आपण खरे बोलणे का आवश्यक आहे आणि आपण का खोटे बोलतो श्रीधर तिळवे नाईक
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सत्य वेगळे आणि सत्याविषयी बोलणे वेगळे ! वास्तव वेगळे आणि वास्तवाविषयी खरे बोलणे वेगळे ! या दोन गोष्टी मधला फरक न कळल्यामुळे नेहमीच सार्वजनिक जीवनामध्ये फार मोठा गोंधळ होत असतो. अनेकदा आपणाला वस्तुस्थिती माहीत नसते आणि निसर्गाचे वेगवेगळे नियम आपणाला सर्वच्या सर्व माहीत असतात असे नाही त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी माहित आहेत त्याविषयी बोलणे आणि खरे बोलणे आवश्यक असते. शेवटी आपणाला पुढच्या पिढ्या सुद्धा घडवायच्या असतात यासाठी त्यांना आत्तापर्यंत होऊन गेलेले खरेखुरे ज्ञान द्यावे लागते आपण जर का त्यांना खोटे ज्ञान दिले तर मग त्या पिढ्या आपोआपच त्या ज्ञानाच्या खोटेपणाच्या तावडीत सापडून आत्महत्येच्या दिशेने प्रवास करायला लागतात कधी कधी ही आत्महत्या संपूर्ण समाजाची होऊन जाते त्यामुळेच सर्वात पहिल्यांदा जर का खरे बोलणे कुठे आवश्यक असेल तर ते म्हणजे शिक्षण क्षेत्र होय. शिक्षण क्षेत्रात जो समाज खोटे बोलतो तो कधीही पुढे जात नाही कारण खोट्याच्या आधारे कधीही गोष्टी चालवता येत नाही विमान असो किंवा गाडी असो जर का खरे टाकले तरच ते धावू शकते अन्यथा शक्य नसते . तेव्हा खरेपणा हा मुळातच जीवनासाठी आणि जगण्यासाठी अत्यंत आवश्यक भाग आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे
हीच गोष्ट इतिहासाबाबत आहे येऊ घातलेल्या पिढ्यांना आपण आपल्या आत्तापर्यंतच्या इतिहासात आलेल्या सगळ्या खऱ्या गोष्टी खरी तंत्रे टेक्नॉलॉजी आणि तिचा खरा इतिहास खरे विज्ञान आणि विज्ञानाचा खरा इतिहास खरे चिन्ह विज्ञान आणि चिन्ह विज्ञानाचा खरा इतिहास खरे चिन्ह तंत्रज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञानाचा खरा इतिहास द्यावे लागतात त्यांचे खरे आकलन खरे ज्ञान द्यावे लागते ते जर का आपण दिले नाही त्यांचे खरे शिक्षण आपण दिले नाही तर मग अत्यंत खोट्या पायावर समाज तयार होऊन तो कोसळतो तेव्हा खरे बोलण्याची सर्वाधिक पहिली आवश्यकता जी असते ती नेहमीच अभ्यासक्रमात असते शिक्षण क्षेत्रात असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अलीकडे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन च्या संदर्भात जो काही वाद उपस्थित आहे तो या संदर्भातच आहे कारण वैदिक लोकांचा या संस्कृतीची काडीचा ही संबंध नव्हता आणि तरीही सिंधू सरस्वती संस्कृती म्हणून खोटा इतिहास देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे असे इतिहास आपण देत राहिलो तर आपण कुणावर अन्याय करतो याची ही जाणीव असायला हवी तुम्हाला जर असे वाटत असेल की बहुजन समाजाला हा इतिहास मान्य होईल तर तुम्ही एका भ्रमात आहात कारण याविषयीची जागरण सुरू होणे आढळ आहे आणि हे जागरण एकदा झाले की मग तुमची इमेज खराब होणे अटळ आहे. शेवटी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन चा इतिहास म्हणजे वाणीपणी , कुंभार सुतार वगैरे उत्पादक वर्ग दलित वर्ग आणि आदिवासी वर्ग यांचा इतिहास आहे एवढ्या मोठ्या समाजाशी आपणाला जर का पंगा घ्यायचा असेल तर आपण खुशाल घ्या पण त्याचे परिणाम अत्यंत वाईट होणे अटळ आहे . कारण हे समाज आता ब्रिटिशकालीन समाजात नाहीत ब्रिटिशकालीन समाजामध्ये हे समाज झोपले होते आता ते जागे झालेत त्यामुळे रिएक्शन येणार नाही असा जर का तुमचा गोंडस गैरसमज झाला असेल तर तो तुम्ही काढून टाकणे आवश्यक आहे. भ्रमाचे राज्य फार काळ चालवता येत नाही एवढेच इथे सांगतो
आता प्रश्न असा आहे की आपल्या या सगळ्या समाजामध्ये कायमच खरे आणि खोटे यांचा प्रश्न का उद्भवतो यासंदर्भामध्ये थोडे खोलात जावे लागेल
अलीकडच्या काळामध्ये इतिहासाच्या संदर्भात ज्या गोष्टी घडत आहेत त्यात आपल्याला सोयीस्कर असलेले खरे सांगण्याचा प्रयत्न जो तो पक्ष करताना दिसतो आणि इथे आज खऱ्याला धरून कमी आणि पक्षाला धरून जास्त चाललेला दिसतो आणि हे काँग्रेसच्या सुद्धा राजवटीत घडले होते .एका अर्थाने हे इतिहासाचे राजकीयकरण आहे आणि त्याची सुरुवात मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांनी केली होती पाकिस्तानचा इतिहास तर इस्लाम नंतरच सुरू होत होता आता त्यांना अक्कल आलेली दिसते पण गमतीचा भाग असा की त्यांना अक्कल येत असताना आपण मात्र आपली अक्कल गमवत चालेललो आहे .
असे तर झालेले नाही ना किंवा त्यामुळे असे तर होणार नाही ना की आपण खरे बोलणे विसरून गेलेलो आहोत ? आता आपण जर असे खरे बोलणे विसरून गेलो तर काय ? अनेकदा आपणाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे पुरावे उपलब्ध झाल्यामुळे सत्याविषयीचे आपले आकलन त्या पुराव्यांच्यामुळे बदलते अशावेळी त्या बदललेल्या पुराव्यांच्या सकट जे खरे आहे ते सांगावे लागते ते छापावे लागते ते सादर करावे लागते म्हणूनच मी म्हटले की वास्तव माहित असत नाही आणि त्यामुळेच आपण वास्तवाविषयी समग्र बोलत आहोत किंवा संपूर्ण बोलत आहोत असा गैरसमज कधीच कोणी बाळगू नये वास्तव म्हणजे आपणाला माहित असलेल्या वास्तवाविषयी बोलणे असेच वास्तवामध्ये होऊन जाते . आपल्याबरोबर अनेक प्राणी जगतात परंतु त्यांना न्यूटनचा नियम करणे कळणे शक्य नाही त्याविषयीचे समीकरण ते मांडू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे खरे बोलण्याची कलाच नाही मुळात बोलण्याची कला नाही . त्यांच्याकडे संभाषण आहे पण भाषा आहे त्यांच्याकडे चिन्ह व्यवस्था आहे परंतु भाषा नाही माणसाचा सगळा आयुष्य हिशेब हा भाषा या गोष्टीवर उभा आहे .याचा अर्थ असा की त्यांच्या आसपास वास्तव आहे वस्तुस्थिती आहे पण त्या वस्तुस्थितीचे आकलन त्यांना असेलच असे नाही म्हणूनच सत्य वेगळे, सत्या विषयीची जाणीव वेगळी , सत्याविषयीचे बोलणे करण्याची क्षमता असणे वेगळे आणि सत्याविषयी बोलणे वेगळे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर खरे बोलण्याची कला खरे बोलण्याची आवश्यकता आपण का विसरत चाललो आहोत याची सुद्धा कारण मीमांसा करणे अत्यंत आवश्यक आहे . अनेकदा तर भारतीय लोकांना खोटे बोलण्याचे व्यसन लागले आहे की काय असे आता शंका यायला लागलेली आहे. हे असे आपल्या बाबतीत का होते ? याला कारण आपला सत्याविषयीच्या संदर्भातला इतिहास आहे आणि तोच पहिल्या कारणाशी जोडला गेलेला आहे.
१ सत्य ज्ञानाचा अंत झाल्यानंतरच प्राप्त होते. त्याला आपल्या भारतीय इतिहासामध्ये मोक्ष असे म्हटले जाते किंवा निर्वाण किंवा कैवल्यप्राप्ती म्हटली जाते. त्यामुळे सर्वजणच जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत सत्यापासून दूर असतात . पण याचा एक तोटा आहे सार्वजनिक जीवनात होतो तो म्हणजे जे अंतिम सत्य आहे ते मानवी जीवनाच्या कुठल्याच कक्षेमध्ये सामाजिक अंगाने येत नाही ते नेहमीच दुवा दशशील किंवा पंचशील यांच्या अंगाने येते आणि त्याचाच भाग म्हणून आपण नेहमी म्हणतो की सत्य बोलावे खरे बोलावे. आपण याचा समावेश शील व्यवस्थेत केलेल्या आहे . पण मग प्रश्न असा आहे की आपणही शिलव्यवस्था पाळत का नाही . आपण आपल्या मुलांना ती पाळायला का लावत नाही . याचे कारण सार्वजनिक जीवनातून आपण मोक्ष फेकून दिला आहे आणि त्याच्या जागी धर्म आणला आहे याचा सर्वात मोठा जर का तोटा कुठला असेल तर तो म्हणजे पंचशील गायब झालेले दिसते . द्वादशीशीलता तर फार दूरची गोष्ट आहे .
आता पंचशील नाही सत्य बोलणे नाही मोक्ष नाही त्यामुळे सत्य नाही मग सार्वजनिक जीवनात काय आहे ?
२ सार्वजनिक जीवनामध्ये माया आहे याबाबतीत जोपर्यंत शेव श्रुती या देशांमध्ये ऍक्टिव्ह होती तोपर्यंत प्रॉब्लेम नव्हता याचे कारण माया म्हणजे वास्तव आहे याची पुरेपूर कल्पना इथल्या लोकांना विशेषतः शैव लोकांना होती .वास्तवाचे स्वरूप माया म्हणून बघितले जात होते त्यामुळे आपण वास्तवाचे आणि वस्तुस्थितीशी कायमच रिलेटेड होतो संबंध दाखवून होतो . परंतु दुर्दैवाने नंतर वैष्णव धर्म आला आणि या वैष्णव धर्माने वेदांत ताब्यात घेऊन मायेचा अर्थ बदलला. या युरेशियन वेदांतामुळे माया हा आभास आहे हा सिद्धांत सर्वत्र भोकाला आणि तो आपल्या अक्षरशः घराघरात वारकरी संप्रदायासारख्या संप्रदायांच्या माध्यमातून संतांच्या साहित्यातून पोहोचवला गेला . माया हा आभास आहे हा सिद्धांत आठव्या शतकानंतर पसरत गेला आणि सारा गोंधळ झाला आणि आजही हा सिद्धांत भारतीय लोक सर्वत्र फेकत असतात किंबहुना स्वामी विवेकानंद यांनी यासंदर्भात कठोर टीका सुद्धा केली होती कारण त्यांच्या काळात सुद्धा हाच सिद्धांत सर्वाधिक प्रचलित झाला होता . भारतात विज्ञान न येण्याचे सर्वात मोठे कारण युरेशियन वैष्णव लोकांचा हा माया सिद्धांत आहे .वास्तविक माया म्हणजे वास्तव आणि वास्तवाविषयी तुम्ही नेहमीच खरे बोलले पाहिजे सत्य बोलले पाहिजे पण प्रत्यक्ष व्यवहारात असे दिसत नाही आपण असे म्हणत नाही याचे कारण सत्याविषयी बोलता येत नाही आणि जग तर युरेशियन माया आहे म्हणजेच आभासी आहे . हे स्वीकारल्यामुळे आणि त्याविषयी घडा दारामध्ये चर्चा सुरू झाल्याने त्याविषयी उपदेश करताना सगळी गडबड सुरू झाली आपण वास्तवाचा शोध घेतो खऱ्याचा शोध घेतो खरे काय आहे त्याचा शोध घेतो आणि विज्ञानाचा सगळा खटाटोप वास्तव काय आहे खरे काय आहे ते जाणून घेण्याच्या असतो ही मूलभूत गोष्टच आपण विसरून गेलो मुळात माया म्हणजे काल्पनिक काहीतरी ही गोष्टच काढून घेतली पाहिजे. माया म्हणजे वास्तव ही शैव व्याख्या आपण स्वीकारली पाहिजे आपण जेव्हा आईची माया म्हणतो तेव्हाच ती सर्वाधिक खरी गोष्ट असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . कारण हे खरोखरच शक्तीमुळे आकाराला आलेली साकार झालेली वस्तुस्थिती असते तिला वस्तुस्थिती म्हणून डावलण्याची जी मूलभूत चूक आपल्याकडे झाली त्यातूनच आपण मायाला ह्या जगाला खोटे समजलो आणि खोटे बोलायलाही शिकलो .
३ तिसरे कारण थोडे वेगळे आहे .खरे जाणण्याची आवश्यकता का आहे ? खरे जाणल्या शिवाय आपल्याला जगणे शक्य नाही म्हणजे एखादी भाजी खरी आहे की खोटी आहे तर ती खरी असली तरच आपण ती खाऊ शकतो आपले सारे अन्न खरे आहे म्हणून आपण जगू शकतो आपले वस्त्र खरे आहे म्हणून आपण ते घालू शकतो आपले घर खरे आहे म्हणून आपण त्यात राहू शकतो म्हणजे खरे आहे म्हणूनच जग चालले आहे. हे आपण लहानपणापासून बिंबवायला हवे पण आपण ते बिंबवत नाही संस्कार करत नाही भारताचा तो एक फार मोठा प्रॉब्लेम आहे की आपण मुलांना खरे असणे म्हणजे काय खरे बोलणे म्हणजे काय तेच शिकवत नाही यामुळे अनेकदा आसपास काय चालले आहे त्याविषयीचा गोंधळ आपल्यासाठी अत्यंत स्वाभाविक आणि सहज असतो. उत्तर आधुनिकतेचा जो प्रचंड धक्का युरोपियन संस्कृतीला बसला होता तसा आपल्या संस्कृतीला बसला नाही कारण आपण उत्तर आधुनिकतेची पार्श्वभूमी गेली हजार वर्षे आपण जगतो आहोत. पण त्यामुळेच आपण पोस्ट ट्रूथ जगात गेली हजार वर्षे जगत आहोत आणि म्हणूनच खोटे ही बिन दिक्कत बोलत आहोत
४ चौथे कारण म्हणजे भारतीयांनी व्यवहारातली एक बेसिक गोष्ट अजूनही पूर्णपणे शिकलेली नाही एकदा खऱ्याचे अस्तित्व पटले की मग खऱ्या विषयी विधान जे करू ते खरे असायला पाहिजे की नको तर ते खरेच असले पाहिजे आपण जर काय खरी विधाने केली नाहीत तर जगणे शक्य नाही जगण्याचा मुख्य आधार खरे बोलणे हा आहे आपण जर का एकमेकांशी खरे बोललो नाही तर आपण एकमेकाबरोबर नीट व्यवहार कधीही करू शकणार नाही म्हणजेच जगण्यासाठी जगण्याचा व्यवहार पार पाडण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत एक खरे काय आहे ते माहिती असणे दुसरी खोटे काय आहे ते माहिती असणे आणि तिसरी जे खरे आहे आणि खोटे आहे हे एकमेकाला स्पष्ट आणि स्वच्छपणाने सांगणे या तीन गोष्टी संपूर्ण व्यवहाराचा कणा आहे भारतीय जोपर्यंत आपल्या दैनंदिन व्यवहारात ही बेसिक गोष्ट स्वीकारत नाही तोपर्यंत ते एकमेकांशी खोटे बोलत राहणार आणि खोटे बोलणारी व्यवस्था टिकत नाही आपल्याकडे खोटे बोलणे हे अतिशय कॉमन होत चालले आहे किंबहुना त्या संदर्भात आपण पूर्णपणे बधिर झालेलो आहोत म्हणजेच आपण खरे बोलण्याबाबत बधिर आहोत खऱ्याविषयी बधिर झालेले लोक आहोत आपल्याला खऱ्याचे महत्त्वच कळत नाही आणि आपण लहानपणापासून शाळेत, घरामध्ये खरे बोलणे शिकवत नाही आहोत .अनेकदा आपण घरातच खोटे बोलायला शिकवायला लागतो आपण आपल्या मुलांशी खोटे बोलतो मुलांना खोटे बोलायला शिकवतो याचा परिणाम असा होतो की मुले खोटे बोलायला लागतात आणि मुलांची मुले मग नंतर खोटे बोलायला लागतात असे आपण पिढ्यानपिढ्या खोटे बोलत आलेलो आहोत आणि म्हणूनच आपला सगळा व्यवहार हा खोट्याचा व्यवहार बनत चाललाय आणि म्हणूनच मग फसवणूक करताना फसवणुकीची सुरुवातच मुळात खोटे बोलून होत असल्याने आपण आरामात फसवणुकीला सुद्धा सोकावलेलो आहोत फसवणूक थांबवायची असेल तर सर्वात पहिल्यांदा आपणाला खरे बोलावे लागेल आपण जोपर्यंत खरे बोलण्याचा आणि सत्य जाणण्याचा संस्कार आपल्या घरामध्ये रुजवत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये जे लोक आहेत ते हळूहळू खोटे बोलायला लागणार आणि खोट्या बोलण्यामध्ये ते एक्सपर्ट तज्ञ होणार आणि मग संपूर्ण समाज खोटारडा होणार . आपणाला हे करायचे आहे का हा प्रश्न आता आपण स्वतःला एकदा विचारायला हवा विचारायला हवा कारण ज्या जागतिकीकरणाच्या संस्कृतीमध्ये आपण आपली सत्ता महासत्ता बनवायला चाललेलो आहोत तिथे फार खोटे चालणे शक्य नाही. आपल्या मुलांना असं आपण का बनवतो हे आपण एकदा स्वतःला नीट विचारले पाहिजे कारण आपण त्यांना खोटे बनवायला लागलो तर आज ना उद्या जागतिक पातळीवरची लढाई लढायला तिथला संघर्ष जगायला ते कमी पडणार आहेत कारण समोरच्या अनेक संस्कृती अशा आहेत ज्या खरं बोलतात. त्यांच्या ऑफिसमध्ये अनेकदा आपल्यापेक्षा जास्त सत्याला महत्त्व मिळते आणि खरं बोलण्याला महत्त्व मिळते साहजिकच याबाबतीत भारताबद्दल आत्ताच शंका निर्माण व्हायला लागलेले आहेत या शंका अशाच वाढत गेल्या तर हळूहळू तुमचे व्यवहार आटत जाणार आहेत . तेव्हा मुलांना जर का नव्या जागतिकीकरणाच्या संस्कृतीमध्ये यश मिळावे असे वाटत असेल तर त्यांना सत्य जाण्याला शिकवा खरे बोलायला शिकवा आणि खरे ऐकवायला शिकवा आणि खरे ऐकायला शिकवा तरच ती टिकतील अन्यथा बॉसने खरे बोलले म्हणून नाराज होणारे अत्यंत संवेदनशील मन म्हणजे ऍक्च्युली बधिरपणाचा कळस असतो हा कळस गाठला गेला तर यश मिळणे शक्य नाही. किंवा मुलांना सत्याची चाड शिकवा
५ पाचवी गोष्ट आता एखादा मनुष्य खोटं बोलत असेल तर त्याचे करायचे काय याबाबतीत आपण नेहमी म्हणतो की माफ करून टाकावे किंवा कोर्टामध्ये केस टाकावी. आज कोर्टामध्ये इतक्या केसेस आहेत की आपल्याकडे एखादा मनुष्य खोटे बोलला किंवा त्याने आपली फसवणूक केली तर त्या संदर्भात काही शिक्षा होण्याची शक्यता जवळजवळ मावळते सर्व केसेस इतक्या लांबत जातात की खोट्याने किंवा खोटे बोलल्याने काही फरक पडतो असे आपल्या पब्लिकला वाटतच नाही वास्तविक खोटे बोलणे हे निषेधार्ह वाटायला हवे पण असे होतच नाही या सगळ्यामुळे खोटे आपल्या हाडामासात रोजच रुजत चाललेले आहे आणि आपण टीमक्या मात्र धर्माच्या वाजवत असतो . वास्तविक इस्लाम ,वैष्णव आणि ब्राह्मण धर्म यांचा अपवाद वगळता कुठलाही धर्म खोटे बोलायला सांगत नाही. युरेशियन धर्मामध्ये मात्र आपदा (आपद)धर्म नावाची एक संकल्पना असल्याने खोट्याला वाव आहे तरीसुद्धा आपल्याकडे अनेक लोक खोटे बोलतात हल्ली बहुजन समाजामध्ये सुद्धा यांचा परिणाम होत बहुजन समाज सुद्धा खोटे बोलायला शिकत आहे माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की सावध व्हा. युरेशियन धर्माच्या चुकीच्या गोष्टी कृपया आत्मसात करू नका .
६ सहावी गोष्ट खरे बोलण्याविषयीचे जे संस्कार असतात ते कोण करते हा सर्वात मोठा प्रश्न असतो आणि यासंदर्भात आपण जर का पाहिले तर दिसते असे की भारतामध्ये शैव श्रुतीतले सर्व धर्म व युरेशियन श्रुतीतले जैन आणि बौद्ध हे धम्म हे खरे बोलायला सांगतात परंतु आपल्या घरामध्ये अनेकदा आपण शैव श्रुती हल्ली स्वीकारत नाही आता आपण युरेशियन श्रुतीकडे येऊ तर तिथे सुद्धा आपणाला असे दिसते की जैन आणि बौद्ध धर्मामध्ये श्रमण परंपरा असल्याने खरे बोलण्याच्या संदर्भामध्ये सत्य बोलण्याच्या संदर्भामध्ये आग्रह आहे त्यामुळे यांच्या आधारे जे देश निर्माण झाले ते खरे बोलायला शिकले पण नंतर ब्राह्मण धर्मामध्ये आणि वैष्णव-धर्मामध्ये खोटे बोलणे हे माहित नाही कसे परंतु जणू परमिशन आहे असे मत प्रस्थापित झाले यामध्ये सर्वात मोठा वाटा हा श्रीकृष्णाचा आहे . महाभारतामध्ये युद्ध जिंकताना आपण खोट्याचा वापर केला तर काहीही बिघडत नाही असा कळत नकळत संस्कार आहे. आणि याचमुळे खोटे बोलणे हे वाईट असते हे धार्मिक पातळीवरच वैष्णव धर्माला मान्य नाही . श्रीकृष्ण डिप्लोमॅटिकली खोटे बोलतो आणि बहुतांशी भारतीय सुद्धा अत्यंत डिप्लोमॅटिकलीच खोटे बोलत असतात दुसरी गोष्ट ब्राह्मण धर्माचा यासंदर्भातला सार्वजनिक व्यवहारातला जो प्रमाण धर्मग्रंथ आहे तो कौटिल्याचा अर्थशास्त्र आहे . किंवा मग पुराणांच्या मध्ये सुद्धा अनेकदा राक्षसांना मारण्यासाठी फसवले जाते तर ते ग्राह्यच धरले जाते म्हणजे फसवणे हा एक प्रकार स्वीकारलेलाच आहे फक्त समोरच्याला राक्षस म्हणून सिद्ध करता आले पाहिजे आणि हे सिद्ध करण्याची गरज पडतच नाही .कुठल्याही माणसाला एकदा राक्षस म्हटले की तुम्ही कसेही मारले तरी चालते अशी काहीतरी पौराणिक नितीमत्ता दिसते नीतिमत्ता दिसते या सगळ्या पौराणिक संस्कारांच्या मुळे आज अवस्था अशी आहे की खोटे बोलण्यासंदर्भात काहीही आपल्याला वाटत नाही आणि म्हणूनच मग आपण स्वतःशी खोटे बोलतो इतरांशी खोटे बोलतो आपल्या फॅमिली मेंबरशि खोटे बोलतो आणि आपल्या दोस्तांशी खोटे बोलतो आणि मग हळूहळू सरकारशी सुद्धा खोटे बोलतो सगळे एकमेकाशी खोटे बोलायला शिकलेले आहेत अशा समाजामध्ये जिथे खऱ्याची काही चाड नाही तिथे व्यवहार करणे फार अवघड जाते कारण व्यवहाराचा आधार खरे बोलणे असतो आपल्याला जोपर्यंत ही बेसिक गोष्ट कळत नाही खरे बोलणे हे किती आवश्यक आहे हे कळत नाही तोपर्यंत कधीही गोष्टी नीट होणे शक्य नाही तेव्हा सर्वात प्रथम खरे बोला कारण जोपर्यंत खरे बोलत आहात तोपर्यंत व्यवहार व्यवस्थित चालण्याची शक्यता आहे तुम्ही एकदा खोटे बोलायला लागला की आपोआप समोरच्या व्यक्ती खोटे बोलायला लागतात आणि मग फक्त गंडीवफशीव सुरू होते तेव्हा विचार करा आपले साधे लग्नासंदर्भातले व्यवहार बघा आपण अनेक गोष्टी सहजरीत्या लपवत असतो ही लपवालपी येते कुठून? कारण आपल्या वर लहानपणापासून हे संस्कार होत जातात आणि पिढ्यान पिढ्या आता आपण हे करत चाललोय आपल्याला लाजा वाटणे सुद्धा बंद झालेले आहे खोटे बोलणे हा मुख्य संस्कार झालेला आहे तो जोपर्यंत आपण मिटवत नाही आणि खरे बोलणे हाच खरा संस्कार आहे हे आपण सांगत नाही बिंबवत नाही तोपर्यंत आपली जगायची दुनिया खऱ्याची होणार नाही. आज हळूहळू भारतीयांच्यावरचा विश्वास उडत चाललाय याचे सर्वात मोठे कारण बहुतांशी भारतीय खोटे बोलणे चुकीचे आहे असं मानत नाहीत. सार्वजनिक जीवनातला व्यवहार नीट व्हायचा असेल तर सर्वात प्रथम खरे बोलणे हे आपले सार्वजनिक मूल्य झाले पाहिजे कौटुंबिक मूल्य झाले पाहिजे सर्वात प्रथम हे मूल्य आपण कुटुंब म्हणून स्वीकारा आणि आपल्या मुलांना सांगा की कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीशी आणि प्रत्येक व्यक्तीने खरेच बोलले पाहिजे आपल्या आई वडिलांशी आपण खरेच बोलले पाहिजे आपल्या भावंडाशी आपण खरेच बोलले पाहिजे आपल्या गुरुजनांशी आपण खरेच बोलले पाहिजे आपल्या मित्रांशी आपण खरेच बोलले पाहिजे जोपर्यंत आपण हे खरे बोलणे आपल्या घरापासून सुरू करत नाही तोपर्यंत खोट्याचे राज्य घरामध्ये सुद्धा राहणार आणि मग आपण एकमेकाचा अंदाज घेत राहणार की आपण कधी खरे बोलतो आणि कधी खोटे बोलत आहोत आज फॅमिली मेंबर्स मध्ये तू कधी खरा बोलतो ते मला माहिती आहे अशा प्रकारचा आपण डायलॉग मारतो. म्हणजेच घरामध्येच आपण खोटे बोलणे स्वीकारलेले आहे आपल्या आई-वडिलांशी सुद्धा खोटे बोलायला आपल्याला काही वाटत नाही आणि हे आश्चर्यकारक आहे . आपल्या मुलांशी खोटे बोलायला आपल्याला काय वाटत नाही आपल्याला जर एखादी वस्तू देता येणे शक्य नाही तर सरळ सांगितले पाहिजे की मला हे देता येणे शक्य नाही कारण माझ्याकडे पैसा नाही परंतु असे होत नाही हे मन राखणे नावाचा जो चमत्कारिक भारतीय प्रकार आहे तो आपण बंद केला पाहिजे मन राखण्याच्या नादामध्ये आपण इतके खोटे बोलतो की हळूहळू त्याची सवय होत जाते मन राखल्यामुळे काही खोटे बाहेर पडायचे थांबत नाही ते येतेच आणि त्यामुळे जे मन दुखवते ते जास्त दुखवणे असते कारण एक तर वस्तुस्थितीमुळे मन दुखावतेच पण त्याचबरोबर समोरची व्यक्ती या संदर्भात खोटं बोलली याचे अधिकचे दुःख होते. म्हणजे दुःख डबल होते .
दुसरी गोष्ट प्रतिमा बिल्डिंग इमेज बिल्डिंग नावाचा एक मोठा प्रकार भारतीयांच्या मध्ये चाललेला असतो हा प्रकार आपण नेमका का आणि कशासाठी स्वीकारतो आहोत? आपल्याला आपण जसे आहोत त्याची का लाज वाटत असते? मुख्य म्हणजे ही लाज नेमकी कोण आपल्या मनामध्ये घालतं .? याची सुरुवात अनेकदा वर्ण जाती व्यवस्थेपासून सुरू होते. आपल्याला आपली जात लपवणे का गरजेचे वाटते कारण जातीनुसार फालतू रिस्पेक्ट च्या गोष्टी सुरू होतात त्या बंद झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक जातीला सर्वात प्रथम आपण रिस्पेक्ट द्यायला आदर द्यायला शिकलो पाहिजे आपल्या आयडेंटिटीज जर वर्ण जाती सारख्या खोट्या आयडेंटिटीज आहेत तर आपण खरे राहणार कसे? वर्ण जात या दोन तदन खोट्या आयडेंटिटी त्यासाठी सर्वात प्रथम स्वीकारणे बंद केले पाहिजे .
७ सातवी गोष्ट आपण बायकांना आदर दिला पाहिजे आणि बायकांच्या खरे बोलण्याला उत्तेजन दिले पाहिजे आपल्याकडे बायका अनेकदा केवळ त्या पुरुषसत्ताक अत्याचारांच्यापासून स्वतःला वाचवावे आणि ते थांबवावे म्हणून खोटं बोलतात .हे थांबले पाहिजे. वडिलांना न सांगता गोष्टी करणे भावाला न सांगता गोष्टी करणे हे सर्व येते कुठून ?हे सर्व वयामधून येते भयामधून येते आणि खोट्या चालीरीतीमधून येते त्यामुळे आपणाला या गोष्टी बदलायच्या असतील जर आपल्याला असे वाटत असेल की आपला सगळा व्यवहार खऱ्याच्या आधारे झाला पाहिजे तर आपल्याला आपल्या सर्व खोटेपणाला उत्तेजन देणाऱ्या आणि खोट्या प्रतिष्ठेच्या आणि खोट्या तर्कावर आधारित असणाऱ्या चालीरीती बंद कराव्या लागतील हे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत खोटे बोलणे खोटे थांबणे शक्य नाही
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment