चौथी नवता उत्तरजालीयता आणि ज्ञान २ श्रीधर तिळवे नाईक 

मागच्या लेखात आपण ज्ञानाच्या संदर्भात झालेली क्रांती आणि त्या अंगाने आता बदलू शकत असलेले आयुष्य या अंगाने चर्चा केली आणि जालीयतेचे युग संपून उत्तर जालीय युग लवकरच सुरू होईल असे म्हटले 

माणसाचा अनुभव आणि माणसाचे ज्ञान यांच्या मधूनच नेहमी कुठलीही नवता वाटचाल करत असते यामध्ये कधी अनुभव पुढे असतो कधी ज्ञान ! जेव्हापासून विज्ञान सुरू झाले तेव्हापासून 99% लोकांच्या आयुष्यात ज्ञान प्रथम झाले आणि अनुभव नंतर याचे कारण जे काही मोजके वैज्ञानिक लोक होते ते इतके पुढे असायचे की सामान्य माणसाला त्याच्या अनुभव विश्वाला विज्ञान गाठणे वैज्ञानिकांना गाठणे फार अवघड होऊन बसायचे तंत्र विज्ञान युगामध्ये तर तंत्रवैज्ञानिकांना गाठणे अधिकच अवघडून बसले फक्त सिद्ध आणि बर्ट्रांड रसेल यांच्यासारखे तत्वज्ञ हेच काय ते या संदर्भात अधिक व्यवस्थित संवाद करत होते याचे कारण या लोकांच्यात जागृती होती 

शैवलोकांच्यामध्ये त्यामुळेच जागृती जागरण आणि जागर या त्रयीला खूप महत्त्व आहे कारण जग ,जाग, जागृती, जागरण आणि जागर या पंचायतनाची उपासना सुरुवातीपासूनच सांगण्यात आलेली आहे हे नेहमी करावे लागते ते नसले की नवता आत्मसात करणे फार कठीण असते याचे रंगमंचात सुद्धा नंतर या लोकांनी रूपांतर केले परंतु कालांतराने मूळ अर्थाचाच अनेकांना विसर पडल्याने मूळ अर्थ हरवत गेला आणि फक्त दंतकथा उरल्या आणि हा जागर आणि जागरण फक्त धार्मिक झाला कर्मकांड झाले 

आता तर आपण एका अशा अवस्थेत गेलो आहोत जिथे आपण जागे राहणे हा गुन्हा ठरलेला आहे परंतु ज्यांना या जगा विषयीचे जगण्याविषयीचे जागरण जिवंत ठेवायचे आहे त्यांना सतत जागृतीच्या शोधात राहावेच लागेल मोक्ष म्हणजे सुद्धा दुसरे तिसरे काही नसून संपूर्ण जागृत होणे असते ज्ञान सुद्धा या पंचायतनाला अपवाद नाही आपण हे पंचायतन ऍक्टिव्ह ठेवले तर ठीक अन्यथा पुन्हा एकदा जग पुढे निघून जाईल आणि आपण शंभर वर्षे पुन्हा मागे ! 

चौथ्या नवतेबाबत ज्ञान आणि अनुभव यांच्या संदर्भामध्ये सर्वात मोठी घडलेली क्रांतिकारक घटना मी सांगितलेलीच आहे जगामध्ये रंग अस्तित्वात नसतात वस्तूंना कुठलाही रंग नसतो प्रत्यक्षामध्ये सर्व रंग माणसाच्या मेंदूची निर्मिती आहे हा जो ज्ञानाच्या संदर्भातला क्रांतिकारक शोध आहे त्याने जवळ जवळ सर्वच गोष्टी बदलल्या 

यातून निर्माण झालेला सर्वात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो म्हणजे इंद्रिय प्रत्यक्ष प्रमाणाचा ! विज्ञानाचा मुख्य आधारच इंद्रियाचे इंद्रियजडीत प्रत्यक्ष प्रमाण हा होता . जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या इंद्रियांना कळत नाही त्यांच्या आकलनात येत नाही तोपर्यंत ती गोष्ट अस्तित्वात आहे हे स्वीकारायचे नाही हा विज्ञानाचा बेसिकच नियम होता त्याला थोडा नंतर कॉनटम विज्ञानाने छेद द्यायला सुरुवात केली परंतु ती गोष्ट नंतरच आहे तिथे सुद्धा किमान जे दिसते आहे त्यावर विश्वास होता पण आता अवस्था असे आहे की जे इंद्रियांना दिसते आहे ते सुद्धा मेंदूची निर्मिती आहे अशा प्रकारचे ज्ञान निष्कर्ष निघालेले आहेत आणि हे निष्कर्ष प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारे काढलेले आहेत आणि हे निरीक्षण चिन्ह प्रत्यक्ष आहे त्यामुळेच चिन्ह प्रत्यक्ष प्रमाण हे आता अधिकाधिक महत्त्वाचे होईल हे मी फार पूर्वीच मांडून ठेवलेले होते आणि त्यावर एक लेख पण लिहिला होता . याचा एक परिणाम असाही झालेला आहे की अनुमान नावाचे जे प्रमाण आत्तापर्यंत आपण साईडला केले होते ते पुन्हा एकदा महत्त्वाचे झाले कारण आपण जे काही जग आपल्या मेंदू द्वारे तयार करतो आहोत ते अनुमान प्राप्त जग आहे असा सिद्धांत आता हळूहळू उदयाला येईल अशी चिन्हे आहेत . म्हणजे मला दिसणारा रंग हा प्रत्यक्षामध्ये माझ्या मेंदू ने तयार केलेले अनुमान आहे आणि तरीही तो प्रत्यक्ष मला दिसतो आहे अनुभवता येतो आहे आणि तरीही तो प्रत्यक्ष रंग वस्तूमध्ये अस्तित्वात नाही आता यामुळे सर्व इंद्रिय प्रत्यक्ष असण्याला चॅलेंज मिळते आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होतात . म्हणजे एका अर्थाने मीच तयार केलेला चित्रपट मीच पाहतो आहे.

अर्थात यासंदर्भातले तपशील सध्या तरी रंगाच्या संदर्भात मर्यादित आहेत आणि म्हणूनच दृश्यसंवेदनेच्या संदर्भात मर्यादित आहेत कानाच्या बाबतीत असे होऊ शकते का? मुळातच श्रवण म्हणजे काय असते आणि ध्वनी म्हणजे काय हा एक आता फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एकेकाळी भाषा वैज्ञानिक असे मानत होते की माणूस म्हणजे कोरी पाटी (हा सिद्धांत प्रथम लॉक या तत्त्वज्ञाने मांडला होता आणि त्याच्यामुळेच उदारमतवाद नावाचा एक मोठा प्रवाह निर्माण झाला ज्याने संपूर्ण राजकारण बदलले भारतामध्ये सर्वात प्रभावी असा हा राजकीय प्रवाह आहे जो आंबेडकर आणि नेहरूंना एकत्र आणतो) असतो. आता हा सिद्धांत कोणीही स्वीकारत नाही कारण ध्वनी सिद्धांत फार मोठ्या प्रमाणात बदलत गेला आता हे स्पष्ट झालेले आहे की माणसाच्या आत जन्मदत्त ध्वनी असतात आणि ध्वनीची क्षमताही असते. माणूस प्रत्येक माणसाचा आवाज लक्षात ठेवू शकतो याचे कारण तो अनेक ध्वनी लक्षात ठेवू शकतो परंतु जसे जसे आपले भाषिक ज्ञान वाढत जाते आपल्या मेंदूमध्ये भाषा वाढत जाते तसे तसे आपल्याच भाषेमधले स्वर आणि व्यंजन मेंदूसाठी मुख्य बनत जातात आणि याचा एक दुष्परिणाम असा होतो की इतर भाषांच्या मधले स्वर आणि व्यंजनात्मक अवगत करण्याची त्याची क्षमता मेंदू मधले त्यांचे सेट्स त्यांचे सेटिंग मागे पडायला लागते वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा एखादे मूल जन्मते तेव्हा त्याच्याजवळ जगातल्या सर्व भाषांच्या मधले स्वर सहजरित्या आत्मसात करण्याची एक अभूतपूर्व क्षमता असते आणि म्हणूनच प्रत्येक बालक स्वतःच्या भाषेत जन्मलेले स्वतःच्या भाषेतले स्वर आत्मसात करू शकते असे कधीच होत नाही की एखादा स्वर राहून जातो . हे घडते याचे कारण मुळातच होमोसेपियन या जातीच्या मुलांना ध्वनी क्षमतेचा प्रचंड मोठा जेनेटिक वारसा आणि साठा उपलब्ध आहे . मनात आणले तर कदाचित माणूस सहजरीत्या 50 भाषा सुद्धा आत्मसात करू शकतो असे अलीकडचे संशोधन सांगते त्यामुळे एकभाषावादाला आता फार अर्थ उरलेला नाही उलट मुलाला जास्तीत जास्त भाषां उपलब्ध करून देणे त्याला जास्तीत जास्त भाषा शिकायला प्रोत्साहन देणे हे त्याच्या ध्वनी क्षमतेला मदत करणारे असते ध्वनि क्षमतेचा साक्षात्कार करणारे असते हे आता आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणूनच मी जेव्हा हिंदीला पूर्ण नकार देणारे काही अतिशहाने लोक आले तेव्हा त्यांना सांगितले की मराठी प्राथमिक असली पाहिजे त्याबद्दल आपण वाद घालू नये ती आपली मातृभाषाच असली पाहिजे आणि तिच्यातूनच शिक्षण दिले पाहिजे विशेषता प्राथमिक शिक्षण तर तिच्यातूनच दिले पाहिजे परंतु त्यानंतर सर्वच्या सर्व भाषा शिकण्यासाठी खुल्या ओपन असल्या पाहिजेत आणि मराठी लोकांनी हिंदी सकट सर्व भारतीय भाषा शिकल्या पाहिजेत त्या क्षमता आपल्या मुलांच्या ठाई आहेत याचे कारण मुलांच्या ठाई अनेक प्रकारचे ध्वनी आत्मसात करण्याची क्षमता असते आत तसा साठा असतो सेटिंग असते किंबहुना त्यामुळेच तर आपण प्रत्येक माणसाचा प्रत्येक वस्तूचा आवाज सहज ओळखायला शिकतो जगातल्या सर्व वस्तूंना आवाज असतो आणि तो जवळजवळ आपण १००% टिपत राहतो याचे कारण आपल्याकडे ती क्षमता असते पण दुर्दैवाची गोष्ट अशी असते की आपण ही क्षमता गमावत जातो एका अर्थाने एका विशिष्ट प्रकारच्या मातृभाषेच्या सेटिंग मध्ये आपण sitting सीटिंग करतो आणि त्यामुळे ओपन होण्याच्या आपल्या क्षमता अनेकदा आपण दुर्लक्षित केल्यामुळे गमावत जातो आपण आता त्या संदर्भात काय करणार आहोत हे ठरवायची वेळ आलेली आहे 

माणसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही ध्वनी क्षमता तो सहजरित्या कल्पना शक्तीशी जोडू शकतो मला खूप लोक म्हणतात की तुझ्या कवितांच्या मध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये कल्पनाशक्ती असते प्रतिमांची प्रचंड झुंड असते पण त्याचे साधे आणि सरळ कारण असे असते की माझ्या कवितांच्या मध्ये मी कल्पना ऑन केली की ती कल्पनाशक्ती मी सहजरीत्या ध्वनी शक्तीशी जोडू शकतो आणि त्यामुळेच मग प्रतिमांची प्रचंड मानवी भाऊगर्दी जमू लागते आणि उडू शकते कल्पनेचे पतंग पण मस्त उडतात फक्त हे सर्व अनुभवाला धरून असावे याची काळजी मी नेहमीच घेत असतो मला कळत नकळत हे माहिती आहे की ध्वनी शक्ती काय पद्धतीने ऑपरेट होते आणि याला कारण मला प्राप्त झालेली सविकल्प समाधी होती ती प्राप्त झाली नसती तर मात्र कदाचित बरीच गडबड झाली असती ते असो सांगण्याचा मुद्दा असा की आपण कल्पनाशक्ती आणि ध्वनीशक्ती या एकत्र सहजरित्या फंक्शन करू शकतात आणि माणसाची ही एक फार मोठी ताकद आहे प्रश्न फक्त एकच आहे तो म्हणजे ध्वनी तरी खरे आहेत का की ते पण रंगाप्रमाणे माणसाने निर्माण केलेले आहेत ? आणि उद्या जर का हे सिद्ध झाले की आपल्याला ऐकू येणारे ध्वनी सुद्धा मेंदूच निर्माण करतो तर मग आपले दृकश्राव्य माध्यमाच्या संदर्भातले अनेक सेट्स आणि सेटिंग आणि गणिते आणि मॅथेमॅटिकल आडाखे बदलणार आहेत . आतापर्यंत आपण ज्ञानाच्या संदर्भात फार पोकळ बढाया मारल्या हे आता स्पष्ट दिसते ज्ञानाचा प्रचंड मोठा भाग अजूनही बाकीच आहे . त्यामुळेच इंटरनेट मधून प्राप्त झालेल्या इन्फॉर्मेशनच्या जीवावर उड्या मारणाऱ्या लोकांचे काय करायचे असा प्रश्न मला नेहमी पडतो . नेमका कसला माज आहे ? इथे साला वैज्ञानिक आयुष्यामध्ये अशा काही पेच्यामध्ये सापडलेले आहेत की उत्तरे सापडत नाहीयेत आणि इकडे इंटरनेट वाचून सर्वज्ञ झालेले लोक ! हे जे ज्ञानाबाबतीतले फालतूचे उथळ समाधान असते तेच अनेकदा माणसाला बंद करून टाकते त्यामुळे होते काय तर अनेकदा हल्ली नवे नवे ध्वनी आत्मसात करण्याऐवजी ते बाहेर हाकलून देणे हे आपण जास्त शिकलेलो आहोत म्हणजे ध्वनी क्षमता प्रचंड आहे परंतु आपण आपली धन्वक्षमता गमवायला आपण शिकत आहोत ही गमावण्याची जी प्रोसेस आहे ती आपली शिक्षण पद्धती आपल्यावर लादत असते त्यामुळेच आपल्या ज्ञानावर त्याचा अत्यंत विसंगत आणि विपरीत परिणाम होतो तो जर का आपणाला फार व्यवस्थित करायचा असेल तर आपल्या ध्वनीचे संगीत जास्तीत जास्त गाण्यांच्या सकट आवाजांच्या सकट ऑर्केस्ट्राशन सकट सादर करणे आपण शिकले पाहिजे 

मोक्षात असणाऱ्या लोकांनी कायमच याची काळजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः आत्मसात केलेल्या भाषेतच मोक्ष सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे . त्यामुळेच गौतम बुद्ध आणि महावीर अर्ध मागधी आणि पालीमध्ये बोलतो त्या काळामध्ये संस्कृत उपलब्ध होती की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे त्यावर आता मी जात नाही मुद्दा एवढाच आहे की आपण एकभाषिक असणे हा अलीकडच्या काळात गुन्हा असतो एवढेच लक्षात ठेवा बहू भाषी असणे आपल्या ध्वनी क्षमतेचे विविधतेचे प्रयोग आणि प्रयोग क्षमता शाबूत ठेवण्याचे एक नैसर्गिक क्रीडांगण आहे .

प्रश्न असा आहे की रंग ज्याप्रमाणे वास्तवात नसतात त्याप्रमाणे ध्वनी सुद्धा वास्तवात नसतो का? तो आपला मेंदू तयार करतो का आणि हा एक अत्यंत कृषीयल प्रश्न आहे आणि येऊ असलेल्या काळामध्ये तो आणखीनच कॉम्प्लिकेटेड होणार आहे कारण या संदर्भात अजूनही पुरेसे संशोधन होत नाहीये. एक गोष्ट नक्की आता झालेली आहे ती म्हणजे ध्वनी आणि दृश्य या अंगाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जग चालत असते विशेषत: माणसाचे जग असे चालते पण वाईट गोष्ट अशी आहे की माणूस आता वास आणि स्पर्श विसरत चाललाय विशेषत: डिजिटल युगामध्ये आपण पाहतो की आपल्याला स्पर्शाचा जवळ जवळ विसर पडलाय खरे तर माणसाकडे असलेली स्पर्श क्षमता सुद्धा अशीच खुली जर का राहिली तर तिचा प्रचंड फायदा होऊ शकतो कारण प्रत्येक माणसाचा प्रत्येक वस्तूचा स्पर्श सुद्धा वेगळा असतो दुर्दैवाने आपण स्पर्शावरून वस्तू आणि माणूस ओळखायला आता कमी पडत चाललेला आहोत किंबहुना ही क्षमता आपण गमावलेली आहे हीच गोष्ट वासाबाबत आहे आपल्याला असे ठामपणे आता सांगितले जाते की माणसाची वासाची क्षमता ही खूपच कमी आहे विशेषत: कुत्र्याच्या संदर्भात हे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षामध्ये ही क्षमता एकेकाळी नक्की जास्त असण्याची शक्यता आहे आपण ती गमावत गेलो असण्याची शक्यता जास्त आहे . शक्यता अशी आहे की आपली क्षमता कुत्र्यापेक्षा जास्त असावी आपले पूर्वज कुत्र्यापेक्षा जास्त सक्षम असावेत परंतु दुर्दैवाची गोष्ट असे की आपण सर्व वासाच्याबाबतीत अक्षम होत गेलो स्वतःलाच अक्षम करत गेलो प्रश्न असा आहे की आपण असेच डिजिटल होत राहिलो तर आपल्या क्षमता कमी होत जाणार आहेत का? यातून अलीकडे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की डिजिटल जग स्वतःचे जग निर्माण करत जाते खरे परंतु याचे होणारे काही साईड इफेक्ट आहेत का ? 

या मागचे कारण उघड आहे आपण सर्व आता ज्ञानाच्या संदर्भात डिजिटल वर प्रचंड अवलंबून राहायला शिकलेलो आहोत आणि याचा एक परिणाम असा झालेला आहे की आपण स्वतःला सुद्धा मोबाईल बनवत आहोत आपण एक मोबाईल ज्ञानाचे स्ट्रक्चर नेट तंत्रज्ञानाचे स्ट्रक्चर नेट चिन्हकीचे स्ट्रक्चरनेट बनवलेले आहे आणि आपण स्वतः निर्माण केलेल्या नेट जालचौकटीत ऑपरेट होत आहोत आणि आपण तसे ऑपरेट व्हावं अशी अनेकांची विशेषत: उत्तर कार्पोरेटवाद्यांची आणि जालकार्पोनेटवाल्यांची इच्छा आहे त्यांना त्यांचा धंदा वाढवायचा आहे पण गमतीचा भाग असा आहे की खुद्द त्यांची मुले सुद्धा यामध्ये येणार आहेत त्यामुळे एलोन मस्कला एवढे मोठे नेटवर्किंग उभे करून सुद्धा आपली मुले सांभाळता येत नाहीत 

आपण एक असे जग आपण बनवत आहोत ज्यामध्ये ज्ञान हे सर्वात महत्त्वाचे ठरवून सुद्धा हे ज्ञानच अंतिमत: माणसाची आत्महत्या ठरणार आहे . प्रश्न असा आहे की ही आत्महत्या थांबवायची की आपण त्या आत्महत्येचे भाग व्हायचे?

श्रीधर तिळवे नाईक

 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती