मोदी : सर्व निवडणुका एकाच वेळी श्रीधर तिळवे नाईक

ह्या निवडणुकीमध्ये मोदी यांनी सर्वच निवडणुका एकाच वेळेला व्हाव्यात अशी सूचना केली होती त्याच्यावर पण भरपूर चर्चा झाली परंतु बहुतेकांना त्यामागचा हुकूमशहा दिसला मोदी नावाचा मनुष्य दिसणे बंद झाले आणि मूळ मुद्दा बाजूला पडला आपण जर भारतीय लोकशाहीत बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट सातत्याने दिसते ती म्हणजे प्रत्येक पक्षात प्रभावी प्रचारक हे जास्तीत जास्त दोन किंवा तीन असतात मोदींच्या बाबतीत तर फक्त एकटे मोदीच प्रचारक आहेत की काय अशी शंका यावी इतके ते एकसंख्यांक आहेत याचा एक परिणाम असा झाला की सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजपला प्रचारक म्हणून मोदीच लागायला लागले नशीब की महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी पंचायतींच्या निवडणुकीसाठी त्यांना बोलवण्यात आले नाही यातून एक गोंधळ असा तयार झाला की लोकसभेच्या निवडणुका तीन महिने आणि विधानसभेच्या निवडणुका 4 टप्प्यात झाल्या तरी भारतातल्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेसाठी असे मिळून विधानसभांसाठी किमान आठ महिने म्हणजे मोदींचे पाच पैकी किमान एक वर्ष प्रचार करण्यातच गेलेले दिसते आणि हे कुठल्याच पंतप्रधानाला परवडणारे नाही साहजिकच त्यांच्याकडून ही सूचना आलेली आहे ही सूचना योग्य आहे का? तर नाही ! याला एकाच वेळेला सर्व निवडणुका घेणे हा उपाय नाही तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपले स्टार प्रचारक तयार करणे हा उपाय आहे भाजप हे करत नाही महाराष्ट्रात तर भाजपकडे एकही वक्ता नाही प्रवक्ता तर संपूर्ण समतोल साधून बोलतोच असे नाही अशावेळी करायचे काय ? खरे तर उपाय होता आपल्यासारखे अनेक प्रचारक तयार करणे पण दुर्दैवाने हे झाले नाही पूर्वी कसं आठ-दहा दिवस देऊन पूर्वीच्या पंतप्रधानांचे काम भागायचे टीव्ही नसल्याने चुका झाल्याच तर त्या लक्षात यायच्या असं नाही तेव्हा त्यांची फारशी हवा पण व्हायची नाही आता मात्र असे होत नाही अनेक लोकांनी पाहिल्याने व्हिडिओ ऑडिओवर चेक केल्याने चुका करतात त्या एकमेकांना ताबडतोब पाठवल्या जातात आणि त्या चुकांची हवा लगेच होते कधी कधी अफवा होते मोदींच्या बाबतीत तरी हवा आणि अफवा खूपदा झालेली दिसते प्रत्येक वेळेला वैचारिक भाषण देणे हे फार अवघड असतं जीभ कधी निसटेल हे सांगता येत नाही आता पंतप्रधानाने प्रचार करायचा की पंतप्रधानपद सांभाळायचे आणि एक लक्षात घ्या मी जो विचारात घेतोय तो काळ फक्त प्रत्यक्ष प्रचाराचा आहे आता त्यात जर का प्रचाराची स्ट्रॅटेजी हा प्रकार आपण ऍड केला तर मोदींची किमान दीड वर्षे तरी इलेक्शन्स मध्ये गेलेली असणार हे कुठल्याही देशातल्या पंतप्रधानाच्या वाट्याला येत नाही भारताची आवाढव्य लोकशाही आणि तिची संरचना हे निर्माण करते हे केले नाही तर खासदार नाराज होतात कारण खासदारांच्या वर आमदारांचा दबाव असतो आमदारांच्या वर कार्यकर्त्यांचा दबाव असतो शेवटी हा दबाव थेट पंतप्रधान पदापर्यंत पोहोचतो मीडियामुळे याचे त्वरण वाढलेले आहे दुसरी गोष्ट मोदींना ऐकायला येणारे श्रोते हे आजच्या काळात ज्यांना भक्त म्हटले जाते तसे असतात हे इमोशनल लोक असतात आणि यांना इमोशनल भाषणेच आवडतात साहजिकच भाषणांनी मोटिवेट करायच्या नादात अनेक भावनिक चुका आणि वैचारिक चुका होतात एकंदरच निवडणूक हे मोदींच्यासाठी तरी भरपूर वेळ खाणारे व कधीकधी फुल टाईम काम आहे भाजपने त्यांच्यावरची ही जबाबदारी कशी कमी करता येईल याचा विचार केला तर दुहेरी फायदा आहे एक तर मोदी अलीकडे बिनाविचाराचे बिन लिखित भाषण करतात आणि हा उत्स्फूर्तपणा कधी कधी फारच महागात पडताना दिसतो या निवडणुकीत तर हे स्पष्टपणे जाणवत होते सायकॉलॉजीकली मोदी तयार होते असं वाटत नव्हतं महाराष्ट्रात तर ते पूर्णपणे थकले होते या माणसाच्या शारीरिक क्षमतेविषयी अफाट कल्पना करून घेतल्यामुळे त्यांना ह्या वयात हे किती कष्टाचे पडले असेल याची मला कल्पनाही करवत नाही पुन्हा या सगळ्याचे चेष्टा उडवणारे पुरोगामी लोक आहेतच आता इतक्या सभा घेतल्यानंतरही पुन्हा पत्रकार परिषदा घेणे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकाल मी लोकांशी थेट बोलतो असे जेव्हा मोदी बोलतात तेव्हा त्यामागे अनेक फॅक्टर असतात त्यातील हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे मोदींनी इलेक्शन साठी दिलेला काळ अन मागच्या पंतप्रधान पदी असलेल्या माणसांनी पत्रकार परिषदांना दिलेला काळ यांची तुलना केली तर मागच्या पंतप्रधान पदी असलेल्या लोकांनी लोकांना दिलेल्या काळापेक्षा मोदींनी दिलेल्या काळ किमान दसपट आहे स्वतःच्या रूममध्ये बसून मोदींच्या वर टीका करणे फार सोपे आहे परंतु एकदा ते नेमके काय करत असतात हे पाहिले की हळूहळू त्यांच्याविषयी कणव यायला लागते भारताच्या लोकशाहीत एकमेव स्टार प्रचारक असणे आणि पंतप्रधानही एकमेव असणे एकहाती असणे असे कधी पूर्वी घडलेले नव्हते नेहरूंच्या काळातही काँग्रेसकडे अक्षरशः शेकड्याने स्टार प्रचारक होते भाजपकडे आजही असा स्टार प्रचारक नाहीये जो संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहे भारत जाऊ द्या एखाद्या राज्यात सुद्धा संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहे असा स्टार प्रचारक नाही भाजपची खरे तर ही शोकांतिका आहे अमित शहा यांच्या विषयी बऱ्याच गोष्टी आहेत पण ते स्टार प्रचारक झालेत असं मला वाटत नाही त्यामुळेच ही निवडणूक सुद्धा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला लढावी लागली आहे हे सुदैव की भाजपचे दुर्दैव हे ठरवणे अवघड आहे

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती