इराण आणि धर्म

 इराण आणि धर्म श्रीधर तिळवे नाईक 


आयातुला खोमिनी यांच्यावर जेव्हा मी कविता लिहिली होती जी आता क .व्हि. या काव्यसंग्रहात आहे तेव्हा अनेक सहकाऱ्यांच्या कडून मी भरपूर शिव्या खाल्ल्या होत्या . ही कविता सेक्युलर वादाच्या विरोधात आहे असे काहींचे म्हणणे होते . पुढे मग १९८९ साली खोमिनीचा मृत्यू झाला आणि खामेनी सत्तेवर आले आणि आता 2026 ला त्यांच्या सत्तेच्या विरोधात इराणमध्ये बंड झाले आहे साहजिकच त्या संदर्भात मग अनेक चर्चा सुरू झालेले आहेत झालेले आहेत काही हिंदुत्ववादी लोकांनी ही क्रांती इस्लामच्या विरोधात झालेली क्रांती आहे अशी मांडणी करायला सुरुवात केलेली आहे मुळातच खोमेनी यांची क्रांती ही क्रांती नव्हतीच ती प्रतिक्रांती होती आणि उत्तराधुनिकतेने जे धर्माचे औडंबर माजवले आहे त्याची राजकीय प्रतिष्ठा या क्रांतीमुळे प्रथमच सेटल झाली . ही ईश्वराची हत्या आहे असे माझे मत असल्याने साहजिकच मी पुन्हा पुन्हा ईश्वराची हत्या होते आहे अशी कवितेची सुरुवात केली होती 


त्यामुळे साहजिकच इराण मध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडी वर माझी नजर असते. परंपरा वादातून उत्तर परंपरा वादाकडे सरकलेले हे राजकारण जगाच्या केंद्रस्थानी यायला इथूनच सुरुवात झाली होती आणि आता इथेच या उत्तर परंपरा वादाला उलथून टाकण्याचे मनसुबे इराणच्या जनतेला सुचलेले आहेत ते यशस्वी होतील की नाही हा एक खरोखरच प्रश्न आहे. 


मुळातच झोराष्ट्रीयन धर्म किंवा पारसी धर्म हा शैव धर्मातून उगम पावलेला असा धर्म आहे . यातला पिता हा सुद्धा शिव आहे आणि त्याच्यासोबत बैल आहे नंदी आहे. पारसी मध्ये शंकराचा उल्लेख पेंगू असा झालेला आहे हे आदिवासी लोकांच्या लिंगो या शब्दाचेच पारसी रुप आहे. तर दुसरा उल्लेख महाबाद हा महादेवाचे रुप आहे. बाद या शब्दाचा इथे असलेला अर्थ बा म्हणजेच पिता असा आहे . आपल्याकडच्या ज्योतिबा खंडोबाप्रमाणेच हा सुद्धा महाबा म्हणजेच महाबाद आहे . मी मागेच सांगितले आहे की बा या शब्दाचा अर्थ क्रिया तंत्राने मोक्ष मिळवणारा पुरुष असा असतो . ज्योतिबा काय किंवा खंडोबा काय हे क्रिया तंत्राच्या साह्याने मोक्ष मिळवणारे सिद्ध होते. अब - बौद - तात म्हणजे पित्यांचा पिता होय. हाही उल्लेख शंकराला धरून आहे.


पारसी धर्म हे एक उत्कृष्ट क्रिया तंत्र आहे ज्याचा आधार आशा म्हणजेच असणे होय . असण्याकडे नेते ते आशा असा दुसराही अर्थ इथे अभिप्रेत आहे .

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय