आशुतोष दिवाण यांना दिलेले उत्तर
हा प्रश्न ब्राह्मण लोक नेहमीच विचारत असतात विशेषता ज्यांना भारताच्या दुर्गतीची जबाबदारी घ्यायची नसते ही व्यवस्था ब्राह्मण स्मृतींनी निर्माण केलेली आहे आणि तिच्याविरुद्ध शैव-धर्माने कायमच उठाव केलेले आहेत शिवाजी महाराज संभाजी महाराज पहिला बाजीराव पेशवा सर्व होळकर महात्मा फुले या सर्वांनाच या संदर्भात उठाव करावा लागला इसवी सन १००० पर्यंत स्मृतींचा प्रभावच नव्हता पण वैष्णव धर्मामुळे श्रुती स्मृतीपुराणोक्त धर्म भारतीयांच्या बोकांडी बसला तो आता इतका हाडात भिनलाय की निघता निघत नाही त्यामुळे उगाच ब्राह्मण असण्याचे ओझे हलके करण्यासाठी या मार्गाने जाण्याची गरज नाही किंवा या प्रश्नाच्या मार्गाने जाण्याची गरज नाही शांतपणाने इतिहासात आपल्या पूर्वजांच्याकडून चुका झाल्या असे म्हणावे आणि वर्ण जाती विरोधात सामील व्हावे तुम्ही सुद्धा काय खरे तर ब्राह्मण नव्हे तुम्ही पंडितच ! आणि पंडितांनी वर्ण जाती व्यवस्थेला कधीच पाठिंबा दिलेला नाही मराठीत पंडितांना पंत म्हणतात आणि शिवाजी महाराजांच्या दरबारी ज्यांना आजकाल ब्राह्मण ब्राह्मण म्हणतात ते प्रत्यक्षात पंत होते त्यामुळे मुळातच पंडित असाल तर हा गिल्ट बाळगण्याची गरज नाही परंतु ब्राह्मण असाल तर मात्र हा गिल्ट आपोआप येणे अटळ ! याबाबतीत नेहमी विचाराला जाणारा प्रश्न एकच असतो पूर्वजांच्या गुन्ह्यासाठी आत्ताच्या वारसदारांना जबाबदार धरता येईल का? तर या प्रश्नाचे उत्तर तो वारसदार व्यवहारात कसा वागतो त्यावरून देता येते माझ्या पाण्यात दोन्ही प्रकारचे ब्राह्मण आहे पहिले जे श्रुती स्मृतीपुराणोक्त धर्माविरोधात पूर्णपणे ठाकलेले आहेत यात यदि फडक्यांच्या पासून नरहर कुरुंदकरांच्या पर्यंत अनेक जण येतात आणि दुसरे जे अजूनही ब्राह्मण असल्याचा तोरा मिरवतात असा तोरा तुम्ही मिळवता का हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि जर का तो तोरा तुम्ही मिरवत असाल तर त्याचा अर्थ तुमच्यात ब्राह्मण्य शिल्लक आहे प्रश्न असा आहे की फक्त ब्राह्मण असा तोरा मिरवत आहेत का ? माझा अनुभव असा की क्षत्रिय सुद्धा आणि अपवादात्मक वेळेला वैश्य सुद्धा अशा प्रकारचा तोरा मिरवताना दिसतात याला मी वर्ण अहंकार म्हणतो तो स्वतःच्या ठायी किती आहे हे प्रत्येकाने तपासणे गरजेचे आहे माझी स्वतःची आजी कायस्थप्रभू होती तिला इतका वर्णअहंकार की बोलता सोय नाही माझ्या एका बहिणीची सासू वैश्य पण तिला वैश्य असण्याचा इतका अहंकार की बाप रे बाप ! तिची सर्व मुले ही आर एस एस कडे गेली एकतर भाजपच्या आजरा शाखेचा अध्यक्ष होता सर्व निष्ठावंत कार्यकर्ते अर्थातच नवीन व्यवस्थित त्यांची पत्रास ठेवली गेली नाही पण वर्ण अहंकार स्पष्ट दिसत होता तो हळूहळू कमी होताना मी बघितला पण कधीच गेला नाही पुढच्या पिढ्यांच्यात मात्र तो गेला
वर्णव्यवस्था ही ब्राह्मण धर्माने दिलेली व्यवस्था आहे आणि त्यांनी ती स्वतःच्या स्वार्थापोटीच दिली याबद्दल माझ्या मनात काडीचीही शंका नाही तेव्हा वर्णव्यवस्था मोडणे हाच खरा उपाय आहे तुम्ही जर स्वतःला अभिमानाने ब्राह्मण म्हणून घेत असाल तर मग या वर्णव्यवस्थेची ही जबाबदारी घ्या कारण ही व्यवस्था ब्राह्मण धर्मानेच निर्माण केलेली आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment