वाणीपणींची सर्वसमावेशकता आणि महात्मा गांधी श्रीधर तिळवे नाईक 

भारतामध्ये वैदिक काळामध्ये वैदिक श्रद्धेमध्येसुद्धा कधी वैश्य वर्ण नव्हता त्याऐवजी "विश " हा समुदाय होता आणि हाच मुख्य होता त्याचा अर्थच मुळात जनता असा आहे आणि तो शेती करणे ,पशुपालन करणे, उत्पादन करणे आणि व्यापार करणे ही चार कामे करत होता त्याची संख्या सर्वाधिक असल्याने साहजिकच वैदिक श्रद्धेमध्ये या जनतेमधूनच नेता निवडला जात होता आणि त्याला विशपती अशी संज्ञा होती आणि तोच अनेकदा प्रमुख असे या काळामध्ये पुरोहित वर्ग म्हणून ब्राह्मणांचा उदय झाला नव्हता ते काम ऋषी करत या ऋषींच्या मध्ये सुद्धा तीन प्रकार होते . ब्रह्मर्षी म्हणजे जो यज्ञ करत असे राजर्षी म्हणजे जो अनेकदा राज्य प्रमुख किंवा टोळी प्रमुख असे आणि जो विश समाजाच्या वतीने मुख्य यजमान असे आणि महर्षी जो प्रामुख्याने विश समुदायातून आलेला असे हे प्रकार जन्मदत्त नव्हते तर व्यवसाय दत्त होते त्यामुळेच व्यवसायाने वीर असलेला विश्वामित्र प्रत्यक्षात ब्रह्मर्षी होऊन मंत्र रचताना दिसतो महर्षीला मात्र सर्वच गोष्टी याव्या लागत पण प्रामुख्याने या जगतातल्या दैनंदिन ज्या गोष्टी असतात त्यामध्येच त्याला पुढाकार घ्यावा लागे . एका अर्थाने तो आजच्या काळात सांगायचे तर समाजाच्या अर्थाचा प्रमुख होता .


याचा प्रचंड मोठा परिणाम विश मानसिकतेवर झालेला आहे. सर्वच लोकांना म्हणजे व्यापार करणारा असो किंवा पशुपालन करणारा असो किंवा शेती करणारा असो किंवा उत्पादन करणारा असो या सर्वांना स्वतः सोबत घेऊन जाणे हे त्या काळात आवश्यक होते आणि असायचे साहजिकच जो वैदिक श्रद्धेमध्ये सुद्धा संस्कार होता तो सर्वांचा समावेश करणारा असा सर्व समावेशक दृष्टिकोन होता . त्यामुळेच आपणाला भारतातल्या ज्या वैश्य वाणी पणी लोकांच्या राजवटी आहेत त्या अत्यंत अर्था बाबतीत उत्तम चाललेल्या दिसतात . ब्राह्मण लोकांचा कारस्थानी प्रकार असा की त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक या सर्वांना क्षत्रिय म्हणायला सुरुवात केली आणि राजर्षी हा शब्द काढून घेऊन त्या जागी क्षत्रिय या शब्दाची प्रतिष्ठापना केली . यामुळेच वर्ण व्यवस्थेमध्ये कारण नसताना तीन वर्ण निर्माण झाले ते म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ! पुढे मग सर्व शैव लोकांचा आणि शेती पशुपालन आणि उत्पादन करणाऱ्या सर्व लोकांचा समावेश हा शूद्र अति शूद्र मध्ये करण्यात आला आणि व्यापार करणारे लोक फक्त वैश्य या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आले . यामागचा उद्देश स्पष्ट होता तो म्हणजे जो काही शेतमाल असेल किंवा पशुधन असे किंवा उत्पादन असेल त्याचा साठा करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवायचे म्हणजे धर्म सत्तेचे आणि राजसत्तेचे संपूर्ण समाजावर नियंत्रण राहते असा विचार पुढे झाला आणि त्यातूनच वैश्य हा स्वतंत्र वर्ग म्हणून प्रस्थापित झाला एका अर्थाने वैश्य हे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे मॅनेजर म्हणून काम करत होते . अर्थातच या गोष्टीला नकार मिळणे अत्यंत अटळ होते आणि तसा तो मिळाला . यातूनच बौद्ध आणि जैन धर्माची निर्मिती झाली हे दोन्ही धर्म वैश्य वर्णातून निर्माण झालेले आहेत . त्यांचे अनुयायी सुद्धा व्यापारी होते आणि या व्यापारी लोकांनीच हे धर्म सर्व जगामध्ये पसरवले. सिल्क रूट हा यांचे मुख्य माध्यम होता. संस्कृत ही भाषा सुद्धा याच लोकांनी तयार केली आणि या भाषेचे आणि या भाषेचे व्याकरण ज्याने तयार केले तो सुद्धा पाणीनी म्हणजेच पणी होता . चलन व्यवस्थासुद्धा पण व्यवस्था होती आणि ते आत्ताच्या नाण्यासारखे होते . जे वाणी आणि पणी होते ते सरळ सरळ शैव धर्मी असल्यामुळे त्यांनी वर्णव्यवस्था स्वीकारायला नकार दिला याचे कारण असे होते की त्यांना शैव-धर्मामध्ये असताना चक्क राजे सुद्धा होता येत होते आणि पुरोहित सुद्धा ! आता अशा पार्श्वभूमीवर केवळ मॅनेजर म्हणून ठेवणारा धर्मांच्या कडे कशाला वैश्य लोक जातील? त्यापेक्षा ज्या धर्मामध्ये पुरोहित होता येते किंवा राजाही होता होते येथे तो धर्म काय वाईट ? त्यामुळे ग्रीक लोकांनी सुद्धा जे या देशांमध्ये सेटल झाले नंतर शैव धर्म स्वीकारलेला दिसतो त्यामुळेच अनेक वैश्य आपणाला गुरव म्हणून सुद्धा दिसतात . गुजरात मध्ये तर त्यांना वेगळे ब्राह्मण बहुदा तपो निधी म्हणून कॅटेगिरी आहे कारण हे एकाच वेळेला पुरोहित असतात आणि व्यापारी ही असतात . म्हणजेच पंडितही असतात आणि व्यापारी ही असतात काश्मीर पंडितांच्या बाबतीत तर हे खूपदा झालेले दिसते 


व्यापार करणाऱ्या माणसाला अस्पृश्यता पाळताच येत नाही उत्पादन कोणीही तयार केले तरी ते घ्यावे लागते त्यामुळे एखाद्या चर्मकाराने उत्कृष्ट चपला तयार केल्या तर त्या घ्याव्या लागतात आणि या देवाणघेवाणी मध्ये स्पर्श होणे अटळ असते त्याच्या जागेवर जाणे अपरिहार्य असते त्यामुळे याबाबतीतले जे काही फालतूचे भ्रम लोकांनी तयार केलेले आहेत ते व्यवहारात प्रत्यक्ष लागू नसतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे अनेकदा भारताचा इतिहास हा व्यापार न करणाऱ्या लोकांनी लिहिलेला आहे ज्यांनी काहीही घंटा बघितलेले नसते .


इसवी सन सातव्या शतकानंतर मात्र गुप्त साम्राज्याचा पाडावं झाला आणि ही सर्व समावेशकता फापलत गेली त्यासाठी मुळातच गीता या काळात लिहिली गेली आणि महाभारत आणि रामायण यांच्या साह्याने सर्वत्र वर्णव्यवस्था आणण्याचे कारस्थान वैष्णव धर्माच्या नावाने अंमलबजावणीत आणले गेले. गुप्तांचे साम्राज्य हे वैश्य साम्राज्य असल्याने साहजिकच त्याच्या पाडावा नंतर वैश्य लोकांना गीतेमध्ये पाप वर्णांमध्ये टाकण्यात आले इतकेच नव्हे तर पणी आणि वाणी लोकांचा व्यापार बंद व्हावा म्हणून ब्राह्मण आणि वैष्णव धर्माने या काळामध्ये समुद्र पर्यटन बंदी आणली अर्थातच वैश्य लोक हे सहन करणे शक्यच नव्हते त्यांनी याच काळामध्ये मोठ्या संख्येने जैन धर्मात प्रवेश करायला सुरुवात केली आणि जैन धर्म अनेक ठिकाणी राजधर्म बनला . पुढे पुढे जैन धर्म सुद्धा वर्णव्यवस्था स्वीकारायला लागला आणि नाईलाजाने मग अनेक वैश्य लोकांनी समुद्राद्वारे आपल्याला व्यापार करता यावा म्हणून मुस्लिम धर्मात प्रवेश करायला सुरुवात केली . ब्राह्मण धर्म आणि वैष्णव धर्म यासंदर्भात कसलीही जबाबदारी घ्यायला तयार नसतात पण या धर्मांतराची जबाबदारी पूर्णपणे या दोन धर्मांच्या वर येते . एकदा आपला मुख्य नेता म्हणजे शेठ असलेला वैश्य माणूसच इस्लाम स्वीकारतो म्हटल्यावर साहजिकच मग त्यांच्या हाताखाली काम करणारा उत्पादक वर्ग हा आपोआपच मुस्लिम व्ह्यायला लागला काश्मीरमध्ये सर्वाधिक धर्मांतर होण्याचे कारण तिथल्या सर्व व्यापारी लोकांनी जे सिल्क मार्गाशी संबंधित होते इस्लाम स्वीकारायला सुरुवात केली . यामध्ये मग हळूहळू शेतकरी ही आले . आज सुद्धा आपण काय करून ठेवले याबद्दल ब्राह्मणांना काही अक्कल आलेली आहे असे दिसत नाही . अगदी इंग्रजांच्या राजवटीत सुद्धा हे लोक समुद्र पर्यटन केले म्हणून लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या नेत्यांना प्रायश्चित्य घ्या म्हणून सांगत होते. पाप तर करायचे पण त्याची जबाबदारी घ्यायची नाही ही ब्राह्मण धर्माची फार पूर्वीपासून प्रवृत्ती आहे याचा परिणाम असा होतो की ब्राह्मण धर्म कधी आत्मपरीक्षण करतच नाही भले भले ब्राह्मण आज सुद्धा आत्मपरीक्षण करत नाहीत अलीकडे तलवारीच्या जीवावर सर्व कसे झाले असे सांगत बसतात प्रत्यक्षात तलवार चालली याबद्दल शंका नाही पण तुमचे काही नालायक सिद्धांत याला जबाबदार होते हे पण स्वीकारा. 


व्यापारी लोकांना व्यापाराचा सर्वात होणारा मोठा फायदा म्हणजे जगभरात त्यांचा संपर्क येतो आणि तिथल्या चालीरीतीशीही संपर्क येतो त्यामुळे साहजिकच एक प्रकारचा खुलेपणा या वर्गामध्ये आहे आणि म्हणूनच त्याची सर्वसमावेशक वृत्ती आपोआपच तयार होत जाते. त्यामुळेच पारसी लोकांना ज्यू धर्मे लोकांना हा वर्ण स्वतःमध्ये सहजरीत्या सामावून घेतो . अलीकडच्या काळामध्ये अनेक अस्पृश्य लोक व्यापारी झालेले आहेत पण म्हणून कुठल्या वैश्य वर्णातल्या माणसाने त्यांना दटावलेले नाही कारण कुठलाही व्यापारी कुठूनही आला तरी वैश्य लोकांना त्याचा प्रॉब्लेम नसतो कारण मुळातच हा समाज सर्वसमावेशक आहे त्यांचा मुद्दा एकच असतो तो म्हणजे गुणवत्ता क्वालिटी असलेले उत्पादन ! तुम्ही जर का उद्या जातीच्या जीवावर असे म्हणाल की आमचे कमी प्रतीचे कमी क्वालिटीचे उत्पादन तुम्ही घ्या तर ते स्वीकारण्याची तयारी वैश्य वर्णाची व्यापारी लोकांची नाही . यामुळे अलीकडे काही लोक दुखावले गेलेले आहेत पण वैश्य लोकांना यामुळे फरक पडत नाही कारण शेवटी बाजारात त्यांना उत्पादन विकायचे असते भारतामध्ये अलीकडे उत्पादनाचा दर्जा प्रचंड खालावत चाललेला आहे अनेक ठिकाणी असे दिसते की वैश्यवर्णा मधला किंवा समाजातला माणूस व्यवसायामध्ये नाही त्या व्यवसायामध्ये बाकीच्या लोकांचे प्रमाण जास्त आहे तर कधी कधी असेही झालेले आहे की गुणवत्तेचा आग्रह कमी झालेला आहे . याला काही अपवाद आहेत पण ते अपवादच आहेत . अनेक व्यवसाय असे होते की जे इतर जातीतल्या इतर समाजातल्या लोकांनी चालवले म्हणजे कोल्हापुरात तुम्ही गेला तर तुम्हाला मिसळ बनवणारे सर्व चांगले लोक सर्व हॉटेलवाले हे प्रामुख्याने मराठे 96 कुळी या समाजातले मिळणार त्यांच्या या व्यवसायाला कधीही कुठल्याही वाणीपणी माणसाने ऑब्जेक्शन घेतलेले तुम्हाला दिसणार नाही ब्राह्मणांना सुद्धा जेव्हा ते व्यवसायात आले तेव्हा कसलीही आडकाठी वैश्य समाजातील लोकांनी केलेली नाही मात्र वैश्य लोक जेव्हा ब्राह्मण बनायला गेले तेव्हा मात्र त्यांना नाकारायला ब्राह्मण लोक कायमच तयार होते त्यांचे म्हणणे तुम्ही गुरव बना पंडित बना परंतु ब्राह्मण होऊ नका . याचाच एक परिणाम म्हणून मग मध्यंतरी वैश्य समाजाने मला मी अर्धा वैश्य असल्यामुळे तूच आमचा मुख्य महर्षी हो अशी ऑफर दिली होती आम्ही कशाला ब्राह्मण गुरु लोकांचे चरण पकडत बसू असा त्यांचा युक्तिवाद होता जर ओशो रजनीश जैन लोकांचा महागुरू बनत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे असा त्यांचा प्रश्न होता . मला अर्थातच त्यावेळी मोक्ष मिळालेला नसल्याने मी ही ऑफर नाकारली पण हे मी सांगतो आहे कारण नेमका काय विचार आता वैश्य वर्णांमध्ये चाललेला आहे हे लक्षात यावे . 


माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे की ब्राह्मण वर्णाने आता आपल्या पौराहित्य करण्याचा व्यवसाय सर्वांना खुला करावा सर्व मंदिराचे मालकी व पौराहित्य इतर जात वर्णांना पण द्यायला सुरुवात करावी किंबहुना आर्य समाजाने या कार्याला सुरुवात केली होती त्याला जास्तीत जास्त उत्तेजन द्यावे तुम्ही तुमचा व्यवसाय बंद करणार आणि इतरांचा व्यवसाय मात्र खुला करा म्हणून मागणी करणार किंवा मागणी न करता हे व्यवसाय बिंदास करणार हे फार काळ आता सहन केले जाणार नाही . या ब्राह्मणांच्या बाजूने होणाऱ्या एकतर्फी देवाण-घेवाणीला आता सर्वांनीच नकार द्यावा हे उत्तम ! 


या सर्व पार्श्वभूमीवर मग महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व कसे काय तयार झाले हे सहज लक्षात येऊ शकते . ज्या प्रकारची राजकीय सभा सर्वसमावेशकता महात्मा गांधी यांच्या ठाई दिसते तशी ती कोणाच्याच दिसत नाही याचे कारण मुळातच त्यांचे हे वैश्य बॅकग्राऊंड आहे ते जर का वाणीपणी समाजातले नसते तर मात्र असे झालेच नसते . 


प्रश्न असा आहे की ही सर्व समावेशकता किती ताणायला पाहिजे होती ?


माझ्या मते सारे गणित जे चुकले आहे ते इथेच चुकले आहे आणि ते प्रामुख्याने इस्लाम बाबत चुकले आहे गांधीजींना हे लक्षातच आले नाही की भविष्यामध्ये ही सर्वसमावेशकता हिंदूंना पुढे घेऊन जाईल परंतु त्याचमुळे इस्लाम पुढे न गेल्याने संकुचित होत जाईल . याबाबतीतल्या गांधीजींच्या ज्या इस्लाम बाबतच्या अपेक्षा होत्या त्या पूर्णपणे कोसळल्या याचे कारणच इस्लामचा स्वभाव आहे .


इस्लाम बाबत सर्वात आश्चर्यकारक जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे खुद्द इस्लाम हा सुद्धा सर्वसमावेशक पार्श्वभूमी असलेल्या व्यापारी लोकांच्यातून आलेल्या महंमद पैगंबर यांनी स्थापन केला होता . पण आश्चर्यकारकरीत्या त्यांनी आपल्या पार्श्वभूमीची ही सर्वसमावेशकता पूर्णपणे नाकारली आणि अत्यंत कठोर आणि अत्यंत उग्र असा एक देव वाद प्रस्थापित केला इतकेच नव्हे तर इतकी बंधने आणली की इस्लाम मध्ये काही स्वीकारायला जावे तर प्रचंड अडथळे यायला लागले . त्यात भरीस भर म्हणून स्वतःला त्यांनी अंतिम म्हणवून घेतले म्हणून घेतले अशाच प्रकारची चूक वाणीपणी समाजातून आलेल्या भगवान महावीर यांनी पण केली होती आणि आश्चर्य हेच आहे असे का व्हावे असे होण्याचे एक मोठे कारण असे की या सर्व समावेशकतेमुळे अनेकदा एक प्रकारचा धार्मिक अराजकाचा प्रकार राजकीय अराजकाचा प्रकार तयार होत जातो . महंमद पैगंबर आणि भगवान महावीर यांच्या काळामध्ये अशी परिस्थिती तयार झाली होती आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या धर्माच्या बाबतीत आपणच अंतिम असे सांगून फार मोठा संकुचितपणा निर्माण केला नंतर जैन धर्म जो आटत गेला त्याचे सर्वात मोठे कारण महावीर हेच शेवटचे तीर्थंकर असल्याने तो सगळा प्रवाह आठव्या शतकानंतर थांबला आणि आठव्या शतकातच थांबला . याच नेमक्या शतकात अशाच प्रकारच्या पार्श्वभूमीतून अरबस्थानातून पुन्हा एकदा महंमद पैगंबर यावेत या योगायोगाला काय म्हणावे ? 


नेमकी हीच घटना पुन्हा एकदा शीख धर्माबाबत का घडावी ? इथे सुद्धा शिख लोकांनी जसा जसा व्यापार स्वीकारायला सुरुवात केली जसा जसा हळूहळू हा धर्म व्यापारी लोकांचा धर्म बनत गेला तसा तसा अंतिमतेकडे आदेश सरकायला लागला आणि शेवटी दहाव्या गुरूंनी आपल्या नंतर गुरु येणार नाही असे जाहीर केले आता याला सुद्धा व्यापाराचाच परिणाम म्हणावा का ?


व्यापारी लोकांना एक व्यवस्था सतत लागते परंतु कधीकधी होते असे की व्यवस्था निर्माण करता करता ती कायमस्वरूपी व्हावी अशा प्रकारच्या निष्कर्षाला ते येतात आणि हा निष्कर्ष त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या वाढीसाठी घातक ठरतो . वास्तविक व्यवसायात आणि धंद्यात सतत बदल करावे लागतात सतत बदल होत असतात याची सर्वाधिक जाणीव त्यांना असते आणि तरीसुद्धा व्यवस्था मात्र अचानकपणे कायमची काहीतरी द्यावी अशी भावना तयार होते आणि त्यामुळेच मग नंतरचे अनेक प्रॉब्लेम व्यापार करणाऱ्या लोकांच्या मध्ये निर्माण होतात त्यांनी निर्माण केलेल्या धर्मांच्या मध्ये निर्माण होतात महात्मा गांधींच्या वेळी सुदैवाने परिस्थिती वेगळी होती ते आरंभी होते त्यामुळे त्यांनी ती सर्वसमावेशकता व्यवस्थित धारण केली परंतु धारण करताना इस्लाम काय आहे ख्रिश्चनिटी खरोखर काय आहे हे समजून सुद्धा घेतले नाही उलट यांना आध्यात्मिक कोंदनात बसवण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात हे धर्म कधीच अध्यात्मिक नव्हते त्यांच्यात मोक्षाची संकल्पना नव्हती पण त्यांच्यात मोक्षाची संकल्पना आहे असे गृहीत धरून गांधीजींनी आपले सेक्युलर धोरण आखले आणि जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या आधारे एखादे राजकीय धोरण आखता तेव्हा ते चुकणारच असते गांधींच्या बाबतीत हेच घडले आणि याचा सर्वाधिक फायदा शेवटी हिंदुत्वाला झाला कारण हिंदुत्वाला इस्लाम काय आहे हे नीट कळलेले होते आहे . मात्र इस्लामचे काय करायचे याचे निदान एक स्पष्ट आणि स्वच्छ धोरण गांधींच्याकडे होते हिंदुत्वाकडे असे कसलेही धोरण आहे असे दिसत नाही . उलट मिळालेली सत्ता कशी टिकवता येईल यामध्येच हे लोक जास्त मश्गूल झालेले आहेत . याचा परिणाम होणे अटळ असते कारण लोक शेवटी कंटाळणार आणि तुम्हाला मतदान करणार नाही आता ही वेळ नेमकी कधी येईल हे सांगता येत नाही पण ही वेळ येणारच त्यामुळे हातात आलेल्या मोजक्या संध्या या वाया घालवल्या म्हणूनच इतिहासात पुन्हा एकदा हिंदूंची आणि हिंदू नेत्यांची हिंदुत्ववादी नेत्यांची नोंद होईल असे आता स्पष्ट दिसते आहे . हे लोक गांधींच्या विरोधात आहेत पण प्रत्यक्षात गांधींच्या प्रमाणेच वागत आहेत . याचा अर्थ इतकाच की भोंगळ सर्वसामावेशकता पुन्हा एकदा एका विचित्र विनाशाकडे घेऊन जाणे अटळ आहे आणि हिंदू लोकांना इतर अभारतीय धर्मांशी लढण्यासाठी लागणारा कणा नसतो हेच आता पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे 


काँग्रेसला अजूनही गांधीजींच्या या मर्यादा कळू नयेत याचे मात्र आता मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे गांधीजींचे संपूर्ण राजकीय धोरण स्वीकारावे परंतु त्यांचे धर्मकारण हे पूर्णपणे फेकून द्यावे हे जितक्या लवकर काँग्रेसला कळेल तितके बरे हे कळले नाही म्हणूनच सत्ता गमवावी लागली आता पुन्हा सत्तेवर द्यायचे असेल तर आम्ही गांधीजींचे धर्मकारण पूर्णपणे फेकू हे तुम्हाला सांगावे लागेल त्याशिवाय तुम्हाला हवी तशी मते मिळणार नाहीत .


भारतीय जनतेचे मात्र यामध्ये खरी शोकांतिका आहे एकाने धर्मकारणाबाबत शेण खाल्ले म्हणून दुसऱ्याला आणले तर तो भलताच कर्तव्य चुकार निघाला . एखाद्या राजकीय संरचनेमध्ये दोन्हीही पक्ष जर जनतेच्या बाजूने नसतील तर जनतेने काय करायचे असा एक फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आज ना उद्या जनतेलाच याचे उत्तर शोधावे लागेल .


श्रीधर तिळवे नाईक 










Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती