लोकप्रियता विज्ञान आणि लोकप्रियतेचे प्रकार श्रीधर तिळवे नाईक
१ सौंदर्यात्मक लोकप्रियता ही लोकप्रियता प्रामुख्याने शारीरिक सौंदर्याच्या आधारे निर्माण होत असते भारतामध्ये कदाचित हिचा पहिला क्रमांक लागेल मग भारतीय कितीही म्हणत की आम्ही धार्मिक आहोत प्रत्यक्षामध्ये धर्मात सुद्धा आपली देवी सुंदर दिसायला हवी असे भारतीयांना वाटत असते विशेषतः युरोशिअन भारतीयांना हे जास्तच आवश्यक वाटते यातून मग अनेक उपप्रकार निर्माण होतात
१ रेखीव सौंदर्य हे प्रामुख्याने नाकाने रेखीव असणाऱ्या लोकांच्या बाबतीत मानले जाते
२ गोलीय सौंदर्य हे प्रामुख्याने अंगाच्या वाक वळणाने सिद्ध होते
३ प्रासादिक सौंदर्य हे प्रामुख्याने ज्याला आजकाल ग्रेस म्हटले जाते त्या अंगाने सिद्ध होते प्राचीन काळात याला प्रासादिक म्हटले जाईल
४ रुबाबदार सौंदर्य एखादा माणूस एखादी व्यक्ती तुमच्या पारंपारिक चौकटीत बसत नसेल परंतु तिचा रुबाब असा असतो की ती रुबाबदार वाटते आणि तिच्या या रुबाबदार असण्यातून सौंदर्य निर्माण होते
५ देखणे सौंदर्य हे एक असे सौंदर्य आहे याबद्दल सांगणे अशक्य शब्दात सांगता येत नाही पण एखादी व्यक्ती देखणी वाटते पण रेखीव असेलच असे नाही . मर्लिन मन्रो याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्याकडे मुमताज अशी होती .
६ स्मार्ट किंवा आकर्षक सौंदर्य एखादी व्यक्ती सुंदर नसते पण आकर्षक असते आणि तरीसुद्धा ती सुंदर वाटते याचे कारण तिच्यामध्ये आकर्षण असते पूर्वी राजेश खन्ना असा होता अलीकडे शाहरुख खान असा झाला .
७ सौष्ठवी सौंदर्य एखाद्या पुरुषाचे किंवा स्त्रीचे शरीर सौष्ठव फार महत्त्वाचे होऊन बसते आर्नोल्ड श्वार्झनेगर याचे सौंदर्य यामध्ये मोडते अनेकदा पुरुष बायकांच्या अशा प्रकारच्या शरीर स्वस्त वाला नाक मुरडतात परंतु माझ्या मते बायकांच्या अशा शरीर सौष्ठवालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे त्याबाबतीत साधारण मी जी चौकशी केली होती त्याबाबतीत सांगण्यात एकच गोष्ट येते ती म्हणजे सेक्स करताना काय ? माझे म्हणणे इतकेच असते तुम्ही काय तिच्याबरोबर सेक्स करणार आहे काय तर यावर उत्तर असे असते की आम्ही स्त्रियांना कितीही काहीही म्हटले तरी अशाच अंगाने पाहतो . अर्थातच सर्व पुरुष असे नाहीत परंतु ही गोष्ट फार महत्त्वाची ठरत जाते. बायकांच्या बाबतीत मात्र अनेक बायकांना अशा सौंदर्याचे आवड असू शकते मात्र सर्वच बायकांना असे सौंदर्य आवडते हा एक फार मोठा गैरसमज अलीकडे पसरवण्यात आलेला आहे अनेक बायकांना तर उलट अशा लोकांची भीतीच वाटते हा माझा अनुभव आहे पण लोकप्रियता आशिष या सौंदर्याच्या साह्याने लाभो शक्ती शकते आर्नोल्ड श्वार्झनेगर हा याचे उत्तम उदाहरण आहे त्याच्या आधी सिल्वेस्टर स्टेलोन असा लोकप्रिय होता पण तो देखणाही होता.
यातल्या कुठल्याही सौंदर्यामुळे लोकप्रियता मिळू शकते त्यामुळे आपण असा ठाम निकष ठरवून याबाबतीत काही विधान करू शकत नाही
भारतामध्ये लोकप्रियतेचे काळानुसार तीन प्रकार घडतात
१ जन्मपूर्व लोकप्रियता : ही अनेकदा अमुक येणार तमुक येणार म्हणून आधीच तयार झालेली असते उदाहरणार्थ बुद्धाचा मैत्रय आणि विष्णूचा कलकी हा अवतार नंतरच्या लोकांना याचा किती फायदा होतो आणि किती तोटा होतो हे सांगणे कठीण आहे अनेकदा यामध्ये ज्योतिषाचा वाटा असतो मी स्वतः यातून गेलेलो आहे म्हणून सांगतो अनेकदा हल्ले होतात कारण काही लोकांच्यासाठी तुमचा जन्म अनवांटेड असतो .
वर्तमान लोकप्रियता या जन्मातली लोकप्रियता त्याबद्दल बोलण्याची गरज नाही
तिसरा प्रकार मृत्यूनंतर ची लोकप्रियता या लोकप्रियतेच्या आकर्षण वर्तमानात प्रचंड लोकप्रियता लाभून सुद्धा ओसरत नाही असे दिसते उदाहरणार्थ पु ल देशपांडे सुनिता देशपांडे यांनी जे लिहिले आहे ते पाहण्याजोगे आहे त्या पु ल देशपांडे यांच्या विषयी म्हणतात,
"असा तू देवमाणूसही; आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानानं ते नावही स्वीकारलंस, पण खरं तर तू जन्मजातच 'खेळिया' होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावं लागतच नाही.
तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान-भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीनं नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंतीही 'तुला' लाभली होती. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास, तो दीर्घायुष्यी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे. तू गेलास, उद्या मीही नाहीशी होणार. पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द, मराठी भाषा जिवंत असेपर्यंत, स्वतःच्या तेजानं चमकतच राहील ना?"
यामध्ये शेवटच्या ज्या ओळी आहेत त्या सरळ सरळ मरणोत्तर सुद्धा तुझी कीर्ती राहील अशी आशा व्यक्त करणाऱ्या आहेत .
अनेकदा जिवंत असताना ज्यांना लोकप्रियता मिळत नाही आणि तरीही ज्यांना आपल्या प्रतिभेविषयी शंका नसते त्यांना हीच एक लोकप्रियता दिलासा वाटत असते पण हा दिलासा खरोखर खरा असतो का त्याचा खरोखर फायदा काय ते केवळ आधी ज्यांना मृत्यूनंतर कीर्ती मिळालेली आहे त्यावरून काढलेले अनुमान असते . मोक्षाच्या संदर्भात त्याचे काहीही महत्त्व नाही परंतु जे लोक या जगात लौकिक पद्धतीने जगत असतात त्यांना मात्र हा दिलासा फार मोठा असू शकतो . माणसाला मेल्यानंतर ही माणसान मानवास मानसन्मान हवा असतो हे फार विनोदी आहे पण तो हवा असतो हेच खरे एका अर्थाने ही अमरत्वाची आसक्ती आहे .
मेल्यानंतर तुम्हाला लाभलेली लोकप्रियता ही नेमकी कशामुळे लागते लाभते याचे मात्र विश्लेषण करावे लागते पण त्याचबरोबर हेही खरे की या लोकप्रियतेचा फायदा घेऊन स्वतःची लोकप्रियता वाढवू पाहणारे लोक मरणोत्तर लोकप्रियतेनंतर वाढत जातात
लोकप्रियतेसाठी तुम्ही जे कार्यकर्ता किंवा कृती करता क्रिया करता त्यावरून सुद्धा काही प्रकार पडतात
१ प्रायोगिक कृतीवरून तुम्हाला मिळणारी प्रायोगिक लोकप्रियता ही लोकप्रियता कायमच तुमच्या प्रयोगांना मिळत असते पण ती अतिशय अल्प असते अनेकदा ते एका विशिष्ट ग्रुप वरतीच मर्यादित असते अनेकदा हे ग्रुप ही लोकप्रियता स्पॉन्सर करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात कारण त्यांच्या दृष्टीने ती प्रायोगिक कृती खूप महत्त्वाची असते परंतु जे व्यवसायिक असतात त्यांना ही प्रायोगी कृती आवडेलच असे नाही
२ समांतर कृती आणि तिच्यामुळे लाभलेली लोकप्रियता तिला आपण समांतर लोकप्रियता म्हणू. ही लोकप्रियता प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याच पद्धतीचे प्रयोग वेगळ्या आशयाच्या मार्गाने करणे अशा अंगाने समांतर कृतींच्या साहाय्याने मिळते . अनेकदा आता प्रायोगिक प्रस्थापित झाल्याने आपणाला सुद्धा चान्स आहे असे कृती करणाऱ्याला वाटत असते इथे बंडाचा प्रश्न नसतो तर बंड स्वीकारले गेलेले आहे असे अनुमान लावून त्या बंडाप्रमाणे बंडाणे निर्माण केलेल्या साच्याप्रमाणे कृती केली जात जाते . आपल्याकडे अनेकदा समांतर कृती करणारे लोक उद्योग करणारे लोक अकारण मोठे केले जातात प्रत्यक्षात त्याने काहीही घंटा प्रायोगिक काम केलेले नसते .
व्यवसायिक कृती आणि व्यावसायिक लोकप्रियता ही नेहमीच व्यावसायिक कृती करून लाभत असल्याने लोक ती करतात मात्र तिला धंदेवाईकपणा नसतो तर स्वतःची इच्छा असते तिथे गल्ला किती निर्माण होईल यावर लक्ष नसते पण जो करणारा असतो त्याला सुमाळत आता समांतर कृती लोकप्रिय होऊ शकते असे वाटते म्हणून तो ती तशी कृती करतो आपल्याकडच्या सगळ्या प्रायोगिक रंगमंचावरच्या नाटकांच्या कृती या प्रत्यक्षात व्यवसाय कृती आहेत आणि त्या युरोपमधल्या प्रयोगांच्या यशस्वी सादरीकरणानंतर उत्पादित झालेल्या आहेत.
धंदेवाईक लोकप्रियता ही लोकप्रियता मात्र धंदेवाईक कृती करून म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी केले गेलेल्या कृतीतून निर्माण होते सर्वसाधारण सर्वच उद्योजक हे धंदेवाईक म्हणजे कमर्शियल असतात आपल्याकडे धंदेवाही हा शब्द फार निगेटिव्ह पद्धतीने वापरले जातो वापरला जातो परंतु ते योग्य नव्हे धंदेवाईक याचा अर्थ कमर्शियल असा होतो तर व्यवसायिक याचा अर्थ प्रोफेशनल होतो उद्योगांच्या मध्ये सुद्धा आणि उद्योगपतींच्या मध्ये सुद्धा व्यवसायिक आणि धंदेवाईक असे दोन प्रकार असू शकतात आपल्याकडे टाटा हे व्यवसायिक होते अंबानी मात्र धंदेवाईकच होते आता मात्र अंबानी व्यवसायिक बनत चाललेले आहेत आणि ही आनंदाची गोष्ट आहे . धंदेवाईक लोकप्रियताला अनेकदा कशाची हीच सारण असते चाड नसते त्यामुळे वाईट काम करून सुद्धा धंदेवाईक लोकप्रियता मिळू शकते फक्त ते कायद्याच्या चौकटीत बसवावे लागते .
बेकायदेशीर लोकप्रियता : ही लोकप्रियता कायदा मोडून मिळवली जाते प्रायोगिक लोकप्रियता प्रायोग करून उभा राहते बंड करून उभा राहते परंतु इथे बंड नसते तर फक्त धंदेवाईकपणा असतो परंतु हा धंदेवाहीतपणा कायदे सुद्धा पळाला तयार नसतो अनेकदा क्रिमिनल लोकांची जी लोकप्रियता असते तिला क्रिमिनल लोकप्रियता किंवा बेकायदेशीर लोकप्रियता म्हणावे लागते आपल्याकडे आलीकडे अशाच लोकप्रिय झालेल्या लोकांना जागा देणारे महाभाग कलावंत जन्मलेले आहेत वास्तविक त्यांचे परखड परीक्षण करायला हवे पण ते होत नाही उलट त्यांची ताकद कशी मोठी आहे याच्याच दंतकथा निर्माण केल्या जातात आणि हे लोक सुद्धा आपली बेकायदेशीर लोकप्रियता कशी वाढत जाईल त्याची काळजी घेत असतात पूर्वीच्या अंडरबल मध्ये लोकप्रियता हा घटक नव्हता परंतु 1990 नंतर मात्र अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा लोकप्रियता महत्त्वाची होत गेली आणि मग बेकायदेशीर लोकप्रियतेचा उदय झाला . टेररिझम हा सुद्धा याच अंगाने येतो अर्थात काही लोक त्याला प्रायोगिक म्हणू शकतात पण मला तरी त्याला प्रायोगिक म्हणावे असे वाटत नाही .
श्रीधर तिळवे नाईक
लोकप्रियता विज्ञान २ शारीरिक लोकप्रियतेचे प्रकार श्रीधर तिळवे नाईक
लोकप्रियतेच्या प्रश्नांची जेव्हा जेव्हा चर्चा येते तेव्हा तेव्हा सौंदर्याची चर्चा अटळ पणाने येत असते याचे कारण अनेक लोकप्रिय व्यक्ती आपण जर का पाहिल्या तर त्यामध्ये सुंदर व्यक्तींचे प्रमाण किमान 50 टक्के आहे साहजिकच सौंदर्य हाच लोकप्रियतेचा एकमेव निकष आहे का असा प्रश्न पडण्याइतपत सौंदर्य लोकप्रियतेच्या केंद्रस्थानी असलेले दिसते त्यामुळे सौंदर्याच्या प्रकाराची सर्वात प्रथम चर्चा करावी लागते सर्वसाधारणपणे असे म्हणता येते की सौंदर्यात्मक लोकप्रियता ही लोकप्रियतेच्या संदर्भामध्ये प्रथम चर्चेला घेण्याजोगी गोष्ट आहे आणि म्हणूनच मग सौंदर्याची चर्चा सर्वात प्रथम घ्यावी लागते यामध्ये सर्वात प्रथम प्रश्न नेहमीच निर्माण होतो तो म्हणजे आपण सर्वजण स्वतःला कितीही आत्मा बित्वा वगैरे मानत असलो तरी प्रत्यक्षामध्ये आपण व्यवहारांमध्ये शरीरच असतो आणि म्हणूनच आपला सर्व व्यवहार शरीर केंद्रीय असतो साहजिकच मग शरीराच्या संदर्भामध्ये दोन गोष्टी दिसतात पहिले सौंदर्य आणि दुसरे शारीरिक बळ त्यामुळेच सौंदर्याच्या लोकप्रियते बरोबरच बळात्मक लोकप्रियतेची चर्चा सुद्धा आपणाला करावीच लागते . म्हणजे कुस्ती खेळणारा मनुष्य हा लोकप्रिय असतो बॉक्सिंग करणारा मनुष्य हा लोकप्रिय असतो मग तो स्त्री असो अथवा पुरुष यामध्ये पुरुषाची लोकप्रियता सध्या तरी तुलनेने अधिक आहे परंतु बळात्मक लोकप्रियता सुद्धा फार महत्त्वाची मानली जाते. यातील सर्वात प्रथम सौंदर्यात्मक लोकप्रियतेची चर्चा आपण करू आणि त्यासाठीच सौंदर्याचे प्रकार सुद्धा आपण काय आहेत ते पाहू
सौंदर्यात्मक लोकप्रियता आणि तिचे प्रकार
ही लोकप्रियता प्रामुख्याने शारीरिक सौंदर्याच्या आधारे निर्माण होत असते भारतामध्ये कदाचित हिचा पहिला क्रमांक लागेल मग भारतीय कितीही म्हणत असोत की आम्ही धार्मिक आहोत . बायको बघताना सर्वात प्रथम पहिला निकष हा अनेकदा सौंदर्यच असतो अलीकडे तर हा निकष पुरुषाबाबतीत सुद्धा प्रस्थापित होताना दिसत आहे प्रत्यक्षामध्ये धर्मात सुद्धा आपली देवी सुंदर दिसायला हवी असे भारतीयांना वाटत असते विशेषतः युरोशिअन भारतीयांना हे जास्तच आवश्यक वाटते सौंदर्याचे अनेक प्रकार असतात आपल्याकडे अनेकदा त्यांची चर्चा जितकी व्हायला हवी तितकी होत नाही म्हणून थोडक्यात चर्चा करतो
१ रेखीव सौंदर्य : हे प्रामुख्याने नाकाने रेखीव असणाऱ्या लोकांच्या बाबतीत मानले जाते सर्वसाधारणपणे ग्रीक संस्कृतीमध्ये जी सौंदर्याची संकल्पना होती ती रेखीवता केंद्रित होते त्यामुळे रेख हाच फार महत्त्वाचा घटक बनला वळण हा घटक फारसा महत्त्वाचा ठरला नाही अनेकदा आपल्याकडे सुद्धा गरीब सौंदर्याचे पुरुष विशेषता जास्त लोकप्रिय झालेले अलीकडच्या काळात दिसतात रितिक रोशनची लोकप्रियता ही अशी रेखीव सौंदर्याची लोकप्रियता आहे ऐश्वर्या रॉय हे दुसरे उदाहरण म्हणता येईल .
२ गोलीय सौंदर्य :हे प्रामुख्याने अंगाच्या वाक वळणाने सिद्ध होते अलीकडच्या काळामध्ये नयनतारा हे याचे उत्तम उदाहरण आहे
३ प्रासादिक सौंदर्य : हे प्रामुख्याने ज्याला आजकाल ग्रेस म्हटले जाते त्या अंगाने सिद्ध होते प्राचीन काळात याला प्रासादिक म्हटले जाई. हे सौंदर्य प्रामुख्याने क्रियात्मक हालचालीतून निर्माण होते आणि याचे उत्तम उदाहरण भारतीयांच्यासाठी अमिताभ बच्चन आहे
४ रुबाबदार सौंदर्य एखादा माणूस एखादी व्यक्ती तुमच्या पारंपारिक चौकटीत बसत नसेल परंतु तिचा रुबाब असा असतो की ती रुबाबदार वाटते आणि तिच्या या रुबाबदार असण्यातून सौंदर्य निर्माण होते अजय देवगन चे सौंदर्य हे असे सौंदर्य आहे
५ देखणे सौंदर्य हे एक असे सौंदर्य आहे याबद्दल सांगणे अशक्य ! शब्दात सांगता येत नाही पण एखादी व्यक्ती देखणी वाटते पण रेखीव असेलच असे नाही . मर्लिन मन्रो याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्याकडे मुमताज अशी होती .
६ स्मार्ट किंवा आकर्षक सौंदर्य: एखादी व्यक्ती सुंदर नसते पण आकर्षक असते आणि तरीसुद्धा ती सुंदर वाटते याचे कारण तिच्यामध्ये आकर्षण असते पूर्वी राजेश खन्ना असा होता अलीकडे शाहरुख खान असा झाला . रणवीर सिंग हे आताचे आत्ताच्या पिढीतील उदाहरण आहे. काशिनाथ घाणेकर सुद्धा असेच होते .
७ सौष्ठवी सौंदर्य एखाद्या पुरुषाचे किंवा स्त्रीचे शरीर सौष्ठव फार महत्त्वाचे होऊन बसते आर्नोल्ड श्वार्झनेगर याचे सौंदर्य यामध्ये मोडते अनेकदा पुरुष बायकांच्या अशा प्रकारच्या शरीर स्वस्त वाला नाक मुरडतात परंतु माझ्या मते बायकांच्या अशा शरीर सौष्ठवालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे त्याबाबतीत साधारण मी जी चौकशी केली होती त्याबाबतीत सांगण्यात एकच गोष्ट येते ती म्हणजे सेक्स करताना काय ? माझे म्हणणे इतकेच असते तुम्ही काय तिच्याबरोबर सेक्स करणार आहे काय तर यावर उत्तर असे असते की आम्ही स्त्रियांना कितीही काहीही म्हटले तरी अशाच अंगाने पाहतो . अर्थातच सर्व पुरुष असे असत नाहीत परंतु ही गोष्ट फार महत्त्वाची ठरत जाते. माझ्याकडे याबाबतीतले फारसे अनुभव नाहीत पण माझ्या दोन अनुभवावरून सांगतो की सर्वसाधारणपणे या टाईप मध्ये स्त्री अनेकदा संबंध ठेवताना कंट्रोल घेते जर का तुम्ही तेवढेच तुल्यबळ असाल तरच तुम्हाला कंट्रोल घेणे शक्य असते तुम्ही जर का passive पद्धतीने शरीर संबंध ठेवू शकत असाल तरच तुम्ही अशा बाबतीत पुढाकार घ्यावा अर्थात ही टीप आहे निष्कर्ष नव्हे अर्थात ती फक्त 2010 पूर्वीच्या अनुभवावर अवलंबून आहे त्यानंतर काही बदल झाला असेल तर त्याची जबाबदारी माझी नाही. हे सुद्धा मी सांगतो आहे कारण याबाबतीत पुरुष फारच निगेटिव्ह झालेले दिसतात कृपया असे निगेटिव्ह होऊ नका एखादी व्यक्ती जेव्हा जिम मध्ये जाऊन अतिशय चांगले धडधाकट सौंदर्य कमावते तेव्हा त्याला सुद्धा दाद देता आली पाहिजे हा काहीतरी पुरुषांचा प्रांत आहे हा गैरसमज सर्व पुरुषांनी आपल्या डोक्यातून काढून टाकावा . अर्थात हाच एकमेव निकष असू नये हे तर अगदीच खरे आहे किंबहुना सौंदर्याच्या सर्वच प्रकारांची चर्चा त्यामुळेच इथे करतो आहे .
बायकांच्या बाबतीत मात्र अनेक बायकांना अशा सौष्ठवात्मक सौंदर्याची आवड असू शकते मात्र सर्वच बायकांना असे सौंदर्य आवडते हा एक फार मोठा गैरसमज अलीकडे पसरवण्यात आलेला आहे. अनेक बायकांना तर उलट अशा लोकांची भीतीच वाटते हा माझा अनुभव आहे पण लोकप्रियता अशा प्रकारच्या सौंदर्याच्या साह्याने लाभू शकते आर्नोल्ड श्वार्झनेगर हा याचे उत्तम उदाहरण आहे त्याच्या आधी सिल्वेस्टर स्टेलोन असा लोकप्रिय होता पण तो देखणाही होता.
यातल्या कुठल्याही सौंदर्यामुळे लोकप्रियता मिळू शकते त्यामुळे आपण अमुक सौंदर्य असेल तरच लोकप्रियता लाभेल असा ठाम निकष ठरवून याबाबतीत काही विधान करू शकत नाही .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment