आर्य - अनार्य वाद व त्रिसिंह श्रीधर तिळवे नाईक
सध्या त्रिसिंह मुद्रेवरून चांगलाच वाद तापलाय ही मुद्रा राजमुद्रा म्हणून नेहरूंनी स्वीकारली आणि आता मोदींच्या काळात एका शिल्पावरून ती वादग्रस्त झाली आहे
हा वाद आर्य अनार्य वाद आहे कि आर्यांच्यातला वाद आहे हाच खरेतर मूलभूत प्रश्न आहे
मी आर्य अनार्य ही ध्रुवात्मकता का स्वीकारली नाही म्हणून अनेक फुलेवादी माझ्यावर नाराज असतात पण माझ्या मते ह्या द्विध्रुवात्मकतेला कारण ब्रिटिश साम्राज्यवाद होता त्यांना इथली नोकरशाही चालवण्यासाठी इथले लोक हवे होते ते एकीकडे उच्चवर्णीयांना आम्ही आणि तुम्ही एकाच आर्य वंशाचे म्हणून चुचकारत होते आणि दुसरीकडे इथल्या जनतेला तुम्ही आर्य नसल्याने म्हणजेच अनार्य असल्याने हिणकस आहात व तुमची लायकी आमच्याकडून राज्य करून घेण्याची आहे असं भासवत होते
दुसरी गोष्ट युरोपियन लोकांची विशेषतः मॅक्स्मुलरची आर्य वंश थेरी ही ब्राह्मणांना आपण जन्मतः श्रेष्ठ आहोत असं दाखवण्यासाठी उपयुक्त होती म्हणून लोकमान्य टिळकांच्यापासून अनेक ब्राम्हणांनी तिचा स्वीकार करून प्रचार केला परिणामी अनार्यांना आपण हीन आहोत असा हिनगंड निर्माण झाला त्यामुळे भारतीय समाजाचे ब्राम्हनायझेशन व आर्यनायझेशन घडवून आणणे व आपले वर्चस्व निसर्गदत्त असल्याचे सिद्ध करणे व ब्राम्हणाचे वर्चस्व दाखवणे हा मुळे हेतू सिद्ध झाला व होतो आजही बहुतांशी ब्राम्हण ह्या सबसे उपर सुपर ब्राम्हणगंडातून मोकळे झालेले नाहीत
तिसरी गोष्ट ह्या द्विध्रुवात्मकतेनेच पुढे वंशवादी हिटलर जन्माला घातला
चौथी ज्या मॅक्स्मुल्लरने हा सिद्धांत मांडला त्यानेच तो नाकारला आहे
आणि सर्वात शेवटी आफ्रिकन उगम सिद्धान्तानंतर आपण सर्वच आफ्रिकेतून आलेले आहोत असं सिद्ध केल्याने नं आपण सर्वच बाहेरचे झालो आहोत त्यामुळे आम्ही मूळचे व आर्य बाहेरचे ह्याला अर्थ नाही आता फक्त आधी आलेले आणि नंतर आलेले एव्हढेच दोन भाग उरतात स्वतःला मूळचे मानून नंतर आलेल्या लोकांना शिव्या घालण्याला आता फार अर्थ उरलेला नाही
त्यामुळेच आर्य - अनार्य ही द्विध्रुवात्मकता मी मान्य करत नाही त्याऐवजी आर्य ही विषमताकेंद्री वर्णलिंगजातिव्यवस्था ही समाजव्यवस्था मानणारी ब्राह्मणेस्मृतीकेंद्रित (ब्राम्हणे म्हणजे ऐतरेय वैग्रे ब्राम्हणे )संस्कृती आहे असं मी मानतो व शैव म्हणजे विषमताकेंद्री लिंगवर्णजातिव्यवस्था नाकारणारी संस्कृती आहे असं मी मानतो आणि भारतात ह्या दोन्ही संस्कृतीचा क्लॅश सतत चालू असतो असं मी मानतो एखादा बलुतेदार असलेलाही आर्य संस्कृती स्वीकारू शकतो आणि एखादा ब्राह्मणही शैव संस्कृती स्वीकारू शकतो बसवेश्वर पहिला बाजीराव हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे तिसरी निरीश्वरवादी निर्मोक्षवादी लोकायत संस्कृती अजूनही ह्या देशात अल्पमतात आहे पण कम्युनिस्टांच्यामुळे ती एकेकाळी फुल फॉर्मात होती व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच्या कौल घराण्यातील शैव संस्कृती डावलून ह्या लोकायत संस्कृतीत दाखल झाले होते
त्यांनी लोकायत धर्म अनुसरून कुठल्याच धर्माचे कसलेच चिन्ह राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारायला नको होते पण केऑस थेरीचे ते चालतेबोलते नमुना असल्याने त्यांनी इथेही गोंधळ घातला आणि बौद्ध धर्माची सिंहमुद्रा राजमुद्रा म्हणून स्वीकारली सूर आर्य असलेल्या लोकांना साईडलाईन करण्याची ही लोकायती खुळं कधी ना कधी तरी संकटात सापडणारच होती तशी ती सापडली त्यापेक्षा लोकायत संस्कृतीला साजेसे विळा कोयता मशीन आणि हात ह्यांना एकत्र करणारे असे काही राजमुद्रा म्हणून शोधले गेले असते तर ते साजेसं झालं असतं पण भारताचे दुसरे अशोक बनायला निघालेल्या नेहरूंना हे कोण समजवणार ?
भारताची कंपनीउत्तर कंपनोत्तर काळातील स्वातंत्र्य चळवळ हीच मुळी लोकायत , सूर व असुर असलेल्या आर्यांनी चालवली व शैवांना टेकन फॉर ग्रांटेड घेऊन राष्ट्रकारण चालवले त्यामुळे आत्ताचा जो वाद आहे तो असुर आर्य विरुद्ध सूर आर्य असा आहे जैन व बौद्ध धर्म हे दोन्ही धर्म असुर आर्यांचे धर्म आहेत आणि त्रिसिंह ही बौद्धांची मुद्रा आहे प्रश्न असा आहे कि हा सिंह आला कुठून ? ह्यासाठी थोडा इतिहास पाहावा लागेल
धर्मानंद कोसंबींनी आर्य शब्दाचा अर्थ फिरस्ता असा दिला आहे आणि नंतर त्याचा अर्थ सभ्य असा झाला असं म्हंटलं आहे ज्याच्याशी मी सहमत आहे
ह्या आर्यांचा प्रमुख इंद्र होता आणि त्याच्या नावाचा अर्थच मुळी इन म्हणजे योद्धा व द्र म्हणजे मुख्य असा म्हणजे मुख्य योद्धा सेनापती होतो ऋग्वेदात वृत्रचे जे वर्णन आहे ते पाहता वृत्र हा ब्राम्हण असावा असे दिसते व तो दासांचा म्हणजे देणाऱ्यांचा प्रमुख होता असे दिसते म्हणजेच दासांच्या पुरोहिताला ब्राम्हण म्हणत असे दिसते आणि त्याचा नातलग त्वष्टा ह्याने इंद्राला वज्र तयार करून दिले म्हणजे इंद्राला व आर्यांना ते करता येत नसावे
ह्याचा अर्थ ब्राम्हण हा अनार्य होता आणि इंद्राने त्याचा पुरोहित म्हणून स्वीकार केला आणि नंतर ह्या ब्राम्हणांनी तत्कालीन जगात (इराकी इजिप्ती ) पुरोहित राजाची स्तुती रचत तश्या स्तुत्या रचल्या
ज्यांना देव म्हंटले जाई ते प्रत्यक्षात आर्य टोळ्यांचे प्रमुख होते व पुढे इंद्राची टोळी महाबलाढ्य ठरली म्हणून तो मुख्य देव म्हणजे मुख्य नेता ठरला
पुढे इंद्राने त्वष्टाच्या मुलाला म्हणजे विश्वरूपाला पुरोहितपद दिले म्हणजे पुरोहितांची नेमणूक राजा करत असे पुढे इंद्राने विश्वरूपाला मारून टाकले कारण इंद्र काय करतो हे त्याच्या लक्ष्यात आले त्याने बंड केले पण ते आकार घेण्याआधीच ते इंद्राने मोडीत काढले ह्या काळात काही ब्राम्हण सेवेत होते हे आता खरं वाटत नाही
इंद्र मुख्य सेनापती मुख्य योद्धा असल्यानेच पुरोहितांनी गायलेली त्याची स्तुतीसुमने पुढे ऋचा झाल्या त्यानंतर इंद्र अनेक झाले आणि इंद्राची सत्ता वंशपरंपरागत असली तरी कधी कधी नहुषासारखे लोकही इंद्र झाले असं दिसतं तत्कालीन सर्वच संस्कृतीत राजे लोकांच्या स्तुत्या रचल्या गेल्या आहेत आणि त्यांचे देवही बनवले गेले आहेत हे राजे आपल्या ठायी दैवी शक्ती असल्याचे दावे करत आणि इंद्र वरूण वैग्रे त्याला अपवाद न्हवते ह्या इंद्रांनी आर्यांचे साम्राज्य वाढवले खरे पण पुढे पुरोहितशाही इतकी वाढली कि तिने देवांनी म्हणजे राजे लोकांनी आमच्या मंत्रानुसार ब्राम्हणेस्मृतीनुसार चाललं पाहिजे असा आग्रह धरायला सुरवात केली ब्राह्मणांचे हे वाढते वर्चस्व सहन करणे क्षत्रियांना अशक्यच होते शैव राज्ये ब्राम्हणांना व पुरोहितांना मुळात फार भाव देतच न्हवती आता आर्य राजेही हे वर्चस्व मानायला तयार न्हवते त्यांनी शैव धर्म स्वीकारला उदा हिरण्य ज्यातून बळी आला
ह्या आर्यांना अग्नीचे व सूर्य हाही ते अग्नी मानत असल्याने सूर्याचे अतोनात आकर्षण होते ह्या सूर्यासारखा दिसणारा प्राणी कोणता तर सिंह ! कारण सूर्याला जशी किरणे तशी सिंहाला आयाळ आहे साहजिकच सगळा पराक्रम ह्या लोकांनी सिंहाला जोडला त्यातूनच इजिप्तमध्येही स्फिन्क्सचे शरीर सिंहाचे दिसते पण आयाळ मात्र सिंहासारखी दाखवली गेलेली दिसते किंवा रोमन राजे हे सीझर म्हणवत जो केसरचा रोमन व्हर्जन आहे
वेदात सिंहाचे अनेक उल्लेख त्यामुळेच स्वाभाविकपणे येतात ऋग्वेद १-६४ - ८ किंवा १-९५ -५ किंवा ३-२-११ किंवा ३-९-४ किंवा ३-२६-५ किंवा ४-१६ -१४ किंवा ५-८३ -३ )
पुढे इंद्र शैव राजांकडून पराभूत व्हायला लागले अगदी यती असलेला कृष्णही इंद्राला हरवू लागला (हा कृष्ण वेगळा )
पुढे पदमशाली नंदाने आर्य क्षत्रियांचा विनाश केला आणि पुन्हा शैव राजवट स्थापन केली त्याने पुरोहितांना भाव दिला नाही विशेषतः ब्राम्हण साहजिकच ब्राम्हणांनी त्याची शूद्र म्हणून हेटाळणी केली मग राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे ह्यातील काहींनी महाराष्ट्रात आगमन केलं व ते प्रामुख्याने कोकणस्थ व चित्पावन झाले ज्यांनी पुढे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक अक्युपाय केला
ह्या नंद वंशातूनच पुढे चंद्रगुप्त आला त्याने आपल्या नंद वंशाचे नाव मौर्य केले आणि त्याच्यामुळे मौर्य घराण्यात प्रथमच आर्य असुर धर्म आला तो म्हणजे जैन धर्म पुढे त्याच्या नातवाने म्हणजे अशोकाने आजोबांना अनुसरत असुर आर्यांचा बौद्ध धर्म स्वीकारलाच पण सिंह ही मुद्राही स्वीकारली आणि स्वतःचे चंडाशोक म्हणजे चंडीचा अशोक व कालाशोक म्हणजे कालीचा अशोक ही शैव नावे बदलून फक्त अशोक हे नाव स्वीकारले त्यातूनच आत्ताची स्वीकारली गेलेली त्रिसिंहमुद्रा अस्तित्वात आली
२० व्या शतकात हा सूर असुर संघर्ष अवतरला तो सूर विरुद्ध लोकायत ह्या स्वरूपात सुरांच्या बाजूने सावरकर उतरले व त्यांनी असुर आर्यांच्यातून आलेल्या बौद्ध धर्मावर जोरदार टीका केली कारण त्यांना गांधीजी बौद्ध मार्गावर चालणारे वाटत होते आणि सावरकरांचा रणाविना कुणाला स्वातंत्र्य मिळाले असा प्रश्न होता त्यांना प्रामाणिकपणे असं वाटत होतं कि भारताने विशेषतः हिंदूंनी जर का पुन्हा अहिंसा स्वीकारली तर ब्रिटिश कधीही हिंदुस्थान सोडणार नाहीत आणि ब्रिटिशांनी यदाकदाचित हिंदुस्थान सोडला तर ह्या देशातील मुस्लिम हिंदुस्थान आपल्या ताब्यात घेऊन हिंदूंना पुन्हा गुलाम बनवतील आता अखंड हिंदुस्तानात असं काही घडलं असतं कि नाही हे आपण पाकिस्तानकडे बघून ठरवावं
नेहरूंना हिंदूंच्याबद्दल त्यांच्या वर्णजातीमुळे कधीच प्रेम न्हवते खरेतर गांधीजींच्याकडेही ते लोकांना खेचणारा व ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारा नेता म्हणूनच सुरवातीला पहात होते आणि त्यांच्या अहिंसेचा परिणाम त्यांच्यात हळूहळू झिरपला प्रश्न असा होता ह्या गांधीवादाला राष्ट्रचिन्हाचे स्वरूप कसे द्यावे जे उर्वरित जगालाही कळेल उर्वरित जगाला फक्त बौद्ध धर्म माहीत होता साहजिकच त्यातूनच सिम्बॉल निवडला गेला पुढे हिंदू संघटित होऊन जनसंघाला भाजप म्हणून व्यापक जनाधार मिळेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल
आज वस्तुस्थिती अशी आहे कि लोकायतांना कितीही बुद्धाविषयी आकर्षण वाटो पण लोकायत व नवबौद्ध सोडले तर उर्वरित हिंदूंना निरीश्वरवादी बुद्धधर्माचे काडीचेही आकर्षण उरलेले नाहीये स्वातंत्र्य चळवळीचा काळ विरून गेलाय आणि प्रॅक्टिकल लेव्हलला इंडियाचा धर्म कोणता तर हिंदू धर्म असा मेसेज गेलाय
अशा वेळेला ह्या जनाधार मिळालेल्या लोकांनी त्यांना आऊटडेटेड वाटणाऱ्या आणि ज्यांना पराभूत करून ते सत्तेवर आले आहेत अशा पराभूतांचे सिम्बॉल का स्वीकारावे ?
एकीकडे जगाला असलेले बुद्धाचे आकर्षण तर दुसरीकडे साहजिकच ज्या संघाचा बौद्ध धर्माला आतून विरोधच होता आणि अशोकचक्र असो कि त्रिसिंह हे त्यांच्या डोळ्यांना खटकत होते त्यांच्या जीवावर सत्ता मिळालेली ! मग मध्य कसा काढावा तर ठेवा सिंह पण आपण सूर आर्य असल्याने शांत सिंहापेक्षा उग्र सिंहच जवळ केलेला बरा ! म्हणजे बदल केलाय अन केलेलाही नाही मुळात सूर काय किंवा असुर काय सिंह दोघांनाही प्यारा पण सुरांना इंद्रासारखा आक्रमक जहाल सिंह हवासा वाटणे नैसर्गिक त्यांची मवाळ बौद्ध सिंहाशी नैसर्गिक युती कशी होणार ?
ह्या सगळ्यात शैवांचा रोल काय ? तर काहीच नाही इंग्रजांशी अंतिम खरं युद्ध लढणारा यशवंतराव होळकर हा शैव राजा होता हे ह्या दोन पार्ट्यांना कोण सांगणार ?
बरं दोघांच्या दृष्टीने शैव काय ?
शैवांचा उल्लेख हा सर्वसाधारण वैदिक वाङ्मयात दास किंवा अनिरय व पुढे शूद्र म्हणून केला गेला आहे आणि त्याचा मूळ अर्थ देणारा दान करणारा असा होतो आर्य आले तेव्हा शैव त्यांना भरपूर दान करत होते त्यामुळे आर्य त्यांना दास म्हणत असत पुढे कपटाने इंद्राने शैवांच्या दासांच्या राजवटी नष्ट केल्या आणि त्यांना शूद्र बनवले
बौद्धांचे काय तर त्यांच्याही अनरीय म्हणजे अनार्य धम्माबद्दल तक्रारी आहेतच उदा जातककथेतील भूरिदत्त जातकात बौद्धानी
कीटा , पतगा उरगा च भेका
हनत्वा किंमिं सुज्झति मक्खीका च
एतेहि धम्मा अनरियरूपा
कम्बोजकान वितथा बहुन्न ।९०३।
असा अनरिय धम्म म्हणून उल्लेख केला आहे व ते कीटक ,पतंग साप बेडूक कृमी व कधीकधी माश्याही मारून खातात म्हणून तक्रार केली आहे
आता ह्यावरून निदान अनार्य धम्म म्हणून काही अस्तित्वात होता एव्हढं स्वीकारायला काय हरकत आहे ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment