नरहर कुरुंदकर समाजवादी लोकांना का झेपले नाहीत? श्रीधर तिळवे नाईक 

नरहर कुरुंदकर यांच्याविषयी पुन्हा एकदा चर्चा छेडली गेलेली आहे . कुरुंदकर हे वास्तविक स्पष्टपणे लोकशाही समाजवादी होते पण तरीही ते समाजवादी लोकांना झेपले नाहीत यामागे दोन कारणे होती .

पहिले कारण त्यांनी स्वतःची ब्राह्मण ही ओळख अत्यंत स्पष्टपणे आणि स्वच्छपणे मान्य केलेली होती साहजिकच त्यामध्ये काही लोकांना ब्राह्मणवाद दिसला वास्तविक उत्तर आधुनिक कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी नव्याने आल्या त्यामध्ये स्वतः च्या पारंपारिक ओळखीचा जर स्वतःवर ठसा असेल किंवा तिचा संस्कार असेल तर ती ओळख स्वीकारणे ही एक गोष्ट होती. मुळातच आदिवासी आणि subalteran लोकांच्या ओळखीसाठी ही गोष्ट आवश्यक बनली होती आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून आपल्याकडे उच्चवर्णीय लोकांच्या सुद्धा ओळखीचा सुळसुळाट झाला .नरहर कुरुंदकरांनी उत्तराधुनिक विचारवंत किती वाचले हे कळणे अवघड आहे पण त्यांनी ते फारसे वाचले नसावेत मात्र ते जर का युरोपमध्ये असते तर मात्र उत्तराधुनिक झाले असते असे मला नेहमीच त्यांचे लिखाण वाचताना जाणवते. मार्क्सवादाकडून त्यांनी एक गोष्ट आत्मसात केली होती ती म्हणजे हिस्टॉरिकल ऍनालिसिस ! याबाबतीत त्यांना मास्टर म्हणावे इतकी त्यांची चांगली पकड होती आणि याला कारण त्यांचे विविध विषयावरचे प्रभुत्व होते . कुठलाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता. विविध शाखांच्या मधील भूतकाळांचा ते व्यवस्थित धांडोळा घेत त्यांना एकमेकात गुंफत ते इतिहास निर्माण करत साहजिकच काही नवीन गोष्टी आपोआपच सापडत जात . त्यांची विश्लेषणाची एक विशिष्ट पद्धत होती आणि ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी किंवा आधुनिक भारत लिहिणारे जावडेकर यांच्या पठडीत बसत त्या पठडीला पुढे नेणारी होती . एखाद्या विद्यार्थ्याला शिकवावे तसे ते लेखन करत. याचे कारण ते हाडाचे शिक्षक होते मात्र ते आचार्यांच्या परंपरेपासून वेगळे झाले याचे कारण ते नास्तिक होते एका अर्थाने मार्क्सवादी होते पण त्यांचा मार्क्सवाद हा पारंपारिक नव्हता आचार्य लोकांना व्यक्ति पूजेतून मुक्त होणे अवघड जाते पण नरहर कुरुंदकर यांच्या बाबतीत दिसते असे की मार्क्सवादी असल्याने ते व्यक्ती पूजा नाकारत प्रत्येक महान व्यक्तीला मर्यादा असतात आणि अनेकदा सामाजिक आणि आर्थिक वर्ग तिच्या मर्यादा निश्चित करतो हे अधोरेखित करण्याची त्यांची वृत्तीही होती . त्यामुळे जवाहरलाल नेहरू असो किंवा शिवाजी महाराज असो प्रत्येकाचे मूल्यमापन करताना त्यांनी शक्ती स्थाने जशी सांगितली तशा काही मर्यादा ही सांगितल्या ज्या अनेकांना झेपल्या नाहीत अर्थातच त्यांचे ज्यांच्यावर प्रेम होते त्यांच्या मर्यादा फार कमी सांगितल्या गेल्या. म्हणजे उदाहरणार्थ जवाहरलाल नेहरू! ते स्वतःला ब्राह्मण म्हणून खरोखर अधोरेखित करत होते म्हणजे काय करत होते तर वस्तुस्थिती अशी आहे की ते आपल्या संस्काराची जडणघडण सांगत होते ते काही आपले ब्राम्हणत्व मिरवत नव्हते . पण झाले असे की त्यांच्या व्यक्तिमत्वातला बौद्धिक अहंकार हा एखाद्या ब्राह्मणाला साजेसा वाटत असल्याने त्यांचा अहंकार आणि ब्राह्मण असणे या दोन गोष्टी एकत्र जोडल्या गेल्या आणि त्यातूनच काही गैरसमज पसरत गेले . ते चर्चेला किती ओपन होते हे आम्हाला सांगणे कठीण आहे कारण ते फारच आधीचे होते आणि त्यामुळे आमचा व्यक्तिगत काही परिचयाचा प्रश्न आला नाही . मात्र त्यांच्या लिखाणात एक गोष्ट जाणवते ती म्हणजे खोटी नम्रता त्यांच्या ठाई नव्हती आणि हीच गोष्ट अनेक समाजवादी लोकांना ते आपल्याला बुटके करत आहेत असा फिलिंग देत राहीली आणि यामुळेच ते काही बुटक्या समाजवादी लोकांना झेपले नाहीत. माझ्या आयुष्यात मला असे कित्येक आंबेडकरवादी भेटले जे ठाम पणाने सांगत की नरहर कुरुंदकर हे हिंदुत्ववादी आहेत अर्थातच नामांतराबाबतची त्यांची भूमिका आंबेडकरवादी लोकांना फार खटकत होती पण आता मात्र त्या भूमिकेचा निदान विचार करावा असे वाटण्याचा काळ आलेला आहे. त्या काळात मात्र मी यासंदर्भात नरहर कुरुंदकर यांच्या कट्टर विरोधात होतो . मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झालेच पाहिजे असे माझे ठाम मत होते आणि आजही मला वाटते की नामांतर झाले बरेच झाले. शेवटी तुम्ही ज्यांना वंचित ठेवलेले असते त्यांना न्याय देण्याचे जे काही प्रयत्न करायचे असतात त्यामध्ये चिन्हात्मक न्याय नावाची एक गोष्ट असते. नामांतर आंदोलन हे चिन्हात्मक न्यायासाठी धडपडत होते. भारताचा इतिहास हा फक्त उच्चवर्णीय लोकांचा नसून तो सर्वच लोकांचा आहे हे ठसवणे या काळामध्ये आवश्यक झाले होते . नरहर कुरुंदकरांनी अशी भूमिका का घेतली हे मला आजही समजलेले नाही ते कुठेतरी इतिहासात "घोट" मळले असेच आता वाटते. प्रत्यक्षात ते अजिबात हिंदुत्ववादी नव्हते पण त्यांच्या याबाबतीतल्या भूमिकेमुळे ते आंबेडकरवादी आणि समाजवादी लोकांना झेपले नाहीत आणि आंबेडकरवादी लोकांनी तर त्यांच्यावर हिंदुत्ववादी असाच स्टॅम्प मारला . त्यांची या काळानंतरच उपेक्षा सुरू झाली आणि अचानक अलीकडे पुन्हा त्यांच्या सगळ्या विचारांचा विचार करण्याची वेळ आपल्या सर्वांच्यावर आलेली आहे.

नरहर कुरुंदकर न झेपण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण अर्थातच त्यांनी केलेली इस्लामची परखड मीमांसा! त्यांनी इस्लाम जसा आहे तसाच पाहिला किंबहुना माझ्या कॉलेजच्या जीवनात ज्यांचा माझ्यावर या अंगाने प्रभाव पडला त्यात नरहर कुरुंदकर पण एक होते . अर्थातच सर्वात मोठा प्रभाव हा मुळात मी कुराणाचे नीट वाचन केले होते आणि जो विसाव्या शतकात आहे आणि पुरोगामी आणि आधुनिक सभ्यता महत्त्वाची मानतो आणि तो जो कुराण नीट ते जसे आहे तसे वाचतो तो कधीही मुसलमान होऊ शकत नाही. माझेही असेच झाले होते . त्यातच कुराणाच्या संदर्भातल्या चर्चा वाचण्यात आल्या होत्या आणि कुराण प्रत्यक्षात खूप नंतर लिहिले गेले आणि ते राजकीय पद्धतीने लिहिले गेले असेच माझे मत झालेले होते .

इस्लाम जितका सभ्य दिसतो तितका तो नाही हे फार कमी समाजवादी लोकांना कळले त्यात नरहर कुरुंदकर होते. प्रत्येक धर्माचा स्वतःचा स्वभाव असतो आणि अनेकदा जो संस्थापक असतो त्याचा स्वभाव त्या त्या धर्मामध्ये उतरलेला असतो . इस्लामच्या बाबतीतल्या सर्व अडचणी या इथूनच सुरू होतात . साहजिकच इस्लाम वरील त्यांची परखड टीका समाजवादी लोकांच्या राजकारणासाठी सूटेबल नव्हती त्या अर्थाने ते समाजवादाला सूटेबल बॉय नव्हते . आज सुद्धा याबाबतीत ज्या तऱ्हेने हात आखडते घेतले जातात ते बघितले की समाजवादी लोकांची फक्त वैचारिक दिवाळखोरी दिसते. वास्तविक जर का या काळामध्ये समाजवादी आणि इतर परिवर्तनवादी मंडळी कुरुंदकर वादी झाले असते तर समाजवाद हा जास्त जमिनीवर राहिला असता आणि कदाचित हिंदुत्ववादी जास्त प्रभावी झाले नसते . ते काही निळकंठ खाडीलकर नव्हते. इस्लामचा खोलात जाऊन अभ्यास करूनच त्यांनी निष्कर्ष काढलेत . पुढे त्यांचे शिष्य म्हणून आलेल्या शेषराव मोरे यांनी मुसलमानांची आणि इस्लाम धर्माची सर्वांगीण चिकित्सा केली . 

थोडक्यात म्हणजे नामांतरातली भूमिका , इस्लाम विषयक विवेचन आणि स्वतःचे ब्राह्मण म्हणून असलेले संस्कार बिन दिक्कत सांगणे ही त्यांच्या उपेक्षेची कारणे होती ही कारणे आता मावळलेली आहेत की अजूनही जिवंत आहेत हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर समाजवादी लोकांनी द्यावे हे उत्तम. 

श्रीधर तिळवे नाईक 








Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती