चौथी नवता ,उत्तर जालीयता आणि निरुपमा शहा यांनी उदय अस्त वर्तुळ आणि वर्तुळाचा भेद यांच्या संदर्भात विचारलेला प्रश्न
प्रश्न निरुपमा शहा
माणसाचा उदय परत अंत हा वर्तुळाकार प्रवास भेदता येतो का ?
उत्तर श्रीधर तिळवे नाईक
जो अनंताला उपलब्ध होत नाही त्याला अंत दिसतो एकदा का तुम्ही अनंताला उपलब्ध झाला की अंत दिसतच नाही आणि उदय पण दिसत नाही आता कोणी जर अनंताला उपलब्ध होणे म्हणजेच भेदने असे म्हणत असेल तर हो भेदणे शक्य आहे असे साधे सरळ उत्तर मी देऊ शकतो पण तरीही जास्त स्पष्टीकरण देतो आहे
प्रश्नात माणूस उदय अंत प्रवास वर्तुळ आणि भेदणे अशा सहा गोष्टी आहेत
माणूस हा होमो सेपियन आहे हे आता स्पष्ट झालेले आहे मात्र त्याच्या स्वरूपाविषयीच्या आधीच्या ज्या संकल्पना , कल्पना आणि परिकल्पना होत्या त्या नष्ट झाल्या त्याच्याबरोबर त्याच्या असणाऱ्या सहजाती एक तर त्याने स्वतः नष्ट केलेल्या आहेत किंवा त्या आपोआप नष्ट झाल्या टिकल्या नाहीत त्यामुळे माणूस आणि उत्क्रांती यांच्यामधला संबंध आता सर्वांनी स्वीकारावा हे उत्तम तो नाकारण्याकडे काही लोकांचा कल आहे परंतु सत्य असे डावलता येत नसते. उद्या जर खरोखरच काही सायंटिफिक पुरावे मिळाले आणि उत्क्रांती नाकारण्यात आली तर मग आपण त्याचा विचार करू शकतो सध्या तरी हा विचार करण्याचे कारण नाही त्यामुळे सुरुवात होमोसेपियन अशी करू किंबहुना चौथ्या नवतेमध्ये होमोसेपियन केंद्रस्थानी आला ही वस्तुस्थिती आहे .त्याच्या आधी माणसाचा विचार करताना नेहमीच आधुनिक काळामध्ये अस्तित्व पुरोगामी काळामध्ये व्यक्ति किंवा सब्जेक्ट(ज्ञाता ) आणि धार्मिक काळामध्ये आत्मा आणि पर्सनॅलिटी तर मोक्षल काळामध्ये जीवप्राण आणि आदिम काळामध्ये शरीर या पद्धतीने होत होता आता या सर्व पद्धती बाजूला झालेल्या आहेत आणि शांतपणाने या सर्वांना सामावून घेत विज्ञान तंत्रज्ञानामधून आलेली होमोसेपियन हीच संकल्पना उदयाला आलेली आहे आपण सर्वांनी ती स्वीकारायला हवी असे आता स्पष्ट झाले आहे याचा शॉट फॉर्म म्हणून आपण स्वतःला सेपियन म्हणायला हरकत नाही मोक्ष देऊ शकेल असा कुंडलिनीचा सर्प उपस्थित असलेला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ज्ञान भान असलेला शारीरिक जेनेटिकल प्राणल जीव म्हणजे सेपियन अशी माझी व्याख्या आहे
त्याचा उदय होतो म्हणजे नेमके काय होते तर त्याचा आईच्या पोटातून जन्म होतो ज्याला बापाचे जीन्स सुद्धा कारणीभूत असतात स्त्रीसत्ताक राजवटी प्रथम आल्या त्याचे सर्वात मोठे कारण माणसाला स्त्रीच्या पोटातूनच आपला जन्म होताना दिसला होता साहजिकच स्त्री हीच आपल्याला संपूर्ण निर्माण करते हा विश्वास होता त्यामुळे स्त्रीला असाधारण महत्व होते आणि सुरुवातीच्या सर्वच राज्यव्यवस्था किंवा राजवटी या स्त्रीसत्ताक होत्या संसार स्त्री निर्माण करते ही संकल्पना सुद्धा त्यातूनच निर्माण झालेली आहे अर्थात मोक्ष मिळाल्यानंतर ती आपोआपच काँक्रीट होते कारण कळूनच चुकते की शक्तीनुसारच संसार निर्माण झालेला आहे शिव संसारामध्ये महाप्राण आणि जीवामध्ये फक्त प्राण म्हणून उपस्थित आहे आपला उदय हा त्यांनी मांडलेल्या संसारातून झालेला आहे . हा उदय उत्क्रांती रूप होता हेही आता स्पष्ट झालेले आहे आपल्याकडच्या अनेक लोकांना सायन्स नाकारण्याची काय हौस असते मला कळत नाही हे लोक धार्मिक ग्रंथांनी आंधळे झालेले असतात दंतकथांच्यावर विश्वास ठेवणारे असतात याबाबतीत विज्ञान काय सांगते तेच महत्त्वाचे . म्हणूनच आपण एकविसाव्या शतकामध्ये सेपियन स्वीकारावा .
हीच गोष्ट अस्तबाबत आहे .हे एक फार मोठे अजूनही न सुटलेले कोडे आहे शैव भाषेत आपण म्हणतो की प्राण उडून गेला पण म्हणजे नेमके शरीरात काय होते कारण शरीर तर समोरच असते मेंदू समोरच असतो शरीराच्या सर्व सिस्टीम समोरच असतात आणि तरीही शरीर जिवंत नसते सिस्टीम चालत नसतात म्हणजे एका अर्थाने आपण सर्वच मरतो म्हणजे आपल्या सिस्टीम मधून चालते होतो आपल्याही शरीराची एक ना एक दिवस हीच अवस्था होणार आहे याची माणसाला अनेकदा जाणीव होते कारण मनुष्य समोरच्या माणसांचे मृत्यू पहात असतो पण तो खरोखर मृत्यू पाहत असतो का की तो मृत शरीर पाहत असतो ? मृत्यू त्याला तरी दिसतो का ? वस्तुस्थिती अशी आहे की मृत्यू दिसत नाही आपण जिवंत असतो तोपर्यंतच आपण असतो आणि आपण नसलो की मृत्यू असतो अपवाद फक्त मोक्ष मिळालेला माणूस ! मोक्षाला त्यामुळेच अनेकदा महामृत्यू म्हटले जाते याचे कारण मोक्ष मिळण्याच्या प्रोसेस मध्ये सर्वच्या सर्व मरताना आणि नंतर मेलेले पाहता येते स्वतःचे शव स्वतःच पाहणे शक्य होते आणि हा पाहणारा शिव असतो प्राण असतो . प्रश्न असा आहे की प्रत्येक माणसाला मरताना हेच होते का ? या संदर्भात आत्ता तरी काही निश्चित विधान करता येत नाही पण आज ना उद्या या संदर्भात नक्की काही विधानात्मक सत्य सापडेल . मी नेहमीच म्हणतो की विज्ञानाबाबत व्यक्तिगत अनुभव फार काउंट करत नाही . मात्र जवळजवळ सर्वच माणसे मरताना हे अनुभवत असतील तर त्यांच्या त्या अनुभवाच्या संदर्भातली रेकॉर्डिंग करून त्या रेकॉर्डिंग मधून काही निष्कर्ष काढता येणे शक्य आहे का हे आता बघावे लागेल पूर्वीच्या काळी हे शक्य नव्हते परंतु आता तंत्रज्ञान विशेषतः चिन्ह तंत्रज्ञान अशा तऱ्हेने विकसित होत आहे की भविष्यात एक दिवस हे करता येणे शक्य आहे.
प्रश्न असा आहे की मग वर्तुळ ही संकल्पना आली कुठून ? तर ती आली ऋतूंच्या पातळीवर ! जेव्हा माणसाने झाडांना पाहिले तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की एक वर्तुळ पूर्ण होते आणि त्या वर्तुळामध्ये वसंत पुन्हा पुन्हा येत राहतो किंवा त्याने चंद्र पाहिला त्याची चंद्रकोर पाहिली आणि नंतर त्याची पौर्णिमा होताना पाहिली मग अमावस्या आणि मग पुन्हा चंद्राला जन्मताना पाहिले आणि पौर्णिमा होताना पाहिले एका अर्थाने हा आकाशातला पुनर्जन्म होता म्हणजे झाड हा जमिनीवरचा तर चंद्र हा आकाशातला पुनर्जन्म असल्यानेच मग त्याला आपल्याही शरीराला असे काही होत असेल असे वाटायला लागले आणि म्हणूनच आपल्या शरीराला सुद्धा वसंत प्राप्ती होत असणार असे गृहीत धरून माणसाला हा आपल्याही शरीराचा वर्तुळाकार प्रवास दिसायला लागला दर वसंता गणिक झाडांचा होणारा पुनर्जन्म हा आपला सुद्धा असू शकतो असे त्याला वाटायला लागले आणि म्हणूनच पुनर्जन्माची संकल्पना आपल्याकडे चांगलीच प्रचलित झाली . अगदी ग्रीक लोकांच्या सुद्धा पुनर्जन्माची संकल्पना असावी आणि कदाचित अनेक आदिवासी धर्मांच्या मध्ये सुद्धा ती असण्याची शक्यता आहे फक्त फरक पडला तो इतकाच की भारतामध्ये भगवान शंकर झाले आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला एक व्यवस्थित आकार दिला आणि हे सर्व मोक्षामुळे झाले इथे मात्र मोक्ष झाला नाही इतर संस्कृतींच्या मध्ये मोक्ष आलाच नाही मोक्ष मिळालेला कोणी झालाच नाही आणि त्यामुळे भारताला एक वेगळी विशिष्टता प्राप्त होत गेली ती आजही टिकून आहे म्हणूनच मी मोक्ष नाकारणारे सर्व धर्म नाकारत असतो . यामुळेच हळूहळू संसार हे चक्र असते आणि वर्तुळाकार प्रवास असतो हे गृहीतका ठामपणे भारतीय संस्कृतीमध्ये रुजलेले आहे . पण त्याचबरोबर हे वर्तुळ भेदता येते का? हा प्रश्न कायमच विचारण्यात आला. हे वर्तुळ एक तर तुम्ही भेदता किंवा मग या वर्तुळा पुढे भेदरता . ज्युदाइक धर्म मग तो ज्यू असो की ख्रिश्चन असो की इस्लाम हे तिन्ही धर्म भेदरलेल्या लोकांचे धर्म आहेत . त्यांच्या मुळाशी भय आहे आणि त्यामुळेच मग ज्याच्याजवळ जे असते ते तो वाटत जातो या न्यायाने हे सर्व धर्म जगभर भय वाटत सुटलेले आहेत . आणि भय संघर्ष निर्माण करते युद्ध निर्माण करते . समोरच्यावर मिळालेला विजय काही काळ का होईना पण भयाचा विसर पडतो . हा भयाचा विसर तत्कालीन नशा असते ती काही काळ चढते पण नंतर उतरते या नशेसाठी मग अणुबॉम्ब सुद्धा टाकला जातो . त्यामुळेच हे वर्तुळ भेजायचे भेदायचे की या वर्तुळा पुढे भेदरायचे हे ठरवायला लागते . भेदरणारा माणूसच किंवा धर्मच भेद निर्माण करतो आणि भेद नेहमीच अमंगळ असतात . भारतातला ब्राह्मणधर्म हा सुद्धा असा भेदरण्यातूनच निर्माण झालेला आहे . म्हणूनच त्याला भेद सुचतात . तेव्हा तुम्ही विचारालेला प्रश्न दिसायला सोपा आहे पण तो फार व्यापक आहे . असो
आता ज्याला हे चक्र किंवा वर्तुळ भेदायचे आहे त्याच्यापुढचे प्रश्न वेगळे असतात . पहिला प्रश्न प्रत्यक्षामध्ये माणूस असा ऋतुजन्य किती जगतो हा आहे खरोखरच त्याचा पुनर्जन्म होतो का हा दुसरा प्रश्न आहे आणि जर का हे संसार चक्र चक्र असेल वर्तुळ असेल तर ते भेदता येईल का असा हा तिसरा प्रश्न आहे
होमोसेपीएनचा वैज्ञानिक अभ्यास स्पष्टपणे अजून तरी पुनर्जन्माच्या बाजूने नाही मग याबाबतीत उरतात ते फक्त वैयक्तिक अनुभव ! त्यांना वैज्ञानिक पातळीवर स्वीकारता येणे शक्य नाही कारण जोपर्यंत एखादी गोष्ट सर्वांना लागू करता येत नाही तसा पुरावा मिळत नाही तोपर्यंत ती वैज्ञानिक सत्य म्हणून स्वीकारता येत नाही . मला माझे सगळे मागचे जन्म आठवत असतीलही परंतु त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देणार कसे आणि ते खरे कशावरून ? याबाबतीत ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव इतकेच आपण म्हणू शकतो . आणि समजा पुनर्जन्म नसेल तर मोक्ष नाहीसा होतो का ? तर वस्तुस्थिती अशी आहे की मोक्षाचा आणि पुनर्जन्माचा काडीचाही संबंध नाही आपल्याकडे भारतीय लोकांनी अकारण तो ताणवलेला आहे . मूळ मुद्दा नेहमीच सौंदर्याचा प्रज्ञेचा आनंदाचा शुद्ध प्राणाचा शुद्ध शक्तीचा अद्वैताचा असतो त्या संपूर्ण आनंदाला त्या संपूर्ण सौंदर्याला त्या संपूर्ण महाप्रज्ञाला शून्यशिवाला अनंत शक्तीला आपल्याला उपलब्ध व्हायचे आहे की नाही हा खरा प्रश्न आहे कारण मोक्ष म्हणजे या सर्वांना उपलब्ध होणे . तेव्हा तुम्ही भेदण्याविषयी जे विचारत आहात त्याचे उत्तर हो हे भेदणे शक्य आहे असेच आहे . म्हणूनच त्यासाठी शून्याला उपलब्ध होणे गरजेचे आहे आणि मोक्ष म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शून्याला उपलब्ध होणे . या शून्यालाच शैव लोकांच्या मध्ये शिव म्हणतात . किंबहुना भारतामध्ये शून्याचा शोध लागला त्याचे सर्वात मोठे कारण मोक्ष आहे . द्रविड लोक हे शून्य अमेरिकेमध्ये घेऊन गेले तर पणी लोक ते आफ्रिकेमध्ये आणि युरोपमध्ये घेऊन गेले अरब लोक आरक्षणात घेऊन गेले आरब लोक अरबस्थानात घेऊन गेले त्यांनी जर का सोबत मोक्षही नेला असता तर फार बरे झाले असते . आज जगाची जी दुर्दशा झालेली आहे ती झाली नसती . मला वाटते एवढे पुरेसे आहे . प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment