एकवाद ,एकतत्त्ववाद ,एकेश्वर वाद, एकदेववाद आणि एकग्रंथदेववाद श्रीधर तिळवे नाईक 

मानवाच्या आदिम काळात सर्व टोळ्या बहुदेववादी होत्या . म्हणजे आधी अगदी आपण जर वैदिक धर्म पाहिला वैदिक टोळ्या पाहिल्या तर त्या टोळ्यांचापण स्वभाव अनेक देववादी आहे. वैदिक श्रद्धा बहुदेववादीच आहे भगवान शंकर यांच्या आगमनापूर्वी भारतात जे लोक होते त्यांच्या त्यांच्या श्रद्धा या सुद्धा अशाच बहुदेववादी होत्या 

सूर्य आणि धरती यांचा संबंध हळूहळू लक्षात आल्यानंतर द्विदेववाद उदयाला आला मुख्य म्हणजे सूर्याविषयी आकलन वाढत गेले आणि सूर्यच प्रकाश पाठवतो हे स्पष्ट कळाले आणि तत्कालीन टोळ्यांचा समज असा होता की पाऊस सुद्धा सूर्यच पाठवतो कारण आकाशाची मालकी सूर्याकडे आहे अशी त्यांना खात्री होती .

भगवान शंकर जन्मण्यापूर्वी हा द्विदेववाद अस्तित्वात होता की नाही याविषयी काहीही कल्पना येणे अशक्य आहे मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे भगवान शंकरांच्या उपदेशातूनच शिव आणि शक्ती ही दोन तत्वे उदयाला आली आणि यातूनच द्वितत्ववाद उदयाला आला यांच्यापासूनच जगातली पहिली श्रुती निर्माण झाली ती म्हणजे शैव श्रुती होय या श्रुतीमध्ये शिव आणि शक्ती अशा दोन तत्त्वांना मूलभूत तत्वे म्हणून स्वीकारण्यात आले प्रथमच देव गेले आणि तत्व आले . आजही भारतात शिव आणि शक्ती ही दोन तत्वे आहेत देऊन आहेत याची आठवण करून द्यावी लागते . यातूनच संसार निर्माण झाला आणि या संसाराचा महाप्राण म्हणजे ईश्वर होय.

भगवान शंकर यांच्याच काळात शेतीचा शोध लागला किंवा त्यांनी लावला आणि बऱ्याचश्या गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या . मुख्य म्हणजे काही हजार वर्षांनी पुरुषाला हे कळून चुकले की स्त्री आपल्यामुळेच गर्भवती होते आणि स्त्रीला दुय्यम स्थान देण्याची धडपड सुरू झाली आणि त्यातूनच मग सर्वात प्रथम एक तत्ववाद उदयाला आला आणि हे तत्व शिव होते ह्या एक तत्ववादाने फक्त शिव या तत्त्वाचीच पूजा सुरू केली 

हा सगळा कारभार निर्गुण निराकार पद्धतीने चाललेला होता पण वाढत गेलेल्या दुष्काळांच्यामुळे आणि त्यामुळे बदललेल्या शेतीमुळे पुन्हा एकदा सर्व काही सगुण साकार आहे असे वाटून पुन्हा एकदा नवे देववाद उदयाला आले आणि इथेच पहिले बीज एकेश्वर वादाचे पडले एकेश्वर वाद हा शैव धर्माचा पहिला अविष्कार आहे आणि तो पहिला धर्म पण आहे यानेच प्रथम शिवलिंगाची पूजा ईश्वर म्हणून करायला सुरुवात केली आणि आजही ही प्रथा जिवंत आहे त्यामुळेच त्रंबकेश्वर वगैरे वगैरे आपण म्हणत असतो 

साधारणपणे इसवी सन पूर्व ८००० च्या आसपास काही आदिवासी लोकांनी निराकार निर्गुण शिवतत्व नाकारून ज्याने ते सांगितले त्या शंकराचीच पूजा सुरू केली आणि त्यातूनच आदिवासी लोकांच्यात बुढा देव आणि बडा देव ह्या संकल्पना जन्माला आल्या याच बडादेव या संकल्पनेतून पुढे महादेव जन्मला आणि सगुण पूजा सुरू झाली मूर्तिपूजा सुरू झाली 

हाच धर्म भारतातून पुढे इराण इराक वगैरे दिशेने गेला पण आता ईश्वर वाद ईश्वराला सगुण मानत होता म्हणजेच निर्गुन ईश्वर किंवा महाप्राण ही संकल्पना गेली आणि माणसाप्रमाणे ईश्वर सगुण झाला शैव लोकांचे या धर्माशी नंतर संघर्ष सुरू झाले त्याचे कारण हेच होते हा धर्म झोराष्ट्रीयन ज्याला आज आपण पारशी धर्म म्हणतो तो होता.त्यातून पहिला एकग्रंथी देववाद जन्मला जो फक्त एक देव स्वीकारत नव्हता तर एक ग्रंथ सुद्धा स्वीकारत होता ज्याला झेंद अवेस्ता म्हटले गेले गाथा उदाहरणार्थ तुकारामाची गाथा ही संकल्पना इथूनच आलेली आहे एक देव आणि एक पुस्तक हे या धर्माचे वैशिष्ट्य होते 

युरेशियन लोक जेव्हा या धर्माच्या संपर्कात आले तेव्हा ते या धर्माने प्रभावीत झाले मूळ शैव धर्माचा ही प्रभाव पडायला लागला आणि त्यातून मग ज्युदाइक स्कूल जन्मले आणि त्यातून पहिला युरेशियन एकग्रंथी देववाद जन्मला जो फक्त एक देव स्वीकारत नव्हता तर एक ग्रंथ सुद्धा स्वीकारत होता त्याच्यातूनच पुढे रोमन कॅथलिक ख्रिश्चन आणि इस्लाम निर्माण झाला 

हा सगळा इतिहास साधारण दहा हजार वर्षाचा आहे आणि तो अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि त्याचे पुरावे अस्पष्ट असल्याने फार मोठा गोंधळ उडत राहतो . याचे कारण लिखित परंपरा ही फार उशिरा सुरू झाली आणि लिखित परंपरा सुरू झाल्यानंतरच पारशी धर्म ,यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म निर्माण झालेले आहेत किंबहुना हे चार धर्म आधीच्या परंपरेपासून वेगळे होतात त्याचे कारण त्यांची लिखित परंपरा आणि एक ग्रंथ वाद आहे . आज जगभर या चार धर्मांचीच व्याप्ती प्रचंड झालेली आहे विशेषता युरोशियन धर्मांची ! विस्तारवाद हा युरेशियन खंडाचा स्वभाव असल्याने त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी आकाश पाताळ एक केले आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे इराणी झोराष्ट्रियन धर्म निर्माण झाल्यानंतर त्याने सर्वत्र आक्रमण केलेले दिसते आणि त्यातून पर्शियन साम्राज्ये निर्माण झालेली दिसतात पुढे इस्लामने त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचाच धर्म धोक्यात आणला .

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय