पंचांग म्हणजे कुणी मुहूर्त सांगणारा किंवा जगबुडी सांगणारा ब्राम्हण असा गैरसमज होऊ नये म्हणून हे सांगतो आहे सद्या आपण ख्रिश्चन पंचांग आणि ह्या पंचांगानुसार तयार झालेले कॅलेंडर वापरतो आणि आपल्या ते गावीही नाही . अपवाद काही इस्लामिक देश ते मात्र इस्लामिक पंचांग वापरतात नासाने स्वतःचे पंचांग डिक्लेअर केलेले आहे पण अजून तरी कुठल्या देशाने ते शास्त्रशुद्ध असूनही स्वीकारलेले नाही असो इथे पंचांग म्हणजे काय ते सांगतो आहे
===========================================
सर , पंचांग म्हणजे पाच अंगे ती पुढीलप्रमाणे
१ ग्रहगती व ग्रहस्थिती
२ अवकाशबिंदू जसा अयनबिंदू
३ नक्षत्रस्थिती (ग्रीक लोकांच्यात राशी )
४ तिथी , पक्ष व वार
५ वर्ष
पंचांग ऍस्ट्रॉनॉमी ज्याला भारतात ज्योतिष म्हणतात त्याचा भाग आहे ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे फलज्योतिष हे पूर्ण वेगळे आहे व मी मागेच इथे म्हंटल्याप्रमाणे त्याला करमणूक म्हणूनच स्थान द्यावे पाश्चात्य देशात भविष्याचा तार्किक अभ्यास करण्याच्या शाखेला फ्यूचरॉलॉजी म्हणतात त्याला विज्ञान म्हणावे कि नाही किंवा त्याला विज्ञानाचे स्वरूप कसे द्यावे त्यात पूर्वसूचनचा समावेश करावा कि नाही हा वाद सतत चालत असतो पण त्याचा फायदा असा असतो कि माणसे भविष्यकेंद्री विचार करतात केवळ इतिहासात गोते खात बसत नाहीत मला ह्याच शाखेत बॅचलर व मास्टर डिग्री मिळवायची होती पण भारतात त्यावेळी कुठल्याच विद्यापीठात ही शाखा शिकवली जात न्हवती आणि युरोप अमेरिकेत जाण्यासाठी लागणारा पैसा माझ्या बापाकडे वा माझ्याकडे न्हवता पुढे १९९० साली तामिळनाडू मध्ये ह्या शाखेचा विचार सुरु झाला मात्र मी स्वतःच्या जीवावर ह्या शाखेचा स्वतःच्या अल्पमतीप्रमाणे अभ्यास करत राहिलो कम्युनिझमच्या इतिहासात फक्त चायनाने ह्या शाखेचा वापर १९७२ पासून करायला सुरवात केली आहे बाकी देशांनी तो केला असता तर कदाचित तिथला कम्युनिझम वाचला असता बाकी मार्क्सने दिलेल्या प्रेडीक्शन्सचा विचार आम्ही आर्थिक फ्यूचरॉलॉजीत अधूनमधून करत असतो
राहता राहिली गोष्ट जगबुडीची ! तर जगबुडीचा मला अनुभव नाही मी जगबुडीविषयी फक्त कथा , दंतकथा , कादंबऱ्यांतून सिनेमातून ऐकून व पाहून आहे त्यामुळे जगबुडी होणार कि नाही मला माहित नाही किंवा होणार असेल तर कधी होणार ह्याविषयी मी काहीच सांगू शकणार नाही मला वाटतं तुम्ही हा प्रश्न जगबुडीतज्ञानां विचारावा
तूर्तास शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या वाया जाताहेत तर त्याला आत्ताचे पंचांग किंवा हवामानशास्त्र जबाबदार आहे का हा माझ्या कन्सर्नचा विषय आहे आणि विज्ञानांत वैयक्तिक मतांना काहीच किंमत नसते त्यामुळे वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांगाचा पुनर्विचार करावा का इतकाच प्रश्न मी चर्चेला घेतला आहे एक पेरणी वाया जाणे म्हणजे शेतकऱ्याचे किती श्रम व धन वाया हे आपण कम्युनिस्ट असल्याने सांगण्याची गरज नाही .
(Dr. Dr.Shridhar Pawar ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केलेलं लिखाण )
Repost
Comments
Post a Comment