प्रिय आशुतोष दिवाण 

तुमच्या या पोस्टमुळे काही गोंधळ उडू शकतो म्हणून मी हे स्पष्टीकरण देतो आहे 

मुळात शब्द जो आहे तो ब्राह्मण धर्म आहे आणि तुम्ही तो वापरलेला नाही. ब्राह्मणी धर्म असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा मग त्यामध्ये ब्राह्मणीकरण झालेला वैदिक धर्म , ब्राह्मणीकरण झालेला वैष्णव धर्म आणि ब्राह्मणीकरण झालेला हिंदू धर्म असे तिन्ही धर्म येतात म्हणजेच ब्राह्मणी धर्मामध्ये ब्राह्मण धर्म , ब्राह्मणी वैष्णव धर्म , ब्राह्मणी हिंदू धर्म आणि ब्राह्मणी वैदिक धर्म असे चार धर्म येऊ शकतात पण यातून फार वेगळ्या समस्या निर्माण होतात याचे कारण असे की ब्राह्मण धर्म वापरून निवडून येण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने पूर्वी जनसंघाच्या नावाने केला होता परंतु त्याला यश मिळाले नाही तुम्हाला आता जे यश दिसते आहे ते ब्राह्मण धर्माचे यश नाही तर वैष्णव हिंदुत्व स्वीकारलेल्या भाजपचे यश आहे याच भाजपाने पुढे मोदी यांच्या नेतृत्वाखाली शैव हिंदुत्व स्वीकारले ज्यांचा आम्ही कित्येक वर्ष आग्रह धरत होतो पण आता फार वेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण खरोखरच भारतीय जनता पक्षाने वैष्णव धर्म स्वीकारला होता का? की केवळ ही एक स्ट्रॅटेजी होती? मुख्य म्हणजे खरोखरच मोदींनी आणि मोदींच्या भाजपाने शैव हिंदुत्व स्वीकारले होते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जर का ब्राह्मण धर्माची ही टिपिकल स्ट्रॅटेजी असेल तर मग पुन्हा एकदा संपूर्ण बहुजन समाज हा फसवला गेला असे नाईलाजाने म्हणावे लागेल .

ब्राह्मणधर्माने वासुदेव धर्माचा संरचनात्मक पाया स्वीकारला आणि त्याचे ब्राह्मणीकरण घडवून आत्ताचा वैष्णव धर्म निर्माण केला आणि स्वतःची ऋग्वेदामधली विष्णू ही दुय्यम देवता जिच्या नावाने धड 10 सूक्तेसुद्धा नाहीत तिला केंद्रस्थानी आणून मुख्य बनवले आणि आश्चर्यकारक रित्या तिला स्वीकारायला लावले . यामागचा उद्देश अत्यंत स्पष्ट होता तो म्हणजे पाशुपत, जैन आणि बौद्ध हे तिन्ही धर्म बुडवणे.

हीच गोष्ट नंतर हिंदू धर्माबाबत केली. आचार्य शंकर यांनी दिलेले पंचायतन शिव,शक्ती, गणपती, स्कंद आणि सूर्य हे स्वीकारून सूर्य देवता म्हणून विष्णू देवता आणली गेली होती . अनेक पुराणे रचली गेली. पुराणोक्त धर्म निर्माण करण्यात आला रामायण आणि महाभारत यांचे नव्याने लेखन करण्यात आले महाभारतामध्ये नंतर गीता टाकण्यात आली. हळूहळू गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे असा प्रचार करण्यात आला या मागचाही उद्देश स्पष्ट होता तो म्हणजे शैव धर्म बुडवून त्याचे ब्राह्मणीकरण घडवणे .

प्रश्न असा आहे की खरोखरच वैदिक किंवा शैव सर्व धर्माचे हे ब्राह्मणीकरण पूर्ण झाले आहे का ? माझ्या मते ते झालेले नाही .

माझ्या मते अजूनही वैदिक धर्मामध्ये आर्य समाजाने आपला आग्रह कायम ठेवलेला आहे तो पूर्णपणे ब्राह्मण धर्मात विलीन झालेला नाही 

हीच गोष्ट वैष्णव धर्माबाबत आहे तुकारामांच्या सारख्या आणि चक्रधरांच्या सारख्या काही लोकांनी तो पूर्णपणे विलीन होऊ दिला नाही मात्र वैष्णव धर्माबाबत ब्राह्मणीकरण्याला सर्वाधिक यश मिळाले असे आता दिसते हिंदू धर्माची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही मुख्य म्हणजे हळूहळू शैव धर्म स्वतंत्र आहे हे आता शैव लोकांच्या लक्षात आलेले आहे त्यामुळेच हिंदू धर्म हे नाव टाकून त्या जागी आता सनातन धर्म असा नवीन वाक्प्रचार प्रचलित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

हे ब्राह्मणी करण घडवण्यामध्ये नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंहाचा वाटा आहे . प्रश्न इतकाच आहे तिथे खरोखर पूर्ण झाले आहे का? माझ्या मते प्रतिकाराची शक्यता आता वाढत चालली आहे आणि ही प्रतिकाराची शक्यता फक्त बाहेरून नाही तर अंतर्गत घडामोडी मध्ये सुद्धा वाढत चाललेली दिसते त्यामुळेच कुंभमेळा हा जो एकेकाळी स्वीकारण्यात आला नव्हता तो आता मोठ्या प्रमाणात स्वीकाराला गेलेला आहे पण त्याचे सुद्धा अधिकाधिक ब्राह्मणीकरण कसे करता येईल या दिशेने प्रयत्न सुरू आहेत ते यशस्वी होण्याची शक्यता आता दिसत नाही याचे कारण मुळातच बहुजन समाजाला आता काय चालले होते हे कळत चालले आहे . त्यामुळे तुम्ही म्हणता ती शक्यता पूर्ण झालेली नाही.

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती