फ्लेश,मांसल आणि डिजिटल श्रीधर तिळवे नाईक 

अलीकडे फ्लेश या कादंबरीला बुकर प्राइज मिळाल्याने अचानक फ्लेशबद्दल विचारविनिमय सुरू झाला. मला स्वतःला हे खूप चांगले लक्षण वाटते " अ डा हॉ का बाना सुना" या माझ्या कादंबरीमध्ये हा संघर्ष केंद्रस्थानी आहे कारण तो आमच्या पिढीचा संघर्ष आहे. आपण मांसल आहोत आणि आपला कंट्रोल मात्र डिजिटल कडे आहे हा एक फार अजिब गरीब संघर्ष आमच्या पिढीच्या वाट्याला सुरुवातीपासून आला साहजिकच फ्लेश आणि त्याचे अनेक अस्पेक्ट विचार आणि आचाराच्या कक्षेत येणे अटळ होते .


2020 नंतर चौथ्या नवतेच्या कादंबऱ्या हळूहळू का होईना परंतु नोबेल मिळवण्याच्या दिशेने सरकायला लागतील असा अंदाज होता त्याची सुरुवात बहुदा या कादंबरीमुळे झालेली आहे. मराठीत अजूनही किशोर कदम सारख्या रोमांटिक कवींचा बोलवाला आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्यासारख्या लोकांना या कादंबऱ्या सामान्य वाटणे अटळ आहे . पण हा काही आमच्या पिढीचा आवाज नाही हा जुन्या पिढीचा आवाज आहे आणि ती सध्या प्रस्थापित झाल्याने अधिक मोठ्या आवाजात बोलते .


मुळात उत्तर आधुनिकतेमध्ये कंडोम आला आणि संपूर्ण काम या जीवनार्थाचे आयाम बदलले मुख्य म्हणजे उत्पादन नियंत्रण आल्याने अगदी ओशो रजनीश्यांना सुद्धा या विषयावर बोलण्याची वेळ आली. संभोगातून समाधी तेव्हा शक्य होऊ शकते जेव्हा तुम्ही कंडोम वापरता अन्यथा मुले होण्याची भीती मोक्ष मिळू देत नाही हे रजनीश्यांच्या कधीच लक्षात आले नाही त्यामुळे साहजिकच सिद्धांत मांडताना कामवासनेतून निर्माण होणाऱ्या मुलांचा प्रश्न ओशो रजनीश्यांच्या गावी सुद्धा नव्हता . ते असे अनेक विषयाबाबत अर्धवटराव होते . 


माणसाचे शरीर ही काही सोपी गोष्ट नाही परंतु मुळातच भगवान शंकर यांनी आदियोगी म्हणून शरीराचा अतिशय खोलात जाऊन विचार केला आणि कामवासनेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून एका अर्थाने ज्याची दंतकथा बनली त्या कामाचा राखराखोटा केला. पुढे मोक्ष मिळाल्यानंतर शरीराच्या साह्याने मोक्ष मिळवण्याची अनेक तंत्रे विकसित केली जी शैव परंपरेमध्ये जोग म्हणून ओळखली जात होती आणि अनुयायांना जोगिया, जोगी किंवा जोगिनी मराठी भाषेत जोगतीन असे म्हटले जात असे जी कालांतराने योग म्हणून मान्यता पावली . त्यातूनच आत्ताचे योग तंत्र डेव्हलप होत गेले आणि आज मुख्य शरीर तंत्र म्हणून योगच प्रस्थापित झालेला आहे.. याचा थेट फायदा सर्वाधिक शैव धर्माला झाला आणि साहजिकच त्यामधूनच मग योगावर अनेक पुस्तके आली मी स्वतः यावर 365 डेज विथ युवर बॉडी नावाचे पुस्तक लिहिले . योग आणि योगासन यांच्यात फरक आहे हे खुद्द अयंगार यांना पुढे येऊन सांगावे लागले .


कामावरचा संयम हा मोक्षाची साधना करणाऱ्या लोकांना साधावाच लागतो मात्र फरक ब्रह्मचर्याबाबत आहे भगवान शंकर मोक्ष प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य आवश्यक मानत नाहीत त्यामुळेच त्यांनी नंतर कुमार स्कंद आणि विनायक या दोन अपत्यांना जन्म दिलेला दिसतो. त्या उलट नंतर आलेले भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध हे मात्र मोक्षासाठी ब्रह्मचर्य आवश्यक मानतात आणि त्याचा प्रचंड प्रभाव पुढे युरेशियन श्रुतीवर झालेला दिसतो .


साहजिकच फ्लेश बद्दल अजून सुद्धा आपण अत्यंत प्रामाणिक असत नाही आपली दैनंदिन व्यवहारात गोष्ट करताना अगदी म्हणजे साधा कंडोम मागताना सुद्धा चाल ढकलच चाललेली असते जिच्यामुळे हिंदी फिल्म वेब सिरीज मध्ये काही सीन पण विनोदाच्या अंगाने आले . वास्तविक आपले अस्तित्व सिद्ध करणारी एकमेव गोष्ट आपले शरीर असते आणि आपल्या संस्कृती मधला सर्वात मोठा विरोधाभास आपण शरीराबाबत सर्वाधिक जास्तीत जास्त अडाणी असतो . याला अर्थातच जबाबदार धर्म आहे धर्म अत्यंत जाणीवपूर्वक शरीर नाकारतो याचे कारण त्याला मनात वास्तव नाकारायचे असते ही पृथ्वी नाकारायची असते आणि कुठलीतरी परलोक संस्कृती स्वर्ग आणि नरक यांच्या आधारे चंद्रलोक आणि सूर्य लोक वगैरे काल्पनिक लोकांच्या आधारे निर्माण करायचे असते साहजिकच मग वास्तव आणि शरीर नाकारणे गरजेचे बनते कारण शरीरिक हे वास्तवाची सुरुवात असते . साहजिकच मग माणसाचा पहिला जन्म हाच मला पापातून व्हायला लागतो . काही डुप्लिकेट लोक याला ओरिजिनल सीन म्हणतात 


शारीरिक तपशिलाबाबत सुद्धा त्यामुळे आपल्याकडे प्रचंड गोंधळ उडालेला दिसतो किंबहुना असे कोणी काही लिहिले की त्याकडे दुर्लक्ष करावे असा एक मार्गच आपल्या संस्कृतीने काढलेला दिसतो आणि साहित्यिक याला अपवाद नाहीत आज सुद्धा शारीरिक तपशिलांच्या कवितेबद्दल या अंगाने कधीही चर्चा होत नाही याचे कारण आपली शरीराबाबत असलेली अडाणी भूमिका आहे . कामवासनेबाबत आपण इतके दुटप्पी झालेलो आहोत की वैयक्तिक आयुष्यामध्ये याबाबतीत कसलीही नैतिक चाड आपल्याकडे राहिलेली नाही आपण फक्त नैतिक गप्पा मारतो पण प्रत्यक्षामध्ये आपण अफाट कामवासनेने भरलेलो आहोत अपवाद फक्त कदाचित शैवा असतील त्याचे कारण असे की तिथे मुळात ब्रह्मचर्य नसल्यामुळे आणि काही शक्ती तंत्रातले लोक संभोगातून समाधी मिळू शकते संभोगातून मोक्ष मिळू शकते शकतो असे मानणारे असल्यामुळे साहजिकच त्यांच्या अफाट कामलिला या तुमच्या संपूर्ण प्रस्थापित चौकटीला कायमच आव्हान देत वर्ण जाती व्यवस्थेला सुद्धा आव्हान देत राहतात कारण बहुतेक सर्व शाक्त तंत्रामध्ये वर्ण आणि जातीचे बंधन नाही साहजिकच संपूर्ण विवाह संस्था तंत्रामध्ये व तंत्रामुळे धोक्यात येत जाते त्यामुळे तंत्राविषयी विषय बोलताना अनेक प्रकारचे सोवळे निर्माण होते . याबाबतीतल्या अनेक गोष्टींना मी वैयक्तिक पातळीवर खूपदा तोंड दिले आहे . समाज तुमच्यावर कायमच नाराज असल्यासारखा वावरत राहतो . त्यामुळे समाजाची संपूर्ण नाराजगी कोण स्वीकारणार ? त्यापेक्षा आपले मस्तपैकी दुटप्पी धोरण राबवावे हे बरे ही सर्वसाधारणपणे भारतीय माणसाची वैचारिक लैंगिक संरचना आहे . तो त्याचा टिपिकल दुटप्पी कल आहे 


पण ही गोष्ट टाळून नवीन पिढी जात नाहीये आणि खरा प्रॉब्लेम आता त्यामुळेच आलेला आहे कारण भारतात पूर्णपणे शरीर स्वीकारणारे एक नवीन पिढी 2020 मध्ये उदयाला आलेली आहे . माझ्या कादंबरीला 2020 पर्यंत कुत्रे सुद्धा विचारत नव्हते आणि त्यानंतर अचानक ती धाड दिशी खपून गेली याला कारण मुळात या नवीन पिढीचे मोकळे वावरणे आहे आपल्याला ते स्वीकारावे लागेल . अर्थातच जे धार्मिक लोक आहेत ते ह्या पिढीला प्रचंड मागे घेऊ इच्छितात खेचू इच्छितात परंतु स्पष्ट सांगायचे तर यामध्ये अपयश येणे अटळ आहे कारण हे लोक सरळ सरळ ग्लोबल ऑडियन्स मध्ये मोडतात तुम्ही कुठल्या कुठल्या नेटवर्क सिस्टीम वरती कंट्रोल आणणार? त्यापेक्षा यांना योग्य ती नैतिक दिशा कशी देता येईल ते पाहिले पाहिजे पण ते पाहण्याऐवजी आपल्याकडे काही भलत्याच गोष्टींची उथळ चर्चा होते .


असो पण यानिमित्ताने नवीन पिढीचे फ्लेश तुमच्या जुनाट संस्कृतीवर आदळले हे एका अर्थाने बरेच आहे. सुधारला तर ठीकच आहे अन्यथा नवीन पिढी काही तुमच्यासाठी थांबलेली नाही तुमच्यासाठी थांबणार नाही कारण काल कधीच कुणासाठी थांबत नसतो तुमच्यासाठीही तो थांबणार नाही .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय