शुद्ध, शूद्र,व्यवहार ,माया आणि वास्तव श्रीधर तिळवे नाईक
भारतीय वर्ण व्यवस्थेची चर्चा करताना शैव संस्कृतीत कायमच गोंधळ माजलेला दिसतो. मी एक सिद्धांत मांडला होता की हा शब्द मूळचा शुद्ध आहे आणि त्या शुद्ध पासून शूद्र हा शब्द नंतर आर्य लोकांनी तयार केला.
सिंधू संस्कृती मध्ये ज्या काही गोष्टी आढळतात त्यात स्नान व्यवस्था ही एक फार मोठी व्यवस्था म्हणून येत राहते त्यातूनच मग संपूर्ण जगाला चकित करणारी सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा येते हे सर्व करण्यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टीने प्रेरणा दिली हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडत नाही पण प्रत्यक्षात तो अस्तित्वात आहे. सर्वसाधारणपणे शिवशक्ती संसार जीव आणि मोक्ष या पाच गोष्टी शैव श्रुतीच्या केंद्रस्थानी असतात.
यातील जो संसार आहे त्याचे दोन प्रकार प्रामुख्याने मांडले जातात
१ शुद्ध संसार
२ अशुद्ध संसार
यातील जो अशुद्ध संसार आहे त्याला माया म्हटले जाते . जो शुद्ध संसार आहे तो थेट शिवाशी जोडला गेलेला असतो . किंबहुना ज्यांना मोक्षाला पोहोचायचे असते त्यांना अशुद्ध संसाराकडून शुद्ध संसाराकडे जावे लागते आणि तिथून मग त्यांना शिवतत्वाकडे जावे लागते म्हणजे शून्याकडे जावे लागते.
संसार या शब्दाला नंतर सृष्टी हा शब्द वापरण्यात यायला लागला आणि नंतर त्यातूनच मग काही घोळ झाले . संसार हा संकल्पना म्हणून थेटपणे शिव आणि शक्ती अशी दोन तत्वे स्वीकारतो त्यामुळे कळत नकळत स्त्रीवादी होत जातो त्या उलट तुम्ही एकदा का सृष्टी ही संकल्पना संसाराला बहाल केली की कळत नकळत पुरुष सत्ताक राजवट राज्य करायला लागते. मी हे खूपदा सांगितलेले आहे की दहाव्या शतकामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलत गेल्या त्यामधली एक मोठी गोष्ट म्हणजे खुद्द शैव तत्त्वज्ञानी लोक सुद्धा संसारा ऐवजी सृष्टी हा शब्द वापरायला लागले आणि इथून एका अर्थाने शंकराचार्यांच्या जगामध्ये प्रवेश झाला. आद्य शंकराचार्य हे माया म्हणजे मिथ्या मानत होते असा एक गैरसमज अत्यंत पद्धतशीरपणे ब्राह्मण धर्माने पसरवला आणि संपूर्ण वेदांताची वाट लावली . कळत नकळत याचा प्रभाव शैव आचार्यांच्या वर सुद्धा पडला विशेषता काश्मिरी शैवागम मध्ये हे खूप प्रभावी होत गेले. आद्य शंकराचार्यांना क्रॉस करण्यासाठी पुन्हा निर्माण झालेला शिवद्वयवाद माया म्हणजे वास्तव अशीच भूमिका घेतो . याबाबतीतली सर्वात महत्त्वाची भूमिका मालिनी विजय तंत्र या ग्रंथामध्ये येते. यामुळे होते असे की जो शुद्ध संसार आहे तो शिवद्वारा निर्माण होतो आणि जो अशुद्ध संसार आहे तो कळत नकळत शक्ती द्वारा निर्माण होतो . त्यामुळेच आपण शक्तीच्या संसारामध्येच आता जगत असतो . कळत नकळत कुठेतरी जग काहीतरी काल्पनिक आहे याचा शिरकाव यामुळे शैव धर्मामध्ये झाला शैव धर्मामध्ये झाला आणि हे फारसे चांगले झाले नाही कारण मुळातच शिवद्वारा आणि शक्ती द्वारा वेगवेगळे संसार निर्माण झालेलेच नाहीत पण हे तत्व स्वीकारल्याने हा द्वयवाद स्वीकारल्याने फार मोठा गोंधळ निर्माण झाला . तो दूर व्हावा म्हणून कळत न कळत त्रिक शास्त्रामध्ये जगाचा कर्ता ,जगाचे कारण आणि जगत अशा तिन्ही गोष्टी वास्तव म्हणून स्वीकारण्यात आल्या. त्याचा फायदा काश्मीरला काही काळ झाला कारण त्यामुळे काश्मीर जमिनीवर राहिला. सोमानंदपासून अभिनव गुप्तापर्यंत सर्वच लोकांनी हा वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला . ज्यांना कोणाला यामध्ये अधिक जाणण्यात इंटरेस्ट असेल त्यांनी उत्पलचा ईश्वरप्रत्य भिज्ञा आणि अभिनव गुप्ताचा विमर्शिनी आणि तंत्रालोक हे दोन ग्रंथ बघावे .
पण महाराष्ट्राप्रमाणे काश्मीरमध्ये सुद्धा बाराव्या शतकामध्ये वैष्णव धर्म शिरला आणि पुन्हा एकदा वैष्णव मायेचा प्रभाव पडायला लागला याची परिणीती जी होणार होती तीच झाली शेवटी काश्मीर मुस्लिम झाला .
सर्वसाधारणपणे आपल्याकडे या संदर्भात नेहमीच साप आणि दोरी यांचा उल्लेख केला जातो आणि दोरीला साप म्हणणे म्हणजे माया असा लोकांचा समज असतो. शैव अशी भूमिका घेत नाहीत ते म्हणतात की प्रत्यक्षामध्ये दोरी ही वास्तव आहे आणि साप हेही वास्तव आहे जी इथे चूक झालेली आहे ती आकलनाची चूक आहे प्रत्यक्ष वास्तवामधली ती चूक नाही. वास्तवामध्ये दोरी पण उपस्थित आहे आणि साप पण उपस्थित आहे आणि म्हणूनच हा आभास होतो हा आभास तुमच्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे प्रत्यक्ष सापाचा किंवा प्रत्यक्ष दोरीचा हा प्रॉब्लेम नाही . आकलन करताना तुम्हाला दोरीच्या जागी साप दिसू शकतो आणि सापाच्या जागी दोरी दिसू शकते आणि हे दोन्ही प्रकारचे आकलन हा तुम्ही घातलेला घोळ आहे वास्तवाशी या घोळाचा संबंध नाही . या पुढचा प्रश्न ताबडतोब निर्माण होतो की हा जो घोळ आहे निर्माण झालेला तो वास्तव आहे की नाही ? तर यावर माझे उत्तर असे की तो चिन्हीक वास्तवाचा प्रॉब्लेम आहे आणि चिन्हिक वास्तव खरे आणि खोटे असू शकते आणि खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे करू शकते . प्रश्न यापुढे जाऊन असा निर्माण होतो की मग आपण हे जे काही खरे खोटे चाललेले असते ते कसे व्हेरिफाय करायचे ते कसे प्रमाणित करायचे . आणि त्यासाठी मग आपणाला एकच गोष्ट करावी लागते ती म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग! प्रत्यक्ष प्रयोगाला प्रमाण मानते म्हणूनच विज्ञान महत्त्वाचे आहे. जिथे ही घटना घडली आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणे की तिथे खरोखर दोरी आहे की साप आहे जर का दहा लोक तिथे गेले आणि त्याने ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं आणि ते वस्तुनिष्ठपणे नोंदवले तर आपणाला तिथे साप आहे की दोरी आहे हे आपणाला स्पष्टपणे कळू शकत सगळा व्यवहार आपल्या या प्रमाणित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे . व्यवहारवादाचे म्हणणेच असे असते की आपण वेरिफाय करू शकतो किंबहुना जो व्हेरिफाय करता येतो तो व्यवहार . आणि प्रोसेस म्हणजे दुसरी तिसरी काहीच गोष्ट नसते तर आपण सतत वेरिफाय करत असतो आणि व्हेरिफिकेशन नंतर जे सत्य आपल्यापुढे येते ते आपण स्वीकारत असतो. त्यामुळेच प्रत्यक्ष प्रमाण अनु प्रत्यक्ष प्रमाण हे सर्वाधिक महत्त्वाचे असते . अति प्रत्यक्षालाच खरा प्रॉब्लेम आहे त्याचे कारण मोक्ष हा अति प्रत्यक्ष पद्धतीने अनुभवायला येतो आणि त्याचे काय करायचे हाच फार मोठा प्रश्न आहे म्हणूनच मोक्षाला विज्ञानाच्या कक्षेत सध्या तरी आणता येतं नाही पण मला असा एक विश्वास आहे की एक ना एक दिवस असं काही शोधले जाईल ज्यामुळे मोक्ष सुद्धा वेरिफिकेशन करण्यासाठी उपलब्ध होईल . सध्या तरी आपण Quantum आणि पोस्ट Post Quantum method मध्येच भरकटत आहोत त्यामुळे अजून संसाराचेच आकलन नेट होत नाहीये नीट होत नाहीये . त्यात भर म्हणून अलीकडे काही लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या साह्याने अविद्या स्पॉन्सर करायला सुरुवात केलेली आहे . त्यामुळे अविद्येचा प्रश्न हा या शतकामध्ये अत्यंत एरणीवर येणे अटळ आहे.
शिवसाठी वेदांताने अनेकदा ब्रह्म हा शब्द सुद्धा वापरलेला आहे . त्याचा एक परिणाम असा झाला की शिव आणि शक्ती ब्रह्म आणि माया हे एक आहेत अशा प्रकारचे सिद्धांतन झालेले आहे.
आपण हे समजून घेतले पाहिजे की मुळातच युरेशियन श्रुतीला काही झाले तरी मोक्ष सामावून घ्यायचा होता . यासंदर्भामध्ये सर्वाधिक मदत त्यांना आद्य शंकराचार्यांच्या कडूनच मिळाली . एका अर्थाने त्यांनी त्यांना एक परिभाषा दिली. वास्तविक गौतम बुद्धाने सुद्धा अशी परिभाषा दिली होती पण तो शेवटी खतीय होता . आद्य शंकराचार्य हे या लोकांच्या दृष्टीने पंडित असल्याने साहजिकच ब्राह्मण म्हणून स्वीकारणे सोपे होते . शिवाय आद्य शंकराचार्य हे स्मृती मान्य करतात अशी ही प्रचार यंत्रणा निर्माण करता येणे सोपे होते. म्हणजे महायानामध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मणांनी घुसून अनेक प्रकारची कर्मकांड घुसवले आणि बौद्ध धर्माचा सत्यानाश केला तसाच काहीसा प्रकार शैव धर्माच्या बाबतीत करता येणे शक्य झाले .
या सगळ्याचा दुष्परिणाम असा झाला की जेव्हा समोर इस्लाम सारखा अत्यंत वास्तववादी धर्म आला तेव्हा त्याचा मुकाबला कसा करायचा हेच भारतीय लोकांना कळले नाही कारण शैव-धर्माशीच नाते तुटल्यामुळे आणि जे नाते होते ते केवळ कर्मकांडात्मक उरल्याने प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला. शेवटी बसवेश्वर यांनी मग पुन्हा एकदा हे नाते प्रस्थापित केले आणि त्यामुळे कर्नाटक वाचला पण त्याचबरोबर हेही खरे की भोसले घराणे जर का कर्नाटकात वाढले नसते तर शिवाजी महाराज कदाचित निर्माण झाले नसते.
आपल्याकडच्या अनेक लोकांना उगाचच निष्कारण वाटत असते की शिवाजी महाराजांचा संबंध हा युरेशियन श्रुतीशी होता प्रत्यक्षामध्ये महाराजांचा काडीचाही संबंध नव्हता . मुळात कर्नाटकात त्या काळामध्ये लिंगायत धर्म व्यवस्थित प्रस्थापित झालेला होता आणि शहाजी महाराजांचा थेट संबंध होता त्यामुळे आपोआपच भोसले घराण्याचा दृष्टिकोनच वास्तववादी होता आणि या दृष्टिकोनाचे संस्कार शिवाजीराजे भोसले यांच्यावर झाले आणि म्हणूनच भारताला शिवाजी महाराजांच्या सारखे एक अद्भुत व्यक्तिमत्व प्राप्त झाले . महाराजांचा व्यवहार सतत वास्तव प्रवीण असण्यामध्ये कळत न कळत त्यांच्या सर्व संस्कारांचा प्रचंड वाटा आहे. म्हणूनच कधीही महाराजांनी वर्णव्यवस्था पाळली नाही .
आता याच्या आधारे मग संसाराकडे कसे पाहायचे ? आपण पाहिले की संसाराचे दोन भाग केले गेले आणि नंतर मग 1000 नंतर संसार दोन केले गेले प्रत्यक्षामध्ये संसार एकच आहे परंतु त्याचे दोन भाग होतात म्हणजे नेमके काय घडते हे आता पाहिजे कारण याचा संबंध थेट सिंधू संस्कृतीचे संस्कृतीशी आहे त्या संस्कृतीमध्ये जे सतत स्नानगृह येथे किंवा शुद्धतेचा आग्रह धरला जात होता त्याच्याशी आहे .
संसारामध्ये दोन तत्वे असतात पहिले शिव आणि दुसरे शक्ती परंतु जेव्हा तुम्ही मोक्षाच्या दिशेने साधक म्हणून प्रवास करायला लागतात तेव्हा तुमची यात्रा ही शुद्ध संसाराकडे व्हायला लागते या संसाराचा मालक शिव असतो तुमचा प्राण असतो तुमचे शरीर नसते . त्या उलट तुमची यात्रा जेव्हा अर्थ आणि काम या दिशेने होते तेव्हा तुमच्या संसाराची मालकीण ही शक्ती असते आणि तुमचे शरीर अधिक महत्त्वाचे असते आणि प्राण हा फक्त शरीराला चालवणारा घटक म्हणून उरतो .
साहजिकच जेव्हा तुम्ही साधना करता किंवा साधनेच्या जागी जातात किंवा दिवसाची सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला आंघोळ करणे अत्यंत आवश्यक असते कारण तुम्ही कळत नकळत स्वप्नांच्या आणि निद्रेच्या जगातून पुन्हा एकदा शुद्ध संसाराच्या दिशेने जाणार असता आणि त्याच वेळेला अशुद्ध संसाराची उपस्थिती तुमचा पाठलाग करणार असतील आणि ती सर्वत्र असते अशा वेळेला जर का रोज स्नान केले तर तुम्ही शुद्ध होता शुद्ध संसारासाठी तयार होता स्वतःच्या शुद्धतेसाठी तयार होता आणि या अशुद्ध संसारामध्ये मग अधिक प्रभावीपणाने काम करू शकता आणि म्हणूनच शैव-धर्मामध्ये शैव श्रुतीमध्ये आंघोळीला स्नानाला स्नानगृहाला प्रचंड महत्व दिले गेले होते म्हणूनच प्रत्येक शिवमंदिर हे नेहमीच नदीकाठी किंवा तलावा काठी बांधले जाते कारण तुम्ही मंदिरात जातात तेव्हा तुम्ही जिथे शिव स्वामी आहे अशा संसारामध्ये प्रवेश करत असता.
साहजिकच जेव्हा या लोकांचा सामना स्थलांतर करून आलेल्या रेशन लोकांशी झालात युरेशियन लोकांशी झाला तेव्हा त्या लोकांच्या मध्ये ही अंघोळीची स्नानाची प्रथाच नव्हती. याचे कारण बर्फामध्ये सर्वसाधारणपणे स्नान करणे अनावश्यक बनत जाते त्यामुळे साधारण आठवड्यातून दोनदा आंघोळ केली तरी चालते परंतु जेव्हा तुम्ही भारतात येतात तेव्हा गोष्टी बदलतात एक तर हिते बर्फ नसतो त्यामुळे नद्या वाहत असतात साहजिकच आंघोळ करणे ही त्या तुलनेमध्ये एक सोपी गोष्ट होऊन बसते पाणी प्रचंड प्रमाणात उपलब्ध असते साहजिकच बर्फ संस्कृतीकडून तुम्ही जलतत्त्वाकडे जलसंस्कृतीकडे येता. युरेशियन लोक जेव्हा आले तेव्हा त्यांच्या हळूहळू लक्षात आले की स्नान ही या देशांमध्ये या प्रदेशांमध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि त्यांनी ती गोष्ट खूप उशीरा स्वीकारली परंतु ते जोपर्यंत स्वीकारत नव्हते तोपर्यंत लोक स्वतःला शुद्ध मानत होते साहजिकच ते भेद करताना शुद्ध आणि अशुद्ध असा भेद करत होते आणि युरेशियन लोकांना अशुद्ध मानत होते अर्थातच हा भेद फार काळ टिकला नाही युरेशियन लोकांनी सुद्धा ही संस्कृती स्वीकारली परंतु ब्राह्मण धर्माला आणि ब्राह्मणाने आंघोळीचे स्त्रोत इतके वाजवले की त्यामागचा मूळ विचारच गायब झाला . सर्वात प्रथम शुद्ध लोकांनी स्वतःला वेगळे ठेवले होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे कारण आंघोळ न करणारे लोक स्नान करणाऱ्या लोकांना प्रॉब्लेमॅटिक वाटायला लागतात अनेकदा जीवजंतू जास्त असण्याची शक्यता असते साहजिकच दूर ठेवण्याकडे कल असतो . त्यामुळेच स्वतःला शुद्ध म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये शै व लोकांनी स्वतःला वेगळे ठेवलेले दिसते आणि याचे उल्लेख कळत नकळमध्ये वेदांच्या मध्ये झालेले अनेक ठिकाणी वापरला गेलेला शब्द सुद्ध असा आहे आणि यातूनच पुढे मग हेटाळणि वजा शूद्र असा शब्द प्रचलित केला गेला .
वास्तविक सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे लोक एकमेका बरोबर कम्फर्टेबल होते नंतरच कळत नकळत काही गोष्टी सत्ता संघर्षात रूपांतरित होत गेल्या आणि मग लढाया सुरू झाल्या.
आणि जेव्हा दहाव्या शतकानंतर वैष्णव धर्माचा प्रभाव वाढवण्यात ब्राह्मण यशस्वी होत गेले कारण यज्ञ संस्कृतीचा त्याग करून त्यांनी पूजा संस्कृती त्यामुळे ते फारसे परके राहिले नाहीत . पण अरबाच्या उंटाची कथा झाली उंट इतका आत शिरला की त्याने ज्याचा तंबू आहे आहे त्याला हाकलून लावले . अर्थातच हे सहन केले जाणे शक्यच नव्हते त्यातूनच मग विविध शैव राजवटी उभ्या राहिल्या सर्वात गाजलेली राजवट ही अर्थातच शिवाजी महाराजांची होती .
थोडक्यात काय शूद्र म्हणजे क्षुद्र नव्हे. त्यामुळे यापुढे सर्व ओबीसी लोकांनी यदाकदाचित ते शूद्रवर्णातून आलेत असे सांगितले जात असेल तर ते स्वीकारू नये आणि यदाकदाचित वर्ण लिहिणे सक्तीचे असेल तर स्वतःचा वर्ण शुद्ध वर्ण असा लिहावा . वर्ण जातव्यवस्थेचा माजोर्डेपणा नष्ट करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment