शक वाटले तरीही प्रत्यक्ष साधना करताना अनेकदा फिजुल असते . कारण मोक्ष शेवटी तुम्हाला मिळवायचा असतो आणि तुम्ही जिथे आहात तिथे मिळवायचा असतो ज्या समाजात आहात त्या समाजात मिळवायचा असतो आणि त्यासाठीची साधना पद्धती शेवटी तुम्हालाच विकसित करावी लागते. स्वतःचे अनुशासन स्वतःची शिस्त स्वतः उभी करावी लागते तेव्हा सर्वात प्रथम आपण काय आहोत आणि आपला भोवताल काय आहे याचे भान बाळगा म्हणजे झाले . नाहीतर मोक्ष म्हणजे हवेतल्या हवेत तरंगणारी गोष्ट बनून जाते आपल्याकडे अनेक ज्ञानतंत्राने जाणारे लोक तर निव्वळ बौद्धिक गप्पा करत बसतात . त्याने काहीही होत नाही ज्ञान तंत्राला सुद्धा विशिष्ट प्रकारचा जोग करावा लागतो नाहीतर आख्खे आयुष्य जुगाड करण्यात वाया जाते ( जुगाड हा शब्द जोग या शब्दापासूनच तयार झालेला आहे आणि जोग या शब्दापासूनच योग हा शब्द तयार झालेला आहे) तेव्हा जोग जुळवा आणि आपल्या आयुष्याच्या संदर्भात आपल्या शरीराच्या संदर्भात जुळवा .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment