Chat GPT, कविता आणि चौथ्या नवतेच्या पिढ्या श्रीधर तिळवे नाईक
कुठलीही नवता आली की तिच्या दशक पद्धतीने पिढ्या तयार होत जातात उदाहरणार्थ तिसरी देशीवादी नव्हता आली तेव्हा तिच्या साठोत्तरी , सत्तरोत्तरी , ऐंशोत्तरी, नव्वोदत्तरी अशा चार पिढ्या तयार झाल्या आणि मग आमची चौथ्या नवतेची पिढी आली .
आमच्या पिढीमध्ये सुद्धा प्रामुख्याने देशीवादी लोकांचाच भरणा प्रचंड होता किंबहुना आमच्या पिढीवर त्यांच्या साहित्याचे वर्चस्व राहिले आणि त्यातून भरपूर मोठे गैरसमज निर्माण झाले ज्याचा परिणाम आमच्या नंतर आलेल्या पिढीवर झालेला आहे.
अशावेळी मग व्यवस्थित समीक्षा करणे आणि साहजिकच त्या कुठे बरोबर आहेत आणि कुठे त्यांची संगत तुटते हे बघावे लागते आमच्याही पिढीमध्ये मग नंतर चार पिढ्या तरी आता निर्माण झालेले आहेत आणि पाचवीची आलेली आहे ती आता पुन्हा एकदा मध्यंतराची पिढी किंवा शेवटोत्तरी पिढी म्हणतात तशी आहे . या पिढीचा पडसादच आत्ताच्या मराठी साहित्यात नसल्याने मी लिहितो आहे खरे तर हे मला लिहायचे नव्हते मी वाट पाहत होतो की पुढची पिढी यासंदर्भात काही लिखाण करते का शक्यता अशीही आहे की असे लिखाण झालेले आहे आणि मला ते माहित नाही तर कृपया असे असेल तर मला अज्ञानी समजून क्षमा करावी.
चौथ्या नवतेची पहिली पिढी ही अनालिटिकल असली तरी अनालिटिकल असणे हा तिचा प्रारंभ होता आणि हळूहळू ती डिजिटल मध्ये शिरत गेली किंबहुना तिनेच डिजिटलता शोधली तिला चौथी नवता मानावी की नाही याबद्दल बराच वाद आहे पण हा वाद निरर्थक आहे कारण मुळात प्रारंभच आमच्या पिढीने केला होता आमच्याच पिढीतून बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब झालेले आहेत . हा वाद निर्माण होतो कारण ती अनालिटिकल होती आणि ती जास्त करून उत्तराधुनिक आणि बाल्यावस्थेतील आधी अवस्थेतील चौथ्या नवतेची होती पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मुल सशक्त जमल्यानंतरच कुमार वय चांगले होते आमची पिढी नक्कीच सशक्त होती ही पिढी ऐंशोत्तरी होती अर्थात त्या काळामध्ये फारच कमी लोक जागृत होते हा खरा प्रॉब्लेम आहे . भारतामध्ये तर हा प्रॉब्लेम जास्तच आहे पण ठीक आहे त्या त्या देशाचा म्हणून स्वतःचा काही प्रॉब्लेम असतो . नंतरच्या पिढीमध्ये मात्र अंतर जवळजवळ मिटत गेले आणि अवकाश हा फार मोठा प्रॉब्लेम राहिला नाही जो पूर्वी असायचा अवकाशाचे अंतर हेच एवढे असायचे की पिढ्या पोहोचताना खूप उशीर व्हायचा . आमच्या पिढीतले खूप लोक विरोधात पण गेले म्हणजे अरुण काळे वगैरे पण नंतर या लोकांनी आमच्याशी अड्जस्टमेंट केली .
चौथ्या नवतेची दुसरी पिढी जी आली ती जास्त महत्त्वाची होती याचे कारण या पिढीमध्ये आंतरजाल पूर्णपणे रुजले . एका अर्थाने हिला इंटरनेट पिढी आंतरजालीय पिढी असं म्हणू शकतो
तिसरी पिढी मात्र ही सरळ सरळ फेसबुकी पिढी होती. या पिढीमध्ये सरळ सरळ फेसबुक हेच मुख्य माध्यम बनत गेले आणि जीमेल ची लोकप्रियता थोडीशी कमी झाली एकमेकाचा आशय जीमेलवरून सार्वजनिक करण्याऐवजी लोक फेसबुक वर सार्वजनिक करायला लागेल .
यानंतरची चौथी पिढी ॲप्स पिढी उदयाला आली मुख्य म्हणजे सार्वजनिक पातळीवर स्टेटस सार्वजनिक झाले खरे परंतु तरीही फेसबुकचा प्रभाव कायम राहिला मात्र नंतर अचानक बोलण्याची सोय झाल्याने कळत नकळत मौखिकतेचा प्रभाव पुन्हा पडला कारण आता मौखिकता आणि लिखितता यांच्यातले अंतर संपले तुम्ही जे बोलतात ते स्पष्टपणे आता स्क्रीनवर उमटायला लागले. यामुळे लिखित आणि मौखिक मौखिक असे काही शिल्लक न राहता आता उमटीका पिढी जन्माला आली मला स्वतःला याचा प्रचंड फायदा झालेला आहे कारण नेमका ह्याच वेळेला माझ्या हातांना अपघात झाला आणि माझ्या जवळ जवळ 90% निर्वाण सिरीज मधील कविता आणि नंतरची मोक्ष सिरीज ही या उमटीक पद्धतीने आली त्याचबरोबर डिजिटल चोरीचे अनेक प्रयोग मी झेलले .
आणि आता जी पाचवी पिढी आलेली आहे तिने खरे तर अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत किंबहुना ही पिढी पाचवी नवता घेऊन येऊ शकते याचे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो पहिल्या चार पिढ्यांना फार सार्वजनिक रित्या उपलब्ध नव्हता तो या पिढीला उपलब्ध झालेला आहे एका अर्थाने ही प्रतिचिन्हसृष्टी आहे आणि ही प्रतिचिन्हसृष्टी अनेक गोष्टींमध्ये योगदान देऊ शकते. ही एक नवी क्रांती आहे का ?हा एक फार मोठा प्रश्न आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या अंगाने जी जाणीव असायला हवी ती जाणीव आपणाला मराठी साहित्यामध्ये फारशी येताना दिसत नाही. या पिढीला मी सध्या तरी चॅटजीपीटीपीढी म्हणतो. हिने सर्वाधिक हादरा जर कशाला दिलेला असेल तर तो आहे कविता लिखाण करणे.
या पिढीमध्ये सर्वात मोठी गोष्ट कोणती झाली असेल तर ती म्हणजे इन्फॉर्मेशन थेट आली पूर्वी काय व्हायचं तर आम्ही जेव्हा google ला काही शोधायचं तेव्हा ब्ल्यू मध्ये दहा-पंधरा ऑप्शन यायचे आता या चॅट जी पी टी मध्ये आपणाला थेट उत्तर मिळतात पण हे फक्त माहिती पुरते राहिलेले नाही म्हणजे याने कविताही लिहायला सुरुवात केलेली आहे अर्थात येणाऱ्या ज्या कविता आहेत त्यांचा दर्जा काही फार चांगला नाही परंतु ह्या कविता लिहिल्या जाऊ शकतात आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चाट जीपीटी लिहिणार असेल तर नेमका माणसाने लिहिलेल्या कविता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने लिहिलेल्या कविता यामध्ये काही फरक आहे का हा प्रश्न नंतरच्या काळामध्ये फार मोठा होत जाणार आहे सध्या हे सर्व बाल्यावस्थेत आहे खरे परंतु भविष्यामध्ये ज्याप्रमाणे चौथ्या नवते मध्ये बाल्यावस्थेकडून अधिक वर्जन्ता वाढ होत गेली आणि मग एक विशिष्ट पद्धतीची सर्जनशीलता फार मोठ्या व्यापक आकारामध्ये उपलब्ध होऊ लागली तसे काही या पिढीमध्ये होणार आहे का हा प्रश्न आहे मुख्य म्हणजे एकदा ही सोय आली की जे लोक आता श्रीधर तिळवे नाईक ५०००- १०००० कविता लिहू कसा शकतो असे प्रश्न विचारतात त्यांनी आता भविष्यातल्या पुढच्या कवितां साईट नी २५००० कविता लिहिल्या तरी गप्प बसणे आवश्यक आहे कारण शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि हव्या तेवढ्या कविता लिहू शकतो शिवाय त्याला आमच्या सर्व थीम्स अवेलेबल असणार म्हणजेच आमच्या पिढीला जशा आधीच्या थीम्स अवेलेबल होत्या आणि नंतर आमच्या स्वतःच्या थीम्स आम्ही शोधल्या त्या सर्व त्याला अवेलेबल असणारच आहेत पण वर त्याला त्याच्या पिढीच्या पण थीम्स अवेलेबल होणार त्यामुळे माझ्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्त संख्येने कविता लिहिणार हे उघड आहे हे एक असे version वळण आहे जे फार चमत्कारिक आहे परंतु ते आलेले आहे सध्या छोटे छोटे काम चाललंय आणि कुठलीही नवीन क्रांती ही कलेच्या संदर्भात कवितेत होत असल्यामुळे चॅट जीपीटीची जी क्रांती आहे ती प्रथम कवितेत दाखल झालेली आहे. मात्र मी नेहमीच सांगतो की पहिली पिढी ही नेहमी पाया टाकते म्हणजे आमच्या पिढीने चौथ्या नवतेचा पाया टाकला परंतु पुढच्या पिढ्यांना मग अधिकाधिक जास्त गुंतागुंत अवेलेबल झाली अनेक प्रकारची स्पष्टता आली त्यामुळे त्या कविता मग अधिक चांगल्या रीतीने येण्याच्या शक्यता निर्माण झाल्या मी शक्यताच म्हणतोय कारण खरोखर आमच्या पिढीपेक्षा या लोकांनी कविता चांगल्या लिहिल्या हे या लोकांना अजूनही पुरावे देऊन सिद्ध करता आलेले नाही आमच्या पिढीतल्या वाईट कविता घेऊन तुलना करून काही साध्य होणार नाही कारण अंतिमत: तुलना नेहमी चांगल्या कवितांचीच करावी लागते आणि लोक वाचतात माझ्यासारख्या अत्यंत कमी वाचल्या जाणाऱ्या माणसाला सुद्धा ब्लॉगवर कधी कधी १००० वाचक मिळालेले दिसतात बाकीच्यांना तर कित्येक पटीनं असतील. वाईट कविता घेऊन नाही तर चांगल्या कविता घेऊन आमच्या पिढीतल्या या लोकांना हा मुद्दा सिद्ध करावा लागेल . असो.
तर चॅट जी पी टी एका अर्थाने कविता लिहिणारी पाचव्या नवतेतली पहिली पिढी असू शकते किंवा चौथ्या नवतेची शेवटची पिढी असू शकते हा क्रायसिस तोच आहे ज्या क्रायसिसमधून मी स्वतः गेलेलो आहे . प्रश्न असा आहे की नंतर मग गुणवत्तेचा प्रश्न येणार आहे आणि साहजिकच मग कविता लिहिण्याच्या अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वेगवेगळ्या साईट्स तयार होतील आणि कुठली साईट चांगली कविता लिहिते असा प्रश्न निर्माण होणार आहे . म्हणजेच कितीही गप्पा मारल्या तरी शेवटी गुणवत्ता महत्त्वाची होतेच इथेही कविता अपवाद होणार नाही याचे कारण असे की सध्या ज्या कविता लिहिल्या जात आहेत त्या फार बाळबोध पद्धतीच्या कविता आहेत किंबहुना मला बाळबोध कविता हे टायटल अलीकडच्या काळात अधिक सूटेबल वाटायला लागले त्याचे सर्वात मोठे कारण चॅट जीपीटीचे आगमन हेही आहे . मी बारावीला लिहिलेल्या कविता आणि चॅट जीपीटी ने आत्ता लिहिलेल्या कविता यांच्यामध्ये फारसे दर्जात्मक अंतर नाही असे मला तरी दिसते कदाचित चॅट जीपीटी झपाट्याने सुरुवात करेल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हळूहळू सुधारणा करेल कारण शेवटी तो माणूस नाही सेमिओडीटी आहे . यामध्ये सर्वात मोठा वांदा होणार आहे तो इमोशनल अस्पेक्टचा . आर्टिफिशिअल इंटेलिजन्स केवळ रचनेच्या सहाय्याने भावना निर्माण करू शकते की नाही हे या काळामध्ये सर्वात कृषियल गुंतागुंतीचे ठरणार आहे . प्रियकर लोकांना आता आमच्यासारख्या लोकांच्याकडे यायची गरज नाही एकेकाळी मी कोल्हापुरातल्या अनेक प्रियकरांना कविता लिहून दिलेले आहेत लिहून दिलेल्या आहेत आता असं काही कोणाला करावे लागेल असं वाटत नाही कारण चॅट जी पी टी हाताशी आहे.
थोडक्यात काय चॅट जीपीटीच्या आत्ताच्या कवितांच्या वरून या कवितांचे मूल्यमापन करता येणार नाही कारण मुळातच ते सगळं बाळबोध प्रकरण आहे या एका अर्थाने पाचव्या पिढीच्या बाळबोध कविता आहेत . ही जर खरोखर पाचवी नवता असेल तर तिने आमच्या चौथ्या नवतेपेक्षा वेगळ्या काही कविता लिहून दाखवाव्यात ते जास्त आव्हानात्मक आहे परंतु ते जर का जमून गेले तर मग मी म्हणेन की खरोखर कविता पुढे गेली अन्यथा केवळ मशीन ने लिहिल्या एवढेच नाविन्य उरेल . आज ना उद्या कविता अशा प्रकारच्या संघर्षात सापडणार याची मला माहिती आणि कल्पना असल्यामुळे मला याचे फारसे आश्चर्य वाटत नाही. ही आर्टिफिशियल सृजनशीलता नेमक्या काय लेवलने काम करणार त्यावरूनच तिचे मूल्यमापन केले पाहिजे भविष्यात कदाचित एक काळ असा येईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने निर्माण केलेल्या कवितांचे मूल्यमापन करणे मानवी समीक्षकांना जमणारच नाही आणि त्यासाठी पुन्हा मग या A I चे आर्टिफिशियल समीक्षक आणावे लागतील. अर्थात माझ्यासारख्या लोकांना याचे काही वाटणे शक्य नाही कारण मुळातच अमरत्वाचा पट्टा वगैरे असल्या भानगडी माझ्या आयुष्यात पूर्वीही अस्तित्वात नव्हत्या आणि आत्ताही नाहीत जास्तीत जास्त काय होईल या पाचव्या नव्हतेतल्या अभूतपूर्व कवितांच्या मुळे आमच्या कविता कालबाह्य ठरवल्या जातील माझ्या दृष्टीने हे सुद्धा ओके आहे. खरा प्रॉब्लेम करिअरिस्ट आणि स्वतःला कवितेत "जीजान" फुंकणाऱ्या लोकांचा आणि लेखकांचा आणि कवी लोकांचा असणार. भविष्य खरोखरच उत्कंडावर्धक आहे याबद्दल काही शंका नाही. आय होप मी जिवंत असेपर्यंतच माझ्या या कंडाचे , जाणण्याच्या उत्सुकतेचे उत्तर मिळून जाईल.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment