बळी आणि बरेच काही श्रीधर तिळवे नाईक
एका जैन माणसाने बकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची खरेदी करून जे काही केले त्याबद्दल मीडियात उलटसुलट चर्चा चालू आहे मुळातच मूळ मुद्द्याला बगल देत हे सर्व काही चाललेले आहेत मूळ मुद्दा हा आहे की बळी ही संकल्पना आली कुठून आणि ती का मानावी?
बळी ही संकल्पना देव ह्या संकल्पनेनंतर उदयाला आलेली आहे म्हणूनच प्रथम देव कसे निर्माण झाले ते पाहायला हवे
देव ही एक अत्यंत गुंतागुंतीची संकल्पना आहे माणसाने ते का निर्माण केले हे कळणे आजही अवघड जाते कारण त्यामागे तर्कशास्त्र आहे ते आता कालबाह्य होत गेलेले आहे प्राचीन काळामध्ये स्वप्नात दिसणारे आपले पूर्वज आपले आई-वडील हे चालत बोलत हालत असल्याने माणसाचा असा समज होता कि ते कुठे ना कुठेतरी जिवंत आहेत कारण फक्त जिवंत मनुष्यच बोलू शकतो याची त्यांना खात्री होती मग त्या पूर्वजांची जे स्वप्नात येऊन बोलता चालता चालतात जिवंत असण्याची जागा कुठली हा प्रश्न पडल्यावर माणसाने पितृ लोक ही संकल्पना तयार केली. प्रश्न असा निर्माण झाला की मेल्यानंतरही जर आपले वडील आजोबा पणजोबा जिवंत असतील तर ते कुठे जात असावेत आणि मग या त्या जागेचा म्हणजेच पितृ लोकांचा मालक कोण त्यांच्या टोळीचा प्रमुख कोण असावा हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातूनच देवाची निर्मिती झाली कालांतराने पुढे यातूनच चांगल्या कामासाठी स्वर्ग आणि वाईट कर्मासाठी नरक अशा दोन लोकांची निर्मिती करण्यात आली प्रश्न असा होता की या दोन्ही लोकांचे नियंत्रण कोणाकडे असते? आकाशात दिसणारे सूर्य आणि चंद्र हे कायमच नवल वाटत असल्याने या दोघांच्याकडे ह्या परलोकांची मालकी गेली त्यांना अनेक वेगवेगळी नावे मिळाली किंबहुना जुडाईक धर्मातली देवाची नावे ही अनेकदा सूर्याला दिलेली किंवा चंद्राला दिलेलीच नावे आहेत पुढे पुढे यातूनच सूर्य हाच एकमेव देव ही संकल्पना उदयाला आली आणि त्यातूनच एकदेववाद निर्माण झाला आणि एकाच देवावर श्रद्धा ठेवा असा दुराग्रहही निर्माण झाला पुढे माणसाला कळून आले की वनस्पती पाण्यामुळे जगतात केवळ सूर्यामुळे नाही साहजिकच मग पाणीही महत्त्वाचे झाले त्यामुळे पाऊसही महत्त्वाचा झाला आणि पावसाचा देवही महत्त्वाचा झाला सूर्य नसला की वनस्पती जगत नाहीत हे लक्षात आल्यावर किंवा अनेकदा पाऊसच पडत नाही हे लक्षात आल्यावर आकाशात कोणीतरी आपल्या पूर्वजांच्यावर आणि पावसावर नियंत्रण ठेवणारा कोणीतरी असावा ही संकल्पना उदयाला आली हेच सुरुवातीचे देव होत शैव तंत्रात प्रकाश देणारा देव म्हणून यम उदयाला आला तर युरेशियन श्रुतीमध्ये सूर्य , असुर , आदित्य नंतर विष्णू व पाऊस पाडणारा देव म्हणून युरेशियन श्रुतीमध्ये वरुण, इंद्र व दक्षिण भारतात हरी उदयाला आले शैव धारेत पुढे त्यातही स्पेशलायझेशन होत जाऊन सकाळचा सूर्य वेगळा झाला त्याला राम असे नाव मिळाले दुपारचा सूर्य मार्तंड भैरव झाला संध्याकाळचा सूर्य शाम झाला अतिसंध्याकाळचा संध्या प्रकाश कालीन समुद्रात बुडतानाचा सूर्य हरी झाला आणि रात्रीचा सूर्य कृष्ण झाला
हळूहळू पंचमहाभूतांची संकल्पना स्थिरावली त्यातही स्पेशलयझेशन झाले आणि वेगवेगळ्या देवांना वेगवेगळी कामे देण्यात आली. आज आपणाला स्वप्न पडतात म्हणजे काय होतं ते माहित आहे आज आपण असं म्हणत नाही की स्वप्नात आहेत म्हणून आपले पूर्वज जिवंत आहेत कारण आपणाला स्वप्नाचे ज्ञान प्राप्त झाले आहे स्वप्नातले सर्व काल्पनिक आहे हे आपल्याला नीट ठाऊक आहे आपल्या पूर्वजांच्या बाबतीत मात्र असे नव्हते साहजिकच त्यांनी त्यांच्या काळाच्या हिशोबाने आपले देव बनवले पुढे पुढे ग्रहणाला सूर्य गायब होऊ लागला आणि मग अंधाराची भीती वाटायला लागली सूर्य आपल्यावर कोपलाय असे वाटायला लागले तेव्हा त्याची शांती करण्यासाठी म्हणून बळी देण्याची प्रथा अस्तित्वात आली हीच गोष्ट पावसाबाबत पाऊस न पडल्याने दुष्काळ पडू लागले तेव्हा हा पाऊस देवतेचा कोप असावा म्हणून पाऊस देवतेला बळी चढवण्यात येऊ लागले आज आपणाला ग्रहण कसे होते हे माहित आहे किंवा दुष्काळ कसा पडतो हे माहित आहे परंतु प्राचीन काळी हे शक्यच नव्हते कारण विज्ञानाची प्रगती झाली नव्हती आज विज्ञानाची प्रगती झाली आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींची कारणे माहित आहेत प्रश्न असा येतो मला जर कारणे माहीत असतील तर मी बळीची प्रथा का चालू ठेवावी ? आणि इतरांनाही ती का चालू ठेवू द्यावी कारण एकेकाळी बळी म्हणून नरबळी दिले जात ते नर बळी थांबवताना काय कारण दिले जात होते ? तर पशूला बळी देणे हे योग्य परंतु माणसाने माणसाला बळी देऊ नये ते अयोग्य हेच कारण दिले जात होते म्हणजेच एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारू नये हे अहिंसेचे तत्व त्यामागे होते आता हेच अहिंसेचे तत्व पशुंना का लागू होत नाही किंवा ते मी पशुंना का लागू करू नये? परंतु हे प्रश्न कोणीही विचारत नाही कारण मग अनेक श्रद्धा कोसळू लागतात आणि अनेकांचे हितसंबंध श्रद्धांच्यात गुंतलेले असल्याने हे लोक सहजासहजी लोकांना श्रद्धा सोडू देऊ इच्छित नाहीत
अशा पार्श्वभूमीवर मग करायचे काय ? एक तर तुम्हाला श्रद्धा स्वीकाराव्या लागतात किंवा नाकाराव्या लागतात याबाबतीत कसलाही फर्म स्टान्स कोणीही घेत नाही मी खूपदा सांगितले आहे की मी श्रद्धा नाकारतो पण मोक्ष स्वीकारतो कारण मोक्ष हा माझा अनुभव आहे मोक्षाची शक्यता कुठल्याही देवाशिवाय धर्माशिवाय असल्याने मोक्षाला ना कुठला देव लागतो ना कुठला धर्म ना कुठली श्रद्धा ! साहजिकच जो मोक्षवादी मनुष्य आहे तो सहजरित्या बळी देणे नाकारू शकतो प्रश्न असा येतो की जनसामान्यांचे काय आणि सगळा पेच इथूनच सुरू होतो यामागे अर्थात राजकारणाचाही वाटा आहे कारण श्रद्धेच्या आधारे राजकारण करणारे अनेक लोक आहेत त्यांना लोकांचाही पाठिंबा आहे म्हणजेच राजकारणी लोक आणि जनतालोक हे दोघेही श्रद्धावान असल्याने हा तिढा सुटत नाही भारतामधील नास्तिक परंपरा ही तब्बल 12000 वर्षाची आहे तिला अत्यंत चांगला आकार भगवान महावीर व भगवान बुद्ध यांनी दिला आहे आता या परंपरेला मानणारा जो वर्ग आहे त्याने बळींच्या बाबत काय भूमिका घ्यावी ? की भूमिकाच घेऊ नये ? मग या प्रश्नाच्या अत्यंत खोलातच जावे लागते आणि विचारावे लागते की मुळात श्रद्धांची गरज आहे का ? या प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर नाही असे असले तरी हे स्वीकारायला आजही कोणाची तयारी नाही आणि हा सगळा पेच प्रसंग त्यातूनच निर्माण होतो विशेषता इस्लामबाबत तो अधिक तीव्र प्रमाणात आहे काही झाले तरी आमचे सगळे जीवन आम्ही श्रद्धेच्याच मार्गाने घालवणार असा बहुतांशी मुसलमानांचा ठाम निश्चय आहे साहजिकच त्यांच्या संदर्भात बळी देणे हा अतिशय भावनिक मुद्दा बनतो या भावनेची आपण कदर करायला हवी की नको असा प्रश्न त्यातून निर्माण होतो बहुसंख्यांक लोक हे श्रद्धेच्या बाजूने असल्याने आज बळी विषयी काहीही करता येत नाहीये लोकशाही स्वीकारणाऱ्या लोकांना तर हा लोकांचा दृष्टिकोन असल्याने तो स्वीकारायला पाहिजे असे वाटत असते पण मग एके काळी सती प्रथा हा बहुसंख्यांक ब्राह्मणांचा व क्षत्रियांचा दृष्टिकोन होता पण तिथे हस्तक्षेप चालला पण इथे हस्तक्षेप चालणार नाही म्हणजे आमच्या श्रद्धा त्या खऱ्या श्रद्धा तुमच्या श्रद्धा त्या खऱ्या श्रद्धा नाहीत हे कसे चालेल ? याबाबतीत कितीही प्रबोधन करा फारशी प्रगती झालेली दिसत नाही याचे कारण मूळ मुद्दा काय आहे ते बघायचेच नाही आणि अहिंसेवर चर्चा करत बसायची असा काहीतरी उद्योग सुरू आहे जैन लोकांच्या बळी देण्याच्या विरोधात अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका भगवान महावीर यांनी घेतलेली आहे याचा जैनांनी प्रचार करायचा की नाही ज्यांनी ही खरेदी बकऱ्यांची केलेली आहे त्यांचा मूळ उद्देश जैन धर्माचा प्रचार करणे प्रसार करणे हाच असतो हे प्रतीकात्मक असते त्यामुळे त्यांनाही ही कृती करण्याची अनुमती नक्की आहे आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार कसा करायचा त्यासाठी कोणती कृती करायची याविषयीची कसलीही बंधने कोणावरही नाहीत अनेकदा हा मूळ मुद्दाच विसरला जातो जणू काय ह्या देशांमध्ये धर्मप्रचार आणि धर्मप्रसार करण्याचा हक्क फक्त अहिंदू धर्मांना आहे का बाबांनो ? सेक्युलर लोकांचे तर्कशास्त्र हे असे अनेकदा दुटप्पी असते दुर्दैवाने आहाराशी निगडित मुद्दा बळी संदर्भात उपस्थित केला जातो वास्तविक जैन लोकांनी त्यांना काय म्हणायचे आहे हे स्पष्ट सांगायला हवे. जैन लोक अति अल्पसंख्यांक असल्याने ते म्हणत नाहीत आणि त्यातूनच प्रतिकात्मक कृतीवर भर द्यावा लागतो जैन लोकांनी स्पष्ट सांगायला हवे की आमच्या धर्मामध्ये बळी देणे बसत नाही आणि आपला विचार स्पष्टपणे मांडायला हवा ते करण्याऐवजी फक्त बकरी खरेदी करणे हा काही उपाय होऊ शकत नाही कारण ज्यांना बकऱ्या खरेदी करायचे आहेत त्यांनी त्या केल्याच असणार फक्त तुम्ही रिप्लेसमेंट वाढवली आणखी काही झालेले नाही बळी संदर्भातला जो लढा आहे तो अहिंसेच्या संदर्भात आहे हे जैन लोकांनी स्पष्टपणे सांगायला आले त्याचबरोबर बळी देण्याची श्रद्धा कुठून आली हेही श्रद्धेच्या संदर्भात सांगणे आणि श्रद्धा विरोधी आंदोलन चालवणे अत्यंत आवश्यक आहे जैन लोक हे करत नाहीत त्यामुळे मग अशा कृत्या या पेज प्रसंगात सापडत जातात वास्तविक लोकांचे जोपर्यंत प्रबोधन होत नाही तोपर्यंत लोक बळी देत राहणारच आता आपण मूळ कथेकडे येऊ जुडाइक धर्माचे जे प्रभावक्षेत्र आहे तिथे एकेकाळी नरबळी सुद्धा दिले जात अब्राहम अब्राहम या प्रेषित समाजसुधारकाने त्या जागी पशुबळी आणले आणि त्याने मानवी जीवन नक्कीच सुधारले आहे ते त्यांनी दिलेले योगदान आहे हे सर्व जुडाइक धर्मामध्ये एक कथा म्हणून मांडले गेले आणि खुद्द देवानेच पशुबळी स्वीकारला हे लोकांच्यावर बिंबवले हे नक्कीच सामाजिक सुधारणारे कृत्य आहे त्याचा आदर केला पाहिजे पण त्याचबरोबर हे नेमके कशासाठी झाले हेही सांगितले पाहिजे बळीची संकल्पना नसती तर हे घडलेच नसते म्हणूनच बळी संकल्पना का आली हेही सांगायला हवे प्रश्न आहे प्रेषित इब्राहिम यांनी अब्राहम यांनी अत्यंत करुणा दाखवून त्यांच्या प्रदेशातील नरबळीची प्रथा कायमची बंद पाडली. प्रश्न असा आहे की त्यांची ही करुणा याहून वाढवता येणे शक्य नाही काय ? तर आहे . म्हणजे ती करुणा आपल्याला पशुंच्यावरही दाखवता येईल का की आपली करुणा आपण फक्त माणसांच्या पुरतीच मर्यादित ठेवणार आहे असा हा खरा प्रश्न आहे ? पण मग इथे आता प्रश्न आहाराचा उपस्थित होतो मुळात माणसाकडे शाकाहार इतक्या प्रमाणात नाही की सर्व मानव जात शाकाहारी बनेल अशा वेळेला शाकाहाराचा अत्याग्रह सोडून द्यावा लागतो आणि एकदा का मांसाहार स्वीकारला की शेवटी हे लक्षात घ्यावे लागते की बळी दिलेला पशु शेवटी माणसाच्या पोटातच जाणार आहे आणि ह्या तर्काच्या आधारे बळी स्वीकारतो येतो जर बळी देवाला खरोखरच पोचला असता तर लोकांनी बळी चढवला असता की नाही याबद्दलच मला शंका आहे बळी देवाला पोहोचत नाही शेवटी माणसाच्या पोटात पोहोचतो एकदा का मांसाहार स्वीकारला की मग ही बळी प्रथा श्रद्धा म्हणून चालू द्यावी या मतापाशी आपण येतो किंबहुना ती त्यामुळेच चालू आहे थोडक्यात काय तर व्यवहारिक पातळीवर बळी हा माणसाच्या पोटातच जात असल्याने आणि आहारात मांसाहार अटळ असल्याने केवळ शाखाहारावर संपूर्ण मानव जात जगू शकत नसल्याने बळीला मान्यता द्यावी लागते हा खरे तर नाईलाज आहे पण त्याचबरोबर बळी देण्यामागचे तर्कशास्त्र वैज्ञानिक पातळीवर टिकत नाही हेही ठणकावून सांगायला हवे. आम्ही बळीला मान्यता देतो कारण तो माणसाच्या पोटातच जातो हेही स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे बळी बाबत जितके प्रबोधन करता येणे शक्य आहे तितके करणे आवश्यक आहे केवळ टोकाच्या भूमिका घेऊन व थंड वाद करता येतो पण माणसांना बदलण्यासाठी त्यांची कारणे नीट बघावी लागतात आजही माणसांचा देवावर आणिस्वर्ग नरकावर विश्वास आहे कयामतीवर विश्वास आहे आणि त्यासाठी माणसे मजहब पाळतात आणि मजहब हा देखील कोणी ना कोणीतरी शिकवलेलाच असतो या शिकवण्या विरोधातच प्रबोधन करावे लागते किंबहुना प्रबोधन म्हणजे धार्मिक शिक्षणाविरोधात लढाई असते ही लढाई ज्यांना करायची आहे ते ती करतात ज्यांना ती करायची नाही फक्त राजकारण करायचंय ते लढाई करत नाहीत फक्त राजकारण करतात आणि हे राजकारण दोन्ही बाजूनी चालू असते
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment