सावरकर स्मृतिदिनानिमित्त: शाक्त विचार , शस्त्र विचार आणि सावरकर श्रीधर तिळवे नाईक 26 फेब्रुवारी हा सावरकरांचा मृत्युदिन! साहजिकच हा दिवस आला की सावरकर विचारांचे विचार मंथन सुरू होते आणि वाद ही सुरू होतात . सावरकर यांना समजून घ्यायचे असेल तर दोन विचार समजून घ्यावे लागतात. पहिला शाक्त विचार जो शैव श्रुती मधून आलेला आहे तर दुसरा शस्त्र बल विचार जो कौटिल्य आणि श्रीकृष्ण यांच्या विचारातून विकसित होत असतो. हा युरेशियन श्रुतीतून आलेला विचार आहे हिंदू धर्म हा या दोन्ही श्रुतींचा मिलाप घडवण्याचा प्रयत्न असल्यामुळे तिथे हे दोन्ही विचार कार्यरत असतात मात्र अंतिम उद्दिष्ट हे युरेशियन श्रुतीचे वर्चस्व स्थापन करणे असल्याने साहजिकच कल साधारणपणे कौटिल्य आणि श्रीकृष्ण यांच्या बाजूने सरकत असतो . शाक्त तंत्र हे मोक्ष मिळवण्याच्या पाच मुख्य तंत्रांच्यापैकी एक तंत्र आहे हे मुळात भगवान शंकर यांनी भगवती पार्वतीला दिले होते . शिव आणि शक्ती या तत्त्वांच्यापैकी शक्ती या तत्त्वाला प्राधान्य देणे हे या तंत्राचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इतर तंत्रांच्या मध्ये संसाराची जी प्रचंड उपेक्षा चालते ती या तं...
Posts
Showing posts from February, 2026
- Get link
- X
- Other Apps
फ्लेश,मांसल आणि डिजिटल श्रीधर तिळवे नाईक अलीकडे फ्लेश या कादंबरीला बुकर प्राइज मिळाल्याने अचानक फ्लेशबद्दल विचारविनिमय सुरू झाला. मला स्वतःला हे खूप चांगले लक्षण वाटते " अ डा हॉ का बाना सुना" या माझ्या कादंबरीमध्ये हा संघर्ष केंद्रस्थानी आहे कारण तो आमच्या पिढीचा संघर्ष आहे. आपण मांसल आहोत आणि आपला कंट्रोल मात्र डिजिटल कडे आहे हा एक फार अजिब गरीब संघर्ष आमच्या पिढीच्या वाट्याला सुरुवातीपासून आला साहजिकच फ्लेश आणि त्याचे अनेक अस्पेक्ट विचार आणि आचाराच्या कक्षेत येणे अटळ होते . 2020 नंतर चौथ्या नवतेच्या कादंबऱ्या हळूहळू का होईना परंतु नोबेल मिळवण्याच्या दिशेने सरकायला लागतील असा अंदाज होता त्याची सुरुवात बहुदा या कादंबरीमुळे झालेली आहे. मराठीत अजूनही किशोर कदम सारख्या रोमांटिक कवींचा बोलवाला आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्यासारख्या लोकांना या कादंबऱ्या सामान्य वाटणे अटळ आहे . पण हा काही आमच्या पिढीचा आवाज नाही हा जुन्या पिढीचा आवाज आहे आणि ती सध्या प्रस्थापित झाल्याने अधिक मोठ्या आवाजात बोलते . मुळात उत्तर आधुनिकतेमध्ये कंडोम आला आणि संपूर्ण काम या जीवनार्थाचे आयाम बदलले मुख्...
- Get link
- X
- Other Apps
वस्तुवाद आणि निर्वस्तुवादी कविता श्रीधर तिळवे नाईक सौष्ठ च्या पहिल्या अंकात जेव्हा मी माझ्या चॅनेल निर्वस्तू या काव्य पाहिलीतील काही कविता टाकल्या तेव्हा अनेक जण गोंधळून गेले होते मग मधले काही दिवस मी ह्या संग्रहातील कविता फेसबुकवर टाकत राहिलो अशा कवितांना प्रतिसाद अल्प असणे अटळ आहे कारण मुळात मराठीत धड वस्तुवाद हाच प्रस्थापित झालेला नाही मग त्याविरुद्ध बंड म्हणून मी लिहिलेल्या निर्वस्तुवादी कविता पचणे अवघडच मात्र मराठी संस्कृतीत वस्तुवाद मात्र व्यवस्थित बोकाळला आहे त्यामुळे त्याविषयी आता लिहिणे गरजेचे बनले आहे . ज्या फ्रेंच संस्कृतीत तो प्रथम आला तिथेच मुळात त्याची दखल घेऊन त्याच्यावर विस्ताराने लिहायला २००२ साल उजडले आहे मग मी कोल्हापूर पासूनच ज्यांना लिहायला सुरवात केली त्या निर्वस्तुवादी कवितांची साधी दाखल तरी कोण घेणार ? ह्या कविता मी सौष्ठवच्या फेब १९९३ च्या अंकात टाकल्या होत्या आणि आता वस्तुवादाच्या प्रभावामुळे त्या दखलपात्र ठरण्याच्या शक्यता आहे . वस्तुवादाला इंग्लिशमध्ये thingism असा शब्द आहे आणि तो फ्रेंच chosisme ह्या शब्दाचे भाषांतर आहे पोस्टमॉडर्न साहित...
- Get link
- X
- Other Apps
शुद्ध, शूद्र,व्यवहार ,माया आणि वास्तव श्रीधर तिळवे नाईक भारतीय वर्ण व्यवस्थेची चर्चा करताना शैव संस्कृतीत कायमच गोंधळ माजलेला दिसतो. मी एक सिद्धांत मांडला होता की हा शब्द मूळचा शुद्ध आहे आणि त्या शुद्ध पासून शूद्र हा शब्द नंतर आर्य लोकांनी तयार केला. सिंधू संस्कृती मध्ये ज्या काही गोष्टी आढळतात त्यात स्नान व्यवस्था ही एक फार मोठी व्यवस्था म्हणून येत राहते त्यातूनच मग संपूर्ण जगाला चकित करणारी सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा येते हे सर्व करण्यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टीने प्रेरणा दिली हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडत नाही पण प्रत्यक्षात तो अस्तित्वात आहे. सर्वसाधारणपणे शिवशक्ती संसार जीव आणि मोक्ष या पाच गोष्टी शैव श्रुतीच्या केंद्रस्थानी असतात. यातील जो संसार आहे त्याचे दोन प्रकार प्रामुख्याने मांडले जातात १ शुद्ध संसार २ अशुद्ध संसार यातील जो अशुद्ध संसार आहे त्याला माया म्हटले जाते . जो शुद्ध संसार आहे तो थेट शिवाशी जोडला गेलेला असतो . किंबहुना ज्यांना मोक्षाला पोहोचायचे असते त्यांना अशुद्ध संसाराकडून शुद्ध संसाराकडे जावे लागते आणि तिथून मग त्यांन...
- Get link
- X
- Other Apps
टिपू सुलतान , राजकीय इतिहास आणि राजकारण श्रीधर तिळवे नाईक भारतामध्ये सध्या दोन गोष्टी खूप प्रभावी आहेत पहिली अनुभव प्रणाली त्यामधील राजकीय विचार प्रणाली म्हणून धर्म खूप लोकप्रिय आहे आणि त्याच्या आधारे धार्मिक राजवटही सत्तेवर आलेली आहे ही नव्या पद्धतीची राजवट असली तरी तिचा गाभा धर्म आहे साहजिकच जेव्हा धार्मिक बाबतीत प्रश्न उपस्थित होतो तेव्हा तो राजकीय प्रश्न असतो . अनेकदा या प्रस्थापित सत्तेला डिवचण्यासाठी म्हणून सेक्युलर लोक व्यवस्थित प्रयत्न करत असतात. त्यामुळे मीडियामध्ये मायलेज मिळते . प्रश्न असा असतो की हा जो धर्माविषयी त्याच्याशी जोडल्या गेलेल्या धर्म कारणाविषयी प्रश्न निर्माण केला जातो तो का निर्माण केला जातो? याचे स्पष्ट आणि स्वच्छ कारण असे की धर्म ही राजकीय प्रणाली असल्याने आणि तिच्या जीवावर निवडणुका जिंकल्यामुळे साहजिकच धर्माच्या बाजूने उतरणे किंवा धर्माच्या विरोधात उतरणे अशा गोष्टी सातत्याने घडायला लागतात . कुठला असेल सेक्युलर लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर त्यांना हिंदू हे बहुजन असल्यामुळे थेट हिंदूंच्या विरोधात बोलता येत नाही म्हणून मग ते इति...
- Get link
- X
- Other Apps
व्यवहार ,महात्मा फुले आणि हक्काचा प्रश्न श्रीधर तिळवे नाईक भारतीय समाजाच्या इतिहासामध्ये आणि समाजशास्त्राच्या इतिहासामध्ये जे योगदान महात्मा फुले यांनी दिले आहे तशा प्रकारचे योगदान पुरोगामी वादामध्ये 19 व्या शतकात फार कोणी दिलेले नाही हे योगदान अतिशय थोर आहे हे करायचे असेल तर प्रथम जातीव्यवस्था काय पद्धतीने आपल्याकडे ऑपरेट होत होती ते पाहिले पाहिजे १ सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये व्यक्तिगत हक्क नाही जो हक्क आहे तो जातीला आहे म्हणजेच व्यक्तिगतला थोडा सुद्धा मुंगी इतका सुद्धा शिरकाव नाही आणि व्यक्तिगतला यायचंच असेल तर मोक्षाच्याच फक्त शक्यता उपलब्ध ठेवायच्या आणि या शक्यता अशा आहेत की ज्या लाखात एकाला मिळू शकतात म्हणजेच तुम्ही थेट संन्यास घ्या आणि समाजातून बाहेर पडा अशा प्रकारची ही योजना आहे साहजिकच बहुतांशी संन्यासी बाहेर पडले पण नंतर नंतर तर गोष्ट हितेपर्यंत गेली की संन्याशाला सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी नाकारलेच पण त्याचबरोबर संन्यास कोणी घ्यायचा आणि घ्यायचा नाही तपश्चर्या कोणी करायचे आणि कोणी करायचे नाही यासंदर्भातले सुद्धा नियम घालून दिले कारण काही संन्यासी अस...
- Get link
- X
- Other Apps
महाशिवरात्र आणि विरोधाभास श्रीधर तिळवे नाईक युरेशियन लोकांच्या पुढे जे काही अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न असतात त्यापैकी एक प्रश्न नेहमी शिव शक्ती या दोन तत्त्वांना आणि शंकर पार्वती विनायक (गणपती) कुमार कार्तिकेय (स्कंद )नंदी (बैल नव्हे मित्र ) या आदिपंचसिद्धांना कसे सामावून घ्यायचे आणि भगवान शंकरांचे भगवती पार्वतीचे करायचे काय हा असतो. ज्याला ते लोकधर्म म्हणतात तोच शैव धर्म आहे आणि त्यामध्ये लोक खूप असल्याने त्याला लोकधर्म म्हटले जाते साहजिकच एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीचे शेवटी तुम्हाला काही ना काही तरी करावे लागते . ब्राह्मण वर्णाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना एकीकडे यज्ञ ही संस्था आपल्या ताब्यात राहिली पाहिजे असे वाटत असते ती कोणाला दुसऱ्याला देता कामा नये असे वाटत असते आणि जो बहुजन समाज आहे त्याच्यावर धार्मिक राज्य करायचे आहे असेही वाटत असते . या परस्परविरोधी अपेक्षांच्यामुळे अनेक विरोधाभास तयार होत असतात. हे विरोधाभास प्रामुख्याने शैव उत्सवांच्या आणि सणांच्या वेळी अधिकच मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत राहतात . शैव धर्म कसाही करून स्वतःच्या ताब्यात आ...
बॉलीवूड आणि अभिनय
- Get link
- X
- Other Apps
बॉलीवूड अभिनय आणि अभिनय हे चलन असणे श्रीधर तिळवे नाईक बॉलीवूड मध्ये अभिनेत्याचे मूल्य कसे ठरतं हा प्रश्न नेहमी विचारला जातो मुळात आपण ठरवलं पाहिजे की नेमक्या कशा पद्धतीने समाज व्यवस्था चिन्ह व्यवस्थेला ऑपरेट करत असते लोकांच्या जे लोकप्रिय असतात तेच चिन्ह पद्धतीने येऊ शकते आणि याची सर्वात मोठी साक्ष आपणाला अभिनयाच्या रूपात भेटते आपण जर का उत्तर आधुनिक आणि आधुनिक कालखंड पाहिले तर तिथे पैसा फार महत्त्वाचा दिसतो आणि हा पैसा पूर्णपणे छापील पद्धतीने उदयाला आलेल्या दिसतो त्या उलट चौथ्या नव्हते मध्ये आपण आलो की आपणाला असे दिसते की ब्रांड हाच सर्वात महत्त्वाचा आहे आणि ब्रांड ची जी मूल्य व्यवस्था आहे किंमत व्यवस्था आहे ती नेहमी त्या ब्रँडला कोणता अभिनेता प्रमोट करतो आणि तो किती लोकप्रिय आहे त्यावर सर्व काही ठरत जाते विशेषता फिल्म मध्ये हे प्रचंड मोठ्या प्रमाणात घडते त्यामुळे त्या त्या मोठ्या अभिनेत्याचा किंवा एकंदरीत सर्व अभिनेत्यांचा अभिनय हे चलन बनत जाते आणि शेवटी अवस्था अशी येते की तो स्वतः अभिनेताच एक नोट बनून जातो पण आश्चर्यकारकरीत्या ही नोट फिक्स नसते म्हणजेच अनेक म्हणजे त्यांचं...
- Get link
- X
- Other Apps
उत्तर आधुनिक साम्राज्यवाद , ब्राह्मणी हिंदुत्व ,मोदींचा अस्त आणि ट्रम्प हे तिसरे का ? श्रीधर तिळवे नाईक काही महिन्यापूर्वी मी जेव्हा मोदींच्या अस्ताविषयी एक लेख लिहिला होता तेव्हा अनेकांना तो अवेळी आणि अस्थायी वाटला होता आणि अलीकडे ज्या घटना घडत आहेत त्यावरून बहुदा मी का हा लेख लिहिला होता समजून यायला हरकत नाही. अर्थातच यामागे इतिहासाचे आकलन आहे . सर्वसाधारणपणे ब्राह्मणी हिंदुत्व एक खेळ नेहमी खेळते तो म्हणजे ते सर्वात प्रथम जर कोणी आपल्यापैकी येत असेल तर त्यालाच मुख्य नेता बनवून राजवट ताब्यात घेतली जाते मौर्य राजवट अशीच सेनापतीला पुढे करून ताब्यात घेतली गेलेली आहे. जेव्हा हे शक्य नसते तेव्हा मग कुठला ना कुठला तरी एक नेता असे आणते जो बहुजनातून आलेला असतो त्याला मग ती प्रस्थापित करते आणि मग हळूहळू त्याचे क्षत्रियकरण घडवून त्याला राम आणि कृष्ण यांच्या तत्त्वज्ञानात बसायला लावून सावकाश आपली राजवट आणते. कधी कधी असे नेतृत्व आणणे त्यांच्या हातात नसते तेव्हा मग अर्थातच धोरण बदलते . मग असे एखादे नेतृत्व निर्माण होते का याची ते वाट बघते आणि मग त्याला क्षत्रियाचा दर्जा देत आत्...
- Get link
- X
- Other Apps
Chat GPT, कविता आणि चौथ्या नवतेच्या पिढ्या श्रीधर तिळवे नाईक कुठलीही नवता आली की तिच्या दशक पद्धतीने पिढ्या तयार होत जातात उदाहरणार्थ तिसरी देशीवादी नव्हता आली तेव्हा तिच्या साठोत्तरी , सत्तरोत्तरी , ऐंशोत्तरी, नव्वोदत्तरी अशा चार पिढ्या तयार झाल्या आणि मग आमची चौथ्या नवतेची पिढी आली . आमच्या पिढीमध्ये सुद्धा प्रामुख्याने देशीवादी लोकांचाच भरणा प्रचंड होता किंबहुना आमच्या पिढीवर त्यांच्या साहित्याचे वर्चस्व राहिले आणि त्यातून भरपूर मोठे गैरसमज निर्माण झाले ज्याचा परिणाम आमच्या नंतर आलेल्या पिढीवर झालेला आहे. अशावेळी मग व्यवस्थित समीक्षा करणे आणि साहजिकच त्या कुठे बरोबर आहेत आणि कुठे त्यांची संगत तुटते हे बघावे लागते आमच्याही पिढीमध्ये मग नंतर चार पिढ्या तरी आता निर्माण झालेले आहेत आणि पाचवीची आलेली आहे ती आता पुन्हा एकदा मध्यंतराची पिढी किंवा शेवटोत्तरी पिढी म्हणतात तशी आहे . या पिढीचा पडसादच आत्ताच्या मराठी साहित्यात नसल्याने मी लिहितो आहे खरे तर हे मला लिहायचे नव्हते मी वाट पाहत होतो की पुढची पिढी यासंदर्भात काही लिखाण करते का शक्यता अशीही आहे की असे लिखाण झालेले आ...