जूनता, अजूनता ,नवता आणि आंबेडकर श्रीधर तिळवे नाईक 


अलीकडच्या काळामध्ये एकंदरच नवयानी बौद्ध आंबेडकरी असणाऱ्या लोकांच्या मध्ये बद्दल अतिशय निगेटिव्ह रीमार्क्स यायला लागलेले आहेत मुख्य म्हणजे चिकित्सा कमी आणि विचिकित्सा जास्त असे काही होत आहे का असा प्रश्न हल्ली विचारला जात आहे अर्थातच नि:चिकित्सेपेक्षा हे बरे हे नक्कीच आहे कारण भारतीय भूतजालीकेमध्ये अनेकदा १००० पासून चिकित्साच बंद झालेली होती भारतीय प्रबोधनाने तीची पुन्हा सुरुवात केली एका अर्थाने संपूर्ण इंडियन नेटवर्क नि:चिकित्सिक बनवले गेले होते त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर अलीकडे चिकित्सा होते हेच महत्त्वाचे बनत गेले . अर्थात बसवेश्वरांच्या सारखे काही लोक या कालखंडात होऊन गेले पण ते अपवादच म्हटले पाहिजेत याचे कारण मी खूपदा सांगितलेले आहे. त्यामुळे चिकित्सा होणे ही सुद्धा मोठी गोष्ट बनून गेली आणि प्रबोधनाचे जे काही वैशिष्ट्य होते त्यामध्ये चिकित्सा केंद्रस्थानी होती .


प्रश्न असा आहे की ही चिकित्सा करताना काही ऐतिहासिक भान आपण राखणार आहोत की नाही . आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचा एक सर्वात मोठा झालेला गोंधळ काय असेल तर तो म्हणजे त्यांना नवतेचा विचार समजत नाही . त्यांना असे वाटते की आंबेडकर आहेत आणि तीच आद्यता आहे वास्तविक आंबेडकर यांनी कधीही ही गोष्ट स्वीकारलेली नाही आणि कायमच आपल्या सर्व पूर्वसूरींचा उल्लेख केलेला आहे असे असून सुद्धा हा विचित्र रोग का जडावा की ज्यामध्ये आंबेडकरांनाच आद्य मानून सर्व चिकित्सा केली जाते ज्ञानाच्या संदर्भामध्ये अशी आद्यता तेव्हाच द्यावी लागते जेव्हा ती सिद्ध होते बाबासाहेबांनी अशा प्रकारे कुठे कुठे आद्य काम केले आहे ते आपल्याला नक्की सांगावे लागेल परंतु त्यासाठी मुळात आधी होऊन गेलेल्या कामांचा नीट आढावा घ्यावा लागतो त्याची नीट चिकित्सा करावी लागते आंबेडकरांनी तर त्यांच्या आधी असलेल्या रानडेंच्या पासून गांधीजींच्या पर्यंत(हे आंबेडकरांच्या पिढीच्या आधीचे होते याचा विसर आंबेडकरवादी लोकांना नेहमी पडत असतो त्यांना असे वाटते की गांधी आंबेडकरांना समकालीन होते मी इतरत्र म्हटल्याप्रमाणे गांधी आणि आंबेडकर यांच्या मधला जो संघर्ष आहे तो बाप आणि मुलगा यांच्यातला संघर्ष आहे आणि तो इंडियन सोसायटी या नावाचे घर कसे चालवावे यावरून झालेला आहे ) सर्वांची चिकित्सा केलेली आहे ही गोष्ट बहुतेक आंबेडकरवादी आता विसरलेले दिसतात .


दुसरी गोष्ट आंबेडकरवादी लोकांना कळत नाही असे दिसते ती म्हणजे आंबेडकरांच्या वर पडलेला पाश्चात विचारांचा प्रभाव ! यामुळे काही दुष्परिणाम झालेले आहेत उदाहरणार्थ ज्ञान हेच सत्ता असते नॉलेज इज पॉवर हे विधान याचे आहे फ्रान्सिस बेकन या तत्त्वज्ञाचे आहे आणि त्याच्यापूर्वीही ते केले गेले होते scientia potentia est" (or "scientia est potentia" or also "scientia potestas est" ही लॅटिन भाषेतील संस्कृतीची परंपरा आहे त्याचाच हा अनुवाद आहे पण हे विधान जणू काय आंबेडकर यांनी प्रथम केले अशा थाटामध्ये अनेकदा सादर केले जाते. आंबेडकरांनी ते अनेकदा वापरले आहे कारण प्रबोधनांमध्ये फ्रान्सिस बेकन याने ते अनेकदा वापरल्याने प्रचलित होऊन बसले पण अनेकदा ते जणू काय बाबासाहेब आंबेडकरांनी शोधले अशा थाटात सांगितले जाते पाश्चात्त्यतत्त्वज्ञानातील आणि तत्वज्ञांची अनेक अशी व्यक्ती वाक्ये आंबेडकर यांच्या नावाने सांगितली जात आहेत तेही एक वेळ चालले असते परंतु प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जणू काय आंबेडकर यांनीच ही विधाने केली आणि बाकीचे लोक ती चोरत आहेत असा जेव्हा आरोप येतो तेव्हा मात्र मग सांगावे लागते की बाबांनो हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधीच म्हटले गेलेले आहे . खुद्द बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी आता हा नक्कीच खुलासा केला असता कारण वैचारिक प्रामाणिकपणा हे आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते . पण आंबेडकर यांच्या अनुयायांना हे कोण समजावणार ?


आंबेडकरांच्या पुढेच बाकी सर्व काही तुच्छ आहेत असे या लोकांच्या पैकी काही लोकांनी गृहीतच धरलेले आणि यामुळेच अनेकदा प्रॉब्लेम निर्माण होतो ज्ञानात्मक तुच्छतावाद हे ब्राम्हण्याचे लक्षण आहे . आता ही शेंडी आंबेडकरवादी लोकांनी का उसनी घ्यावी ? मी हे नेहमीच सांगत आलेलो आहे की पुरोगवा पुरोगामी वादाचे पुरोगामी युगाचे सर्वोच्च शिखर हिमालय हे बाबासाहेब आंबेडकर आहेत याबद्दल दुमत होऊ नये कारण त्यांनी तेवढे काम केलेले आहे पण त्यांच्यानंतर आधुनिक आणि उत्तर आधुनिक आणि आता चौथ्या नव्हतेचे युग सुरू झालेले आहे आणि कार फार पुढे निघून गेला आणि समाज सुद्धा फार पुढे निघून गेलेले आहेत गेलेला आहे आत्ताच्या काळातील सर्व प्रश्नांची उत्तरे बाबासाहेब आंबेडकरांच्या कडेच होती असे वाटणे हे खुद्द आंबेडकरांना सुद्धा आवडले नसते . आंबेडकरांच्या इतका समकालीन विचारवंत भारतामध्ये कोणी नसेल . परंतु त्याचबरोबर हेही खरे की सर्वच विचारवंतांना त्यांच्या काळाची मर्यादा असते तशी मर्यादा बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा होती . भारताच्या पुरोगामी वादाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे युरोपियन प्रबोधन कालखंडामध्ये प्रोटेस्ट होऊन प्रोटेस्टंट पंथ तयार झाला आणि त्यासारखे अनेक पंथ तयार झाले तसेच भारतामध्ये सुद्धा नवीन धर्मांचे अनेक पंथ तयार झाले . प्रोटेस्टंट पंथ हा ख्रिश्चन परंपरेपर्यंत उठाव होऊन बंड होऊन तयार झालेला नवीन धर्म होता आणि त्याला मोक्षाचा आधार नसला तरी विचारांचा आधार होता नवीन बदललेल्या युगात पुन्हा एकदा श्रद्धास्थानची स्थापना हा त्यामागचा उद्देश होता आपल्याकडे अशा प्रकारचा उद्देश सर्वच पुरोगामी विचारवंतांनी बाळगलेला दिसतो आणि त्यामुळेच राजा राम मोहन राय असो किंवा दयानंद सरस्वती असो किंवा स्वामी विवेकानंद असो किंवा ज्योतिबा फुले असो सर्वांनीच नवीन पंथ निर्माण केला आणि त्यांनी तो प्रस्थापित धर्मामध्येच बंड करून निर्माण केला आंबेडकर सुद्धा याला अपवाद नव्हते आणि म्हणूनच त्यांनी प्रस्थापित असलेल्या बौद्ध धर्मामध्येच आणि हिंदू धर्मा विरोधात नवयान निर्माण केले . याची सुरुवात अर्थातच बसवेश्वर यांनी केली होती त्यांनी प्रथम लिंगायत नावाचा त्या काळातील प्रस्थापित शैव-धर्माविरोधात आणि ब्राह्मण धर्मा विरोधात बंड करून नवीन शैव धर्म निर्माण केला . म्हणजेच एका अर्थाने पुरोगामी कालखंडाची सर्व वैशिष्ट्ये बाबासाहेब आंबेडकर शिखराला पोहोचवतात . आणि त्यांचे खरे योगदान इथेच आहे . त्याचा तुम्ही अभिमानच भागात परंतु हे सर्व काही आकाशातून आलेले नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधीच भारतामध्ये बौद्ध धर्माचा विचार सुरू झाला होता आणि त्या सर्व बौद्ध धर्माच्या चिकित्सेवरच बाबासाहेबांनी स्वतःचे नवयान निर्माण केलेले आहे . पण हे फक्त आंबेडकर यांनी केलेले नाही हे लक्षातच घेतले पाहिजे वेदांतांमध्ये राजाराम मोहन राय यांचा ब्राम्हो समाज वैदिक परंपरेमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांचा आर्य समाज महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज आणि स्वामी विवेकानंद यांचा नव हिंदू समाज असे अनेक प्रकारचे नवीन समाज आंबेडकरांच्या आधीच निर्माण करण्यात आलेले आहेत . ते जणू काही अस्तित्वात नव्हते आणि भारत म्हणजे काहीतरी ब्राह्मण लोकांचे ऐकत स्मृतीमध्ये गडाबडा लोळणारा समाज होता हा जो काही आंबेडकरवादी लोकांचा गैरसमज झालेला आहे तो त्यांनी काढून टाकलेला बरा. मानस स्मृतीच्या विरोधामध्ये अनेक लोक उभे राहिलेले आहेत पण यातली मुलगा आम्ही बंडखोरी ही महात्मा फुले यांच्यामध्ये दिसते तेच असे आहेत की ज्यांनी पहिल्यांदा राम आणि कृष्ण यांच्या अवतारांची आणि त्यांच्या आधी झालेल्या अवतारांची मीमांसा थेट केली . त्यांच्या खांद्यावर मग बाबासाहेब आंबेडकर यांचे रिडल ऑफ रामा आणि कृष्ण निर्माण होते . ब्राह्मणधर्मा विरोधामध्ये सर्वात पहिला मोठा उठाव हा महात्मा फुले यांनीच केलेला आहे म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा उल्लेख अत्यंत आदराने गुरु म्हणून करतात कारण त्यांच्या चिकित्सेचा पाया महात्मा फुले यांनी आधीच आपल्या लिखाणात घातलेला होता . आता जे बाबासाहेब आंबेडकर स्वतःला स्वयंभू समजत नाहीत त्यांना स्वयंभू समजणाऱ्या लोकांचे करायचे काय ? 


वास्तविक बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो व्यवहारिक तत्त्वज्ञानाचा ! Charles Sanders Peirce, William James आणि John Dewey यांचा आणि या व्यवहारवादाची सुरुवात १८७० सालीच अमेरिकेमध्ये झालेली होती आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १८९२ यावर्षी झालेला आहे . म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माच्या आधीच हे तत्त्वज्ञान जन्मलेले होते हे लक्षात घ्या.


Charles Sanders Peirce हा या व्यवहारवादाचा आद्यकर्ता मानला जातो. आज अमेरिकेची संपूर्ण जडणघडण या विचारांच्यामुळे घडलेली आहे आणि त्यांचे तत्त्वज्ञान सुद्धा याच तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली आहे याशिवाय रसेल यांचा प्रभाव सुद्धा आहे . या लोकांच्याकडून आंबेडकरांनी नेमके काय काय घेतले याची एकदा व्यवस्थित चिकित्सा झाली पाहिजे खुद्द आंबेडकर यांनी John Dewey यांच्यावर गुरु म्हणून खूप ठिकाणी लिहिलेले आहे ते गेले तेव्हा त्यांना झालेले दुःख त्यांनी अनेकदा व्यक्त केलेले आहे गुरुजनांच्या बद्दलचा हा आदर हे आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्यच म्हणायला पाहिजे पण अलीकडे बौद्धिक अहंकाराने ग्रस्त झालेल्या आणि प्रत्यक्षात आंबेडकरांच्या निम्मे सुद्धा वाचन झालेले नाही अशा लोकांचा जो काही बौद्धिक माज आहे त्यामुळे आंबेडकरवाद वाढणे राहिले बाजूला पण संकुचितच होणे शक्य होत जाणार आहे वास्तविक आता आंबेडकर वादाच्या नंतर उत्तर आंबेडकर वाद व्यवस्थितपणे विकसित करायला पाहिजे आणि त्यानंतर मग चौथ्या नवतेचा आंबेडकर वाद आला पाहिजे पण स्वतःच्या डोळ्यांना ढापणे लावल्यानंतर हे कसे होणार . आंबेडकर हे कधीही आयुष्यात थांबले नाहीत पुढे पुढे सरकत राहिले नवीन नवीन उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या प्रकाशात नवीन नवीन गोष्टी शोधत राहिले परंतु त्यांच्या नंतर आलेल्या त्यांच्या काही आंधळ्या अनुयायांनी मात्र आंबेडकरांच्या पुढे समाज जाताच कामा नये असा काहीतरी गैरसमज बाळगलेला दिसतो दलितांच्या समस्या आणि दलितांचा विकास या दोन्ही गोष्टी 21व्या शतकामधल्या आहेत हे सुद्धा या स्वतःला समकालीन समजणाऱ्या लोकांना कळत नाही अस्पृश्य समाजा पुढच्या आजच्या समस्या या आजच्या संदर्भातच तपासल्या पाहिजेत तरच त्या सुटू शकतील अन्यथा सुटणार नाहीत शिवाय दलित लोकांच्या मनात सुद्धा एक प्रस्थापित दलित वर्गीयता आणि वर्ग तयार झालेला आहे हा दलित मध्यमवर्ग आंबेडकरवादी चळवळीच्या बाजूने उतरणार की प्रस्थापित व्यवस्थेला सामील होत जाणार असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यातले अनेक लोक सध्या प्रस्थापित व्यवस्थेला सामील होतानाच दिसतात अनेकांना आंबेडकरांचा विसर पडलेला आहे तेव्हा या सर्व लोकांचे काय करायचे हे सुद्धा पाहिले पाहिजे आंबेडकरांचा फोटो लावला म्हणजे आपण आंबेडकरवादी होतो हा जो गैरसमज आहे तो जेवढ्या लवकर काढला जाईल तेवढे बरे .


याशिवाय आंबेडकरांच्या संदर्भात नेहमीच ज्याची चर्चा केली जाते तो कार्ल मार्क्स नेमका त्यांच्यावर काय प्रभाव टाकून गेला ते पाहिले पाहिजे . आंबेडकर हे प्रामुख्याने लोकशाही उदारमतवाद या तत्त्वज्ञानामध्ये बसतात . त्याची सुरुवात म्हणजेच त्यांची आद्यता आणि नवता तपासली पाहिजे पण ही नवता तपासण्यासाठी आपणाला त्यांची जुनता काय आहे भूतजालिकता काय आहे ते तपासले पाहिजे त्यांनी भूतकाळातून नेमके कुणाकडून काय काय घेतले हे तपासले पाहिजे या प्रकारची कसलीही चिकित्सा आंबेडकरवादी आजकाल करायला तयार नसतात ते आंबेडकरांना स्वयंभू बनवायला बघतात . पण कुठलाही विचारवंत हा स्वयंभू नसतो . त्याच्या विचारांच्या मध्ये अनेकदा 99 टक्के भाग हा मागूनच आलेला असतो आणि फक्त एक टक्के भाग हा त्याचा स्वतःचा सृजनशील असा भाग असतो आणि त्या सृजनशील भागामुळेच संपूर्ण समाजाचा संपूर्ण संस्कृतीचा विचार पुढे सरकलेला असतो . बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा याला अपवाद नाही.


मुळात ज्या लोकशाहीचा विचार आंबेडकर करतात ती लोकशाही प्रामुख्याने अमेरिका आणि ब्रिटन यांच्या तत्त्वज्ञान परंपरेतील आहे आणि त्याचा आंबेडकर यांच्यावर सखोल परिणाम झालेला दिसतो . खुद्द ज्योतिबा फुले यांना सुद्धा या उदारमतवादातील हक्काची लढाई नीट कळली होती आणि म्हणूनच ते इतरांच्या पासून वेगळे झाले हक्कांचा प्रश्न जेवढा फुले यांनी चर्चेला घेतला आहे तेवढा इतरांनी घेतला नाही याचे कारण उदारमतवादाचा आवश्यक तो राजकीय प्रभाव यांच्यावर नव्हता फुले यांना पेशवाई नको होती कारण पेशवाई मध्ये हक्कच नव्हते राजकीय हक्क तर बिलकुलच नव्हते त्यामुळेच त्यांनी ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला कारण ब्रिटिश सरकारमध्ये राजकीय हक्काची लढाई लढता येत होती . किंबहुना अशी लढाई लढता येणे शक्य नसते तर गांधीवाद सुद्धा निर्माण झाला नसता . आंबेडकर यांना याची व्यवस्थित कल्पना आहे . याच उदारमतवादी परंपरेमध्ये १९५० नंतर नव उदारमतवाद निर्माण झाला आणि त्याने एक पूर्णपणे वेगळी मांडणी केली १९८० नंतर अनेक देशांनी त्याचा स्वीकार केला आता जिथून आंबेडकर वादांनी उदारमतवाद आणला त्या उदारमतवादाचा प्रवाह मुळात अमेरिकेत आणि इंग्लंडमध्येच थांबला नाही तर तो पुढे गेला तर त्याबरोबर आपण पुढे गेलो पाहिजे की नाही ? आज बाबासाहेब आंबेडकर असते तर ते निश्चितपणे पुढे गेले असते तेवढा लवचिकपणा त्यांच्याकडे होता 


आता तर चौथ्या नवतेमध्ये त्या पुढचे प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण नवउदारमतवाद हा कळत नकळत उत्तराधुनिक वादाचा एक नवीन आविष्कार होता त्याने परंपरेचा पुन्हा एकदा विचार करायला सुरुवात केली होती त्यामधले सर्वाधिक गाजलेले वाक्य म्हणजे परंपरा म्हणजे राख नसते तर परंपरा म्हणजे धगधग जिवंत ठेवलेला अग्नी असतो .


पण अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रिगन आणि इंग्लंडच्या पंतप्रधान मार्गा रेट थ्याचर या दोन राष्ट्र प्रमुखांनी तो स्वीकारल्यानंतर अमेरिका आणि इंग्लंड यांचे जे काही झालेले आहे ते काही पूर्णपणे समाधानकारक नाही आमच्या पिढीच्या तारुण्यामध्ये हे दोन उदय झाले होते त्यामुळे मी स्वतः त्यावर फार बारकाईने लक्ष ठेवून होतो कारण त्या वेळेला ही एक फार मोठी थ्रिलिंग घटना होती आणि अर्थशास्त्राचाही मी त्या काळामध्ये विद्यार्थी असल्याने आम्हाला त्याचा अभ्यास सक्तीचा होता . पण प्रत्यक्षात मात्र हळूहळू उनमाद ओसरत गेला . आणि आत्ताची जी काही जगाची आर्थिक गोची झालेली आहे तिच्यामध्ये या घटनांचा किती वाटा आहे असा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .

 त्यामुळे त्याची सुद्धा आता चिकित्सा करण्याची वेळ आलेली आहे . आपल्याकडे अशा प्रकारच्या धोरणाचा प्रभाव पडूनच राजीव गांधी आणि नरसिंहराव निर्माण झाले आणि मग मनमोहन सिंग मात्र मोदी यांच्या कालखंडामध्ये हा नव उदारमतवाद त्याच दिशेने अधिक उग्र टोकाला जहाल टोकाला गेला याला अतिमुक्त उदारमत वाद म्हणतात हा नको तितका उजवा असतो आणि त्याचे दुष्परिणामच जास्त झाले की काय अशी आता शंका येते आहे ज्या दिशेने इंग्लंडच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर आणि रोनाल्ड रिगन यांचा मार्ग गेला यातून अमेरिका आणि ब्रिटिश अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक या लोकांना अजूनही जमलेली नाही आणि म्हणूनच सध्या जग एका विचित्र आर्थिक संकटात सापडलेले दिसते 


आपल्याकडच्या आंबेडकरवादी लोकांना अजूनही आंबेडकरांच्या नंतर सुद्धा निर्माण झालेल्या उदारमतवादाच्या नव्या शिड्याच गाठता आलेल्या नाहीत त्यामुळे उत्तर उदारमतवाद ह्या भानगडी बद्दल त्यांच्याशी काय चर्चा करणार ? त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची काय चर्चा करणार ? मी नेहमीच सांगत आलेलो आहे की चौथ्या नवतेला पुरोगामी वादाकडून जागतिक संस्कृतीला मिळालेली स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्य शिकलीच पाहिजेत त्यांच्या मधूनच नागरिक हक्काचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि नागरिकांना हक्क मिळालीच पाहिजेत ते शाबूत राहिलेच पाहिजेत केवळ आधुनिकतेने आणि उत्तर आधुनिकतेने या मूल्यांना विरोध किंवा यांचे डी कन्स्ट्रक्शन केले म्हणून त्यांना बाजूला काढता येत नाही हे आता आपण समजूनच घेतले पाहिजे परंतु त्याचा संदर्भ मात्र आता पूर्णपणे बदललेला आहे . दुर्दैवाने पुरोगामी वादामध्येच आपले पुरोगामी लोक अडकून पडले आणि नंतरच्या युगातले संघर्ष आणि पेच त्यांना कळले नाहीत . चौथ्या नवतेच्या आंबेडकर वादाला या गोष्टींचा विचार मात्र अतिशय सखोल होऊन करावा लागेल .


भारतामध्ये दलित नेत्याने बौद्ध धर्म स्वीकारणे याची सुरुवातसुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नाही . ती सुरुवात करणाऱ्या माणसाचे नाव ज्योती C. Iyothee Thassa Pandithar पंडितार (Born Kathavarayan; 20 May 1845) होते मुळातच दक्षिणात्य लोक नेहमीच पुढे असतात ते यासंदर्भात सुद्धा पुढे आहेत तिथे पुरोगामी वादाचे आगमन बसवेश्वर यांच्यामुळे युरोपच्या आधीही झाले होते त्याची पार्श्वभूमी कर्नाटकामध्ये तयार झाली होती आणि संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र हळूहळू लिंगायत बनत गेले होते दुर्दैवाने पुढे मग मराठा साम्राज्य वाढत गेल्याने पुन्हा एकदा पेशवाई आली आणि अनेक शैव समाज हळूहळू उत्तर पेशवाईमुळे शूद्र होत गेले अतिसुद्र होत गेले.त्यातच पंडितार( पंडिथार) समाज होता त्यामुळे साहजिकच पहिले बौद्ध धर्मांतर करणारा मनुष्य मूळचा शैव आहे शैव धर्मामध्ये सर्वच समाजात पंडित असतात तसे अस्पृश्य बनवल्या गेलेल्या लोकांच्या जमातीत सुद्धा असतात हा सुद्धा पंडित होता परंतु नंतर मग अनेक पंडित अस्पृश्य केले गेले त्यांच्यामध्ये याचेही घराणे होते हा स्वतः सिद्ध मीमांसे मधला वैद्य होता १८९१ मध्ये त्याने द्रविड महाजनसभेची स्थापना केली . १८९२ च्या आसपास त्याने बौद्ध धर्म हळूहळू स्वीकारायला सुरुवात केली. त्यानेच अभिजन आणि महाजन अशा दोन वेगळ्या संस्कृती आहेत आणि अभिजन ही द्रविडांच्या विरोधात निर्माण केली गेलेली संस्कृती आहे असा त्याचा दावा आहे एका अर्थाने ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान हा विचारवंत आहे . पण महात्मा फुले यांचा अनार्य असा शब्द न वापरता द्रविड असा शब्द त्याने वापरलेला आहे खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शेवटची दिशा ही याच दिशेने म्हणजेच द्रविड दिशेने जायला लागली होती परंतु अलीकडे हे लपवले जाते . पण खुद्द बाबासाहेब आंबेडकरांच्याच हे लक्षात यायला लागले होते की वैदिक लोक येण्याच्या आधीच इथे मूळ लोकांची अत्यंत प्रगत अशी द्रविड संस्कृती होती .


आता भारताचा विचार करताना तुम्ही त्याचे श्रेय नाकारणार आहात का ? बसवेश्वर यांचा विचार नाकारणार आहात का ? उलट सर्व काही आंबेडकर म्हणण्याच्या नादामध्ये तुम्ही या लोकांचा आधार गमावत बसला आणि आज अवस्था अशी आहे की संपूर्ण वीर आणि ओबीसी समाज तुमच्या पासून तुटलेला आहे . ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही असे अनेक अस्पृश्य समाज सुद्धा हळूहळू आंबेडकर वादांच्या पासून तुटत आहेत याला कारण तुम्ही आहात परंतु आत्मपरीक्षण करणे राहिले बाजूला उलट हे तुकडीकरण कसे वाढत जाईल याचीच काळजी तुम्ही करत आहात . अनेकदा तर तुम्ही ब्राह्मण धर्माचे एजंट असल्यासारखे वागता . पूर्वीच्या काळामध्ये काही ब्राह्मण आणि इतर प्रभावी जातीतले महाजन महायान बौद्ध धर्मामध्ये अशा प्रकारचे एजंट होते तुम्हाला तसे एजंट बनायचे आहे काय ?


माझे स्वतःचे मत असे आहे की आता दलितवादी लोकांनी आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे दलित वाद हा आंबेडकर यांच्यापासून सुरू होत नाही तो त्यांच्या आधीच सुरू झाला होता आणि त्याची मुळे थेट आपणाला बसवेश्वर यांच्या लिखाणात दाखवता येतात . दलित पुरोगामी वादाचे सर्वोत्तम शिखर म्हणून तुम्ही जरूर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करा कारण ते तसे आहेत त्यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही पण हिमालय हाच काय तो पर्वत आणि बाकीचे सर्व डोंगर हे जे काही चालले आहे ते परवडणारे नाही . काही लोक तर डोंगरांना सुद्धा मान्यता द्यायला तयार नाहीत . परिवर्तनवादी चळवळीला हे सर्व परवडणारे नाही . आज ओबीसी समाजापैकी आणि हळूहळू दलित समाजापैकी अनेक जण हे हिंदुत्वाला सामील होत गेले आणि म्हणूनच शैव हिंदुत्व पुन्हा एकदा हिंदुत्ववादामध्ये नव्याने दाखल करणे प्राप्त झाले . पण हे का झाले याची चिकित्सा न करता आम्ही म्हणतो तेच खरे याला फार अर्थ उरत नाही . परिवर्तन वादाची चळवळ ही पंडित ,वीर , वाणीपणी , उत्पादक ओबीसी , बीसी, एससी ,एसटी ,आदिवासी अशा सर्व प्रकारच्या समूहांना घेऊन उभी करावी लागेल अन्यथा अनुयायी नेत्याला संपवतात असा जो इतिहासामुळे झालेला समज आहे तो समज पुन्हा एकदा खरा होईल .


श्रीधर तिळवे नाईक  


Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती