अपयशावर उभे असणारे यश आणि भारतीय राजकारण श्रीधर तिळवे नाईक 

अपयशावर उभे राहणारे यश हे भारतीय राजकारणाचे मध्ययुगीन काळापासूनचे वैशिष्ट्य आहे. याचे कारण मुळातच यश म्हणजे काय हेच भारतीय समाज आता विसरून गेलेला आहे. खरे यश ते असते जे कन्स्ट्रक्टिव्ह असते जे स्वतः काहीतरी असे निर्माण करून ठेवते की ज्याची कॉपी नंतर अनेक लोक करत बसतात . खरे यश सृजनशील असतं निर्माणशील असते . आणि दुय्यमस ते असते जे आपल्याकडे नाही त्या गोष्टी व्यवस्थित आयात करत शिकते पूर्णपणे आत्मसात करते आणि पुन्हा स्वतःच उत्पादन करते . परंतु भारतामध्ये एक धर्म असा आहे की जो फक्त सृजनाची हत्या करत असतो आणि दंतकथा रचत सर्व सृजनशीलता गटारात नेऊन फेकतो . या धर्माला ब्राह्मण लोक ब्राह्मण धर्म म्हणतात आणि इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा १८९० पर्यंत या धर्माला इंग्रज लोक सुद्धा ब्राह्मण धर्म म्हणत होते हिंदू नाही .


या ब्राह्मण धर्माला नैतिकतेची कसलीही चाड नाही कुठलाही स्वतःचा असा खरा देव नाही. या धर्माकडे फक्त एका विशिष्ट वर्णाचे पौराहित्य एवढी क्षमता आहे . मग कुठल्याही धर्माचे पवार आहेत ते पौराहित्य या लोकांना चालते आणि सर्व संसाधने आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हे लोक कुठल्याही टोकाला जाऊ शकतात जे लोक स्वतःच्या इंद्र नावाच्या देवाचे पण नाहीत ते इतर कोणाच्या देवांचे काय होणार जे लोक वेदांचे सुद्धा नाहीत यज्ञाचे सुद्धा नाहीत ते लोक इतरांच्या विद चे कसे होणार इतरांच्या ज्ञानाचे कसे होणार आणि इतरांच्या पूजा पाठचे कसे होणार ते तिथे जाऊन सुद्धा घोळच घालणार आणि तसा घोळ घातला गेला आहे भारतात जन्मलेला प्रत्येक धर्म खराब करणे एवढेच एक काम ब्राह्मण धर्माने गेल्या अडीच हजार वर्षात केलेले आहे सुरुवात अर्थातच वैदिक धर्मापासून झालेली आहे प्रथम वैदिक धर्म खराब करण्यासाठी म्हणूनच ब्राह्मण धर्माचा जन्म झाला आणि नंतर मग वासुदेव धर्म खराब करून वैष्णव धर्म निर्माण केला बौद्ध धर्म खराब करण्यासाठी म्हणून नंतर मग महायान वगैरे आणले गेले जैन धर्म खराब करण्यासाठी म्हणून जैन धर्मामध्ये सुद्धा वर्णव्यवस्था आणली गेली मुस्लिम धर्म फक्त खराब करता आला नाही कारण तो मुळातच इतका खराब होता की त्याहून अधिक खराब करता येणे शक्य नव्हते मात्र अनेक ब्राह्मणांनी या कालखंडामध्ये मुस्लिम धर्माचा स्वीकार करून ते मौलवी बनलेले दिसतात याचे कारण त्यांना असे वाटले की आता यापुढचा काळ मुस्लिम धर्माचा आहे पुढे मग काही लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारतानाही दिसतात त्याही धर्मामध्ये मुळातच लिखित संहिता इतकी प्रखर होती की तिथे फार काही यांना करता आले नाही मात्र हळूहळू पाठच्या दाराने या लोकांनी ख्रिश्चन धर्मामध्ये वर्णव्यवस्था आणली . 


म्हणजेच प्रत्येक धर्माचे यश खराब करणे त्या धर्मामध्ये वर्णव्यवस्था आणणे व्यवस्थेमध्ये नेहमीच ब्राह्मण किंवा पुरोहित टॉपला राहील याची काळजी घेणे हाच एक फंडा बनून गेलेला आहे त्यामुळे जेव्हा पुरोगामी वाद आला तेव्हा आता हा पुरोगामी वाद कसा काय खराब होणार असा प्रश्न बहुतेक ब्राह्मणांना पडला असावा त्यामुळेच मग सर्वच्या सर्व विचारप्रणालींच्या मध्ये ब्राह्मण लोकांनी शिरकाव करून सर्व विचार प्रणाली खराब करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला . फक्त एक शैवधर्म उरला होता तो या लोकांनी मग पुरोगामी कालखंडामध्ये व्यवस्थित खराब करून त्याला सुद्धा वर्ण जात व्यवस्था शिकवली त्याची सुरुवात मुस्लिम कालखंडामध्ये झाली होती पण बसवेश्वर गुरुनानक शिवाजी महाराजांनी हे प्रयत्न हाणून पाडले आणि शैव-धर्मामध्ये घुसलेली वर्ण जात व्यवस्था नष्ट केली पण गप्प बसतील ते ब्राह्मण धर्मीय कसले ? ते फक्त संधीची वाट बघत बसलो आणि अशी संधी पहिल्या बाजीरावाच्या मस्तानी प्रकरणांमध्ये मिळाली आणि पुन्हा नानासाहेब पेशव्यांच्या कालखंडामध्ये या लोकांनी नवशैव धर्म सुद्धा व्यवस्थित खराब करायला सुरुवात केली आणि पुरोगामी कालखंडामध्ये हिंदू धर्म निर्माण करून शैव धर्म खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला अलीकडे कुंभमेळ्यामध्ये हा प्रयत्न पुन्हा पुन्हा होतो आहे .


या सगळ्याचा परिणाम असा झाला की कन्स्ट्रक्टिव काम करता येणे या गोष्टीवरचा भारतीय लोकांचा विश्वासच उडत चाललेला आहे अपवाद कदाचित असले तर बसवेश्वर शिवाजी महाराज महात्मा फुले महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर असे काही मोजके लोक आहेत पण या लोकांच्या बाबतीत सुद्धा आपण लक्षात घेतले तर लक्षात येते की हे लोक ब्राह्मण धर्माच्या कचाट्यातून सुटले अर्थात ते काही आपोआप सुटले नाहीत काही काळ त्यांनी या धर्माच्या साह्याने हिंदू धर्माच्या साह्याने काही होते का ते तपासून पाहिले आणि जेव्हा लक्षात आले की असे काही होत नाही तेव्हा या लोकांनी आपल्या स्वतंत्र वाटचालींना सुरुवात केली विशेषत : महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत हे घडताना दिसते 


यानंतर मग अर्थातच आधुनिक वादाची सुरुवात नेहरूंच्या कालखंडामध्ये झाली आणि आता हा आधुनिक वाद कसा काय बुवा खराब होणार अशी चिंता अनेक ब्राह्मण धर्म स्वीकारलेल्या लोकांच्या मनात निर्माण झाली त्यामध्ये काँग्रेसने त्यांना मदत केली काँग्रेसने मूळचे फ्युडल स्ट्रक्चर नष्ट केलेच नाही उलट त्याला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या साह्याने सत्ता ताब्यात ठेवण्याचे नवीन राजकीय समीकरण जुळवायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणधर्म खेड्यातून नष्ट झालाच नाही उलट तो मजबूतच होत गेला आणि शैव लोकांच्या मध्ये तो अधिकाधिक पसरत गेला आज अवस्था अशी आहे की अनेक शैव लोकांना आपला धर्म स्वतंत्र धर्म आहे याचीच कल्पना नाही 


यातूनच मग हळूहळू गोष्ट अशी झाली की अपयशावर यश उभा करणे याची सुरुवात झाली म्हणजे जेव्हा नेहरू चीन आणि पाकिस्तानच्या धोरणाबाबत अपयशी होत गेले तेव्हा त्यांच्या या अपयशावर ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असे म्हणतात लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी उभे राहिले मग इंदिरा गांधींना सुद्धा अपयश आले आणि त्यांच्या अपयशावर जनता पक्ष उभा राहिला मग जनता पक्षाच्या अपयशावर पुन्हा एकदा इंदिरा गांधींनी आपला यशाचा पूल बांधला त्यानंतर पुन्हा एकदा एक कन्स्ट्रक्टिव्ह माणूस आला त्याचे नाव राजीव गांधी! नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी हे कन्स्ट्रक्शन खूप सुंदर रीतीने डेव्हलप केले परंतु नेहमीप्रमाणे मग ब्राह्मणांना हे उत्तर आधुनिक नवउदारमतवादी धोरण खराब करणे गरजेचे होते कारण तसा त्यांचा ब्राह्मण धर्माचा नियमच आहे मात्र फक्त ब्राह्मण लोकांच्या साहाय्याने हे करता येणार नाही हे लक्षात आल्याने या लोकांनी आपले धोरण बदलले आणि त्यांनी शैव-धर्मातल्या लोकांना आपल्याबरोबर घ्यायला सुरुवात केली बहुजन समाज आपल्याबरोबर घ्यायला सुरुवात केली आणि त्यासाठी म्हणूनच प्रथम आपल्या पक्षांमध्ये अत्यंत लायक असणारे सर्व ब्राह्मण आणि क्षत्रिय लोक सुद्धा साईडलाईन केले कारण ओबीसी लोकांचा सपोर्ट शैव लोकांचा सपोर्ट अत्यंत आवश्यक वाटत होता आणि त्यातूनच मग नरेंद्र मोदी नावाचे बहुजन समाजातून उदयाला आलेले नेतृत्व या लोकांनी पंतप्रधानपदी उभे केले त्यामुळे साहजिकच बहुजन समाजाने आणि शैव-धर्मातल्या सर्व लोकांनी यांना पाठिंबा दिला पण जे व्हायचे तेच झाले हळूहळू मोदींचे अपयश अलीकडच्या दोन काळामध्ये अंडरलाईन करण्यात आले आणि आज आपणाला असे दिसते की मोदींच्या अपयशावर राहुल गांधी उभे राहत आहेत प्रत्यक्षामध्ये मनमोहन सिंग यांच्या नंतरच्या शेवटच्या दोन वर्षांमध्ये त्यांच्या यशाला डाग लावण्यामध्ये सर्वाधिक वाटा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाच होता पण आता त्याचा विसर पडलेला दिसतो नरसिंहराव यांची स्मृती सुद्धा राहू नये म्हणून या लोकांनी धडपड केलेली होती परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत पण दक्षिण भारताबद्दल काँग्रेसचा असलेला आकस दिसला हा आकस फक्त काँग्रेसचा आहे असे वाटते तोपर्यंत अलीकडे मोदी यांनी सुद्धा आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना परमिशन नाकारून आपण सुद्धा या आकसाबाबत कमी नाही आहोत आणि उत्तर भारतीयच आहोत हे सिद्ध केले 


मोदींच्या अपयशाची सातत्याने चर्चा जशी होऊ लागली तशी तशी आता या अपयशाला पर्याय म्हणून राहुल गांधी यांना पुढे आणण्यात येत आहे आणि राहुल गांधी नेता म्हणून पुढे येत पण आहेत राहुल गांधींचे १९९५ च्या नंतरचे व्यक्तिमत्व त्यानंतर २००७ नंतरचे व्यक्तिमत्व आणि २०२१ नंतरचे व्यक्तिमत्व यांच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे असे दिसते आहे २०२१ नंतर राहुल गांधी हळूहळू एक परीपक्व राजकारणी बनताना दिसतात आणि गमतीचा भाग असा आहे की हिंदुत्ववादी लोक अजूनही त्यांच्या पप्पू इमेजेस मध्ये अडकलेले आहेत त्यांना असे वाटते की लोकांच्या मनात अजूनही राहुल गांधी यांची प्रतिमा पप्पू अशी आहे पण हे सर्व बदललेले आहे.


नवीन राहुल गांधी हे नक्कीच पूर्वीच्या राहुल गांधींच्या पेक्षा सक्षम आहेत आणि कदाचित ते पंतप्रधान पद सुद्धा सांभाळू शकतील अशा प्रकारची सक्षमता आणि शक्ती ते दाखवत आहेत साहजिकच आतापर्यंत काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी लायक उमेदवार नाही असे जनतेला वाटत होते तोपर्यंत नरेंद्र मोदी यांना सर्व वाटचाली सोप्या होत्या परंतु आता जी येणारी निवडणूक आहे त्यामध्ये भाजपकडून कोणीही उभे राहिले तर हे काँग्रेसकडून एक सशक्त पर्याय राहुल गांधींच्या रूपाने पंतप्रधान पदासाठी उभा आहे फक्त काँग्रेसने एकच करावे ते म्हणजे सरळ सरळ स्पष्ट आणि स्वच्छपणे राहुल गांधी हे आमचे पंतप्रधान असतील असे जाहीर करावे याबाबतीत तथाकथित लोकशाही दाखवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये कारण लोकांना अलीकडे पंतप्रधानपदी कोणता चेहरा आहे हे आधीच निवडणुकीच्या आधीच कळायला लागते याबाबतीत विरोधीपक्षांनी देखील आपले अहंकार बाजूला काढून ठेवावेत आणि शांतपणाने राहुल गांधी आमच्या वतीने पंतप्रधान असतील असे जाहीर करावे त्यातच त्यांचे कल्याण आहे आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आलेली आहे ती वागणूक लक्षात घेता संपूर्ण दक्षिण भाजपच्या विरोधात गेली तर फारसे आश्चर्य मानू नये . पुन्हा एकदा काँग्रेसला सत्तेवर येण्याचे वातावरण हळूहळू तयार होते आहे प्रश्न असा आहे की या वातावरणाचा पुरेसा फायदा घेतला जाणार आहे की नेहमीप्रमाणे काहीतरी घोळ घालून सगळेजण एकमेकांच्या पायात टांगा घालून सगळेच उताणे पडणार आहेत कारण विरोधी पक्ष अनेकदा हा मूर्खपणा करत असतो .


या सगळ्या मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम एकच येतो तो म्हणजे प्रत्येक वेळेला पहिल्याच्या अपयशावर दुसऱ्याचे यश ही साखळी सुरू राहणार आहे का? ही साखळी कधी तुटणार आहे का? कारण सर्वसाधारणपणे रिप्लेस करणे फार सोपे असते परंतु निर्माण करणे फार अवघड असतं . राहुल गांधी काय निर्माण करू इच्छितात याबद्दलचा एक संपूर्ण आराखडा जोपर्यंत ते लोकांना सादर करत नाही तोपर्यंत लोकांची मते मिळण्याची शक्यता थोडी कमीच राहील मात्र जर का त्यांनी हा आराखडा सादर केला आणि तो जर का लोकांना पटला तर मग त्यांचे यश जवळजवळ निश्चित आहे अनेकांना असे वाटते की मोदी यांच्या जागी अमित शहा आणले तर प्रश्न सुटेल पण स्पष्ट सांगायचे तर प्रश्न सुटणार नाही आता फक्त शैव हिंदुत्व हिंदुत्ववादी लोकांना वाचवू शकते अन्यथा भाजप येत असलेल्या निवडणुकीत वाचेल याची शक्यता फार फार कमी आहे. अलीकडेच काशीचा प्रश्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही असे कळत नकळत जाहीर करण्यात आलेले आहे भागवतांचे तसे विधान आलेले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की या लोकांना नेहमीप्रमाणे शैव लोकांच्या बाबतीत काहीही करायचे नाहीये . शैव लोकांची यासंदर्भातली मागणी अत्यंत स्पष्ट होती पण काशी विश्वेश्वरयाचे मंदिर निर्माण होईल अशी कसलीही शक्यता आता दिसत नाही आणि जर काही शक्यता दिसणार नसेल तर मग शेव लोक भाजपाला त्याची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत डोक्यावर कातडे ओढले म्हणजे सूर्य उगवायचा थांबत नाही हे आता सर्वांनी लक्षात घ्यावे तुमचा विरोधक अतिशय प्रबळ होत चालला आहे ही वस्तुस्थिती ती जर का स्वीकारायची नसेल तर त्याने काहीच फरक पडत नाही कारण तो तसा झालेला आहे आणि तो तसा व्हायला तुम्ही खूप मदत केलेली हिंदू लोकांच्यासाठी तुम्ही काहीही केलेले नाही तुम्ही फक्त मुस्लिम लोकांच्या संदर्भात भय निर्माण करत बहुजन समाजाला घाबरवत बसला आणि मलमपट्ट्या करत बसला लोकांना आता या मलमपट्ट्यांच्या मध्ये बहुजन समाजाला काडीचाही इंटरेस्ट नाही हिंदू लोकांना आता यापुढे कोणीही दोष देऊ शकत नाही की त्यांनी बहुमत दिले नाही. अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये दोन तृतीयांश बहुमत देऊन समान नागरी कायदा निर्माण करण्याची चांगली संधी हिंदू आमदारांना राजकीय लोकांना देण्यात आली होती आणि हिंदू लोकांनी हिंदुत्ववादी लोकांनी ही संधी हुकवली असाच आता इतिहास लिहिला जाईल . आपले राजकीय नेते किती मूर्ख असावेत याचा हा नमुना आहे . मध्ययुगातले अनेक राजे आणि आत्ताचे हिंदुत्ववादी लोक यांच्यामध्ये काडीचाही फरक नाही हे आता हळूहळू स्पष्ट होत चालले आहे उलट शरियतला आळा घालायचा राहिला बाजूला हे लोक मनुस्मृतिचे समर्थन करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत आहेत खरंतर या गोष्टीची या लोकांना लाज वाटायला हवी परंतु एकंदरच लाज कोळून प्यालेले असे हे लोग आहेत . यांना अजूनही बहुजन समाज मध्ययुगामध्ये अडकून पडलेला आहे असे का वाटते ?आपण अजूनही मनुस्मृती आणू शकतो असे का वाटते? केवळ अनेक तोंडाने बोलायचे अनेक चेहरे दाखवायचे आणि त्याच्या जीवावर चेहऱ्यांची झुलवा झुलव करत बसायचे हे आता खूप झाले हिंदू जनमानस हे सर्व सहन करण्याच्या मूडमध्ये नाही हे जितक्या लवकर भाजपाला कळेल तितके बरे . नाहीतर एक फार मोठा पराभव तुमची वाट बघतो आहे .


श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती