कलावंत नेहमीच समाजाला मागे का नेतात श्रीधर तिळवे नाईक
जगामध्ये ज्या काही समजूती आहेत त्यामध्ये एक समजूत म्हणजे कलावंत हे नेहमी समाजाला पुढे घेऊन जातात प्रत्यक्षामध्ये हे खरे आहे की खोटे आहे हे सुद्धा कोणी तपासत नाही आणि अनेकदा हे गृहीत धरले जाते
प्रत्यक्ष वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे कलावंत हे नेहमीच समाजाला मागे घेऊन जात असतात म्हणजे ते जे सिल्याबस मध्ये शिकलेले असतात त्याच्या पलीकडे अनेकदा जात नाहीत किंवा मग प्रस्थापित सत्ताधारी जे येतात त्यांच्या पलीकडले ते पाहायला सुद्धा जात नाहीत म्हणजेच सिल्याबस आणि सत्ता यांच्यामध्येच बहुतांशी कलावंत अडकून पडतात आणि प्रस्थापित व्यवस्थेला कायमच साथ देत राहतात त्यामुळेच तर प्रायोगिकता ही प्रायोगिकता ठरते कारण बहुतांशी कलावंत हे प्रस्थापित व्यवस्थेबरोबरच असतात म्हणूनच कलेमधली नवता ही सुद्धा जे लोक निर्माण करतात त्यांना प्रचंड त्रास दिला जातो आणि या त्रास देण्यामध्ये सर्वाधिक आघाडीवर कलावंत असतात ते प्रायोजित कलावंतांना जितका त्रास देता येईल तितका त्रास ते कलेमध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये कलेच्या सत्ता स्थानामध्ये देत असतात . कलावंत कधीच सभ्य असत नाही कला वंत सुद्धा राजकीयच असतात वेळ प्रसंगी जे नवता वादी असतात त्यांना कोर्टात खेचले जाते जेलमध्ये पाठवले जाते आणि कधी कधी तर मारण्याचे प्रयत्न होतात त्यातून ते वाचले तर ठीक नाही वाचले तर रामनाम सत्य हैं त्यामुळेच एकदा कदाचित तो कलावंत मेला तर किंवा जेलमध्ये गेला तर त्याच्याबरोबरच त्या माणसाची निर्माण केलेली नवता मरण पावण्याचा धोका असतो. आपल्याकडे मर्ढेकर यांच्या कवितेवर केस झाल्यानंतर कळत नकळत नवकवितेला सेटबॅक बसलेला दिसतो . किंबहुना असा सेटबॅक बसावा असाच प्रस्थापित व्यवस्थेचा उद्देश असतो आणि अनेकदा हा उद्देश कलावंतांच्या मधीलच काही कलावंत सफल करतात . बाळ सिताराम मर्ढेकर यांच्यावर सर्वाधिक टीका करणारे लोक कलावंत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे .
हे अगदी प्राचीन काळापासून झालेले दिसते आपण जर का धर्म युगात गेलो तर धर्माचे रक्षक कोण असा प्रश्न आपण विचारला तर त्याचे उत्तर स्पष्टपणे कलावंत असे येते. कलावंतच अनेक प्रस्थापित धर्माला सहाय्यक ठरतील अशा दंतकथा निर्माण करतात आपण जर का रामायण आणि महाभारत यांना कलाकृती म्हणून पाहायला सुरुवात केली तर वाल्मिकी आणि व्यास या दोन कलावंतांनी इंडियाला किती मागे न्यायला भाग पाडले हे आपणाला स्पष्टपणे कळू शकते . जेव्हा या महाकाव्यांची भाषांतरे प्रादेशिक भाषेत होऊ लागली तेव्हा अनेक प्रादेशिक भाषा आणि संस्कृती मागासलेल्या झाल्या . त्यांनी वर्ण जात व्यवस्थेवर विश्वास ठेवायला सुरुवात केली . आणि त्यामुळे साधारणपणे प्रादेशिक भाषांचा प्रस्थापित होण्याचा काल आणि वर्ण जात व्यवस्थाच भारतामध्ये सेटल होण्याचा काल एकच आहे . आणि या दोन्ही गोष्टी सेटल करण्यामध्ये कलावंत लोकांनी स्थानिक भाषेत रामायण आणि महाभारत लिहून सिंहाचा वाटा उचलला . याच लोकांनी भगवद्गीता लोकप्रिय केली जिचा आधारच मुळात वर्णसंकर होऊ नये असा होता. यांच्यामुळे स्मृती मधले कायदे हळूहळू का होईना पण प्रादेशिक संस्कृतीमध्ये घुसले. त्यामुळेच अनेकदा वैष्णव महाभारताला वैष्णव स्मृति मानतात . कारण वैष्णव धर्म व्यवस्था नेमकी कशी असावी याचा मॅप याचा नकाशा आपणाला महाभारतामध्ये मिळतो. हा नकाशा नंतर भारतभर अमलात आणला गेला आणि संतांच्या चळवळीने या गोष्टींना मदत केली . आज सुद्धा हिंदुत्ववादी लोकांना सर्व संतांच्या बद्दल विलक्षण सन्मान मनात येतो आदर येतो याचे कारण त्यांना हे पूर्णपणे माहीत आहे की हिंदुत्ववादाचा सर्वाधिक प्रचार हा संतांच्या भक्ती चळवळीने आणि खुद्द संतांनी केलेला आहे . याला शहर द्यायचा म्हणून काही पुरोगामी लोक संत कसे विद्रोही होते ते दाखवण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात त्यांची ही मांडणी बहुजन समाज आणि ती प्रादेशिक संस्कृती स्वीकारताना दिसत नाही . परिणाम एकच झाला भक्ती काव्याने संपूर्ण भारतीय समाज हा सरळ सरळ श्रद्धेच्या युगात नेला आणि यामध्ये कलावंत संतांचा वाटा सर्वाधिक मोठा होता . विशेषता कलावंत कवी संत कवी हे यामध्ये मुख्य होते . आणि त्यांना अनेकदा पंत लोकांनी पण साथ दिलेली दिसते .
त्यानंतर आधुनिकतेने जेव्हा आधुनिक औद्योगिकीकरण आणले आधुनिक व्यवस्थापन आणले प्रबंधन आणले सुरचन आणले तेव्हा त्या औद्योगीकरणाला सुरचनेला आव्हान देणारा जो फोर्स होता तो धार्मिक होता हा धार्मिक फोर्स ज्यू लोकांच्या ज्यू धर्मामधून आलेला होता आणि त्याचा प्रमुख प्रचार हा कलावंतांनीच केला होता .या कलावंत लोकांनीच उत्तराधुनिकता आणली संस्कृती वगैरे भानगडी आणल्या आणि मुख्य म्हणजे यांनी परंपरा आणली परंपरा आणणारे लोक दुसरे तिसरे कोणी नसून कलावंत लोकच होते आणि टी.एस . इलियट त्याचा प्रवर्तक होता ज्याच्याबद्दल मी लिहिलेले आहे . या तथाकथित आधुनिक आणि उत्तराधुनिक कलावंतांनीच वेगवेगळ्या धार्मिक कथांचे दंतकथांचे पुनर्जीवन करून विज्ञानाचा सत्यानाश सुरू केला आणि हा सत्यानाश आधुनिकतेच्या नावाने झाल्यामुळे कळत नकळत आधुनिक होऊन परंपरा ही केंद्रस्थानी आली आणि परंपरेबरोबरच उत्तर आधुनिकता सुद्धा जगातल्या सर्व समाजांच्या बोकांडी बसली आणि त्यातूनच आत्ताचे तथाकथित पोस्टtruth' युग अवतरलेले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे कलावंत हे समाज पुढे घेऊन जात नसतात कलावंत हे समाज नेहमीच मागे खेचत असतात ते नेहमीच धर्मामध्ये आणि कर्मकांडामध्ये समाजाला दाखल करत असतात ते कर्मकांडांना महत्त्व देत असतात कारण अनेकदा त्यांच्या कलाकृतींची जी डिमांड असते ती कर्मकांडावर अवलंबून असते साहजिकच स्वतःचे पोट कर्मकांडावर अवलंबून असल्यामुळे हे लोक नेहमीच कांडांच्या पक्षांमध्ये असतात आज गणपतीची सर्वाधिक मूर्तीची गरज कोणाला लागते तर मूर्तिकारांना लागते . साहजिकच या मूर्तीशी संबंधित असलेले सर्वच्या सर्व कलाकार जास्तीत जास्त गणेशोत्सव साजरा करायला बघतात आणि म्हणूनच गणेश हा फार मोठा देव आहे अशा प्रकारचा वैदिक प्रचार यशस्वी झाला आणि गणेशोत्सव पण यशस्वी झाला आज सुद्धा अशा प्रकारची मंदिरे झाली तर कलावंतांना ती हवी आहेत कारण कलावंतांच्या कलेची सगळीच्या सगळी फायद्याची गणिते ही त्या मंदिरांवर मंदिरांच्यातून निर्माण होणाऱ्या देवांच्या मूर्तींच्यावर आणि देवांच्या नावाने होणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मकांडावर अवलंबून आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला कलावंत वगैरे ही फार प्रोग्रेसिव जमात असणार वगैरे असे वाटते ते एका भ्रमात आहे याचे अधिकृत उदाहरण आपणाला पुरोगामी कालखंडामध्ये दिसते. म्हणजे जेव्हा वैज्ञानिक पुरोगामी वाद मांडत होते आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञ फ्रान्सिस बेकन किंवा डेकार्ट हे इंद्रीय वादाचे किंवा बुद्धिवादाचे विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धत आपल्या पद्धतीने मांडत होते तिची मांडणी करत होते तेव्हा कलावंतांनी एक रोमँटिसिझम नावाचा भावपूर्णवाद आणला आणि या रोमँटिसीजमने जो संपूर्णपणे पुरोगामी म्हणावा असा वैज्ञानिक अजेंडा होता तो मागे न्यायला सुरुवात केली पुन्हा एकदा मनुष्य विज्ञान विरोधी झाला ज्ञानविरोधी झाला म्हणजेच इथे सुद्धा आपणाला असे दिसते की कलावंत लोकांनी पुरोगामी वादाला मदत करण्याऐवजी तो पुरोगामी वाद मागे नेला
आता असे घडत असताना कलावंत समाज पुढे नेत असतात अशी दंतकथा कोणी प्रचलित केली ? तर त्याचे उत्तर प्रस्थापित लोकांनी असे आहे कारण जर एखादा समुदाय आपल्या बाजूने लढतो असे दिसत असेल तर प्रस्थापित लोक कायमच त्याला आपला भाग वन व तो कसा समाज कल्याण करणारा आहे ते सांगत राहतात प्रत्यक्षामध्ये मात्र कलावंत उलट जास्त दंतकथा आणि भाकड कथा प्रचलित करत असतात आणि म्हणूनच धर्माचे भावते आणि फावते .
आपल्याकडचा वारकरी संप्रदाय सुद्धा जे कलावंत संत झाले त्यांनीच निर्माण केलेला आहे म्हणजेच एकंदरीत जास्तीत जास्त धर्माचा प्रचार करणे हाच कलेला एक मात्र उद्योग होता की काय अशी शंका घेण्या इतपत महाराष्ट्रात गेल्या हजार वर्षात हालचाली झालेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी जणू काय कलावंत समाज पुढे नेत असतो असे सांगत केल्या जातात त्यामुळेच महाराष्ट्रात सुद्धा हे प्रमेय अतिशय प्रभावी होताना दिसते याचे सर्वात मोठे कारण ते वारकरी संप्रदायाला धर्माला मदत करते परंपरेला भक्कम होण्यासाठी मदत करते म्हणजेच हे कलावंत एका अर्थाने समाजाला पुढे घेऊन गेले नाही तर त्यांनी आपल्या कलेच्या साह्याने समाज मागे नेला यासाठी फार मागे जाण्याची गरज नाही 1980 नंतर साठोत्तरी पिढीचे वर्चस्व वाढले वाढत गेले तसे तसे सारे प्रादेशिक समाज मागे गेले. रामायण ह्या कलाकृतीचा टीव्हीवरचा अवतार सर्वाधिक लोकप्रिय झाल्यानंतरच राम मंदिराला प्रचंड मोठा आधार मिळायला लागला ज्यांना कोणाला हा योगायोग वाटतो ते एका भ्रमात जगतायेत याविषयी मला तरी शंका नाही कलावंतांचा धर्माला अंधश्रद्धांना दंतकथांना मदत करण्याचा हा जो पैसे मिळवून देणारा अजेंडा आहे त्या अजेंडाला कला-बीला असे समजून माफ करून चालणार आहे का हा खरा प्रश्न आहे कारण अनेकदा कलावंत काय करतात हे पहावे लागते आतापर्यंतचा तरी अनुभव असा आहे की कलावंतानी नेहमीच पु विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी पुढे नेलेला समाज फक्त आपल्या कलेच्या आधारे मागे नेलेला आहे
कलावंतांनो थोडंसं आपण आपल्या कलाकृती मधून कोणते विष पाजत असतो याविषयी विचार करा .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment