अर्थव्यवस्थेची उत्क्रांती श्रीधर तिळवे नाईक 

कुठल्याही अर्थव्यवस्थेला अचानक काही आकार मिळत नसतो ती नेहमीच उत्क्रांतीचा एक जैविक फॉर्मुला फॉलो करत असते 

आरंभ हा नेहमी सृजनापासून होतो नवीन ज्ञान होते नवीन प्रति ज्ञान होते त्यातून तंत्रज्ञान जन्मते आणि मग नवीन गोष्टींचे उत्पादन सुरू होते यातूनच मग उत्पादक अर्थव्यवस्था निर्माण होते या अर्थव्यवस्थेचा पाया असतो ही सुरुवात असते हा पाया अनेकदा नेहमीच श्रमिक लोकांच्या श्रमांच्यामधून निर्माण होतो आणि अनेकदा श्रमिकांना गुलाम तरी बनवले जाते किंवा सेवक तरी बनवले जाते राब राब राबवले जाते त्यांना मी राबक म्हणतो यांची राबवणूक हीच उत्पादक अर्थव्यवस्थेला सुरुवातीला आधार देते एकाच वेळेला ज्यांनी निर्माण केले आहे ते आणि दुसऱ्या बाजूला जे उत्पादन करणार आहेत ते यांचे व्यवस्थित शोषण सुरू होते

यातून मग दुसरा टप्पा उत्क्रांत होतो ही उत्क्रांती सामाजिक बनत जाते आणि अर्थव्यवस्थेची सामाजिक व्यवस्था आकार घ्यायला लागते अनेक विचारवंत विचार मांडायला लागतात हा टप्पा अनेकदा व्यवस्था म्हणून आकार घेत संस्कृती म्हणून प्रस्थापित व्हायला लागतो. अलीकडच्या काळात तो नेटवर्क म्हणून सुद्धा जन्मले ला दिसतो. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मग उत्क्रांती आणखी पुढचा टप्पा गाठते 

आता हे उत्पादन खपवण्यासाठी ग्राहकपेठ आणि 

कच्चामाल पुरवणारी निसर्गपेठ शोधली जातात आणि त्यातूनच मग साम्रराज्यीय अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठला जातो इथे अनेक बाहेरच्या देशांच्या व राज्यांच्यावर आक्रमण केले जाते त्यांना जिंकले जाते आणि त्यांच्या आधारे आपल्या प्रदेशाची अर्थव्यवस्था बळकट केली जाते इथेच सत्ता अर्थव्यवस्था म्हणून एन्ट्री करते आणि सत्तेबरोबर सत्ता कारण सुद्धा येते आणि ते आपला शेअर फायद्यामध्ये मागायला लागते . ती उत्पादनावर टॅक्स लावते वितळणावर टॅक्स लावते ग्रहण करणाऱ्या ग्राहकावर टॅक्स लावते जितके टॅक्स अधिक तितके सत्ता कारण मजबूत होत जाते.अनेकदा सत्ता तिच्याकडे साठलेला पैसा इन्व्हेस्ट पण करायला लागते पण तिला रिटर्न पण लागतात या टप्प्यात उत्पादक राज्यव्यवस्थेला इन्वेस्टर म्हणून वापरायला बघतात आणि राज्यव्यवस्था उत्पादकाला आपला पार्टनर समजायला लागते  

यानंतरचा टप्पा नेहमीच राजकीय अर्थव्यवस्थेचा टप्पा असतो म्हणजे असे की आता फक्त अर्थव्यवस्थेचे उत्पादन होऊन थांबत नाही तिच्यावर जास्तीत जास्त कर लावणे आणि तिच्यावर अधिकाधिक नियंत्रण मिळवणे सत्ताधारी लोकांना गरजेचे वाटायला लागते उत्पादकांच्याकडे असलेला अधिकाधिक पैसा आता पुरत नाही ग्राहकांच्याकडे सुद्धा असलेला पैसा सत्ता सत्ता कारणाकडे वळवण्याचा प्रयत्न करायला लागते सत्ताधारी लोक करायला लागतात आधीच्या टप्प्यामध्ये श्रमिकांचे शोषण असेल गरिबांचे शोषण असेल तर या टप्प्यांमध्ये हळूहळू मध्यमवर्गाचे शोषण सुरू होते आणि मध्यम वर्गाला कर द्यायला भाग पाडत अधिकाधिक त्याने निर्माण केलेला पैसा आपल्या बाजूला कसा वळवता येईल या दिशेने चाचपणी सुरू होते त्यासाठी मध्यम वर्गाला फायनान्स करणारे अनेक घटक आपोआपच राजकीय नियंत्रणाखाली आणले जातात अनेकदा बँका निर्माण केल्या जातात किंवा आपल्या राजकीय उद्देशासाठी राबवल्या जातात त्यामुळेच ही व्यवस्था राजकीय अर्थव्यवस्था असते आता फक्त उत्पादक शोषक राहत नाही तर सत्ताधारी सुद्धा शोषक बनत जातात या दोघांना मग कंटाळलेले लोक हळूहळू धर्माकडे वळायला लागतात आणि यातूनच मग पाचवा घटक येतो तो म्हणजे धर्म किंवा त्यासारखी एखादी जीवन प्रणाली ! धार्मिक अर्थव्यवस्थेचा पाया रचला जायला लागतो आणि मग धर्म सत्तेवर यायचा प्रयत्न करायला लागतात किंवा मोक्ष विजयी झाला तर मोक्ष सत्तेवर यायला लागतो आणि मोक्ष सत्तेवर आला तर नव्याने पूर्ण एकशील व्यवस्था निर्माण करतो पण मोक्ष सत्तेवर आला नाही तर मात्र धर्म संपूर्णपणे नैतिकता आपल्या अंगाने वळवायला लागतो .

इथेच मग अर्थव्यवस्थेची वाढ थांबते कारण सृजनशीलतेला वाव मिळणे थांबते . हळूहळू स्वातंत्र्य सुद्धा नष्ट व्हायला लागते आणि अर्थव्यवस्था इस्लामच्या तावडीत सापडते कम्युनिजमच्या तावडीत सापडते किंवा मग ती धर्म किंवा धर्मासारख्या असणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या तावडीत सापडते आणि हळूहळू गोठायला लागते आता इथे फक्त गरीब आणि मध्यमवर्गाचे शोषण नाही होत नाही तर जो उच्च वर्ग असतो तो सुद्धा हळूहळू सत्तेच्या शोषणाला बळी पडायला लागतो . अनेकदा जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे सुद्धा शोषण केले जाते . विरोधकांना मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू होतात . परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्था एका न कळणाऱ्या डाऊन फॉल मध्ये सापडते हा डाऊन फॉल फक्त डाऊन फॉल नसतो ती कोंडी असते ही कोंडी फोडून जोपर्यंत कोणी आपला जीव पणाला लावून सर्जन करत नाही तोपर्यंत ती फुटतच नाही . आणि मग हळूहळू शेवटची अवस्था येऊन अर्थव्यवस्था सडायला लागते आणि तिचा मृत्यू होतो एखादा उत्क्रांत झालेली जमात जशी पूर्णपणे नाहीशी होते तसे काहीसे हे अर्थव्यवस्थेचे असते .

त्या जागी नवीन अर्थव्यवस्था आली तर ठीक नाहीतर त्या अर्थव्यवस्थेमध्ये माणसे सुद्धा सडायला लागतात आणि धर्माचा प्रभाव अधिकाधिक वाढत जातो कारण जितकी दुर्गंधी जास्त तितका धर्म अधिक सुगंधी वाटायला लागतो . कला धर्म वाटायला लागते . अशाच वेळी क्रांतीच्या शक्यता निर्माण होतात क्रांती फळली तर ठीक नाहीतर उत्क्रांतीची ही शेवटची तापदायक अवस्था ताप देत राहते . अनेकदा या टप्प्याला अंधार युग म्हटले जाते .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती