व्यवहार आणि विश्वासार्हतेचे सात प्रकार श्रीधर तिळवे नाईक
गेले काही लेख आपण सातत्याने व्यवहाराचा विचार करतो आहोत आणि त्या अंगाने काही मांडणी करत आहोत
विचार तुम्ही कसाही करू शकता परंतु जर त्याला व्यवहाराचे मूर्त स्वरूप मिळाले नाही तर मग त्याला काहीही अर्थ उरत नाही प्रत्येक व्यवहाराच्या मागे विश्वासार्हता गृहीत धरलेली असते आता ही विश्वासार्हतात जर टिकली नाही आणि मनुष्य जर का व्यवहाराला नीट नसेल तर मग तो व्यवहार टिकत नाही म्हणूनच एग्रीमेंट करावी लागतात कायदे करावे लागतात त्या कायद्यानुसार कागदपत्रे तयार करावी लागतात जेणेकरून व्यवहार काय आहे हे प्रत्यक्ष लिखित संहितेमध्ये आणि डिजिटल संहितेमध्ये उपलब्ध व्हावे . किंबहुना व्यवहाराची पहिली बाजू करार असते . त्यानंतर मग हळूहळू आचरणात्मक आणि योजनेनुसार कर्माचा समुदाय अमलात आणला जातो .
हा सगळा उद्योग एका विश्वासार्हतेवर उभा असतो आणि ही विश्वासार्हता काय पद्धतीने मानवी समाजामध्ये काम करत असते ते पहावे लागते त्यासाठीच आपणाला विश्वासार्हतेचे सातही प्रकार तपासावे लागतात मानवाचा सगळा व्यवहार हा उत्क्रांत होत गेलेला व्यवहार आहे हळूहळू त्याला एक जालात्मक स्वरूप आलेले आहे आणि हे सगळे जालात्मक स्वरूप सात प्रकारच्या विश्वासार्हतेवर उभे आहे
१ आदिम इंद्रियात्मक विश्वासार्हता जगातल्या सर्वच प्राण्यांना या विश्वासार्हतेच्या आधारे जगावे लागतात इथे इंद्रियांना जे इंद्रिय जन्य होते त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व प्राणी आपले जीवन जगत असतात आपले अन्न शोधत असतात इंद्रियांच्या मध्ये फक्त ज्ञानेंद्रियांचा समावेश होत नाही त्यामध्ये कर्मेंद्रिय सुद्धा येतात आणि इतर अवयव इंद्रिय सुद्धा येतात प्रत्येक प्राण्यांमध्ये ज्ञानेन्द्रियच एक्टिव असेल असे नाही इंद्रियांच्या साह्याने जितके प्राप्त होते तितकेच ज्ञान खरे अशी कसोटी मानणारे विज्ञानामध्ये सुद्धा लोक होते परंतु तिथे सुद्धा केवळ एकाच माणसाचा इंद्रियांचा अनुभव प्रमाण मानला जात नव्हता तर अनेक लोकांना जर तोच तोच इंद्रियाचा प्रत्यय आला तर आणि तरच ते प्रमाण मानले गेलेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे
२ मोक्ष अनुभवात्मक विश्वासार्हता अनुभव म्हणजे केवळ इंद्रिय नव्हे अनुभवामध्ये त्याबरोबरच प्रज्ञाचा आणि अनेक गोष्टीचा समावेश होतो एका अर्थाने अनुभव म्हणजे माणसांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रकारच्या दशशक्तींना येणारा प्रत्यय असतो
३ दर्शन आप्तांत्मक किंवा गुरुप्रधान विश्वासार्हता इथे विश्वास ठेवला जातो कारण ज्या व्यक्तीवर हा विश्वास अवलंबून असतो ती व्यक्ती अतिशय विश्वासार्ह आहे असे लोकांना वाटत असते आजही आपण अनेकदा दैनंदिन जीवनात व्यवहार करताना अशा पद्धतीच्या विश्वासार्हतेचा वापर करत असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना जगण्यासाठी समूह म्हणून जगण्यासाठी समाज म्हणून जगण्यासाठी आपल्याला हे आवश्यक आहे
४ धर्म परंपरात्मक विश्वासार्हता इथे मात्र पूर्णपणे परंपरेच्या आधारे विश्वास ठेवला जातो अनेकदा संहिता नसली तरी परंपरा म्हणते म्हणून विश्वास ठेवला जातो कालांतराने परंपरा बनत जाते पुढे मग ही परंपरा मौखिकची लिखित होते आणि एकदा लिखित झाली की मग परंपरा परंपरा राहत नाही ती चिन्हात्मक होत जाते अनेकदा एकाच ग्रंथावर विश्वास ठेवणारे लोक सुद्धा असतात आणि ते त्या ग्रंथालाच विश्वासार्ह मानून जगत असतात अनेकदा असे लोक एकांडे होत जातात त्यांचा समूह एकांड होत जातो आणि त्यातून जगाला ताप होण्याची शक्यता जास्त असते
५ विज्ञान विज्ञानात्मक विश्वासार्हता इथे विज्ञानाने निरीक्षण परीक्षण आणि निष्कर्ष अशी जी मेथोडोलॉजी दिलेली आहे तिला फॉलो केले जाते मुख्य म्हणजे परीक्षण केले जाते आणि निरीक्षणामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्हनेस असतो, व्यक्तिमत्व प्रधानत्व नसते
६ तंत्रज्ञान तंत्रज्ञानात्मक विश्वासार्हता प्रत्यक्ष तंत्र एप्लीकेबल दिसले तर विश्वास ठेवला जातो म्हणजे पेट्रोल ने गाडी चालते की नाही तर इथे प्रत्यक्षात पेट्रोल घालून बघितले जाते आणि पेट्रोलने गाडी चालताना प्रत्येक जण बघत असतो म्हणून त्यावर विश्वास ठेवला जातो अन्यथा अनेक मॉडेल सादर होत असतात परंतु तीच मॉडेल स्वीकारली जातात जी या तंत्रज्ञानात्मक विश्वासार्हतेवर उतरतात जी उतरत नाहीत ती आपोआपच साईडलाईन केली जातात
७ चिन्हकेंद्रीय किंवा चिन्हात्मक विश्वासार्हता संविधानावरची श्रद्धा धार्मिक ग्रंथावरची श्रद्धा सुद्धा यातच येते शेवटी पुस्तक बनवावे लागते आणि हे पुस्तक कायद्याचे असते. धर्म आजही या सगळ्या विश्वासार्हतेवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकून आहे किंबहुना भारतीय संविधानाच्या जडणघडणीमध्ये जी मूलभूत चूक झाली ती हीच होती की धर्माच्या आधारे कायदे बनवले गेले ते बनवला बनवायला नको हवी होते हवे होते परंतु काँग्रेस हे मुळातच एका धर्म प्रधान अशा महात्मा गांधी नामक नेतृत्वाच्या प्रभावाखाली असल्याने हे घडलेले आहे जाने हे संविधान लिहिले ते बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा बौद्ध धम्माच्या प्रभावाखाली होते त्यामुळेच धर्म आणि धम्म यांचा विलक्षण संगम आपल्या संविधानामध्ये झालेला दिसतो . प्रत्यक्षामध्ये आता वेळ अशी आलेली आहे की संविधानातून धर्म काढून टाकावा आणि पूर्णपणे विज्ञान अधिष्ठित आणि शीलव्यवस्थेच्या अधिष्ठित नवीन संविधान निर्माण करणे आवश्यक आहे . आपल्याकडे अनेकांची श्रद्धा आंधळी आहे यामध्ये आंबेडकरवादी लोक सुद्धा येतात त्यामुळे धर्मनिरपेक्ष कायदा झालेला नाही अजूनही आपले अनेक कायदे धर्मसापेक्ष आहेत आणि आता ते बाजूला काढलेले बरे . सर्वांसाठी सर्वच बाबतीत समान कायदा हे आता उद्दिष्ट असले पाहिजे आणि हे कायदे विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिष्ठितच असले पाहिजे . त्यामुळे संविधानाची विश्वासार्हता वाढेल आपल्या संविधानामध्ये अनेक भाग हे विज्ञानाच्या आधारे उभे आहेत ते तसेच ठेवायला हरकत नाही परंतु जे धर्माच्या आधारे आहेत ते मात्र आता पूर्णपणे काढून टाकले पाहिजे . याला पर्याय नाही ही त्यावेळेला केली गेलेली एक तडजोड होती परंतु ह्या तडजोडीलाच तत्त्वज्ञान समजणारे लोक आहेत . या देशात सर्वात मोठे दुर्दैव जर काही असेल तर ते म्हणजे संविधानात बदल अशी मागणी केली की अनेकांना मनुस्मृती दिसायला लागते ते बंद व्हायला हवे कारण मनुस्मृती ही सुद्धा धर्मग्रंथ आहे आणि कुठलाच धर्मग्रंथ मग तो कुठल्याही धर्माचा असो हा आपल्या संविधानाचा आधार होता कामा नये .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment