आरंभ ,शेवट ,उत्तर आधुनिकता, चौथी नवता ,आंदोलने आणि विश्वासार्हतेचा प्रश्न श्रीधर तिळवे नाईक
कलेच्या पातळीवर पुरोगामी कालखंडात शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे ऑल इज वेल द ट एन्ड्स well असा शेवट उद्भवला आधुनिक कालखंडामध्ये मात्र सुरुवातच ऑल इज नॉट वेल पासून होऊन शेवट सुद्धा ऑल इज नॉट वेल पर्यंत झाला उत्तर आधुनिकतेत Their is nothing like All because All is imaginery.Their are fragments and it beguines with fragments and ends in fragments असं सर्व काही झाल चौथ्या नवतेत मात्र we can connect fragments and create All असा आत्मविश्वास परतला आणि माझ्या कादंबरीलेखनामागच्या नेटवर्क मागे सर्वात मोठी प्रेरणा हे तत्व आहे त्यामुळेच "अडा हॉ का बा ना सु ना" ची सुरुवात तुकड्यांच्या पासून होते पण शेवट मात्र एका नेटवर्क प्रोसिजरमध्ये होतो आणि ही कृती जिला मी कादंबरी म्हणणे टाळतो कारण वांग्मय प्रकारांचा संपूर्णपणे हस्त झालेला आहे एक नेटवर्क सादर करते
केवळ चिन्हकीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्या चिन्हकीचा उपयोग संपूर्ण नेटवर्क बांधण्यासाठी करता येतो हा माझा विश्वास आहे आणि अजूनही तो तुटावा असे काही घडलेले नाही किंबहुना बांधकामावर अनेक कविता मी लिहिलेल्या आहेत त्याचे कारण माझा बांधकामावरचा विश्वास आजही ढळलेला नाही किंबहुना चौथ्या नवतेची ही मुख्य थीम आहे : नेटवर्क बांधणे आणि अजूनही बांधकाम चालू आहे
बांधकामाच्या कुठल्याही सुरुवातीला शेवटाची चिंता असते साहजिकच अनेकदा ही शेवटाची चिंता हीच आरंभीची चिंता बनते
कुठलेही आंदोलन सुरू झाले की त्या आंदोलनाच्या सुरुवातीलाच आपणाला शेवटाची चिंता सतवायला लागते याचे कारण शेवट आधीच पाहण्याची अदृश्य कल्पनाशक्ती माणसाकडे आहे अर्थातच हे सर्व शेवट सुरुवातीच्या कालखंडामध्ये काल्पनिक असतात परंतु ते दिसायला लागतात आणि मग अनेकदा असे होते की आंदोलनाला हे काल्पनिक शेवट वळण द्यायला लागतात आत्ताचे भाषेच्या संदर्भातले आंदोलन सुद्धा याबाबतीत अपवाद नाही म्हणजे अनेकांना राज ठाकरे हे भाजपचे आहेत काय आणि ते पुन्हा भाजपमध्ये विलीन होतील का असा प्रश्न सुरुवातीलाच पडायला लागला याचे कारण पुन्हा हा निर्माण झालेला विश्वासार्हतेचा प्रश्न आहे मुळात देवेंद्र फडणवीस हे हिंदीचा मुद्दा घेऊन येतील असे कोणालाही वाटले नव्हते किंबहुना देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता या हिंदी भाषेच्या आग्रहामुळे पूर्णपणे धोक्यात आलेली आहे आणि त्यांना हे कोणीही सांगत नाही स्वतःची विश्वासार्हता एखाद्या हितसंबंधांच्या बाहेर गहाण टाकणारे राजकारणी फार थोडे असतील देवेंद्र फडणवीस यांची आता त्यात भर पडलेली आहे प्रत्यक्षात विश्वासार्हते बाबतीत प्रश्न पडण्याची गरजच नव्हती परंतु तो पडायला लागला कारण जवळजवळ प्रत्येक मराठी राजकारणी माणसाने विश्वासार्हता गमवायला सुरुवात केली आहे आणि भाषेच्या संदर्भामध्ये हे आता तीव्रतेने समोर आलेले आहे
साहजिकच चौथ्या नवतेमध्ये विश्वासार्हतेचा प्रश्न हा केंद्रस्थानी आलेला प्रश्न आहे दुर्दैवाने मराठीत त्याची चर्चा होत नाही मी काही वर्षांपूर्वी या संदर्भात एक निबंध इथे टाकला होता पण तो काही फारसा कोणी वाचला नाही किंबहुना कोणीच वाचला नाही नंतर तो कोणीतरी काढून टाकला ऑडिअन्स नसला की तुमच्या निबंधाचे आजच्या काळात काही होऊ शकते कारण तेच आहे अगदी सामाजिक प्लॅटफॉर्मची सुद्धा आता विश्वासार्हता नाही तुमच्या कुठल्याही पोस्ट बाबत काहीही होऊ शकते
माणसाला नेहमी शेवट पाहण्याची गरज भासते याचे कारण शेवटी तो प्लॅन करणारा एकमेव प्राणी आहे बाकीचे प्राणी सुद्धा काही रँडम प्लॅन करतात पण ते अत्यंत इन्स्टंटवर व इन्स्टिक्टवर चालतात माणूस हा कायमच काहीतरी काँक्रीट बनवायच्या मागे लागलेला असतो साहजिकच माणसाला कायमच आंतरिक पातळीवर भविष्याच्या दिशेने चर्चा करताना किंवा प्लॅनिंग करताना नेहमीच श्रद्धेची गरज लागते म्हणजे मराठी भाषा भविष्यात टिकेल ही जर काय श्रद्धाच नसेल तर मग मराठी भाषेचे आंदोलन चालवता येणे शक्यच नाही ही श्रद्धा ठेवावी लागते ठेवावी लागेल
तुम्ही वैज्ञानिक पातळीवर अमुकच भविष्यात शेवट होईल असे सांगू शकत नाही अगदी शक्यतांच्या विज्ञानाची शक्यता आजमावून सुद्धा अजूनही यासंदर्भामध्ये सर्व काही रँडम चाललेले आहे आणि त्यामुळेच इथे अवैज्ञानिकता आपोआपच प्रवेश करते पुरोगामी कालखंडात श्रद्धा संपली असे वाटले तरी प्रत्यक्षामध्ये श्रद्धा संपलेलीच नव्हती आणि संपली तरी शेवट काय हा प्रश्न तसाच उरतो आणि उरलाही मग शेवटाच्या संदर्भात काही काँक्रीट उत्तर पुरोगामी कालखंडाला शोधावे लागले आणि ते प्रगती असे झाले एका अर्थाने सर्व पुरोगामी वादाने प्रगती या गोष्टीवर श्रद्धा ठेवली आजही पुरोगामी लोक मनुष्य जमात आज ना उद्या प्रगतीच्या दिशेने जाते यावर विश्वास ठेवून काम करत असतात त्याशिवाय पर्याय नसतोच साहजिकच सर्व मानव जातीचा आणि मानव जातीच्या इतिहासाचा प्रवास प्रगतीत होतो असा विश्वास विज्ञानाच्या आधारे देण्याचा प्रयत्न सर्व विचार प्रणालींनी केला आयडिया लॉजिनी केला आणि त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला परंतु हा विश्वास विसाव्या शतकात हळूहळू डळमळायला लागला आणि इथूनच आधुनिक अस्तित्वाचे प्रश्न आणि आधुनिक सामाजिक अस्तित्वाचे प्रश्न निर्माण झाले मुख्य म्हणजे प्रगतीच्या आधारे चालणाऱ्या सर्व व्यवस्थांच्या संदर्भात प्रचंड मोठे प्रश्न निर्माण झाले काफकाच्या kafka लिखाणामध्ये हा प्रश्न जोरदारपणे अवतरलेला दिसतो म्हणजे व्यवस्थेमध्ये माणसाचे झुरळ होणे किंवा त्याला माहीत नसलेल्या गोष्टीसाठी व्यवस्थित त्याला अटक होणे वगैरे थीम्स या कळत नकळत पुरोगामी व्यवस्था कशा अविश्वासार्ह बनल्या आहेत हे दाखवतात या काळात या व्यवस्थांच्या संदर्भामध्ये एक प्रकारची सामूहिक परात्मता आली आणि वैयक्तिक परात्मता तर आलीच आली तिच्यावर खूप काही चर्चा अस्तित्वावादात झालेली आहे अगदी रशिया आणि चीन मधली कम्युनिस्ट व्यवस्था सुद्धा विश्वासार्हता गमावून बसली
साहजिकच या कालखंडात आपण नेमके कशासंदर्भात आणि का विचार करत आहोत याची सखोल जाणीव प्रत्येकाला होती असे दिसत नाही सर्व काही सरकारच्या ताब्यात देण्यापेक्षा सरकारवरचा विश्वास उडाल्याने मग आधुनिकतेने व्यवस्थेच्याऐवजी एक प्रकारचे सरचनापण आणले रचना आणल्या स्ट्रक्चर्स आणली साहजिकच त्यावर चर्चा चालू झाल्या व्यवस्था गेली रचना आल्या त्या अंगाने पुढे मग कार्पोरेट्स आली परंतु ज्या रचना आल्या त्या सुद्धा हळूहळू १९३५ नंतर कोसळायला लागल्या आणि त्यातूनच दुसरे महायुद्ध निर्माण झाले त्यांचे कोसळणे हे उत्तर आधुनिकतेचा पाया बनले आणि मुळात इथेच विश्वासार्हतेला तडा जायला लागला माणसे विश्वासार्हतेची वाट पाहायला लागली या कालखंडामध्ये वेटिंग प्रतीक्षा इंतजार ही एक फार मोठी थीम इतकी व्यापक झाली की शेवटी तिच्यावर वेटिंग फॉर गोदो नावाचे एक नाटकच आले त्यातूनच कोणी येणार आहे यावर विश्वास ठेवायचा की कोणीच येणार नाही यावर विश्वास ठेवायचा हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला आणि हा निकाल ज्याच्या त्याच्या वैयक्तिक पातळीवर ज्याने त्याने द्यावा असे काहीतरी तत्त्वज्ञान निर्माण झाले
चौथ्या नवतेच्या आरंभीच विश्वासार्हता trust पूर्णपणे धोक्यात आलेली होती आणि आज प्रत्येक आंदोलनामध्ये विश्वासार्हतेचा प्रश्न कायमच निर्माण होताना दिसतो ही विश्वासार्हता कशी मापायची हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही अजूनही हा प्रश्न वैयक्तिक झालेला दिसतो त्यामुळे साहजिकच कोणाचेही मूल्यमापन करताना प्रत्येक जण विश्वासार्हतेचे मूल्यमापन हे वैयक्तिक पातळीवर करतो पण वैयक्तिक मूल्यमापने ही सामाजिक पातळीवर कितपत उपयोगी पडतील हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो त्यामुळेच आजकाल सततचे सर्वे चाललेले दिसतात त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय वर्तन करताना दिसत नाही आणि ज्यांना सर्वे वगैरे गोष्टी करायचा नाहीये त्या लोकांना धर्म हा एक फार मोठा शॉर्टकट या काळात निर्माण झाला सरळ ईश्वरावर सर्वे करण्याची जबाबदारी टाकून मोकळे व्हायचे आणि तो जो निर्णय देईल तोच खरा असे मानायचे असे मानणारे सुद्धा खूप होते या लोकांच्या मुळेच ईश्वर परतला आणि आया तुला खोमिनी सारख्या लोकांची ईश्वरी राजवट पण परत आली वेटिंग फॉर गोदो ऐवजी कमिंग फॉर कमिंग ऑफ god हे प्रस्थापित झाले ज्यांना अशा कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवायचा नव्हता त्यांच्यासाठी विश्वासार्हता कमावण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे सततचे सर्वे करणे आणि त्यातून येणाऱ्या निष्कर्षातून एक स्वतःचा निष्कर्ष तयार करणे साहजिकच सततचे सर्वे आणि त्यांचे सततचे बदलत जाणारे निष्कर्ष यामुळे विश्वासार्हतेचे मूल्यमापन हे नेहमीच तात्कालिक असते हे आता स्वीकारावे लागते कोणत्याही क्षणी कोणीही पलटी मारू शकतो आणि त्याच्या पलटी बरोबर त्याची विश्वासार्हता ही पलटी मारते असे आता दिसते त्यामुळेच आज काल विजुअल पातळीवर गाड्या पलटताना खूप आकर्षक वाटतं कारण आपणाला पलट्या या फार दृश्य स्वरूपात गाड्यांच्या पलट्यामध्ये किंवा वाहनाच्या पलट्यामध्ये दिसतात किंवा मग विमानासारखे काहीतरी कोसळ कोसळणे बांधकाम "उभारणी" किंवा"कोसळ" या दोन्ही थीम्स सतत अलीकडे सळसळताना दिस तात कारण उभारणी ,पलटी आणि कोसळ या चौथ्या नवतेच्या फार मोठ्या थिम्स आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर या दोन गोष्टींनी गेल्या पाच वर्षांमध्ये हाहाकार माजवलेला आहे युद्धामध्ये कोण कुठल्या बाजूने लढतो हेच आता कळत नाही ट्रम्प इराणच्या बाजूने आहे की इस्त्राईलच्या बाजूने आहे हे आज सुद्धा गुलदस्तात आहे कारण तो दोन्ही बाजूने लढताना दिसतो मराठी भाषेच्या आंदोलनात सुद्धा हे सर्व काही अटळच आहे प्रश्न आहे याचे यथास्थितीत आकलन कसे करायचे ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment