टिपू सुलतान , राजकीय इतिहास आणि राजकारण श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये सध्या दोन गोष्टी खूप प्रभावी आहेत पहिली अनुभव प्रणाली त्यामधील राजकीय विचार प्रणाली म्हणून धर्म खूप लोकप्रिय आहे आणि त्याच्या आधारे धार्मिक राजवटही सत्तेवर आलेली आहे ही नव्या पद्धतीची राजवट असली तरी तिचा गाभा धर्म आहे साहजिकच जेव्हा धार्मिक बाबतीत प्रश्न उपस्थित होतो तेव्हा तो राजकीय प्रश्न असतो . अनेकदा या प्रस्थापित सत्तेला डिवचण्यासाठी म्हणून सेक्युलर लोक व्यवस्थित प्रयत्न करत असतात. त्यामुळे मीडियामध्ये मायलेज मिळते .
प्रश्न असा असतो की हा जो धर्माविषयी त्याच्याशी जोडल्या गेलेल्या धर्म कारणाविषयी प्रश्न निर्माण केला जातो तो का निर्माण केला जातो?
याचे स्पष्ट आणि स्वच्छ कारण असे की धर्म ही राजकीय प्रणाली असल्याने आणि तिच्या जीवावर निवडणुका जिंकल्यामुळे साहजिकच धर्माच्या बाजूने उतरणे किंवा धर्माच्या विरोधात उतरणे अशा गोष्टी सातत्याने घडायला लागतात . कुठला असेल सेक्युलर लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर त्यांना हिंदू हे बहुजन असल्यामुळे थेट हिंदूंच्या विरोधात बोलता येत नाही म्हणून मग ते इतिहासाच्या आधारे अशी पिल्ले सोडत असतात .
हिंदुत्ववाद ही प्रामुख्याने धार्मिक प्रणाली मानायची की मौक्षिक प्रणाली मानायची हा खरा वाद आहे परंतु तो तसा उभा राहू दिला जात नाही याचे कारण असे की मोक्षाच्या अंगाने राजवट आणायला गेली तर नैतिकतेचे द्वादशशिलतेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आचरण करावे लागते आणि राजकीय लोकांना अशा प्रकारचे नैतिक आचरण नको असते . सत्य अहिंसा अचौर्य ब्रह्मचर्य किंवा सुकाम अपरिग्रह किंवा सुपरी ग्रह यासारख्या गोष्टींच्या वर चर्चा करायच्या असतील तर तुम्हाला त्या गोष्टींचे आचरण करावे लागते आणि हे आचरण करणे राजकीय लोकांना कधीही परवडणारे नसते त्यामुळे धर्म हा एक अर्थाने मोक्ष टाळण्याचा शॉर्टकट म्हणून उदयाला येत असतो . म्हणजे असे की राजकीय लोकांनी कितीही खोटे बोलले तरी चालेल पण जनतेने मात्र कायद्यानुसार सत्य बोलले पाहिजे किंवा राजकीय लोकांनी कितीही चौर्य व परिग्रह केले तरी चालतं परंतु जनतेने मात्र चोरी करता कामा नये अपरिग्रह पाळले पाहिजे त्यातून मग एक विरोधाभास तयार होत जातो तो म्हणजे राजकीय लोक ही एक वेगळी जमात बनत जाते आणि यामध्ये सर्वच प्रकारचे लोक सामील असतात अगदी व्यापारी सुद्धा यामध्ये सामील होत जातात आणि त्यांचे असे राजकीय सत्तेला सामील होत जाणे हे राजकीय असते . धर्म हा असा नैतिकतेचे राजकारण व्यवस्थितपणे मॅनिप्युलेट करत राहतो.
राजकीय सत्तेचे आकर्षण हा एक फार मोठा सांस्कृतिक घोळ आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी असते की निर्णय घेण्याची सर्व सत्ता आपण राजकीय लोकांच्या ताब्यात दिल्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला आहे आणि याला प्रामुख्याने समाजवाद जबाबदार आहे कारण समाजवादाने सर्व गोष्टी समाजवादाच्या नावाखाली सरकारच्या आणि कायद्याच्या ताब्यात देणे सुरू केले आणि लोकांचे स्वातंत्र्य पूर्णपणे कापत नेले . त्यामुळेच कायदे किती करायचे याच्या मर्यादा आता ठरवणे आवश्यक बनत चाललेले आहे. प्राचीन काळामध्ये या मर्यादा खूप कमी होत्या पण राजकीय सत्ता पुरोगामी लोकांनी इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण केली की सर्व गोष्टी राजकीय होत गेल्या इतक्या की ईस्ट इंडियन कंपनीने निर्माण केलेले साम्राज्य बिनधास्तपणे त्या त्या देशांमध्ये तिथल्या राजकीय लोकांनी आपल्या ताब्यात घेतले जणू काय त्यांच्या बाप जाद्यांचा हक्क आहे हा हक्क यांना कोणी दिला हा प्रश्न सुद्धा कोणी विचारला नाही इतके याबाबतीत सर्व आंधळे झालेले होते .याचा एक दुष्परिणाम असा होतो की संपूर्ण आयुष्याचे राजकीय करण होत जाते आणि सत्ता कारण हे कळत नकळत समाजाच्या केंद्रस्थानी वावरत राहते आणि इतिहास हा त्याला अपवाद उरत नाही साहजिकच मग राजकीय इतिहास म्हणजेच इतिहास असा प्रकारचा भ्रम तयार केला जातो पसरवला जातो.
वास्तविक खरोखर राजकीय इतिहासाचा आपणाला कितपत फायदा आहे असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण उपयुक्तता हा जर का आपण निकष लावला तर राजकीय इतिहास अक्षरशः बिनकामाचा आहे त्यापेक्षा विज्ञानाचा इतिहास तंत्रज्ञानाचा इतिहास संकल्पनांचा इतिहास चिन्ह विज्ञानाचा इतिहास चिन्ह तंत्रज्ञानाचा इतिहास हे इतिहास प्रामुख्याने शिकवले जायला पाहिजे परंतु हे इतिहास आपण शिकवत नाही याचे कारण आपणाला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेच अजून कळत नाही जास्तीत जास्त मोक्षाचा इतिहास यामध्ये टाकता येईल परंतु बाकी इतिहास विशेषत: राजकीय इतिहास खरोखर काही गरजेचा आहे का हा एक प्रश्न आहे आपण कारण नसताना राज्यसत्ताकेंद्रित उद्योग आणि विचार विमर्श जास्त करत बसतो आणि आपला सगळा सिल्याबस हा राज्य ठरवत असल्याने हे लोक आपोआपच सिल्याबस मध्ये जेव्हा जेव्हा इतिहासाचा प्रश्न येतो तेव्हा राज्य केंद्रस्थानी आणतात याचा एक दुष्परिणाम असा होतो की लहानपणापासूनच आपण राज्य म्हणजे काहीतरी फार मोठी गोष्ट आहे असे समजायला लागतो आणि सर्वच गोष्टी आपल्या संसारातच संस्कारातच राजकीय होत जातात आणि आपल्या वर्तमान पत्रांच्या हेडलाईन्स ह्या नेहमीच्या राजकीय गोष्टींनी भारावल्या जातात प्रत्यक्षामध्ये जितके राज्याचे वर्चस्व नष्ट करता येईल तितके करणे आधुनिकतेच्या प्रसारासाठी आवश्यक होते पण आधुनिकतेने हे कधीही केले नाही आणि राजकारणी लोकांनी मुळात कायमच आधुनिकता राजकीय आधुनिकता बनवली नाही त्यानंतर किमान उत्तर आधुनिकता या संदर्भात काही करेल असे वाटले होते परंतु उत्तर आधुनिकतेने काहीही केले नाही उलट राजकारणाबरोबर संस्कृती महत्वाची मानत सांस्कृतिक राष्ट्रवादाला आणि धार्मिक राष्ट्रवादाला उत्तेजन दिले याचा एक दुष्परिणाम असा झाला की आता सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि धार्मिक राष्ट्रवाद या दोनच गोष्टी जिवंत असल्यासारख्या राजकारणामध्ये प्रचलित झालेल्या आहेत आणि त्यातूनच मग टिपू सुलतान काय शिवाजी महाराज काय किंवा औरंगजेब काय किंवा अकबर काय असे जुने इतिहासदत्त मुद्दे आपण पुन्हा पुन्हा पुढे आणतो राम मंदिराचा प्रश्न त्यातूनच आला आणि आपण जो इस्लामला आता सध्या नको तितकाच अवकाश दिला तो सुद्धा त्यातूनच आला. आम्हाला इस्लामच्या इतिहासाशी काय देणे घेणे असा प्रश्न सुद्धा आपण विचारत नाही इस्लाम हा काही या देशाचा इतिहास नाहीये या देशात इस्लामचा इतिहास इस्लामच्या आक्रमणापासून सुरू होतो ही वस्तुस्थिती परंतु ती तशी पाहिली जात नाही आणि यासाठी आर्ग्युमेंट केली जाते ती अत्यंत भंपक असते म्हणजे असे की मुस्लिम बादशहाने संपत्ती निर्माण केली आणि ती ते सोबत घेऊन गेले नाहीत अगदी भल्या भल्या मार्क्सवादी लेखकांच्या अकला याबाबतीत गहाण पडलेल्या असतात यांना कोणीतरी हे सांगितले पाहिजे की आपल्या या बादशहाने हजच्या यात्रेसाठी किंवा मक्के मध्ये किंवा तत्सम करण्यासाठी किती देणग्या पाठवल्या होत्या या विरोधात पहिले बंड सम्राट अकबर यांनी केले म्हणूनच सम्राट अकबरच्या विरोधात व्यवस्थितपणे काड्या टाकून त्याच्या मुलाला उभे करण्यात आले पुन्हा मग औरंगजेबाने सर्वच्या सर्व जुन्या इस्लामिक फॉर्मलिटीचा प्रकार अस्तित्वात आणला तेव्हा पैसे पाठवले जात होते आणि त्या काळामध्ये जितके शक्य होते तेवढे पाठवले जात होते . दुसरी गोष्ट मुळातच त्या काळामध्ये आधुनिकता नव्हती इंग्रजांच्या काळामध्ये आधुनिकता आली त्यामुळे सर्वच्या सर्व पैसा इंग्लंडला पाठवता आला इंग्लंडने जो शोषण केले ते महाव्यापक झाले याचे सर्वात मोठे कारण पैसा निर्यात करता येत होता धनसंपत्ती निर्यात करता येत होती. कापसासारखा कच्चामाल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात झाला याचे कारण हेच होते .
अशा प्रकारचे अर्थकारण करायला मुळातच तुमच्याकडे भव्य मोठे अर्थकारण करणारे इन्फ्रास्ट्रक्चर असायला लागते ते युरोपियन लोकांच्या वसाहतवादाच्या काळामध्ये जेवढे निर्माण होते त्याचा वापर व्यवस्थित केला गेला तेव्हा उगाचच काही सवलत देण्याचे कारण नाही . शिवाय मुळातच मुस्लिम राज्यकर्त्यांचा अजेंडा असा होता की भारतामध्ये इस्लामचा प्रचार करण्यासाठी म्हणून या राजवटी आहेत अगदी बिरबला सारखा माणूस सुद्धा ज्याला शहाणा म्हटले जाते आयुष्याच्या शेवटी मुस्लिम झाला होता. आणि अकबराच्या धर्मामार्फतच घडले होते . तेव्हा अकबर काही एकदम इस्लामच्या विरोधात होता वगैरे मानायचे कारण नाही उलट इस्लामला नवीन आकार देण्याचा प्रयत्न त्याने केला पण तो इथल्या पारंपारिक इस्लाम धर्माने स्वीकारला नाही उलट त्यालाच तुम्ही काही मोहम्मद पैगंबर नाही असे ऐकवण्यात आले .
तेव्हा सगळा प्रकार बघताना टिपू सुलताना कडे सुद्धा याच अंगाने बघायला पाहिजे टिपू सर्वात प्रथम राजा होता मग तो मुस्लिम होता आणि या दोन्ही गोष्टींचा विरोधाभास त्याच्यामध्ये आढळत राहतो एक राजा म्हणून त्याला जे काम करायचे असते ते तो करत राहतो आणि त्यासाठी मग तो अधून मधून हिंदूंना सांभाळून घेत असतो कारण सर्वच मुस्लिम राजवटींची सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे त्यांची सर्व प्रजा ही हिंदू होती त्यामुळे साहजिकच प्रजेला सांभाळण्यासाठी म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात तसे टिपूने केले त्यावरून तो धर्म निरपेक्ष होता वगैरे असं काही म्हणायचं कारण नाही टिपू हा धर्म वेडाच होता फक्त आपले राजकारण त्यामुळे धोक्यात येणार नाही यासाठी लागणारा विवेक त्याच्याकडे होता अशाच प्रकारचा विवेक आपणाला तत्कालीन पेशव्यांच्याकडे सुद्धा दिसतो(दुसऱ्या बाजीरावाचा काळामध्ये तो ढासळला आणि पेशवाई फाफलत गेली ) आणि म्हणूनच इंग्रजांच्या आणि इतर युरोपियन लोकांच्या बरोबर युती वगैरे हे लोक करताना दिसतात. यामध्ये कुठल्याच राज्यकर्त्याला कसलीही लाज वाटलेली दिसत नाही याचे कारण असे की त्या काळामध्ये राज्य ही जी संकल्पना होती ती वाचवणे सर्वात राज्य वाचवणे सर्वात महत्त्वाचे मानत होती आणि हे लोक सुद्धा स्वतःचे राज्य वाचवणे सर्वात महत्त्वाचे मानत होते आणि ते करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आपले राजकारण खेळलेले आहे . अर्थात आत्ताचे राज्यकर्ते काही वेगळे नाहीत ते सुद्धा तेच करतात फक्त टिपू हा निमित्त मात्र होत जातो . ज्यांना विशेषतः मुस्लिमांना राजकारण करायचे असले की टिपू लागतो कारण टिपू हा आपला आदर्श आहे औरंगजेब हा आपला आदर्श आहे असे खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितले होते तेव्हा काय आदर्श आहेत याबद्दल गोंधळ करून घेण्याचे काहीही कारण नाही इस्लामला या देशांमध्ये पाय पसरायचा आहे इस्लामिक स्टेट आणायचे आहे हीच वस्तुस्थिती आणि सर्व राजकारण मुस्लिम लोकांचे हे याच दिशेने जाणार आहे त्याबद्दल तुम्ही काहीही करा कितीही आपटा पण हे असेच होणार आहे हिंदूंनी कन्फ्युज होऊ नये ज्यांना कन्फ्युज व्हायचंय त्यांना होऊ दे 22 व्या शतकामध्ये सर्वाधिक मूर्ख लोक म्हणून त्यांची नोंद होणार आहे फक्त हिंदू हिंदू म्हणून वाचले तर कदाचित अन्यथा ही ही नोंद होणार नाही उलट इस्लामची राजवट वाढावी म्हणून ह्या काफीर लोकांनी कशी मदत केली याबद्दल यांचे कौतुक केले जाईल . आणि यांची जी कोणी पनतवंडे खापरपणतवंडे त्यावेळी असतील त्यांना कदाचित मुस्लिम केले गेल्या नंतर सन्मानाच्या पोस्ट दिल्या जातील की तुमच्या सेक्युलर पूर्वजांनी आमच्यासाठी खूप मोठी सेवा केली म्हणून तुम्हाला आम्ही हा मानसन्मान देत आहोत तुमच्यासारख्या लोकांच्या मुळेच इस्लाम वाढला वगैरे वगैरे कदाचित नोंदी होतील. अनेकांना हे अशक्य वाटते पण ज्यांना कुणा ला शंका असेल त्यांनी एकदा लेबनॉनचा इतिहास पाहावा. 1940 पर्यंत ख्रिश्चन असणारा हा देश बघता बघता मुस्लिम बहुसंख्य बनला आणि आता इस्लामिक स्टेट तिथे येऊ घातले आहे. किंबहुना काही प्रमाणात आलेले आहे . केवळ मुस्लिम स्थलांतराच्या जीवावर हा बदल घडवून एक संपूर्ण राष्ट्र ताब्यात घेतले गेले पण आपल्याकडचे सेक्युलर लोक हा इतिहास सांगत नाहीत . तिथे अजूनही 40% ख्रिश्चन आहेत म्हणून इस्लामिक स्टेट आलेले नाही पण माझा अंदाज चुकला नाही तर येतंय वीस वर्षात लेबनॉन इस्लामी स्टेट झालेला असेल आणि एकदा का इस्लामिक स्टेट झाला तर आपल्यासाठी ही खतऱ्याची घंटी आहे हे लक्षात ठेवा . पहिली घंटी मी वाजवली होती ती म्हणजे तुर्कस्तानात इस्लामिक राजवट ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी इस्लामच्या विरोधात असेल .तशी ती आलेली आहे दुसरी घंटी लेबनॉन आहे . अनेक मार्क्सवादी समाजवादी लोक मला सांगतात की भविष्य पाहिले पाहिजे एकविसाव्या शतकात आपण आलो पाहिजे मी त्यांना सांगतो की तुम्ही पण 21व्या शतकात या आणि तुर्कस्तानात काय झाले लेबनॉन मध्ये काय होत आहे ते पहा . पाकिस्तान आणि बांगलादेश इस्लामिक स्टेट कसे झाले ते पहा तुम्ही कुठे वर्तमान पाहता आहात तुम्ही मूर्खासारखे एकोणीसाव्या शतकात वावरत आहात.
टिपू सुलतान याने आपले धर्मवेड कधीच स्वतःच्या राज्यात दाखवलेले फारसे दिसत नाही त्याचा साधारणपणे राजकारणाचा गाभा असा दिसतो की स्वतःचे हिंदू प्रजा असलेले राज्य काही प्रमाणात हिंदूंना धरत सांभाळायचे पण स्वतःच्या राज्याबाहेरची राज्य आहेत तिथे मात्रे आपले धर्मवेड व्यवस्थित राबवायचे . पण हे काही त्याचे स्वभाव रूप नाही याचे कारण असे की ही त्याची मजबूरी आहे कारण त्याच्या राज्यामध्ये हिंदू प्रचंड संख्येत होते आणि प्रजेला नाराज करून कुठलाच राजा यशस्वी होत नाही एवढे राजकारण प्रत्येकाला कळते त्यामुळे आपल्या राज्यातल्या हिंदू मंदिरांना किंवा हिंदू मठांना त्याने देणग्या दिल्या त्यात आश्चर्य नाही. स्वतःच्या प्रजेसाठी त्याने ही गोष्ट केली आहे आणि ही इस्लामला धरून आहे . तो औरंगजेब इतका फानाटिक नव्हता त्यामुळे जिझिया वगैरे काही फार आला नाही .
मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की मुळात याबाबतीत विश्लेषण असे पाहिजे होते की हिंदू प्रचंड संख्येने बहुमतात असूनसुद्धा त्यांनी मुस्लिम राजवटी स्वीकारल्या कशा ? इथले क्षत्रीय नेमके मुस्लिमांची सेवा का करत होते ? पण हे मुळात बेसिक प्रश्न आहेत कारण या मुस्लिमांच्या सेवेमध्ये या देशाचे ब्राह्मण सुद्धा होते ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणवणारे लोक ज्यांच्यावर बाकी सर्व समाज अवलंबून होता हे नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून संपूर्ण प्रजा का मुस्लिम राजवटींच्या पायाशी बांधत होती? हा खरा प्रश्न आहे आणि हा खरा प्रश्न ब्राह्मण क्षत्रिय लोक कधीही उपस्थित करत नाहीत. टिपू सुलताना कडे हिंदू सरदार का आणि काय काम करत होते ते त्याच्या राज्याचे रक्षण का करत होते सर्वात वाईट गोष्ट म्हणजे धर्मांतराच्या जेव्हा गोष्टी घडत होत्या तेव्हा हे काय तमाशा बघत होते काय ? की हेही त्या काळातले सेक्युलर होते ? की मुळातच ब्राह्मण लोकांना आणि क्षत्रिय लोकांना वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी जनतेची काही पडलीच नव्हती ? वैष्णव धर्मामध्ये फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय पुण्यवान आहेत म्हणून फक्त पुण्य योनीचेच रक्षण करणे आणि इतरांना पापी असल्याने पापयोनीत त्यांनी जन्म घेतल्यामुळे बिनधास्तपणे मुस्लिम धर्मात ढकलणे ही या लोकांची पॉलिसी होती का ? प्रश्न विचारायचे तर तुम्हाला सुद्धा विचारता येतात त्यामुळे राजकारण खेळताना जरा जपूनच ! हे तुमचे नशीब आहे की बहुजन समाज या काळाबद्दल नीट जागा नाही अन्यथा अनेक प्रश्न तुमच्या संदर्भात विचारता येतात एवढे लक्षात ठेवा . वैश्य लोकांना समुद्र पर्यटन बंदी करून अरब व्यापाऱ्यांना मदत करणारे कोण होते ? तुम्ही मुळात अत्यंत विकृत सिद्धांत मांडून सत्यानाश केला एवढे लक्षात ठेवा . वाईट या गोष्टीचे वाटते की तुम्हाला या गोष्टीची लाज वाटत नाही. अजून सुद्धा तुमचा कधी कधी वर्ण अहंकार वर येतो . हा देश वैष्णव झाला म्हणजे काय झाला याची अजूनही अनेकांना कल्पनाच येत नाही. अजूनही इसवी सन १००० ते २०२६ या कालखंडामध्ये ब्राह्मण क्षत्रिय एकत्र पुण्यभूमी आणि पुण्य योनी आणि वैश्य शूद्र अति शूद्र आदिवासी पापयोनी हे समीकरण व्यवस्थित चाललेले असते . आणि हे समीकरण वैष्णव आहे कारण ते गीतेमधून आलेले आहे. याच समीकरणातून महाराष्ट्रांमध्ये ब्राह्मण राज्यकर्ते आणि क्षत्रिय राज्यकर्ते एकत्र आलेले आहेत त्यांची युती झालेली आहे. गरज पडेल तेव्हा एकत्र यावे आणि गरज संपली की सत्तेसाठी एकमेकांशी भांडावे हा खेळ अक्षरशः वैदिक काळापासून सुरू आहे . जेव्हा जेव्हा बहुजन समाज सत्तेवर येतो तेव्हा तेव्हा हे लोक बरोबर कार्यक्रम करण्यासाठी एकत्र येतात . एकदा बहुजन समाजाचा राज्यकर्ता बरोबर क्षत्रिय म्हणून सामील झाला किंवा हुसकावला गेला किंवा मारला की मग बरोबर पुन्हा या लोकांच्या मध्ये आपापसात सत्तेसाठी भांडणे सुरू होतात ब्राह्मण श्रेष्ठ की क्षत्रिय श्रेष्ठ हा नेहमीचा वाद सुरू होतो . फक्त या वेळेला झाले असे आहे की प्रथम मोदी यांना पुढे आणण्यात आले त्यांच्या साह्याने संपूर्ण बहुजन समाज स्वतःकडे ओढला आणि आता आपली सत्ता आली आहे असे वाटल्यानंतर मोदींना हटवावे का याची चाचपणी सुरू झालेली आहे . त्यासाठी मग वेगवेगळे मुद्दे आणता येतात का हे पाहिले जात आहे . वासना कांडाच्या फायली असो किंवा यूजीसी एक्ट असो सर्व मुद्दे चाचपले जात आहेत . मोदी बाहुले बनलेले नाहीत हेच खरे तर चुकलेले गणित आहे . याबाबतीत काहीशी त्यांची अवस्था गांधींच्या सारखी आहे. गांधींच्या आधारे संपूर्ण बहुजन समाज आपल्या ताब्यात आणणे असा एक मोठा कार्यक्रम काँग्रेसने राबवला होता . आणि मग काँग्रेसच्या कडे बहुजन समाज आल्यानंतर आणि काँग्रेसच राष्ट्रांमध्ये संपूर्ण सत्तेवर येणार हे स्पष्ट झाल्यानंतर गांधींची हत्या झालेली आहे. एक प्रकारची परस्पर पूरकता आणि आकलनाचे व्यवस्थित परस्परक खेळ यासंदर्भात ऍक्टिव्ह झाले .
तेव्हा टिपू सुलतानाचा मुद्दा का आणला जातो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे सरळ सरळ राजकारण आहे आणि ते राजकीय इतिहासामुळे आलेले आहे . हा राजकीय इतिहास धार्मिक राजकीय इतिहास असल्यामुळे धर्माचा मुद्दा येतो याचे कारण स्पष्ट आहे टिपू सुलतान हा पुरोगामी लोकांना मुस्लिमांच्या बाजूने आपण आहोत असे दाखवण्यासाठी आवश्यक वाटतो तर हिंदुत्ववादी लोकांना टिपू सुलतान हा कसा हिंदूंच्या विरोधी होता हे दाखवत आम्ही फक्त हिंदूंचे संरक्षण करते आहोत असे दाखवायचे असते या दोन्ही बाजूने राजकारणच आहे . आणि मी म्हटल्याप्रमाणे मुद्दा कोणी विचारतच नाही तो म्हणजे हिंदू बहुसंख्य असून सुद्धा त्यांनी मुस्लिम राजवटींना का विरोध केला नाही का बंड केले नाही गुलामगिरीला हे लोक असे शरण का गेले? मुख्य म्हणजे बहुजन समाज हा इतका पोचा बनला का ? इतका कणाहीन बनला का आणि जर का तो तसा बनला असेल तर त्याला तसे कोणी बनवले आणि जर का विचार प्रणाली विचाराची पद्धत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या बहुजन समाजाला सहजरित्या हाताळत असेल त्याचा पाठीचा कणा काढून घेणार असेल घेत असेल तर मग तिच्याच बाबतीत काही मूलभूत प्रश्न सतत डेव्हलप करावे लागतील. करावे लागतात मी ते सतत करतच असतो . तेव्हा मुद्दा हा नाही की टिपू सुलतान काय होता त्याबद्दल तर मी बोललेलोच आहे पण त्याबरोबर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे की टिपू सुलताना सारख्या माणसाच्या राजवटीत हिंदू बहुसंख्य असून सुद्धा त्यांनी बंड का केले नाही त्यांनी टिपूला सोबत का दिली का सहन केले आणि दुसरा मुद्दा हा मुद्दा राजकीय मुद्दा म्हणून नेहमी का वापरला जातो ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment