भारतीय अर्थव्यवस्थेची तीन मॉडेल्स श्रीधर तिळवे नाईक 


भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करताना भारतीयांची भोजन व्यवस्था आपण नीट लक्षात घेतली पाहिजे अन्यथा भारतीय अर्थव्यवस्थेची मॉडेल कशी तयार होतात हे आपणाला कळणे अशक्य आहे 


भारतीय एकाच थाळीमध्ये अनेक पदार्थ एकाच वेळी वाढून घेतात आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने क्रम लावत ती थाळी फस्त करत जातो संपवत जातो . कोणी भातापासून सुरू करेल तर कोणी स्वीट डिश पासून कोणी चपाती पासून रोटी पासून तर कोणी चक्क चटणी पासून! त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेचे कुठलेही मॉडेल तुम्ही जर निवडले तर तुम्हाला तिची रचना ही नेहमीच थाळीसारखी दिसेल आणि त्यात अनेक पदार्थ ओढून वाढून घेतलेले दिसतील त्यामुळेच अनेकांची पंचाईत होते कारण अनेकांना हल्ली पाश्चात्त्य पद्धतीची सवय झालेली आहे त्यामुळेच एकाच थाळीमध्ये अनेक प्रकारचे विचार आणि दृष्टिकोन वाढले गेलेले असतात आणि त्यामुळेच मॉडेल एखाद्या नेटवर्क सारखे दिसते भारतीय माणूस चिन्हसृष्टीशी सहजरित्या ऍडजस्ट होऊन गेला याचे सर्वात मोठे कारण त्याची जगण्याची शैली पद्धतच मुळात नेटवर्किंग शैली पद्धत आहे 


भारतीयांनी पहिली थाळी तयार केली ती डाव्या लोकशाहीची left democratic थाळी होती तिच्यामध्ये वैष्णव गांधीवाद, डावा ख्रिश्चन वाद , लोकशाही समाजवाद, लोकशाही साम्यवाद , लोकशाही बुद्धवाद असे पाच पदार्थ होते आणि या पाच पदार्थांच्यातून ही थाळी तयार झाली होती तिच्यामध्ये बुद्धाची करुणा होती वैष्णवादाचा गांधीवादी सेक्युलर वाद होता , लोकशाही समाजवादामधली लोकशाही होती आणि समाजवादी लोकशाही होती. लोकशाही साम्यवादा मधली रशियातून आयात केलेली पंचवार्षिक योजना होती आणि रशियाची मैत्री होती . तिचा कल डावा होता आणि तो स्पष्ट होता . इंदिरा गांधींच्या काळामध्येच लक्षात यायला सुरुवात झाले की ही थाळी पूर्णपणे फ्लॉप झालेली आहे आणि आपल्या भोवतालचे काही देश विशेषत: चीन हा आपल्या पुढे निघून गेला आहे आणि नंतर तर असे लक्षात आले की एशियन टायगर सुद्धा तयार व्हायला लागलेले आहेत जे आपल्यापेक्षा पुढे जाणार हे दिसायला लागले. साहजिकच मग सर्व गोष्टींचा पुनर्विचार सुरू झाला यातूनच मग दुसरी थाळी तयार झाली 


भारतीय अर्थव्यवस्थेची दुसरी थाळी ही शैव मध्यममार्गी, शैव मध्यकल्याणवादी , बसवेश्वरांच्यासारखी कायक वाद आणि गुरुनानकांच्यासारखी लंगरवाद स्वीकारणारी अशी होती तिचे बीज जरी पहिल्या मॉडेलने टाकले असले तरी ते प्रत्यक्षात नाईलाजाने टाकलेले बीज होते प्रत्यक्षात ही थाळी उभी केली ती मनमोहन सिंग यांनी आणि त्यांना पाठिंबा नरसिंहराव यांनी दिला . साधारणपणे 1985 मध्ये हिचे पहिल्या मॉडेल कडूनच बीज पडले आणि प्रत्यक्षामध्ये मॉडेल तयार झाले ते 1992 ला आणि मनमोहन सिंग यांनी ते पूर्णपणे व्यवस्थित उभे केले आणि ते 2009 पर्यंत व्यवस्थित चालवले गेले त्यानंतर पुन्हा एकदा पहिल्या मॉडेलने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामार्फत हस्तक्षेप करून या मॉडेलचा सत्यानाश करायला सुरुवात केली याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला आणि शेवटी काँग्रेसचा पराभव झाला या पराभवाला अनेक जण अण्णा हजारे यांना दोष देतात परंतु अण्णा हजारे यांनी ज्या दोषांच्या कडे लक्ष वेधले आणि ज्या दोषांच्या विरुद्ध आंदोलन केले ते दोष प्रत्यक्षामध्ये 2009 पासून निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. या काळामध्ये राहुल गांधी हे आपल्या आईच्या प्रचंड प्रभावाखाली होते आणि त्यांची आई पहिल्या मॉडेल मधून बाहेर यायला तयारच नव्हती राहुल गांधी यांच्यामध्ये अलीकडे जो बदल घडलेला आहे तो २०१९ नंतर घडत गेलेला आहे आणि ते बहुदा पुन्हा एकदा दुसऱ्या मॉडेल कडे परततील अशी चिन्हे दिसत आहेत .


भारतीय अर्थव्यवस्थेची तिसरी थाळी तिसरे मॉडेल हे नरेंद्र मोदी यांनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले . सद्गुरु अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिकन आहेत . नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट आणि स्वच्छपणाने युरेशियन मॉडेल म्हणजेच ब्राह्मणी, वैष्णव, हिंदू, जैन,उजवे आणि अमेरिकन उत्तर कार्पोरेट वादी असे पदार्थ असलेले मॉडेल स्वीकारले आणि एका नवीन प्रयोगाची सुरुवात झाली. या मॉडेलने लंगर वाद शाबूत ठेवला पण काही ठिकाणी या लंगरवादाची जागा वैष्णव वैदिक दानवादाने घेतली आणि त्यातूनच लाडकी बहीण योजना वगैरे अतिरेक करत गोंधळ घातला .शैव मॉडेल मधल्या मध्यकल्याणवादाची आणि बसवेश्वरांच्या कायकवादी मॉडेलची मात्र या मॉडेलने पुरती वाट लावून ठेवली आणि पहिल्या मॉडेल मधला डावा विचार तर पूर्णपणेच फेकून दिला . या मॉडेल चे मूल्यमापन करताना फार तटस्थ होऊन मूल्यमापन करावे लागते कारण अनेकदा आपल्याकडे अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करताना पक्ष आणि आयडिया लॉजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होतात . मोदी आहेत तर विरोध केलाच पाहिजे आणि मोदी आहेत तर त्यांची प्रत्येक गोष्ट चांगलीच आहे ही दोन्ही टोके आहेत अर्थव्यवस्थेमध्ये आणि अर्थव्यवस्थेच्या अभ्यासामध्ये असले आग्रह कामाचे नसतात. तिथे नेमके काय चांगले झाले काय कल्याणकारी झाले आणि काय वाईट झाले काय अकल्याणकारी झाले ते पहावे लागते . हे पाहताना आपण हे भारतातल्या अर्थव्यवस्थेची मूल्यमापन करत आहोत हे लक्षात घ्यावे लागते आणि भारतीय अर्थव्यवस्था भारतीय थाळीसारखी असते हे स्वीकारावे लागते.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती