बुरखा टिकली कुंकू ओढणी आणि साडी श्रीधर तिळवे नाईक
खरे तर अशा विषयांच्यावर बोलू नये पण बोलावे लागते लिहू नये पण लिहावे लागते
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे धर्म आणि संस्कृती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . धर्म हा संस्कृतीचा भाग होऊ शकतो पण प्रत्येक धर्माची संस्कृती तयार होऊ शकते पण संस्कृतीमध्ये फक्त एकच धर्म असेल असे नाही अनेक धर्म सुद्धा असू शकतात इंडियन संस्कृती हे याचे उत्तम उदाहरण आहे इंडिया मध्ये शैव वैदिक वेदांती ब्राह्मण लोकशैव म्हणजे पाशुपत ते नवनाथ जैन बौद्ध वैष्णव हिंदू नवशैव म्हणजे लिंगायत आणि शीख असे अनेक धर्म येतात तेव्हा एका संस्कृतीमध्ये धर्म असतात आणि प्रत्येक धर्माची स्वतःची एक संस्कृती असू शकते जी त्या मोठ्या संस्कृतीची उपसंस्कृती म्हणून वावरत असते इंडिया मध्ये बाहेरून आलेले जे धर्म आहेत त्यांचा इंडियन संस्कृतीशी काय संबंध हाच सर्वात मोठा प्रश्न आहे
यामध्ये इस्लामला एक वाट व्यवस्थित सापडली होती ती म्हणजे भारतीय संस्कृती स्वीकारायची पण स्वतःच्या धर्मातले काही मुख्य घटक शाबूत ठेवायचे म्हणजे उपासनेची जागा मस्शीद उपासनेचे पुस्तक कुराण ठेवायचे पण बाकी सर्व सवयी उदाहरणार्थ पोशाख इंडियन ठेवायचा त्यामुळेच १८५० पर्यंत जवळजवळ ९०% बहुजन मुस्लिम स्त्रिया या साडी नेसायच्या ओढणी घालायच्या कुंकू लावायच्या अनेकजण मंगळसूत्र घालायच्या साडी नेसायच्या परंतु अचानक नंतर जी १८५० नंतर प्यान इस्लामिक चळवळ आली तीच्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या गेल्या जी दहा टक्के उच्च समजणाऱ्या महाजन मुस्लिम लोकांची मुस्लिम संस्कृती होती जीचा आधार प्रामुख्याने मुस्लिम राजवट होता आणि जी बाहेरून आलेल्या लोकांच्या मुळे भारतामध्ये नांदत होती ती संस्कृती हळूहळू बहुजन मूळ हिंदू शैव वैष्णव असलेल्या मुस्लिम समाजाने स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यातूनच प्रचंड गोंधळ निर्माण झाले यातूनच मग बांगलादेशमध्ये उर्दूची सक्ती आली आणि मग बांगलादेश हा स्वतंत्र देश झाला . जर का यांना शक्य असते तर हे लोक अरबी भाषा शिकले असते इतकी यांच्यामध्ये धर्मामुळे अरब संस्कृतीची ओढ निर्माण झालेली आहे प्रश्न असा आहे की आता या ओढीचे रूपांतर कट्टरपणामध्ये होत आहे आणि सगळा गोंधळ त्यातूनच निर्माण झालेला आहे . बांगलादेश मधील मुस्लिम स्त्रिया अगदी परवा परवा पर्यंत सर्रास कुंकू लावायच्या आणि साडी नेसायच्या पण तिथे सुद्धा हा कट्टर पण आता घुसलेला दिसतो . हे होणे अटळ आहे कारण इस्लामचे स्वरूपच असे आहे ते तुम्हाला आवडो अगर ना आवडो परंतु ते प्रचंड कर्मठ उग्र आणि नको तितके मजहबी बनवत जाते . हा इस्लामचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसते .
आता प्रश्न असा निर्माण होतो की बाकीच्या धर्मांनी याबाबतीत काय करावे ? आणि खरा पेच हाच आहे एखाद्या हरणापुढे वाघाने कसे वागावे हे हरणाला ठरवता येत नाही ख्रिश्चन धर्माची आणि सर्व इंडियन धर्मांची आजची अवस्था हरणासारखी झाली आहे आणि प्रॉब्लेम असा आहे की हरण वाघाने काय करायचे ते ठरवू शकत नाही . अशावेळी उपाय काय तर हरणाने स्वतः महावाघ बनवणे इस्रायल ने ,चीन ने आणि अलीकडे काही प्रमाणात जापानने नेमके हेच केलेले आहे. हळूहळू युरोपमधील काही ख्रिश्चन लोक सुद्धा या दिशेने सरकायला लागलेले आहेत आणि म्हणूनच हे देश खटकत आहेत त्यातील चीनचे धोरण दोन्ही डगरीवर पाय ठेवून असणारे म्हणजे चीनमध्ये महा वाघ आणि चीन बाहेर मात्र इस्लाम बरोबर मैत्री असे दुटप्पी आहे कारण त्यांना इस्लामच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत नाही आणि चीनमध्ये आतल्या अंतर्गत प्रश्नात इस्लामला त्यांना जे तोंड द्यावे लागले तिथे त्यांनी इस्लाम नास्तिकतेच्या नावाने खाल्ला . याबाबतीतले सर्वात मूर्ख लोक सुसंस्कृत पुरोगामी ख्रिश्चन आहेत आणि भारतातले पुरोगामी आहेत त्यांना हे कळतच नाही की लढाई चालली आहे म्हणजे नेमकी काय चाललेली आहे. मुख्य म्हणजे मुस्लिम लोक अजिबातच तडजोड करायला तयार नाहीत उलट आपण अधिकाधिक कट्टर झालो की लोक आपल्याला घाबरतात याची त्यांना पूर्णपणे कल्पना आलेली आहे आणि घाबरलेल्या माणसाला अधिक घाबरवण्यात माणसाला नैसर्गिक रित्या मजा येते ती मजा सध्या इस्लाम घेत आहे .
त्यामुळे पुरोगामी लोकांना कितीही गप्पा मारल्या तरी आज ना उद्या शैव वैष्णव हिंदू जैन बौद्ध वगैरे भारतीय आणि ख्रिश्चन या धर्मांना इस्रायल प्रमाणे महावाघ बनल्याखेरीज काहीही पर्याय नाही वेळप्रसंगी पुरोगामी लोकांच्या कानाखाली सुद्धा दोन काढाव्या लागतील कारण कधी कधी शहाणपणा असलेला मूर्खपणा फार तापदायक ठरत असतो नेहरूंच्या काळात असा ताप झालेला आहे आणि त्यातूनच आपण तिबेट गमावलेला आहे त्याचा तोटा तिबेटला आणि तिबेट मधील बौद्ध धर्मी लोकांना किती झाला याचा साधा विचार सुद्धा पुरोगामी लोक करत नाही इतके यांचे बौद्ध धर्मीय लोकांच्या वरचे प्रेम भोंगळ आहे. असेच भोंगळ प्रेम त्यांचे पाकिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदूंच्या बाबतीत होते म्हणूनच हे देश सर्व हिंदूंना मुस्लिम करत होते तेव्हा हे लोक सत्तेवर असून सुद्धा तमाशा बघत बसले होते . अगदी हे प्रदेश ताब्यात होते तेव्हा सुद्धा या लोकांनी या संदर्भात कसलीही कारवाई केलेली नाही युद्ध जिंकून सुद्धा हिंदूंच्या बाबतीत काही न करणारे अत्यंत नपुसंक असे हे मूर्ख लोक आहेत . जर हिंदूंच्या बद्दल यांना प्रेम असते तर पाकिस्तान आणि बांगलादेश मधल्या मुसलमानांच्या धर्म परिवर्तन मोहिमेबद्दल यांनी किमान विरोध केला असता मोर्चे काढले असते पण असले काहीही हिंदू पुरोगामी लोकांनी केलेले नाही याचे कारण यांना मुळात कुठल्याच धार्मिक लोकसंख्येशी काहीही देणे घेणे नाही कारण धार्मिक लोकसंख्या हा यांच्या प्रेमाचा भाग नाही यांना फक्त आर्थिक आणि राजकीय प्रेम सुचते . धर्म हा घटक काय पद्धतीने काम करतो हे अजूनही या लोकांच्या टाळक्यात घुसत नाही . इस्लाम स्वीकारण्याचा स्पष्ट अर्थ आर्थिक आणि राजकीय बाबतीत सुद्धा आठशे वर्षे मागे जाणे आहे इतके बेसिक गणित या लोकांना कळत नाही . अफगाणिस्तान हा नमुना समोर आलेला आहे . पण अक्कल येतील ते पुरोगामी कसले ?
त्यामुळे साहजिकच मग सिम्बॉलिक लढाया ज्या काहीच कामाच्या नसतात त्या लढल्या जातात . बरं सिम्बॉल कसली आहेत ती धार्मिक आहेत की सांस्कृतिक हा प्रश्न सुद्धा कोणी निर्माण करत नाही . वस्तुस्थिती अशी आहे की सर्व भारतीय धर्मांच्यामध्ये धार्मिक असा काही पोशाख असतो यालाच मान्यता नाही त्यामुळे इंडियन धर्मांना कुठलाही धार्मिक पोशाखच नाही आणि ज्यामुळे हे धार्मिक आहे म्हणून तुम्ही घाला असे तर्कशास्त्र जेव्हा दिले जाते तेव्हा त्याला आपल्या धर्मांच्या मध्ये आधार मिळत नाही याउलट इस्लाम मध्ये मात्र असा आधार आहे मात्र हा आधार बुरख्याला आहे की सभ्य पोशाखाला आहे याची साधी तपासणी सुद्धा अलीकडे मुसलमान करत नाहीत .
बुरखा ही धार्मिक गोष्ट आहे ती काही सांस्कृतिक गोष्ट नव्हे त्या उलट कुंकू ओढणी साडी या सर्व गोष्टी ज्यांच्यावर चर्चा होते त्या सांस्कृतिक गोष्टी आहेत म्हणूनच आरामात कुठलीही ख्रिश्चन स्त्री किंवा कुठलीही ज्यू स्त्री किंवा कुठलीही मुस्लिम स्त्री या गोष्टी घालत असेल तर कुठलाही हिंदू कधीही त्याला ऑब्जेक्शन घेत नाही कारण त्या गोष्टी संस्कृतीक आहेत हे त्याला माहिती असते आणि म्हणूनच तो त्याला उलट प्रोत्साहनच देतो .
प्रश्न असा आहे की मग आता काय करायचे आपण काही आता प्राचीन काळात राहात नाही . प्राचीन काळानंतर पुरोगामी वस्त्रे आलेली आहेत आधुनिक वस्त्रे आलेली आहेत उत्तराधुनिक वस्त्रे आलेली आहेत आणि ही सर्व वस्त्रे घालण्याचा अधिकार ज्याप्रमाणे सर्व पुरुषांना आहे त्याप्रमाणे स्त्रियांना सुद्धा आहे. यामध्ये धर्माचा प्रश्न संस्कृतीचा प्रश्न येत नाही हा प्रश्न प्रगतीचा विकासाचा आहे . धार्मिक समारंभांना धार्मिक वस्त्रे घालणं मी समजू शकतो परंतु धर्म नसलेले असे जे जे सांस्कृतिक असतील किंवा सामाजिक असतील किंवा राजकीय असतील किंवा आर्थिक असतील अशा सर्व प्रसंगांच्या मध्ये सर्व स्त्री-पुरुषांना पुरोगामी, आधुनिक, उत्तराधुनिक अशी सर्व प्रकारची वस्त्रे घालण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा फरक करून चालत नाही तो प्रत्येक धर्माच्या स्त्री-पुरुषांचा हक्क आहे . पण ज्यांना मुळातच आता उत्तर आधुनिकतेने आणलेल्या परंपरेच्या क्षेत्रामध्ये लढाया लढायच्या आहेत ते लोक जाणीवपूर्वक हे प्रश्न निर्माण करत आहेत . अशावेळी मग धर्म आणि संस्कृती या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे सांगावे लागते तुम्ही जेव्हा भारतात राहता तेव्हा भारतातल्या सांस्कृतिक गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजे . भारतामध्ये घुंघट प्रथा सुरू झाली त्याचे सर्वात मोठे कारण बुरखा होता . अन्यथा ही काही भारतीय संस्कृतीतली प्रथा नाही अपवाद कदाचित वाळवंट असलेले प्रदेश विशेषता राजस्थान पण तरीसुद्धा मुस्लिम संस्कृतीकडून आलेली गोष्ट आपल्या संस्कृतीमध्ये ऍडजेस्ट करून घेण्यामध्ये ही प्रथा आली आता उद्या जर का एखाद्या इंडियन धर्माच्या स्त्रीला घुंगट घेणे गरजेचे वाटत असेल तर आपण त्याबद्दल ऑब्जेक्शन घेऊ नये पण कोणीतरी धर्माच्या नावाखाली ही सक्ती करत असेल तर ती सक्ती मात्र चुकीची आहे . आपण एका उन्हाळा प्रचंड आणि चार महिन्याचा असणाऱ्या देशांमध्ये राहतो याची जाणीव सर्वांनी ठेवावी. कारण मुळात वस्त्रांचा संबंध हा नेहमीच हवामानाशी असतो हवे पासून हवेच्या तापदायक गोष्टींच्या पासून बचाव करण्यासाठी म्हणून हे सर्व केले जाते . म्हणूनच वस्त्र घातले जाते वाळवंटाच्या प्रदेशामध्ये किंवा बर्फाच्या प्रदेशामध्ये संपूर्ण वस्त्र पाय घोळ असणे ही गरज असल्याने तिथे अशा प्रकारची वस्त्रे निर्माण झाली वाळवंटात वादळ असल्यामुळे आणि वादळामध्ये वाळूचे कण असल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्याचे सौंदर्य रक्षण करण्यासाठी म्हणून बुरखा आला भारतामध्ये राजस्थान सारख्या प्रदेशांमध्ये घुंघट आला त्याचे कारण वादळच होते अनेकदा ओढणी चेहऱ्यावर घेऊन वादळांच्या प्रदेशात संरक्षण केले जात होते त्यामुळे तिथेही बरोबरच आहे परंतु उद्या जर का कोणी मुंबईसारख्या दमट हवामानामध्ये बुरखा घालून हिंडत असेल तर ते कसे काय चालेल ? आरोग्याच्या दृष्टीने कदाचित ते घातकच ठरण्याची शक्यता आहे . तेव्हा विवेक हवा याला मी वस्त्र विवेक म्हणतो हा वस्त्र विवेक हल्ली सर्वच लोक गमावत चालले आहेत की काय अशी शंका येते आहे याचे कारण आपल्याला परंपरेच्या संदर्भामध्ये उत्तराधुनिकतेने इतके खराब करून टाकलेले आहे की आपण उत्तर आधुनिकतेच्या टर्म्स आणि कंडिशन स्वीकारत आंधळे होत चाललो आहोत . वास्तविक आधुनिक वस्त्र निर्मितीच्या संदर्भातील निर्माण शीलताच कमी झाली आणि मग पारंपारिक वस्त्रे आणि पुरोगामी वस्त्रे पारंपारिक वस्त्रे आणि आधुनिक वस्त्रे पुरोगामी वस्ती आणि आधुनिक वस्त्रे यांचा संगम करून उत्तर आधुनिक वस्त्रे निर्माण करण्यात आली पण याचा परिणाम मात्र काही भलताच होताना दिसतो कळत नकळत त्यामुळे परंपरा सेट झाली आणि आता आपण या परंपरेच्या नको तेवढे नादी लागलेलो आहोत . मी नेहमीच सांगतो की कुठल्याही काळामध्ये काहीही असो ते जर का वर्तमान काळात उपयुक्त असेल आणि विज्ञानाच्या कसोटीवर उतरत असेल तर आणि तरच ते आपण स्वीकारावे अन्यथा स्वीकारू नये कसोटी नेहमी वैज्ञानिक असली पाहिजे. आपल्या या भारतामधल्या हवामानाच्या जडणघडणीमध्ये जे जे योग्य आहे ते ते वस्त्र आपण स्वीकारावे उदाहरणार्थ ब्रिटिश कालीन सूट हा काही योग्य पोशाख नव्हे भारताच्या हवामानाला तो शोभत नाही परंतु आपल्याकडे कायद्याच्या बार कौन्सिलमध्ये आणि न्यायालयामध्ये कारण नसताना आपण तो ब्रिटिश सूट पोशाख स्वीकारला त्यामागे कसलाही वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता वास्तविक याला एक नीट स्वरूप देता आले असते म्हणजे असे की भारतीय पद्धतीचा कापसाच्यापासून बनवलेल्या कापडाचा सूट आणि तो सुद्धा तिरंगी रंगांमध्ये आपण सक्तीचा करू शकलो असतो जेणेकरून प्रत्येक वकील हा फक्त संविधान मानतो आणि न्यायाधीश फक्त संविधान मानतात असे सिम्बॉलिकली सुचवता आले असते आणि हा पोशाख भारतीय हवामानानुसार करायचा असल्यामुळे वकील लोक उकडून परेशान पण होणार /झाले नसते . पण हे सांगायचे कोणी कोणाला ? कशासाठी काय आहे हेच लक्षात न घेता जर तुम्ही सर्व मूर्खासारखे आंधळे अनुकरण करत बसला तर मग गोंधळ होत राहणारच . खरे तर संसदेत सुद्धा तिरंगी पोशाख सक्तीचा केला पाहिजे जेणेकरून या लोकांना आपण कुणासाठी संसदेत आहोत वादविवाद करतो आहोत आणि भांडतो आहोत ते लक्षात आले पाहिजे . प्रत्येकाच्या ड्रेसवर त्याच्या मतदारसंघाचे नाव पाहिजे जिथून तो निवडून आला आहे . ड्रेसिंग कोड करायचे असेल तर आपल्याला आपण कशासाठी नेमके हे ड्रेसिंग कोड करत आहोत हे लक्षात आले पाहिजे तरच मग ते ड्रेसिंग कोड नीट असते परंतु आपण ते करत नाही आणि सगळा गोंधळ उडतो अगदी शाळांच्या मध्ये सुद्धा एक पोशाक आवश्यक आहे आणि तो पांढरा असावा आणि त्याला एक तिरंगी झेंड्याची किनार असावी म्हणजे सर्व नागरिक सारखे असतात हे लहानपणापासूनच बिंबले जाईल आपण अनेकदा अलीकडे स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगळे वेगळे पोशाख स्वीकारत आहोत परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये मानसिक आणि आर्थिक विषमता निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे तीही योग्य नव्हे जिथे ड्रेसिंग कोड आवश्यक आहे अशा ज्या काही जागा आहे त्यामध्ये शाळा कॉलेज आणि युनिव्हर्सिटी या जागा आहेत . स्वातंत्र्य नुसते स्वातंत्र्य असत नाही ते जबाबदारी पण असते आपल्या ड्रेसिंग कोड मध्ये अनेकदा जबाबदारी सुचवली जात नाही त्याचा एक अनिष्ट परिणाम असा होतो की आपण जबाबदारीशी निगडित राहतच नाही म्हणूनच शालेय जीवनापासूनच ही जबाबदारी निगडित करणे गरजेचे आहे .
अर्थातच शाळेच्या बाहेर विद्यार्थी काय घालतो हा पूर्णपणे त्याचा आणि त्याच्या पालकांचा प्रश्न आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला पारंपारिक, पुरोगामी ,आधुनिक, उत्तराधुनिक , जालिक आणि उत्तरजालिक अशा सर्व प्रकारचे पोशाख घालण्याचा अधिकार आहे मग तो नागरिक स्त्री असो किंवा पुरुष किंवा इतर ! मात्र चेहरा मात्र खुलाच असला पाहिजे कारण चेहरा हीच नागरिकत्वाची ओळख असते तीच सर्व कागदपत्रांच्यावर उपस्थित असते अशावेळी आम्ही बुरखा घालणार आणि तुम्हाला आम्ही आमचे नागरिकत्व तपासू देणार नाही हा आग्रह हट्टाग्रह आहे. तो खपवून घेण्याचे काहीही कारण नाही . मुळात इस्लाम मध्ये सुद्धा आज्ञा अशी नाही . स्त्रीने सभ्यतेला धरून पोशाख घालावा असे म्हटले आहे परंतु काही कट्टर धार्मिक लोकांनी त्याचा अर्थ करताना अत्यंत जाणीवपूर्वक हा अर्थ बुरख्याशी जुळवून घेतला आणि बुरखा धार्मिक झाला पुढे भारतातही हा बुरखा प्रकार आणला गेला आणि हा प्यान इस्लामिक चळवळीने आणलेला आहे . भारताने ही Pan इस्लामिक चळवळ का स्वीकारावी ? गांधीजींच्या खिलाफत चळवळीतील मूर्खपणाची किंमत आपण का मोजावी ?
थोडक्यात काय हवामान आणि नागरिकत्वाची जबाबदारी यांच्या मधून वस्त्रांची निर्मिती झाली पाहिजे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य सुद्धा शाबूत राहिले पाहिजे आणि त्यासाठी वस्त्र विवेक वाढला पाहिजे त्यासाठी तो मुळात रुजवला पाहिजे . म्हणजे असले फालतूचे प्रश्न निर्माण होणार नाहीत . मुस्लिम स्त्रियांना जर का मंगळसूत्र लावायचे असेल तर साडी नेसणे कुंकू लावणे टिकली लावणे आवडत असेल तर त्यांनी खुशाल ते करावे आणि जर का हिंदूं स्त्रियांना वाळवंटासारख्या प्रदेशात काही बुरख्यासारखे काही घालणे आवश्यक वाटत असेल तर त्यांनी खुशाल ओढणी घुंगट वगैरे घ्यावे परंतु याबाबतीत हवामानाला विसरू नये कारण तुमचा पोशाख तुम्हाला हेल्दी ठेवण्यासाठी आहे आरोग्य शाबूत ठेवण्यासाठी आहे याचे भान राखा सर्वात महत्त्वाचे तुमचे आरोग्य आहे . जेव्हा धर्म आणि आरोग्य यांच्यामध्ये निवड करण्याची वेळ येईल तेव्हा स्वतःचे आरोग्य निवडा .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment