धर्मांचे दोन प्रकार , निराशा आणि आपले आयुष्य श्रीधर तिळवे नाईक 

सध्या संपूर्ण जग निराशेत गेलेले आहे हे तसे होणे अटळच होते कारण कधी नव्हे ते संपूर्ण जगभर निराशेतून आणि फ्रस्टेशन मधून जन्मलेले धर्म सगळा अवकाश व्यापून बसलेले आहेत . स्वतःला ताप करून घ्यायचा आणि हा ताप मग जगभर वाटायचा हाच स्वभाव बनून गेलेले धर्म काय वाटणार आणि काय करणार ? शेवटी तुम्ही तेच वाटता जे तुमच्याकडे असते आणि शेवटी तुम्ही तेच बनता जे तुमच्या मूळच्या जेनेटिक्समध्येच असते . जर तुमचा धर्म हाच निराशेतून जन्मलेला असेल तर मग तुम्ही निराश होणे अटळ आहे .

आपल्याला अनेकदा हे लक्षात येत नाही की भारतीय धर्म आणि युरेशियन धर्म यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्यांचे उगमस्थान हा फरक घडवते भारतीय धर्म जे शैव श्रुतीतून जन्मलेले आहेत ते एक तर अत्यंत आनंदात जन्मलेले आहेत किंवा शांतीत ! त्याउलट तुम्ही जर का सर्व युरेशियन धर्म बघितले तर तुम्हाला ते प्रचंड निराशेने ग्रस्त असलेल्या लोकांनी किंवा देशोधडीला लागलेल्या लोकांनी जन्माला घातलेले आहेत असे दिसेल म्हणजे असे की आपण जर का आदिशैव धर्म घेतला तर तो खुद्द भगवान शंकर यांनी अक्षरशः आनंदाने डान्स करता करता जन्माला घातलेला आहे त्यामुळे सिंधू संस्कृती ही अक्षरशः युद्ध न करता सुद्धा व्यवस्थित जिवंत राहिली सळसळली हा धर्म आनंदाचा नृत्याचा सोहळा आहे त्यामुळेच त्याचा जन्म सेलिब्रेशन मधून होतो आणि सेलिब्रेशन करणारे अनेक उत्सव आपोआपच सादर होत जातात हीच गोष्ट जैन धर्माची अत्यंत अहिंसक आणि शांती मधून हा धम्म जन्मलेला आहे भगवान महावीर यांनी तो जन्माला घातलेला आहे आणि तो शांतीतच जन्माला घातलेला आहे हीच गोष्ट बौद्ध धम्मा बाबत आहे अतिशय करुणामय शांती मध्ये बुद्धाचा धम्म जन्मलेला आहे . त्यात सुद्धा भगवान शंकरांचा यांचा धम्म हा पूर्णपणे पॉझिटिव आहे त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा सक्सेसफुल लव्ह स्टोरी आहे सती वगैरे सर्व नंतर घातलेले प्रकार आहेत ते मूळ आयुष्यात नव्हते . या तिन्ही धर्मांचे धर्म संस्थापक हे उपदेश करताना एक तर आनंदात आहेत किंवा शांतीत आहेत त्या उलट जर का आपण युरेशियन धर्मांची रचना पाहिली तर मुळात हे सर्वच्या सर्व धर्म संस्थापक अनेकदा देशोधडीला लागलेले दिसतात म्हणजे मोजेसला आपला देश सोडायला लागलेला आहे जीजस कृसीफाय झालेला आहे तर महंमद पैगंबर यांना कायमच आपले स्वतःचे शहर सोडावे लागले आहे आणि सतत युद्धमय परिस्थितीत राहावे लागले आहे या सततच्या युद्धमय परिस्थिती मधून जन्मलेले हे धर्म आहेत हीच गोष्ट रामाची आहे त्यालाही आपला देश सोडावा लागलेला आहे आणि आपली पत्नी शोधावी लागलेली आहे हीच गोष्ट कृष्णाची त्याचा तर साक्षात जन्मच म्हणजे संघर्ष होता जन्म झाल्या झाल्या आई वडिलांच्या पासून दूर जावे लागलेले आहे इथेही देश सोडावा लागलेला आहे जेव्हा देश सोडायला लागतो आनंदाचा त्याग करावा लागतो तेव्हा त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या धर्मावर पण होत असतो बुद्धाने स्वतः देश सोडलेला आहे इथे देश सोडावा लागलेला नाही पण तरीसुद्धा बुद्धाच्या सगळ्या धर्मामध्ये जग दुःखमय आहे असेच गृहीतक येते त्यामुळे तो अर्धा पॉझिटिव्ह अर्धा निगेटिव्ह आहे युरेशियन धर्म मात्र प्रचंड निगेटिव्हिटीमधून जन्मलेले दिसतात. साहजिकच असे धर्म फक्त प्रश्न निर्माण करतात नैराश्यच निर्माण करतात हा सगळा नैराश्याचा आणि त्यावर मात करण्याचा सिलसिला चालू आहे अनेकदा आपल्याला ही बेसिक गोष्टच कळत नाही हा फरक कळत नाही भारतीयांचे आनंदी आणि शांत असण्याचे रहस्य त्यांचा हा शैव जैन बौद्ध धर्म होता दुर्दैवाने नंतर अचानक युरेशन धर्माची इसवी सन १००० नंतर विजय घौडदौड झाली आणि ही विजयी घौडदौड फक्त निराशा वाटत गेली तुम्ही संतांची काव्यरचना बघा त्यांचे चरित्र बघा पुन्हा एकदा तुम्हाला उदास करणारे चरित्र जास्त दिसायला लागेल युरेशियन धर्मांना आनंदत राहण्याची ऍलर्जी आहे की काय असाच प्रश्न पडतो .

हा मुळातच पॉझिटिव्ह धर्म आणि निगेटिव्ह धर्म यांच्यातला फरक आहे सर्व भारतीय धर्म इंडियन धर्म हे पॉझिटिव धर्म आहेत आणि सर्व युरेशियन धर्म हे निगेटिव्ह धर्म आहेत . त्यातही शैव धर्म असा आहे जो संपूर्णपणे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह काही नाही पण ब्राह्मणांची करणी इतकी थोर की त्यांनी पुराणे रचून या धर्मात सुद्धा नसलेल्या निगेटिव्हिटीज टाकून द्यायचा प्रयत्न केला म्हणजे स्वतः दुःखी असायचेच वर आणि आपले दुःख दुसऱ्या धर्मात टाकून द्यायचे आपल्या धर्मातले प्रश्न त्यांनी या शैव धर्मात फेकण्याचा आणि टाकण्याचा प्रयत्न केला हे म्हणजे गोडे सरोवर खारट करणे होते संपूर्ण पुराणे म्हणजे आयुष्य खारट करण्याचा प्रयत्न ! तुम्ही जर का ते लहानपणापासून ऐकायला बसला की तुम्हाला असे वाटेल की जग म्हणजे एक शत्रू आहे आणि शत्रूच्या बालेकिल्लात आपण जन्मलेलो आहोत . लेखकांची ही फ्रस्टेशन्स सर्वसामान्य जनतेने का मिरवावीत ? हे जग आनंदाने जगण्यासाठी आहे हे आयुष्य म्हणजे डान्स आहे आयुष्य म्हणजे कुठल्यातरी इमोशनल अत्याचार मधून निर्माण झालेली कथा नव्हे .

मला शैवधर्म श्रुती आवडते कारण ती डान्स मधून जन्मलेली आहे आनंदा मधून जन्मलेली आहे तेव्हा आनंदी राहा हे उगाच फ्रस्टेशनचे नसते उद्योग अंगाला लावून घेऊ नका अमुक पाप केले म्हणून कॉम्प्लेक्स घेऊ नका सेक्सला सुद्धा पाप समजणारे लोक आयुष्याची आपोआपच नफरत करायला शिकवतात आपल्याकडे आपला देव शंकर सुद्धा आरामात आनंदाने दोन मुलांना जन्म देतो आणि पार्वती बरोबर अतिशय छान पैकी रोमान्स पण करतो . तो आनंदाने नाचतो गातो . तसेच व्हा. 

 निगेटिव्ह धर्मांचा द्वेष आणि दुःख आपल्या अंगात येऊ देऊ नका . निराशा देणाऱ्या सर्व पौराणिक भाकडकथा फेकून द्या . नाचणाऱ्या शिवाला देव्हाऱ्यात स्थान द्या आनंदात रहा नृत्य करा प्रत्येक गोष्ट आनंदाने करा आनंदात रहाल तर उपाय सुद्धा आपोआप सापडत जातात आणि जेव्हा सगळेच आनंदात असतात तेव्हा गोष्टी बदलायला लागतात . ही बाहेरून आलेली फ्रस्टेशन्स आपली स्टेशन्स नाहीत . आपली स्टेशन्स ही आनंदाची स्टेशन्स आहेत . आनंदाने जगा आनंदाने नाचा आणि आनंदच वाटा .

श्रीधर तिळवे नाईक


 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती