द. भा. धामणस्कर गेले

 द. भा. धामणस्कर गेले:  सत्यकथावादाची सुरुवात गेली श्रीधर तिळवे नाईक 

द. भा. धामणस्कर गेले बालकवींची सशक्त परंपरा पुढे नेणारे जे काही मोजके कवी महाराष्ट्रात होऊन गेले त्यात 1970 नंतर एक ठळक नाव पुढे आले ते म्हणजे द. भा. धामणस्कर ! 

हे नाव गाजणे शक्य नव्हते कारण या संपूर्ण कालखंडावर आधुनिकतेचा इतका प्रचंड मोठा ठसा होता की मध्यमवर्गीय असणे हा गुन्हा होऊन गेला मार्क्सवादाच्या प्रभावामुळे आणि देशीवादी लोकांच्या ग्रामीण अट्टाहासामुळे मध्यमवर्गीय विशेषता ब्राह्मणी केंद्रीय संविधानशीलतेच्या आणि संवेदनशीलतेच्या विरोधात उठाव झाल्यामुळे एकंदरच या काळामध्ये मग या संपूर्ण पिढीच्या नशिबात एक प्रकारची उपेक्षा यायला सुरुवात झाली 

ही पिढी नेमकी काय होती तर तिला सत्यकथेचा प्रतिमावाद आदर्श वाटत होता पण त्याचबरोबर तिची जडणघडण मध्यमवर्ग संवेदनशीलते मध्ये झाली होती त्यामुळे साहजिकच त्या संवेदनशीलतेच्या मर्यादा पाळत तिला व्यक्त व्हायचे होते मात्र या पिढीचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे तिने देशीवाद आत्मसात करायला सुरुवात केली होती त्यामुळे आत्तापर्यंत जो मध्यमवर्ग चालत आलेला होता ज्याच्या मागे ठोस अनुभव असून सुद्धा कारण नसताना पाश्चात्य संवेदनशीलतेचा एक विचित्र असा पगडा होता हा पगडा पूर्णपणे ओलांडण्यामध्ये हे लोक यशस्वी होत होते यामध्ये प्रामुख्याने जे काही लोक होते त्यामध्ये एक म्हणून आपण द. भा. धामणस्कर यांचा उल्लेख करू शकतो 


या लोकांना अरुण कोलटकर यांच्या सर रियल संवेदनशील ते पेक्षा किंवा दिलीप चित्रे यांच्या जल्लोष आणि पिसाटी सादर करणाऱ्या प्रतिमा कल्लोळापेक्षा देशी वादांच्या पैकी जे असे लोक होते जे साधे आणि सरळ भाषांकन करण्यामध्ये तज्ञ होते त्यांच्या शैलीचा अवलंबविस्तार करायचा होता त्यामुळे यांनी आपली मध्यमवर्गीय भाषा बदलली नाही उलट ती जशी आहे तशीच शाबूत ठेवली आणि त्याचबरोबर सत्य कथेचा जो मोकाट सुटलेला प्रतिमावाद होता त्याला आवड घालून त्याला पुन्हा एकदा मध्यमवर्गीय अनुभवाशी जोडून घेतले त्यामुळेच चालत आलेल्या सत्यकथा वादापेक्षा ही कविता एकाच वेळेला सत्यकथा वाद आणि देशी वाद्यांना प्रमाण मानत आपला उत्तर सत्यकथा वाद विकसित करत होती. प्रतिमांच्या भाऊ गर्दीत कवितेतला मूळ अनुभव तोडण्याची जी सत्यकथेची मूळची लखप होती ती या लोकांनी पूर्णपणे संपवली आणि त्याऐवजी देशीवादी लोकांचे अनुभवाचे थेट संघटन आणि निवेदन स्वीकारले ज्या लोकांनी हे केले त्यामध्ये कदाचित द. भा. धामणस्कर हे अतिशय प्रभावी होते त्यांच्याच वाटेने उत्तम कोळगावकर गेले होते हेमंत जोगळेकर गेले होते गुरुनाथ सामंत गेले होते या सर्वच लोकांनी 70 उत्तरी मध्यमवर्ग सादर केला परंतु तो सादर करताना त्यांनी आपली मध्यमवर्गीय मुळे न लपवता ती जशी आहेत तशी सादर करण्याचा अट्टाहास ठेवला आणि त्यामुळे त्याचा प्रचंड फायदा त्यांना झाला मुख्य म्हणजे त्यांच्या कविता सहजरीत्या लोकांना कळत होत्या सत्य कथेतल्या प्रतिमांच्या मधून येणारी गुंतागुंत त्यांच्यामध्ये नव्हती पण त्याचबरोबर मध्यमवर्गाची म्हणून भारतामध्ये एक जी परंपरा आहे ती परंपरा या लोकांनी जपली. यासंदर्भात द. भा. धामणस्कर यांची जी एक हस्तांतर नावाची कविता आहे ती प्रचंड गाजली ती पुढील प्रमाणे


विसर्जनासाठी गणपती नेताना

मला मूर्ती जड झाली, तेव्हा

उसळत्या तारुण्याचा

माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.


मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली

चौरंगासहित.

मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर

मी एका दैवी आनंदात अकल्पित

परंपरा पुढे सरकल्याच्या..


मी पुन्हा तरूण ययातीसारखा;

माझा मुलगा जख्ख म्हातारा,

परंपरेच्या ओझ्याने वाकलेला..


प्राक्तनाचे संदर्भ, द. भा. धामणस्कर

मध्यमवर्गीय परंपरा ही किती सहज पणाने पुढच्या पिढीत सरकते ते अधोरेखित करणारे ही कविता आहे आणि ती द. भा. धामणस्कर यांचा प्रवास सुद्धा दर्शवते . इथे साठोत्तरीचे मध्यमवर्गाविरोधातले बंड नाही तर त्या मध्यमवर्गीय परंपरेचा केलेला मुकाट स्वीकारसंस्कार आहे 

साहजिकच मग अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागतात त्यातील एक मुख्य प्रश्न म्हणजे खरोखरच सर्वजण बंडखोर असतात का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे म्हणजे एका बाजूला चित्रे नेमाडे कोल्हटकर या लोकांनी दाखवलेल्या दिशेने कला गेली तर दुसरी मात्र सत्य कथेच्या दिशेने गेली यातील काही जण मात्र असे होते ज्यांना सामावून घेतले गेले नाही त्यातले सर्वात मोठे ठळक नाव हे सुरेश मथुरे यांचे आहे वास्तविक त्यांच्यामध्येही मध्यमवर्गीय संस्थास्वीकार आहे पण स्वीकार संस्कार नाही त्यांचा कवितेतला जो वर्ग आहे तो अतिशय अर्बन असा झालेला मध्यमवर्ग होता आणि हा वर्ग कविता वाचत नसल्याने साहजिकच त्यांना त्यांचे वाचकच मिळाले नाहीत त्यांच्या युकॅलिप्टस कवितेवर मी मार्गी आणि देशी या ग्रंथात लिहिलेलेच आहे 

मग या सगळ्या कवींना मिळून काय म्हणावे तर मला सुसलेला शब्द उत्तर सत्य कथा वाद हाच आहे हे लोक उत्तराधुनिक झालेले नाहीत पण तरीही परंपरेचा मात्र स्वीकार करतानाच दिसतात काही प्रमाणात अपवाद असतील तर नारायण कुलकर्णी कवठेकर असतील 

या सगळ्यांच्या कविता आमच्या पिढीला भेटल्या त्या ग्रंथालीच्या पुस्तकामुळे ! पुढे पुढे असेही लक्षात आले की याही पुस्तकाच्या बाहेर अनेक उत्तम कविता आहेत कवी आहेत आणि त्यांना ग्रंथालीने समाविष्ट केलेले नाहीत कारण जे संपादक आहेत त्यांच्या आकलनाच्या मर्यादा या पुस्तकाला लाभलेल्या आहेत 


द. भा. धामणस्कर यांच्या कवितेतला निसर्ग हा माझ्या मते सर्वाधिक लक्षणीय असा काहीतरी आहे ज्याची परंपरा पुढे नलेशने पुढे नेली 


मध्यमवर्गीय कुटुंबातले कुटुंब सोहळे आणि घटना या सुद्धा अतिशय साध्या सरळ पद्धतीने द. भा. धामणस्कर व्यक्त करताना दिसतात द. भा. धामणस्कर


द. भा. धामणस्कर 

 द. भा. धामणस्कर द. भा. धामणस्कर द. भा. धामणस्कर



द. भा. धामणस्कर 

 द. भा. धामणस्कर द. भा. धामणस्कर द. भा. धामणस्कर

प्रश्न असा आहे की तरीसुद्धा या लोकांचा उल्लेख कधीही ग्रेट किंवा थोर कवी म्हणून होत नाही असे का झाले याचे कारण आपण जर का शोधायला गेलो तर आपणाला या काळामधल्या गद्याकडे जावे लागते उदाहरणार्थ श्याम मनोहर यांचे गद्द गद्य हे याच काळात आलेले परंतु त्यामध्ये जो तात्विक खोल तळ दिसतो पाया दिसतो तो या सर्व कवींच्या कवितांच्या मध्ये मिसिंग आहे हे लोक असे काहीही नवीन सांगत नाहीत की जे आपल्याला माहिती नाही थोडक्यात धक्का देण्याची जी एक ताकद लागते ती नाही आणि त्याचबरोबर श्याम मनोहर यांनी निर्माण केलेले मध्यमवर्गीय विश्व ज्या प्रकारचे अतिशय बारीक बारीक कंगोरे सादर करते त्या प्रकारचे कंगोरे सुद्धा मिसिंग आहेत एक प्रकारचे मध्यमवर्गाचे परीक्षण जे सतत शाम मनोहर यांच्या कादंबऱ्यांच्या मध्ये चाललेले असते ते इथे नाही आणि याचा एक परिणाम असा होतो की ही कविता चांगली वाटते पण थोर वाटत नाही 

मग नितळपणाचा प्रश्न आला की पुन्हा प्रकाश संतांच्या सारखा अतिशय ताकतीचा कथाकार पुन्हा दिसतो त्याच्या लंपण कथा दिसतात त्यातला जो ताजे पण आहे तो या कवींच्या मध्ये असला तरी असे वाटत राहते की हे गद्यांमध्ये अधिक प्रभावी पद्धतीने आलेले आहे. त्यामुळे निरागसतेचेच बोट पकडायचे असेल तर मग ते प्रकाश संत यांचे बोट पकडावे असे होते 

या पिढीच्या या मर्यादा म्हणता येतील नवीन दर्शन नाही आणि धक्का देणारा अनुभव पण अशावेळी मग अभिव्यक्ती हाच चान्स असतो पण अरुण कोल्हटकर यांनी धक्का मारण्याचा हा चान्स इतक्या पद्धतशीरपणे उचलला की बाकीचे सगळे कवी आपोआपच चाय कम पानी होऊन गेले कदाचित अपवाद असतील तर अनिरुद्ध कुलकर्णी चंद्रकांत खोत आणि वसंत गुर्जर असतील एका अर्थाने ही एक साध्या सरळ अँगलची बाळबोध पण निरागस चाकोरी बद्ध अनुभव विश्वातली कविता आहे साहजिकच या लोकांच्यावर टीका करणारे सुद्धा अनेक समीक्षक निर्माण झाले पण सर्वात मोठी टीका हीच होती की यांची उपेक्षा केली गेली मंगेश पाडगावकर यांचा कालखंड इतिहास जमा झाल्याचे हे लक्षण होते .

मग या लोकांनी काहीच दिले नाही का ? 

माझ्यामते साध्या सरळ कौटुंबिक मध्यमवर्गीय अनुभवाचे अत्यंत प्रामाणिक असे साध्या सरळ भाषेमध्ये केलेले रूपांतर या लोकांनी शक्य करून दाखवले आणि हेच त्यांचे योगदान आहे आणि त्यामध्ये द. भा. धामणस्कर हे अतिशय महत्त्वाचे होते त्यांनी कधीही भाषाशैली अनुभवावर हावी होऊ दिली नाही . त्यामुळे कवितेला निष्कारण पडलेले वजन पेलावे लागले नाही . सर्वात महत्त्वाची गोष्ट अर्थातच ऑथेंटीसिटी होती आणि ही या संपूर्ण पिढीची एक ताकद बनली आणि ती ज्यांच्या कवितेत निर्माण झाली त्यापैकी द. भा. धामणस्कर हे फार महत्त्वाचे होते 

आता हे अनुभव विश्व मध्यमवर्गामध्ये कधीही परतणार नाही त्यामुळे एका अर्थाने डॉक्युमेंटेशन झाले ते बरेच झाले 

या मध्यमवर्गातील काही लोकांचे रूपांतर उच्च मध्यमवर्गात झाले आहे आणि त्यांचे अनुभव विश्व काय आहे हे आत्ता मनोज जोशी ची कविता सिद्ध करत आहे . या लोकांना त्याची चाहूल सुद्धा लागू नये हे खरोखर आश्चर्य म्हणायला पाहिजे . या सगळ्या निरागसपणाची कशी नासाडी होत गेली हे जर अनुभवायचे असेल तर प्रत्येकाने मन्या जोशी याची कविता वाचलीच पाहिजे.

द. भा. धामणस्कर गेले एक नितळ पारदर्शककवी गेला त्यांना माझी आदरांजली 

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती