गीता , भगवान श्रीकृष्ण ,ब्राह्मण आणि पंडित श्रीधर तिळवे नाईक 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख भागवत यांनी अचानकपणे भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायामधील एक श्लोक कोट केला आहे आणि साहजिकच त्यावर आता अचानक इंटरनेटवर चर्चा सुरू झालेली दिसते हे स्वाभाविक आहे. कारण भागवत यांनी एखादा श्लोक उल्लेखित करणे याला अतिशय महत्त्वाचा असा अर्थ असतो वैदिक धर्मीय, ब्राह्मणधर्मीय आणि वैष्णव धर्मीय यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतीलच परंतु या श्लोकाचा शैव लोकांच्या दृष्टीने असलेला जो काय अर्थ आहे तो फार वेगळा आहे आणि तो सांगितला पाहिजे .मुळातच शैव लोकांच्या मते भगवद्गीता ही आचार्य शंकर यांनी लिहिली होती आणि ती पूर्णपणे आत्ताची जी गीता आहे त्यापेक्षा वेगळी होती नंतर तिला भगवद्गीतेमध्ये सामावून घेण्यात आले आणि महाभारत युद्धाशीही ती नंतर जोडली गेली त्यामुळेच नंतर मग असेही झाले की काही अभिनव गुप्त वगैरे पंडित लोकांची अशी समजूत झाली की ही तीच गीता आहे जी आचार्य शंकर यांनी लिहिली होती आणि यांच्यापैकी काहींनी त्यावर भाष्य पण लिहिली ज्यामध्ये ज्ञानेश्वरांचाही समावेश होतो त्यामुळेच या भगवद्गीतेमध्ये काही श्लोक असे सापडतात जिथे शैव परंपरेवर काही वेगळा प्रकाश पडत असतो हा श्लोक त्यापैकी एक आहे आणि भागवत यांनी एकेकाळी केलेल्या मांडणीशी तो पूर्णपणे विसंगत आहे याची बहुदा भागवत यांना कल्पना आलेली नाही 


यापूर्वी भागवत यांनी असे म्हटले होते की वर्णव्यवस्था पंडित लोकांनी निर्माण केली आणि त्यावर मी लिहिले होते की वर्णव्यवस्था ही ब्राह्मण धर्माने निर्माण केली आणि तिचा जो लेखक आहे तो क्षत्रिय होता की ब्राह्मण होता हे सांगणे फार कठीण आहे कारण वर्णव्यवस्था सांगणारा क्षत्रिय होता की ब्राह्मण होता यावरच वाद आहे स्वतः श्रीकृष्ण याने आपणच वर्णव्यवस्था निर्माण केली अशी कबुली गीतेमध्ये दिलेली आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे स्वतः क्षत्रिय वंशात जन्मले होते अशी क्षत्रियांची श्रद्धा आहे आता मग याचा अर्थ आपण असा घ्यायचा का की क्षत्रियाने वर्ण व्यवस्था निर्माण केली ? असो हा वाद आता इथे सोडून देऊ भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असे अनेक आंतरविरोध असतात आणि ते सोडवणे फार गुंतागुंतीचे असते त्यामुळे हा विषय इथे सोडतो.

आता आपण श्लोकाची चर्चा करू हा श्लोक नेमका काय आहे तो पुढील प्रमाणे आहे 

विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि |

शुनी चैव श्वपाके च पण्डित:समदर्शिन:II

भगवद्गीता ५ अध्याय १८ वा श्लोक 


याचा आता अर्थ नेमका काय होतो तर अर्थ पुढील प्रमाणे होतो 

"पंडीत हा विद्या आणि विनयसंपन्न असणारा ब्राह्मण, गाय, हत्ती , कुत्रा , कुत्र्याचं मांस खाणारा या सर्वांकडेच समदर्शि पाहतो.

यातील कुत्र्याचे मांस खाणारे म्हणजे नेमके लोक कोण हा एक फार वादाचा विषय आहे काहींच्या मते सर्व अस्पृश्य यामध्ये येतात तर काहींच्या मते फक्त चांडाळ लोक येतात . त्यामुळे आपण सध्यातरी कुत्र्याचे मांस खाणारे एवढाच अर्थ घेऊ जो प्रत्यक्ष श्लोकात आहे .

आता यामध्ये लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की भगवान श्रीकृष्ण स्पष्ट आणि स्वच्छपणाने ब्राह्मण आणि पंडित या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे सांगत आहेत आणि हे फार इंटरेस्टिंग आहे मी नेहमीच सांगत आलोय की पंडित आणि ब्राह्मण हे दोन वेगळे आहेत जे शैव आहेत ते पंडित आहेत आणि युरेशियन आहेत ते ब्राह्मण आहेत पंडित वर्ण जात व्यवस्था स्वीकारत नाहीत आणि ब्राह्मण वर्ण जात व्यवस्था स्वीकारतात हा दोन्हींच्या मधला फरक आहे . इथे या श्लोकामध्ये पंडित समदर्शी समदृष्टीने बघतो असे म्हटलेले आहे ब्राह्मण समदृष्टीने बघतो असे म्हटलेले नाही किंबहुना कळत नकळत ब्राह्मण समदर्शी समदृष्टीने बघत नाही हेच इथे अधोरेखित केलेले आहे . सर्वात आश्चर्यकारक गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे ज्ञानी म्हणून पंडितांचा उल्लेख आहे तर विद्यापती म्हणून ब्राह्मणांचा उल्लेख आहे . म्हणजेच पंडिताजवळ ज्ञान आहे ब्राह्मणांच्या जवळ विद्या आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की जोपर्यंत ब्राह्मण पंडित होत नाही तोपर्यंत तो ज्ञानयोगी होत नाही 

भागवतांच्या बहुदा हे लक्षात आलेले नाही त्यामुळे त्यांनी हा श्लोक कोट केला असावा .

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती