मेस्सी ,actional इंटेलिजन्स आणि चौथी नवता श्रीधर तिळवे नाईक 

मेस्सी आणि त्याची टीम आता वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मध्ये आहे आणि कदाचित हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप आहे त्यामुळे साहजिकच त्याच्या सगळ्या खेळाचे विश्लेषण आता सुरू आहे खरे तर तो जेव्हापासून आला आहे तेव्हापासूनच मी त्याच्यावर नजर ठेवून आहे कारण फुटबॉल मधला जीनियस म्हणूनच त्याची सुरुवात झाली होती. फुटबॉल हा एक असा खेळ आहे जो पाहायला आणि खेळायला फार सोपा आहे परंतु समजून घ्यायला फार कठीण ! एका अर्थाने तो आयुष्यासारखाच आहे . माझा स्वतःचा फुटबॉल मधला मैदानावरचा शत्रू आणि वैयक्तिक आयुष्यातला अत्यंत जानी दोस्त अरुण साटम हा सुद्धा त्याचा फॅन ! पण विश्लेषणाची वेळ आली की सर्वच पळून जातात याचे कारण फुटबॉल विषयीचे विश्लेषण फार अवघड असते क्रिकेट जेवढे गणिती आहे तेवढा फुटबॉल नाही याचे कारण इथे एकाच वेळेला 11 खेळाडू तुमच्यावर चल होत चाल करून येऊ शकतात क्रिकेटमध्ये असे होत नाही कारण तिथे फक्त गोलंदाज चाल करून येत असतो आणि नंतर इतरांना फक्त डिफेंड करावा लागतो .ते इतर तुमच्यावर चाल करून तुमच्या अंगावर येत नाहीत . त्यामुळेच क्रिकेटमध्ये अंपायर एका जागी उभा राहू शकतो फुटबॉल मध्ये हे शक्य नसते . एका अर्थाने फुटबॉल हा सुद्धा चल खेळात येतो . आणि सर्व चल खेळामध्ये कितीही खेळाडू अंगावर येऊ शकतात आणि तुम्हीही चाल करून जाऊ शकता आणि चाल करताना तुमच्याकडे सुद्धा खेळाडू असतात आणि मुख्य म्हणजे मैदान सर्वांनाच खुले असते. क्रिकेटमध्ये हे घडत नाही त्यामुळे खेळ म्हणून क्रिकेट आता लोकप्रिय झाला असला तरी फुटबॉल मध्ये जी शारीरिक आणि क्रियात्मक क्षमतेची कसोटी लागते ती क्रिकेटमध्ये लागत नाही याबाबतीत फुटबॉल 100 मांडला तर क्रिकेट फक्त 80 आहे. मात्र दोन्हीकडे स्किल मधला फरक आहे फुटबॉल मध्ये पाय तर क्रिकेटमध्ये हात मुख्य आहेत क्रिकेटमध्ये शारीरिक पातळीवर डोके वाचवावे लागते फुटबॉल मध्ये ते शारीरिक पातळीवर सुद्धा वापरावे लागते हेल्मेट नव्हते तेव्हा क्रिकेटमध्ये डोके शारीरिक पातळीवर खूप खतरनाक स्टेज मध्ये होते फुटबॉल मध्ये ही शक्यता थोडी कमी होते पण असतेच फुटबॉल एका अर्थाने हात सोडून सर्वांगाने खेळायचा खेळ आहे आणि आश्चर्यकारकरीत्या क्रिकेट मुख्यत्वे फक्त हाताच्या साह्याने खेळायचा खेळ आहे. साहजिकच एका अर्थाने हे "दोन ध्रुवावर दोघे आपण " असे खेळ आहेत त्यामुळेच ते दोन्ही खेळ खेळताना मजा येते एकात हाताचा व्यायाम होतो तर दुसऱ्या मध्ये हात सोडून उरलेल्या सर्व गोष्टींचा व्यायाम होतो अर्थातच दोन्हीमध्ये मेंदूला बौद्धिक गोष्टींना समानच व्यायाम आहे. दोन्ही खेळांचे स्वतंत्र बौद्धिक व्याप आहेत आणि त्यांचे विश्लेषण सतत चाललेले असते 


मेसीबाबत अलीकडे आलेली एक विलक्षण थेरी हीच आहे ती म्हणजे तो मैदानावर इतरांच्या पेक्षा जास्त स्कॅनिंग करतो आणि म्हणून तो इतका यशस्वी आहे. हा सिद्धांत खरोखर स्वीकारता येईल का की तो अपुरा आहे ?


प्रत्यक्षात त्याचे स्कॅनिंग परसेंटेज काढले तर ते जास्त आहे यात शंका नाही पण मला वाटते की सर्वात महत्त्वाची गोष्ट स्कॅनिंग मध्ये मेस्सीची असलेली निरीक्षण क्षमता आहे तो फक्त एकाच जागी राहून ऑब्झर्वेशन करतो ही दंतकथा आहे तो पळत पळत सुद्धा अचूक निरीक्षण करत असतो हा माझा स्वतःचा निष्कर्ष आहे.


कुठल्याही खेळामध्ये विशेषत: सांघिक खेळामध्ये टेलिफोनिक क्षमता ही सर्वाधिक महत्त्वाची असते कारण तुमच्या आणि विरोधी संघाबरोबर असणारे सतत होणारे तुमचे संप्रेषण, संवादन आणि संभाषण हे फार महत्त्वाचे होऊन बसते . एका अर्थाने खेळ कम्युनिकेशन ची गोष्ट आहे आणि भारतामध्ये वर्णव्यवस्थेने कम्युनिकेशन्स उध्वस्त केल्यामुळे ( आपण मुसलमानांच्या कडून पराभूत झालो त्याला एक मोठे कारण हे वर्ण जातव्यवस्थेने कम्युनिकेशन उध्वस्त करणे आहे मुस्लिम समाजामध्ये जेवताना सुद्धा व्यवस्थित एकाच थाळीत जेवण्याचा प्रघात आहे आणि त्यामुळे कम्युनिकेशन होते सर्व हिंदू धर्मामध्ये फक्त आपल्या कुटुंबाचे आणि जातीचे लोक एकत्र जेवण करतात आणि म्हणूनच भारतामध्ये म्हणजे मरण आणि तोरण फार महत्त्वाचे होऊन बसते कारण ती एकच जागा अशी असते जिथे सर्व वर्ण जात धर्म एकत्र जेवण करतात पण दुर्दैवाने पूर्वीच्या काळी इसवी सन 1000 नंतर त्याच्यात सुद्धा स्वतंत्र पंक्ती मांडल्या जात होत्या त्यामुळे कम्युनिकेशन होणार कसे जे लोक अजून सुद्धा वर्ण जात व्यवस्थेचे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये स्पोर्टिंग स्पिरीट नसते असे खुशाल समजावे) .आणि कम्युनिकेशन वर प्रचंड लिमिटेशन्स असल्यामुळे खेळाबाबत बोंब झाली आजही आपण या संदर्भामध्ये प्रचंड मागासलेले आहोत याचे कारण आपल्याला संप्रेषण करायचे असते आणि ते फार महत्त्वाचे असते याची अजूनही जाणीव नाही आपले सगळे संप्रेषण हे पूर्णपणे वैयक्तिक असते आणि आपल्या कुटुंबाच्या बाबतीत असते बाकीच्या सर्व क्षेत्रांमध्ये संप्रेषण कमी आणि संवादन आणि संभाषण जास्त असते पण अनेकदा संप्रेषण न झाल्यामुळे भारतात जेवढी भांडणे होतात तेवढी जगात कुठेच होत नसावीत कारण अजूनही आपणाला संप्रेषणाचे महत्व कळलेले नाही आणि संप्रेषण हे अनेकदा शरीराच्या हालचाली मधून व्यक्त होत असते त्याबाबतीत मुळातच आपण असे काही वेगवेगळे फांदे मारलेले आहेत की बोंबच आहे . आपला हा संप्रेषण नाकारणारा राष्ट्रीय स्वभाव त्याला अलीकडे काही लोक उत्तेजनच देत आहेत अलीकडच्या काळामध्ये फारच बोकाळलेला आहे तो खेळाच्या बाबतीत फार महागात पडतो कारण खेळ फक्त संवादन आणि संभाषण यांच्यावर चालत नाहीत तिथे संप्रेषणच मुख्य असते आणि त्याचे माध्यम म्हणून संभाषण आणि संवादन चालते .( संवर्धन आणि संभाषण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अनेकांना तशा त्या वाटत नाहीत म्हणून फरक सांगतो संवादनमध्ये फक्त संवाद होतात पण बॉडी जवळजवळ अनुपस्थित असते इस्लाममध्ये बाई बुरख्यामध्ये असल्यामुळे हे खूप वेळा घडते. विशेषतः प्रेमप्रकरणांमध्ये तर शब्दच महत्वाचे होऊन बसतात आणि म्हणूनच गजल वगैरे वगैरे चालते . शरीराच्या अभिव्यक्तीसाठी प्रेम प्रकरणांमध्ये जागाच नसल्याने अनेकदा तारांबळ उडते अलीकडे टेलिफोन आणि नंतर मोबाईल फोन आल्यानंतर आपण हळूहळू अनुपस्थितीला प्रचंड महत्त्व द्यायला लागलेलो आहोत त्यामुळेच संवादन प्रचंड वाढलेले दिसते त्या उलट संभाषणामध्ये मात्र प्रत्यक्ष शरीर उपस्थित असते आणि हे शरीर संप्रेषण करायला मुक्त असते हा दोन्ही मधला फार मोठा फरक आहे हे लक्षात घ्यावे अलीकडच्या काळामध्ये जे संभाषणाच्या नंतर प्रॉब्लेम येत आहेत त्याचे कारण बॉडी लँग्वेज उपस्थित नसते आता व्हिडिओ कॉल आल्याने थोडा प्रश्न कमी झाला . नाही तर मधल्या काळात हे जरा जादाच होते . मला वाटते ही गोष्ट आता क्लिअर झाली असेल)


स्वतःला हिंदू संस्कृती म्हणून स्वतंत्र काढताना या संस्कृतीचा खेळामध्ये इतका का प्रॉब्लेम झाला हा प्रश्न खरे तर विचारायला पाहिजे पण आपण असे प्रश्न विचारत नाहीत कारण ते वर्ण जात व्यवस्थेच्या विरोधात जातात. आपण काय प्रकारचा गोंधळ घातलाय याची अजूनही आपणाला कल्पना नाही असो खेळाचे म्हणून एक समाजशास्त्र आहे त्याचा विचार करावाच लागतो आणि त्यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार होतो. खेळामध्ये आपण अजून लँडफोनिक लेवल सुद्धा गाठलेली नाही अपवाद फक्त क्रिकेट आहे आणि म्हणूनच तिथे अधून मधून तळपत असतो अलीकडे भालाफेक कारण मुळात आपण भाला शोधला असा आपला विश्वास आहे आणि त्याचे श्रेय शिवपुत्र कुमार स्कंदला जाते त्याने पहिला भाला तयार केला असे मानले जाते अर्थातच ही श्रद्धा आहे तिला प्रत्यक्ष पुरावे काय हा फार मोठा प्रश्न आहे कारण केवळ कथेमधून चालत आलेले हे निवेदन आहे 


जगाच्या इतिहासामध्ये सर्वच पिढ्यांच्यामध्ये जे बदल घडत आले त्यात आमची पिढी ही एक क्रांतिकारक पिढी म्हणून ओळखली जाईल याचे कारण आम्ही चौथी नवता जगभर सर्वत्र वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणली फुटबॉल याला अपवाद नाही . मेसी हा आमचा एका अर्थाने फुटबॉल मधला चौथ्या नवतेचा एक प्रतिनिधी आहे .


आधुनिक फुटबॉल मध्ये साधारणपणे लँड फोनिक संप्रेषण जाऊन हळूहळू जेसम फोनिक संप्रेषण उदयाला आले आणि पेले हा त्यातला पहिला खेळाडू होता परंतु आमच्या पिढीने हळूहळू हे सर्व बदलत नेले आणि ज्याला आज आपण मोबाईल म्हणतो तसे मोबाईल आणि पुढे मोबाईल स्मार्ट संप्रेषण आमच्या पिढीने फुटबॉल मध्ये प्रस्थापित केले आणि या सगळ्यांमध्ये जे काही पाच मास्टर फुटबॉलर आले त्यामध्ये एक मेस्सी आहे. काहींच्या मते तो सर्वश्रेष्ठ आहे. जर का आपणाला त्याची ताकद समजून घ्यायची असेल तर मोबाईलीक असणे म्हणजे काय हे तपासावे लागेल 


ज्याप्रमाणे एखादा मोबाईल फिरता फिरता सर्व प्रकारची अनेक नेटवर्कस स्वतःमध्ये कॅच करत राहतो पकडत राहतो आणि हाताळत राहतो त्याप्रमाणे मेसी एक संपूर्ण नेटवर्क घेऊन चालत असतो आणि इतरांच्या नेटवर्कशी संपर्क ठेवून ती सहजरीत्या शारीरिक पातळीवर पायाळत असतो. तो पूर्णपणे मोबाईलीक असतो एकाच वेळेला तो चार खेळाडूंच्याकडून पास घेण्याची किंवा खेळाडूंना पास देण्याची शक्यता आजमावू शकतो आणि ती त्याची सर्वात मोठी ताकद आहे त्याची दुसरी क्षमता अर्थातच एकाच वेळेला तो किमान तीन खेळाडूंच्या सर्व हालचालींच्यावर नजर ठेवू शकतो आणि गॅप काढून चेंडू काढू शकतो किंबहुना चौथ्या नवतेतल्या सर्व फुटबॉलपटूंच्या मध्ये आपणाला ही खासियत दिसते यासाठी तुमच्याकडे स्कॅनिंग करण्याची अद्भुत क्षमता लागते आणि ती सुदैवाने त्याच्याकडे जन्मदत्त आहे . यासाठी तुम्ही जेवढे चंचल असावे लागता तेवढेच फोकसड असावे लागता आणि हा जो समतोल आहे तो त्याच्याकडे प्रचंड आहे आणि ती त्याची खरी ताकद आहे . 


मुख्य म्हणजे मेसी पळता पळता संपूर्ण मैदान बघू शकतो आणि त्याच वेळेला समोरच्या आणि स्वतःच्या फुटबॉल वर त्याचे लक्ष असते आणि हे केवळ अद्भुत आहे . पेलेमध्ये असे कौशल्य होते की नाही हे सांगणे कठीण आहे कारण आपल्याला त्याचे फार कमी व्हिडिओ उपलब्ध आहेत परंतु अलीकडच्या काळातले पाचच्या पाच लिजेंड लोक हे याबाबतीत प्रवीण दिसतात पण मेसी हा जास्त पुढे जात गेला याचे सर्वात मोठे कारण मैदानाबाहेरचे संप्रेषण त्याने इतके जिवंत ठेवले की तो जवळ जवळ आपल्या टीमचा प्रेषित झालेला आहे त्याचे सहकारी त्याच्यासाठी मरूसुद्धा शकतात याचे कारण तो त्यांच्यासाठी मरू शकतो. तो केवळ फक्त आपली संधी घेत नाही जर दुसऱ्याला गोल करण्याचा चान्स जास्त असेल तर तो त्याच्याकडे चेंडू पास करतो स्वतः गोल करण्याच्या फंदात पडत नाही आणि हे जे निस्वार्थी पण आहे ते विलक्षण आहे कळत नकळत तो इथे संत आहे त्यामुळेच त्याच्या सहकाऱ्यांचा त्याच्या सगळ्या चांगुलपणावर विश्वास असतो आपल्याकडे असा चांगुलपणा असला की त्याला टोचून टोचून मारतील इतके लोक वैयक्तिक स्वभावाच्या पातळीवर हलकट झालेले आहेत. बाहेरच्या जगामध्ये सुदैवाने या प्रकारच्या हलकटपणाचे इतके प्रमाण नाहीये कारण त्यांना स्वार्थ नीट कळतो आणि भारतामधल्या लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जर कुठला असेल तर तो म्हणजे स्वार्थापेक्षा त्यांचा अनेकदा अहंकारच मोठा होऊन जातो. खुद्द मेस्सी कडे असा अहंकार नाही मात्र आपण काय आहोत हे त्याला माहिती आहे पण त्याच्यामुळेच त्याच्या टीममेट्स मध्ये सुद्धा हा अहंकार दिसत नाही त्याचा परिणाम असा होतो की ज्याला टीम वर्क म्हणतात ते अत्यंत अव्वल दर्जाचे होते आणि अशा प्रकारचे टीम वर्क इतर लेजंड फुटबॉलपटूंना मिळालेले नाही याबाबतीत मेसी काहीसा भाग्यवान आहे .


आणखी एक गोष्ट म्हणजे अनेकदा ज्या जागेवरून गोल करणे अवघड वाटते त्या जागे वरून सुद्धा त्याने गोल केलेले आहेत . अगदी बघतांना सुद्धा आपण इमॅजिन करू शकणार नाही अशा वेळी त्याने गोल केलेला दिसतो . कारण जे कॅमेराला दिसते त्यापेक्षा त्याला अधिक दिसते . त्यामुळे त्याच्या बाबतीत नैसर्गिक टायमिंगच्या पारंपारिक पद्धती कधी कधी निकामी ठरतात.


प्रश्न असा आहे की इतके सर्व त्याला साध्य कसे होते ?


या प्रश्नाचे उत्तर आहे ॲक्शनल इंटेलिजन्स ! मेसी बहुदा हा ॲक्शनरी इंटेलिजन्स आईच्या पोटातून येताना घेऊनच जन्मलेला आहे आणि तो त्याच्याकडे अभूतपूर्व म्हणावा असा आहे .तो याबाबतीत कॅम्पुटर पेक्षा फास्ट आहे. कॉम्प्युटर पळू शकत नाही अगदी लॅपटॉप सुद्धा फुटबॉल सारखा पळू शकत नाही त्याला पळवावे लागते माणूस आणि लॅपटॉप यांच्यात फरक हाच आहे की मोबाईल नेटवर्क चालवणारा मनुष्य किती क्षमतेचा आहे त्यावर सगळे असते .इथे तसे होत नाही इथे मेसी हाच पळणारा आणि पळवणारा त्यामुळे एक प्रकारचे अद्वैत प्रस्थापित होते.अभेद प्रस्तावित होते आणि फुटबॉल आणि मेसी यांना वेगळे काढणे अवघड होऊन जाते इतके कधीकधी एकरूप असतात आणि चेंडू आपल्या पायांमधून काढून घेतला गेला हे समोरच्याला कळे तोपर्यंत मेसी पुढे गेलेला असतो . अनेकदा तर तो दुसऱ्यांच्या पायांच्या पर्यंत चेंडू पोचू देत नाही. आपल्याच पायांच्या सोबत चेंडू नेत राहतो . या सगळ्याला एक अभूतपूर्व एक्शनल इंटेलिजन्स लागतो तो सुदैवाने त्याच्याकडे जन्मदत्त आहे किंबहुना म्हणूनच तो जीनियस आहे किंबहुना तो खेळत नाही तो फुटबॉल बरोबर नृत्य करतो .आणि म्हणूनच आपणाला त्याला सॅल्यूट ठोकावा लागतो 


त्यामुळेच माझा त्याला मनापासून सॅल्यूट ! खरे तर हा सॅल्यूट द्यायला मला उशीर झाला आहे पण देर आये दुरुस्त आये 


बाकी विश्वचषकाचा निकाल काहीही लागू दे पण आपण एकाच वेळेला फुटबॉल मध्ये पाच पाच लिजेंड्स पाहिल्या काहींच्या नशिबी विश्वचषक जिंकणे आले नाही पण तरीसुद्धा तो त्यांचा पराभव नाही कारण संघ हा फक्त व्यक्तीचा नसतो तो सिस्टीमचा असतो आपल्याकडे आपण फुटबॉल मध्ये उपस्थित सुद्धा नाही याची सुद्धा आपल्या सिस्टीमला लाज नाही बाकी जिंकणे बिंकणे फार लांबच्या गोष्टी ! आपल्याकडे असा एखादा जीनियस निर्माण झाला तर त्याला उत्तेजन देण्याऐवजी व्यवस्थित कोपऱ्यात ढकलून त्याच्या करिअरला ठार मारतील अशी स्थिती आहे. अलीकडे तर अशा प्रकारचा स्पोर्टल वायलन्स प्रचंड बोकाळलाय सुदैवाने इतर देशात तो नाही कारण आपण जिंकायला हवे आणि काही करून जिंकायला हवे असे स्पिरिट तिथे आहे आपल्याकडे हे स्पिरिट नाही आपण फक्त आत्म्यावर चर्चा करायच्या प्रत्यक्षात कसल्याही प्रकारचा आत्मा नसलेले आपण लोक आहोत . आपण विश्वचषक जिंकला तरी देवाला परमेश्वराला श्रेय देऊ आणि तिथेच थांबू परिणामी ज्यांनी मेहनत केली त्यांच्या मेहनतीचे रहस्य सुद्धा समजून घेण्याची इच्छा आपल्या ठाई नाही देवांच्या नंतर आपल्याकडे मग राजकारणी लोकांचा क्रमांक येतो. ज्या माणसाने हातात आयुष्यात कधी बॅट पकडली नसेल फुटबॉल पकडला नसेल अशा राजकारणी माणसाचे नाव आपण बिन दिक्कत मैदानाला देऊ शकतो इतके आपण बेकार आहोत . असो. सिस्टीम जितकी उगाळावी तितकी काळीच ! 


आमच्या पिढीला जागतिकीकरणाचा झालेला सर्वात मोठा जर फायदा कुठला असेल तर तो म्हणजे वैश्विक प्रक्षेपण ! त्यामुळे निदान जगाच्या पातळीवर का होईना परंतु अस्तित्वात असलेले महान लोक आपल्याला पाहायला मिळतात . फुटबॉल मध्ये पाच पाच दंतकथा आपल्या डोळ्या देखत उभ्या राहिल्या असे भाग्य फार थोड्या पिढ्यांना लाभले असेल आपल्याला ते लाभले याबद्दल धन्यवादच दिले पाहिजे आणि कृतज्ञ राहिले पाहिजे .


याही विश्वचषकाने आम्हाला आनंद दिला आयुष्यात आणखी आनंदा खेरीज काय हवे असते ?


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती