फ्रेडरिक नीत्शे , उत्तर आधुनिकता आणि चौथी नवता श्रीधर तिळवे नाईक
उत्तरआधुनिकतेची सुरुवात ही फ्रेडरिक नीत्शे पासून सुरू होते असे मी मानतो याचे कारण त्याचे अनेक सिद्धांत आहेत ज्याच्या जीवावर नंतर उत्तर संरचनावादी आणि उत्तर आधुनिक वादी या दोन्ही लोकांनी आपली इमारत उभी केली. सर्वसाधारणपणे आधुनिकतेचा विचार हा जीव पातळीवर अस्तित्वापासून सुरू होतो फ्रेडरिक नीत्शे मात्र जीव पातळीवरचा विचार हा प्रामुख्याने पर्सनॅलिटी या ग्रीक शब्दापासून आणि संकल्पनेपासून करतो त्यामुळेच तो ग्रीक शोकांतिकेचा पुन्हा एकदा संपूर्ण विचार करतो आणि या शोकांतिकेमधून आलेल्या मुखवट्याचा म्हणजेच परसोन्याचा आणि पर्सनॅलिटीचा तो खोलात जाऊन विचार करतो . तो पुरोगामी लोकांच्या व्यक्तिगतता सब्जेक्टिव्हिटी इंडिविज्युअलीटी या संकल्पनांना नाकारतोच परंतु अस्तित्व वादाने सुरू केलेल्या अस्तित्व या संकल्पनेला सुद्धा तो अनेकदा नाकारतो याचे कारण कळत नकळत त्याचा उत्तर आधुनिक दृष्टिकोन आहे ज्याची कल्पना खुद्द त्यालाच बहुतेक आली नव्हती तो सर्व काही कन्स्ट्रक्शन मानतो रचित मानतो त्यामुळेच त्याला सब्जेक्ट इज डेड असे म्हणायची सुद्धा गरज वाटत नाही तो थेट पर्सनॅलिटीवर येतो आणि खुद्द तत्त्वज्ञाच्या पर्सनॅलिटीवर सुद्धा तो चर्चा करतो जी आत्तापर्यंत अनेकदा टाळली गेली माझ्या मते अनेकदा आधुनिक आणि उत्तर आधुनिक तत्त्वज्ञ जेव्हा तत्त्वज्ञान मांडत असतो तेव्हा तो स्वतःला तत्त्वज्ञ म्हणून त्या तत्त्वज्ञानामध्ये रचत सुद्धा असतो . त्याने रचलेला तत्त्वज्ञ काय आहे हे त्यामुळेच पाहणे आवश्यक असते कलेच्या क्षेत्रामध्ये आपण असे म्हणू शकतो की कलावंत कला निर्माण करताना स्वतः मधल्या कलावंताला सुद्धा रचत असतो आणि म्हणूनच कलेच्या क्षेत्रामध्ये कलावंताचे जैविक प्रकरण नेमके काय आहे हे तपासावे लागते आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनाच्या नावाखाली याची प्रचंड निंदा 1950 ते 19 90 पर्यंत चालली होती आणि वसंतराव पाटणकरांच्या सारखे अनेक लोक याची खिल्ली उडवत होते आणि मी त्यांची खिल्ली उडवत होतो कारण ते मुंबई विद्यापीठातल्या माझ्या मराठी डिपार्टमेंटमधले एका अर्थाने शिक्षक होते
त्यामुळे जेव्हा तुम्ही तत्त्वज्ञानाची किंवा कलेची चर्चा करत असता तेव्हा तुम्हाला तत्त्वज्ञाची आणि कलावंताची सुद्धा चर्चा करावी लागते आणि नाही केली तरी एक ना एक दिवस करणे भाग पडते . यातून एक असा गोंधळ निर्माण होतो की कलावंत जाणीवपूर्वक स्वतःचे व्यक्तिमत्व लपवून ठेवतात आणि समीक्षकांना त्यांनी कलेमध्ये रचलेले जे व्यक्तिमत्व आहे किंवा व्यक्तित्व आहे ते तुम्ही स्वीकारा असा इनडायरेक्टली इशारा देतात याचे कारण आपण एक्सपोज होऊ याचे कायमच कलावंतांना आणि तत्त्वज्ञाना भय वाटत असते .
पुरोगामी कला विचाराने जर सर्वात मोठी गोष्ट कुठली आणली असेल तर ती म्हणजे कलावंताच्या व्यक्तिमत्व भोवती त्यांनी फार मोठे ग्लॅमर उभे केले त्यामुळेच कलावंताच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे प्रत्येकाला आवश्यक वाटायला लागले. पुढे आधुनिकतेमध्ये सुद्धा फ्रॉइड हा एक असा मनुष्य झाला ज्याने कलावंताचे व्यक्तित्व केंद्रस्थानी आणायला सुरुवात केली त्याने व्यक्तिमत्वापेक्षा व्यक्तित्वावर भर द्यायला सुरुवात केली म्हणजे एका अर्थाने तो इंडिज्यूवालिटीचीच चर्चा करत होता आणि मुख्य म्हणजे मन या गोष्टीवर सारे लक्ष केंद्रित केले तो सायको एनालिसिस करत होता त्यामुळे हे साहजिक होते आणि कळत नकळत त्याच्या विचारावर फ्रेडरिक नीत्शे याचा प्रभाव होता परंतु तत्त्वज्ञ हा अनेकदा मनापेक्षा जास्त चित्तावर भर देतो आणि हे चित्त प्रकरण काय आहे हा एक फार गुंतागुंतीचा विषय होता आणि आहे
चित्तामध्ये सुद्धा महाप्रज्ञा , प्रज्ञा , शहाणीव , जाण , जाणीव , नेणीव , णीव अशा पातळ्या असतात त्यातील णीव ही फक्त आता हिंदीत नीव म्हणून उरलेली आहे आणि तिचा अर्थ फक्त पाया एवढाच झाला आहे एकेकाळी शैव इंडियन परंपरेत तिचा चित्ताशी असलेला संबंध गळून पडला आहे . मोक्ष मिळाल्यानंतर ज्या काही गोष्टी मिळतात त्यातील एक म्हणजे महाप्रज्ञा किंवा परम प्रज्ञा होय . परंतु होते असे की अनेकदा माणसे ही समाजाकडूनच कन्स्ट्रक्टेड होतात आणि अनेकदा ती स्वतःला कन्स्ट्रक्ट करतात म्हणजेच परसोना धारण करतात अनेक प्रकारच्या या परसोनांच्यामुळे मुखवट्यांच्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी तयार होते आणि हे पर्सनॅलिटी ते मिरवतच समाजामध्ये यश आणि पैसा प्राप्त करत असतात . त्यामुळेच कोसला मधला पांडुरंग सांगवीकर पुण्यामध्ये पर्सनॅलिटी कमवायला येतो याचा अर्थच आपल्याकडे ती नाही कारण आपल्या गावामध्ये आधुनिकता आणि उत्तर आधुनिकता नाही याची त्याला कल्पना आहे प्रत्यक्षात मात्र तो स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रश्नांनी इतका घायाळ होतो की थेट परंपरेत दाखल होतो . दुर्दैवाची गोष्ट अशी की ही परंपरा आधुनिक नाही तर पारंपारिक आहे . त्यामुळेच मी अनेकदा म्हटले आहे की कोसला परंपरेमुळेच आणि पारंपारिक परंपरेमुळेच लोकांना आवडते . आधुनिक होण्यात फेल गेलेल्या माणसाची ती शोकांतिका आहे. त्यामुळेच अनेकदा मुंबईतन परतलेल्या लोकांना ती अधिकच भावते.
फ्रेडरिक नीत्शे असो की सिग्मंड फ्राईड असो दोघांच्या वर शॉपेनहॉवेअर याचा प्रभाव आहे हे तत्त्वज्ञानाचा इतिहास यांना माहिती आहे त्यांना नीट माहिती आहे पण फ्रेडरिक नीत्शे हा कितीतरी पुढे येतो आणि पर्सनॅलिटीच्या संदर्भात अधिक खोलात जातो
फ्रेडरिक नीत्शे स्पष्ट पणाने हे सिद्ध करतो की सत्य हे फक्त मानवी सत्यच असते आणि आपल्या कामाला फक्त मानवी सत्यच येऊ शकते इतर प्रकारचे सत्य आपल्या कामाला येईलच असे नाही त्याच्या या सत्याविषयीच्या सिद्धांताचा प्रचंड प्रभाव उत्तराधुनिकतेवर पडलेला आहे अलीकडे या उत्तर अधिनुकतेची मजल त्यामुळेच जर सत्य का मानवीच असेल तर मग ते मानवानेच का कन्स्ट्रक्ट करू नये इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यातूनच आत्ताचे तथाकथित पोस्ट truth राजकीय युग अवतरलेले आहे कारण आता राजकारणी सुद्धा व्यक्तिमत्व निर्माण करत असतात पर्सनॅलिटी निर्माण करत असतात आणि ही पर्सनॅलिटी मिळवत असतात आणि आश्चर्यकारकरीत्या त्यांचे मतदार या पर्सनॅलिटीलाच मत देत असतात प्रत्यक्षात तो माणूस काय आहे याचा कसलाही शोध जनता घेत नाही तिला तो घ्यायचा सुद्धा नाही कारण त्यांच्या दृष्टीने पर्सनॅलिटी रूपच true असते फ्रेडरिक नीत्शे याने जनतेच्या या सगळ्या मानसिकतेचा आधीच उच्चार केला होता म्हणूनच आज त्याला सर्वाधिक द्रष्टा तत्त्वज्ञ म्हणावे लागते मी हे नेहमीच सांगत आलेलो आहे की या कालखंडातला मला आवडलेला सर्वात मोठा तत्त्वज्ञ म्हणजे फ्रेडरिक नीत्शे होय कारण तो माझा आवडता शत्रू आहे त्याच्याशी लढायला मला आवडते शेवटी कुस्तीच खेळायची असेल तर ती फ्रेडरिक नीत्शे सारखा मातब्बर पैलवानाशीच खेळली पाहिजे आपल्याकडे हे अशा प्रकारचे उत्तराधुनिक स्वरूप आणि पर्सनॅलिटी घेऊन येणारे तत्त्वज्ञ म्हणून आपण ओशो रजनीश यांना पाहिले पाहिजे . त्यांच्यावर फ्रेडरिक नीत्शे याचा असलेला प्रभाव त्यांनी अनेकदा मान्य केलेला आहे ओशो रजनीश आणि फ्रेडरिक नीत्शे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत फक्त एक बाजू युरोपियन आहे दुसरी बाजू भारतीय इतकाच काय तो फरक ! दुसरा फरक हा मोक्षाचा आणि धर्माचा आहे ओशो रजनीश्यांनी स्वतःला सुपरमॅन करण्याचा केलेला प्रयत्न हा मोक्षा मधून वाटचाल करणारा वाटत असल्याने अनेक मोक्षवाले आणि धार्मिक लोक त्यांच्या प्रेमात पडलेले दिसतात आपल्याला ओशो रजनीश्यांनी स्वतः ला बांधून आपल्या मधून सुपरमॅन निर्माण करून गंडवले आहे हे त्यांना कळले सुद्धा नाही मला ते फार लवकर कळले आणि माझ्या एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गारमध्ये यावर एक कविता सुद्धा आहे एखादा माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये ओशो रजनिशांच्या संदर्भात धर्माच्या क्षेत्रामध्ये कशी स्वतःची पर्सनॅलिटी निर्माण करतो आणि या त्या पर्सनॅलिटीच्या जीवावर कसे स्वतःचे पर्सनल साम्राज्य उभे करतो याचा नमुना म्हणून ओशो रजनीश यांचा अभ्यास करायला हवा . फ्रेडरिक आणि ओशो यांच्यातला फरक हाच आहे की ओशो यांना ते साधले जे फेडरिक यांना कधी साधले नाही याचे कारण काळामध्ये फरक पडला होता आणि उत्तर आधुनिकता ही मुळातच आता स्वीकारण्याजागी गोष्ट झाली होती जिचा फायदा ओशो रजनीश्यांना मिळाला .ज्या वेळेला पुण्यामध्ये पांडुरंग सांगवीकर फेल होत होता त्यावेळेला ओशो रजनीश पुण्यामध्येच जाऊन यशस्वी व्हायची तयारी करणार होते आणि पुढे होणार होते आणि पुढे झालेही या दोघांच्यातला फरक आणि या दोघांचाही पुण्याच्या संस्कृतीवर पडलेला आणि एकंदरच महाराष्ट्राच्या संस्कृतीवर पडलेला प्रभाव यांची एकदा कोणीतरी सामाजिक तुलना करायला हरकत नाही कारण या तुलनेमध्ये मराठी लोकांच्या संस्कृतीची गोची दिसते कारण हे सर्वच्या सर्व परंपरेमध्ये जात होते पण फ्रेडरिकचा अपवाद वगळता ओशो रजनीश आणि भालचंद्र नेमाडे हे दोघेही परंपरेच्या कोसलामध्ये अडकले त्यातील ओशो काही प्रमाणात सुटले आणि त्यांनी संपूर्ण उत्तर भारतच एका अर्थाने पारंपारिक केला आणि मुक्तही केला नेमाडे यांनी मात्र मराठी साहित्यिक संस्कृती परंपरेच्या खुंट्याला जाऊन बांधली . ज्या वेळेला ओशो अमेरिकेत जाऊन रजनीशपूर निर्माण करत होते त्यावेळेला नेमाडे महाराष्ट्रातल्या गावागावात हिंडत होते . यामध्ये सर्वात मोठी गोची मराठी लोकांची झाली कारण त्यांना एका बाजूला ओशो हवे आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते पांडुरंग सांगवीकर आहेत किंवा होते भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरिकरणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ओशो रजनीश हे या उत्तरिकरणाचे एक आद्य संस्थापक म्हणून आपले नाव घ्यायला भाग पाडतील. हे सर्व त्यांनी पर्सनॅलिटीच्या जीवावर निर्माण केलेले गेलेले षडयंत्र आह किंवा कन्स्ट्रक्शन आहे आणि भल्या भल्या लोकांच्या अजूनही ते लक्षात आलेले नाही. आपल्याकडे आजही मुकेश माचकरांच्या सारखे काही अति फॅन लोक आहेतच. पूर्वी शिरीष पै अशा होत्या .
याशिवाय बॉलीवूड मधून आलेल्या अनेक अभिनेत्यांच्या आणि सुपरस्टार लोकांच्या पर्सनॅलिटी चा प्रभाव सुद्धा मराठी लोकांच्या वर पडलेला आहे आणि त्यामुळेच मराठी संस्कृती नष्ट होण्यामध्ये जेवढा बॉलीवूडचा वाटा आहे तेवढा कदाचित कुठल्याच इंडस्ट्रीचा नाही बाकी सर्व इंडस्ट्रीचा पाया बॉलीवूड इंडस्ट्रीने रचलेला आहे . मुंबई त्यांच्यामुळेच बोंबलत गेली आणि आता जो काही चाललेला शोक आहे तो तुमच्या बॉलिवूडच्या शौकांमधूनच निर्माण झालेला आहे.
खुद्द बॉलीवूड सुद्धा एक पर्सनॅलिटी आहे जी अनेक प्रकारच्या मुखवट्यांच्या पासून बनत असते . तिचे सर्व काही चित्रण अडा हॉ का बाना सुना या कादंबरीमध्ये केलेले आहे त्यामुळे अधिक तपशीलवार चर्चा करत नाही ज्यांना रस आहे त्यांनी ती कादंबरी मिळवून वाचावी
या पर्सनॅलिटीच्या सिद्धांतामुळेच असेल परंतु
फ्रेडरिक नीत्शे स्वतः आपल्यातला तत्त्वज्ञ आणि आपले तत्त्वज्ञान एखाद्या नटा सारखे सादर करत जातो आणि हा नट अनेकदा सुभाषिते फेकत राहतो जेणेकरून टाळ्या मिळाव्यात. निदान पक्षी काही झाले नाही तरी आपले डायलॉग ठसठशीत ठसावेत . यासाठी ज्यांना रस असेल त्यांनी त्यांचा Beyond Good and Evil या पुस्तकाचा चौथा भाग वाचावा किंवा Maxims and Interludes हे पुस्तक वाचावे .
साहजिकच याचा खणखणीत प्रभाव अमेरिकेवर पडत गेला आणि त्यामध्ये सर्वाधिक फ्रेडरिक नीत्शे याचा प्रभाव कोणावर पडला असेल तर ती व्यक्ती म्हणजे आयन रँड होय .आयन रँडवर मी फार काही लिहिले नाही याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मला ती कधीच फार ओरिजिनल वाटली नाही याचे कारण मी तिचे वाचन करण्याआधीच फ्रेडरिक नीत्शे वाचला होता तिचे नायक म्हणजे सुद्धा दुसरे तिसरे कोणी नसून फ्रेडरिक नीत्शे याचे सुपरमॅन आहेत आपल्याकडे अलीकडे खूप तिची चर्चा आहे म्हणून मी हे सांगतो आहे . मग फरक कुठे आहे तर ती फ्रेडरिक नीत्शे सारखी मुखवटे पांघरू इच्छित नाही तर मुखवटे फाडू इच्छिते . प्रत्यक्षात गंमत अशी आहे की ती स्वतःच अमेरिकन संस्कृतीकडून स्पॉन्सर झालेली पर्सनॅलिटी आहे आणि त्यामुळेच ती अंतिमतः फ्रेडरिक नीत्शेचा सुपरमॅनच सादर करत राहते . फ्रेडरिक नीत्शे याचा सुभाषित फेकण्याचा छंद तिच्याही लिखाणामध्ये आढळतो .
फ्रेडरिक नीत्शे कधी कधी ग्रीक नाटकातल्या स्वगतातील लेखन शैलीसारखे दीर्घ च्या दीर्घ पॅसेज लिहितो कधी कधी काव्याच्या नादात भटकतो आणि पुन्हा स्वतःत परततो त्यामुळेच ज्यांना कवितेची सवय नाही त्यांच्यासाठी फ्रेडरिक नीत्शे हा तत्वज्ञ म्हणून खूप अवघड बनून जातो त्या उलट माझ्यासारख्या कवी माणसाला फ्रेडरिक नीत्शे हा फार सोपा तत्त्वज्ञ वाटतो फक्त आपण कविता वाचतोय असे समजावे.
एका अर्थाने फ्रेडरिक नीत्शे तत्त्वज्ञान लिहित नाही तो तत्त्वज्ञाचे आणि तत्त्वज्ञानाचे नाटक लिहितो आणि हे नाटक लिहिताना तो ग्रीक नाटकांच्यासारखे काव्यात्मक पद्धतीने लिहित जातो. ग्रीक नाटकांचा आणि फ्रेडरिक नीत्शे यांचा सुरुवातीपासून असलेला थेट संबंध जर का तुम्ही लक्षात घेतला नाही तर तुम्हाला फ्रेडरिक नीत्शे कळणे अवघड जाते
ज्या लोकांना शैव श्रुती मधली तंत्र परंपरा आणि तंत्र लेखन शैली माहिती आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारचे लेखन नवीन नाही त्यामुळेच तुम्ही जर का माझ्यासारखे एखाद्या शैव दर्शनाचे आचार्य म्हणून वाढले असाल तर तुमच्यासाठी फ्रेडरिक नीत्शे हा तितका अवघड बनत नाही किंबहुना ज्याला तंत्र म्हटले जाते आणि जे प्रत्यक्षात शक्ती तंत्र आहे ते तंत्र सर्वात प्रथम तुमची पर्सनॅलिटी फाडते आणि ऑथेंटिक काय आहे ते तपासायला भाग पाडते . दुर्देवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे तंत्र म्हणजे काहीतरी शारीरिक संभोग वगैरे अशी संकल्पना निर्माण झाली आणि त्यात ओशो रजनीश्यांच्या पर्सनॅलिटीचा प्रचंड वाटा आहे किंबहुना त्यांचा हा सर्वाधिक प्रभावी आणि वादग्रस्त मुखवटा होता हा लैंगिक मुखवटा आणि प्रत्यक्ष तंत्र यांचा या शक्ती तंत्राशी काडीचाही संबंध नाही तिचा संबंध शक्तीशी आहे आणि शक्ती सृजनशील असते ती जेव्हा सृजनशील असत नाही तेव्हा ती मग आपोआपच समाजाकडून कन्स्ट्रक्ट केली जाते हे साधारण कामवासने सारखे असते तुम्ही स्वतःची कामवासना स्वायत्त ठेवा नाहीतर समाज ती स्पॉन्सर केल्याशिवाय राहत नाही .
फ्रेडरिक नीत्शे याला हे किती कळले होते हा एक फार मोठा प्रश्न आहे मात्र फ्रेडरिक नीत्शे भारतात जन्माला असता तर तो कदाचित तंत्राच्या साह्याने मोक्षाला पोहोचला असता . त्याने ओशो रजनीश्यांच्यासारखे फेक गुरु कचऱ्यात फेकून दिले असते आणि कदाचित चांगला गुरु शोधून किंवा स्वतःचा शोध घेत स्वतःच गुरु बनत मोक्ष मिळवला असता असो
ओशो यांनी फ्रेडरिक नीत्शे याच्याकडून संकल्पनांची तात्काळ निघता घेतली त्यामुळेच दोघांच्यातही अनेकदा आज हे आणि उद्या ते इथे ते आणि उद्या तिथे असा कायमच फरक पडत राहतो आणि तुम्हाला तिथी संकल्पना त्या त्या संदर्भातच तपासायला लागते अन्यथा तर्कशास्त्र लागू पडत नाही फ्रेडरिक नीत्शे यांना हे इतके स्पष्टपणे कळले नव्हते पण रजनीश्यांना मात्र हे स्पष्टपणे कळल्याने त्यांनी त्याचा पुरस्कार सुद्धा केलेला दिसतो हे समर्थन आहे पण हे समर्थन आवश्यक बनते कारण जीवन प्रणाली आणि विचारप्रणाली यांच्या मधले द्वैत इथे संपुष्टात येते आणि जीवना इतकेच विचार सुद्धा तात्कालीक असतात त्या त्या क्षणी असतात याची जाणीव आपणाला होत राहते
जग बदलत असते आणि सतत बदलत असते आणि त्याप्रमाणेच तत्वज्ञ आणि त्याचे तत्वज्ञान सुद्धा सतत बदलत असते असे काहीतरी फ्रेडरिक नीत्शे यांच्या बाबतीत घडताना आपणाला दिसते त्याच्याच भाषेत सांगायचे तर प्रत्येक संकल्पना आहे टेम्पररी रेस्टिंग प्लेस असते आणि त्यांचा उद्देश हा ग्रेट अंडरस्टँडिंग कडे जाणे हा असतो ज्या पायरीवर नीत्शे उभा असतो ती पायरी कायमच फ्रेडरिक नीत्शे सकट पुढच्या पायरीवर नाहीशी होऊ शकते त्यामुळेच त्याचे तत्त्वज्ञान शहाणपण देते पण तत्त्वज्ञान देत नाही आणि मुळात बहुदा त्याचा उद्देश हाच आहे शेवटी श्रद्धेची ताकद कशात होती तर शहाणपणात होते एका अर्थाने फार खोलात तो श्रद्धेत जातो आणि श्रद्धे कडून शहाणपण घेऊन येतो कवितेत जे खेळ कविता आणि कवी खेळतो ते सारे खेळ फ्रेडरिक नीत्शे खेळत राहतो त्यामुळेच अर्थांची अनिश्चितता सतत निश्चित होत राहते . साहजिकच वाचकांचे स्टॅंडर्ड तो गृहीत धरतो . प्रत्यक्षात ते अस्तित्वात नसले की वाचक गोंधळायला लागतो. याचा अर्थ असा नाही की तो संदिग्धता जाणीवपूर्वक निर्माण करतो ती आपोआपच निर्माण होत जाते तो फक्त त्या त्या जीवनाच्या त्या त्या अंगाला जास्तीत जास्त चिन्हात्मक चेहरा देण्याचा प्रयत्न करत असतो .
हे वाचून फ्रेडरिक नीत्शे वाचण्याची इच्छा निर्माण झाली तरी खूप झाले उत्तर आधुनिकतेची चर्चा करायची आणि फ्रेडरिक नीत्शे हा त्या तत्त्वज्ञानाचा पायोनियर मात्र वाचायचा नाही असा उद्योग खूप जण करत असतात म्हणून त्यांच्यासाठी हा लेख लिहिला होता तो इथे पुन्हा थोडा दुरुस्त करून टाकला आहे
श्रीधर तिळवे नाईक
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक
नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
फ्रेडरिक नीत्शे फ्रेडरिक नीत्शे
Comments
Post a Comment