सविकल्प समाधी प्रचंडचे प्रचंडीचे दर्शन आणि प्रेषित श्रीधर तिळवे नाईक
मला एक प्रश्न नेहमीच विचारण्यात येतो तो म्हणजे झरतृष्ठ ,मोजेस , जीजस आणि मोहम्मद पैगंबर यांच्या सर्व संवादामध्ये God विषयीचे इतके भय का आढळून येते ?
सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे God हे सगुण रूप आहे निर्गुन रूप नाही तेव्हा सगुण रूपापर्यंत पोहोचणाऱ्या लोकांच्या संदर्भातच हा प्रश्न निर्माण होतो हे आपण सर्वात प्रथम लक्षात घेतले पाहिजे . किंबहुना प्रेषित म्हणजे सगुण समाधी पर्यंत सगुण रूपापर्यंत पोहोचलेले साधक असे म्हणता येईल.
आता या प्रश्नाचे उत्तर God विषयी भय निर्माण होण्याचे सर्वात पहिले कारण म्हणजे हे लोक कधीही निर्विकल्प समाधी पर्यंत पोहोचलेले नाहीत .हे कायमच सविकल्प समाधीला पोहोचले आणि ही समाधी आयुष्यात त्यांना अपवादात्मक वेळेलाच भेटलेली दिसते .ही समाधी त्यांना साधनेतून लाभलेली होती असे दिसत नाही कारण तशा प्रकारची डिसिप्लिन किंवा अनुशासन ते जिथे राहत होते किंवा हिंडत होते तिथे उपलब्ध नव्हते. सर्वसाधारणपणे त्या काळात या प्रदेशांच्या मध्ये उपलब्ध असलेली साधना ही प्रामुख्याने यमनियम आसन प्राणायाम ध्यान आणि धारणा यांच्यापर्यंतच मर्यादित असावी आणि त्याचे संस्कार या लोकांच्यावर झालेले होते . साहजिकच या लोकांना जे काही लाभले त्याच्या आधारे त्यांनी आपली मांडणी केली. सविकल्प समाधीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे अनेकदा ती ज्यांना प्राप्त होती होते ते लोक स्वतःला प्रेषित समजायला लागतात. आपल्याकडे सुद्धा अनेक लोकांच्या बाबतीत ही गोष्ट घडलेली दिसते. ही समाधी अनेकदा आपण काहीतरी विशेष आहोत अशी जाणीव करून द्यायला लागते कारण इतरांना अशा प्रकारचे काही प्राप्त झालेले नसते दुसरी गोष्ट सविकल्प समाधी प्राप्त झाल्यानंतर अनेकदा तुमच्या बोलण्यामध्ये एक तेजस्वीपणा येतो आणि तुमच्या बोलण्याचा प्रचंड प्रभाव लोकांच्यावर सहज पडायला लागतो साहजिकच लोक तुम्हाला अद्भुत समजायला लागतात आणि त्याच वेळेला जर का तुमची भाकिते खरी यायला लागली की मग बघायलाच नको . पाश्चात्त्य देशांमध्ये मुळातच प्रेषित या शब्दाचा अर्थ ज्याला भविष्य सांगता येते असा मनुष्य असाच अनेकदा असतो आणि हे भविष्य अनेकदा त्याला देव दाखवतो असाही समज आहे. वास्तविक सविकल्प समाधीला पोहचल्यानंतर तुम्हाला आपोआपच भविष्य दिसण्याची विद्या प्राप्त होऊ शकते. त्यामुळे साहजिकच अनेक प्रेषित निर्माण झालेले दिसतात .मी स्वतः या अवस्थेतून गेलेलो आहे आणि लोक तुमची पूजा करायला तयारच असते असतात असा माझा अनुभव आहे मी आता अडकलो नाही ती गोष्ट सोडून द्या पण अनेक लोक अडकतात हेही खरे साधकाने यामध्ये अडकायचे नसते पण दुर्दैवाने अनेक लोक त्यामध्ये अडकत जातात आणि तिथेच थांबतात .माणसांच्या कडून मिळणारा मान सन्मान हा एवढा मोठा असतो की त्याला टाळून जगणे हे अनेकांना शक्य होत नाही कारण हे टाळायचे असेल तर पळून जायला लागते आणि तुमच्या या पलायनाला लोक एक प्रकारचा विक्षिप्तपणा मानायला लागतात. हे सहन करण्याची तयारी कुणाचीच नसते . कारण अनेक जण समाजातले आपले प्रतिबिंब टिकवू पाहतात . लोकांना विक्षिप्त दिसण्यापेक्षा नॉर्मल होऊन आपल्याला जे दिसते ते सांगत सुटणे हे जास्त चांगले आणि सुरक्षित वाटायला लागते .
हे आपले सुदैवच म्हटले पाहिजे की आपल्याकडे भगवान शंकर होऊन गेले आणि त्यांनी आधीच सविकल्प समाधीपलीकडे सुद्धा एक निर्विकल्प समाधी आहे हे सांगून योगाचा पाया घातला त्यामुळे ज्यांनी शंकरांचे अनुकरण केले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले असे लोक अनेकदा याबाबतीत सावध असतात परंतु जे लोक सावध नव्हते ते मात्र या ट्रॅप मध्ये फसत गेलेले दिसतात .
भारतामध्ये त्यामुळेच प्रचंड आणि प्रचंडी म्हणजेच चंडी हिची मूर्ती ही नेहमीच भयावह काढली जाते कारण जे प्रचंड दिसते त्याला सामोरे जात हळूहळू त्यातले सौंदर्य वाढवत न्यावे लागते अनेकांना हे जमत नाही आणि प्रथमदर्शनी जे काही प्रचंड दिसते त्या प्रचंड दिसण्याला हे लोक घाबरतात आणि ताबडतोब वास्तव जीवनात परततात याचा जो परिणाम व्हायचा तो होतो ईश्वर प्रचंड आहे मॅग्नेफिशियंट आहे हे तर असतेच पण त्याचबरोबर तो भयावह भय निर्माण करणारा आहे असेही वाटायला लागते आपल्यापेक्षा मोठा आकार पाहून घाबरणे ही एक नैसर्गिक भीती आहे ती भीती आपोआपच उफाळते आणि त्यातूनच मग भयमुग्धता जन्मते. अनेकदा सगुण स्वरूप दिसले की त्याचे काय करायचे असाही काही जणांच्या पुढे प्रश्न असतो . भारताबाहेर आपण ज्यांना प्रेषित म्हणतो त्यांच्या बाबतीत हे घडल्याने त्यांनी त्या प्रचंड पणाला त्यांच्या पद्धतीने सादर केले पण ते जर का थांबले असते आणि त्यांनी अधिक पुढची साधना केली असती तर कदाचित त्यांना हेच प्रचंड कसे सुंदर होते हीच प्रचंडी असलेली कशी सुंदर होत सुंदरा होते हे दिसले असते आणि त्यांनी पाहिलेले प्रचंड सुंदर झाले असते प्रचंडी सुंदरी झाली असती . आपल्याकडे सुद्धा असे घाबरून परतलेले काही गुरु दिसतात त्यांनी चंडीची पूजा करताना त्यामुळेच तिला भयावह आकार दिला याचे कारण समोर साक्षात जेव्हा महाकाल ठाकतो किंवा महाकाली ठाकते तेव्हा सर्वकाही तो /ती गिळताना दिसतो दिसते त्यात आपणही गिळले जाणार हे स्पष्ट दिसते साहजिकच तो प्रचंड पणा महाकालपणा अनेकदा अंगावर येतो आपल्याकडे विज्ञानाच्या आशीर्वादाने अलीकडे टेलिस्कोप वगैरे प्रचंड प्रमाणात आल्या आणि आता त्या दृश्यांची कदाचित सर्वांना सवय होईल पण प्राचीन काळी अशा प्रकारची दृश्ये जेव्हा तुम्ही सविकल्प समाधीत जाताना पाहत होता तेव्हा जी रिएक्शन होती ती साहजिकच भयमुग्धता हीच होती आज मोठमोठ्या हबलच्या किंवा पाहून मोठे आलेल्या टेलिस्कोप मधून जी दृश्य दिसतात तीच दृश्यं तुम्ही सविकल्प समाधीत जाता तेव्हा सुद्धा दिसतात. तुम्ही जर का त्या काळात गेला आणि जर का हा विचार केलात की टेलिस्कोप शिवाय ही दृश्य दिसत होती तर मग त्या लोकांना काय वाटले असेल त्याची कल्पना करू शकाल .साहजिकच मग आज ना उद्या सर्व काही गिळले जाणार आहे हे स्पष्ट होते आणि यालाच आपल्याकडच्या अनेक प्रेषितांनी कयामत असे म्हटलेले आहे .
वास्तविक हे भयावह नसते पण माणसाला हे इतके अनपेक्षित पणे दिसते की त्याचे भय वाटावे . अनेकदा काहीही साधना न केलेले लोक चुकून सविकल्प समाधीच्या क्षेत्रात पाऊल टाकतात आणि त्यांना जेव्हा हे दर्शन घडते तेव्हा ते भय मुग्ध होतात . हा भयमुग्धपणा हे एक सगुण स्वरूप आणि सौंदर्य असते . आणि यातूनच महाश्रद्धा ( म्हणजे मजहब किंवा रिलीजन) निर्माण झाली
अर्थातच प्रेषित मूळ निर्गुण सत्यापर्यंत न पोचल्याने काही विचित्र प्रश्न निर्माण होतात . अर्धाच प्रवास झाल्याने मंजिल नेमकी काय आहे ते कळत नसल्याने सर्व काही धुसर धुसर होत जाते आणि धुक्यात हरवत जाते . महाश्रद्धांचा शेवट त्यामुळे अनेकदा धुक्यात झालेला दिसतो आणि अनेकदा अनेक संवाद परस्परविरोधी निर्माण होत जातात . आपल्या आकलनाच्या पलीकडे हे आहे याची जाणीव होते आणि जेव्हा ही जाणीव त्या काळामध्ये झाले असेल तेव्हा त्यांना काय वाटले असेल हे आपण आता समजू शकतो . साहजिकच त्यांच्या त्याकाळच्या मर्यादांच्या मधून महा श्रद्धा निर्माण झालेल्या आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे दुर्दैवाने हे स्वीकारण्याची तयारी अनेक लोकांच्याकडे आजही नाही आणि त्यामुळेच भविष्यातल्या दिशा अनेकांना स्पष्ट होत नाहीत . बरं हे समजावून कसं सांगणार कारण सविकल्प समाधी प्राप्त होत नाही तोपर्यंत हे पोहोचवणे अवघडच होऊन बसते .
भारतीय लोकांना मात्र हे सहज समजावता येते त्याचे कारण ईश्वर ही संकल्पना फक्त सगुण नाही तर ती निर्गुण सुद्धा आहे . त्याउलट God ही संकल्पना सगुण आहे आणि अनेकदा त्यामुळेच त्याला हजारो गुण चिटकवले जातात किंबहुना God याला समांतर जी नावे तयार केली जातात ती सर्वच्या सर्व सगुणदर्शकता दर्शवणारी असतात
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment