प्रश्न: तुम्ही मोक्षाविषयी का बोलत नाही ?

श्रीधर तिळवे नाईक: मोक्षाविषयीची बोलणे आणि मोक्ष यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. मोक्षाविषयी आतापर्यंत जे जे काही बोलले गेले आहे त्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. याचा अर्थ मी अजिबात बोलत नाही असा नाही जेव्हा अस्सल साधक येतो तेव्हा मी बोलतो पण हल्ली साधक कमी आणि करमणूक करायला येणारे लोक जास्त येतात त्यांच्या दृष्टीने मोक्ष ही सुद्धा करमणूक आहे ते स्वतःच्याच मनाचे मनोरंजन करत असतात अनेक कलावंत तर फक्त प्रेरणा घेण्यासाठी येत असतात . त्यांना मोक्षाची काडीची साधना करायची नसते . आपल्या कलेला काय उपयुक्त आहे ते ते शोषून घेतात आणि निघून जातात काही फक्त त्यासाठीच फोन करत असतात अस्सल साधक एक दुर्मिळ गोष्ट होऊन बसलेली आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना नेमका प्रश्न घेता येतो . बाकी तुम्ही कितीही काहीही वाचत बसला लिहित बसला तरी ते सर्व काल्पनिकच आहे मोक्षाविषयी कितीही प्राचीन लिखाण असो ते सर्व रद्दी आहे या रद्दीत मी कशाला भर टाकत जाऊ ? अनेकांना तर धर्म आणि मोक्ष यांच्यातला फरकच कळत नाही. कारण आपल्याकडे धर्म हाच मोक्ष समजण्याची फार मोठी मूलभूत चूक अनेक मोक्षवादी लोकांनी केली त्यातून प्रचंड मोठा घोटाळा निर्माण झालेला आहे. सर्व धर्म हे कल्पनेवर उभे आहेत .त्यांचा मोक्षाशी संबंध नाही .मोक्ष साहित्य म्हणून ते सर्व रद्दी आहे मग त्यातल्या कथा कितीही रम्य असोत त्या उलट कल्पना नाहीशा केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही 

प्रश्न : तुम्ही स्वतः कलावंत आहात 

श्रीधर तिळवे नाईक: मी स्वतः कलावंत आहे म्हणूनच उत्तम कथा सांगू शकतो कविता लिहू शकतो पण मला हे माहित आहे हे सर्व मोक्षाच्या संदर्भात रद्दी आहे किंबहुना मी अनेकदा म्हटलेले आहे ओशो कलावंत नव्हते म्हणून कथा सांगत बसले आणि त्यांच्यासारखेच अनेक जण आता त्यांची नक्कल करत अध्यात्मिक कर्मणूक करत असतात.मी कलावंत आहे म्हणूनच कथा सांगत नाही मला कला किती भंपक असते फार नीट माहिती आहे. 

प्रश्न तरीही अधून मधून तुमच्याकडूनही का बोलले जाते 

श्रीधर तिळवे नाईक: मोक्ष नावाचे काहीतरी आहे याची बातमी देण्यासाठी आणि लक्षात घ्या ही दिली गेलेली बातमी सुद्धा मोक्षाबाबत अफवा आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय