नेटम पोस्टनेटम विज्ञान ,अंतस्थ - बहिस्थ डिबेट आणि सत्य श्रीधर तिळवे नाईक
सध्या शिवांडाच्या संदर्भात आणि ब्रम्हांडाच्या (कॉसमॉस) संदर्भात विज्ञानामध्ये अनेक गोष्टींची चर्चा सुरू आहे. त्यातील एक चर्चा म्हणजे आपण जर का ब्रम्हांडाच्या म्हणजे कॉसमॉसच्या आत असू तर आपल्याला ते ब्रम्हांड बाहेरून दिसणे शक्य नाही म्हणजेच आपणाला ब्रम्हांड नेमके काय आहे हे कधीही कळणार नाही . अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर जो भाग आहे तो समग्र कसे कवटाळणार ? जे अपूर्ण आहे ते पूर्ण कसे पाहणार ? ज्याप्रमाणे डोळा संपूर्ण देह न्याहाळू शकत नाही त्याचप्रमाणे जो भाग आहे जो अंश आहे जो अपूर्ण आहे तो संपूर्ण समग्र पाहू शकत नाही
माझे त्यावर उत्तर असे आहे की जर का हा भागच नाहीसा झाला आणि प्राण समग्र झाला तर ! मोक्षामध्ये नेमके हेच होते . तुम्हीच शिव होता तुम्ही शिवांड होता मग आपोआपच संपूर्ण शिवांडाच्या अनुभवाला तुम्ही उपलब्ध होता. इथे ज्ञान होत नाही फक्त प्रचिती असते . त्यामुळेच शैव धारेमध्ये नेहमीच मोक्ष म्हणजे ज्ञानाचा अंत असे म्हटलेले आहे. पाश्चात्त्य देशात ही धारा पूर्ण पणे पोहोचलेली नाही म्हणून त्यांना या संदर्भात अजूनही संपूर्ण कल्पना येत नाही. ज्ञानाने पछाडलेली अशी ती एक ग्रीक संस्कृतीतून जन्मलेली पॅशन आहे जिला नंतर युरेशियन रोमन संस्कृतीने नाहीसे केले आणि ख्रिश्चन लोकांचा ख्रिश्चन धर्माचा एक रानवट दृष्टिकोन सर्वत्र प्रस्थापित करत स्वतःची वर्ग व्यवस्था आणि वर्णव्यवस्था जिला आता आपण इस्टेट व्यवस्था म्हणू शकतो प्रस्थापित केली .(या इस्टेट व्यवस्थेला इंग्लिश आणि फ्रेंच राज्यक्रांतीने सुरुंग लावला)
पुरोगामी काळामध्ये ग्रीक संस्कृतीचे पुन्हा एकदा पुनरजीवन झाले . आपल्याकडे मात्र पुरोगामी काळामध्ये शैव संस्कृतीचे बसवेश्वर यांनी पुनर्जीवन केले आणि शिवाजी महाराजांनी ती वाढवली होळकर घराण्याने तिचा विस्तार सुरूही केला पण हे पुनरजीवन पूर्ण होण्याआधीच ब्राह्मण धर्मी उत्तर पेशवाईकडून ती मारली गेली .
युरोपियन संस्कृतीमध्ये असे काही घडले नाही उलट तिथले राजे लोक प्रबोधनाच्या बाजूने उभे राहिले पुरोगामी वादाच्या बाजूने उभे राहिले आणि याचा फायदा युरोपियन लोकांना मिळाला पण हे लोक कायमच ग्रीक संस्कृतीतील चौकटीत अजूनही वावरताना दिसतात वास्तविक देरिदाने ग्रीक संस्कृतीतल्या अनेक केंद्र वादांना आव्हान दिले होते त्यांचे डी कन्स्ट्रक्शन केले होते ते यासाठीच केले होते ती ज्ञानाच्या कक्षा विस्तारित व्हाव्यात पण त्यातून स्वतःच्या ज्ञान कक्षा विस्तारित करण्याऐवजी उत्तर आधुनिक लोक हे प्रामुख्याने ज्यू किंवा जुडाईक असल्याने त्यांनी आपला ज्यू धर्माचा अजेंडा पुढे नेला . नंतरच्या उत्तराधुनिक लोकांनी धर्म हा विज्ञान केंद्री आयडिया लॉजिला पर्याय शोधला ज्याला खुद्द देरिदा सुद्धा अपवाद नव्हता . उत्तर प्रबोधनाच्या उत्तर पुरोगामी वादाच्या कालखंडामध्ये ज्याप्रमाणे कांटेने संपूर्ण वैज्ञानिक प्रोजेक्टच शंकास्पद केला आणि धर्म आणला अगदी तोच प्रकार उत्तर आधुनिक कालखंडामध्ये रिपीट झालेला आहे याची अनेकांना कल्पना येत नाही. त्यातूनच मग जग म्हणजे संपूर्ण ज्ञान केंद्री किंवा धर्म केंद्री व्यवस्था असा विचार येतो मोक्षाचा विचारच न झाल्याने ही सगळी गडबड झालेली आहे . माणसाला समग्र होण्याचे काही चान्सेसच ख्रिश्चन धर्मात नाहीत ते मुळात कुठल्याच जुडाईक धर्मामध्ये नाहीत आणि हाच खरा प्रॉब्लेम आहे त्यातूनच मग विज्ञानातले सुद्धा प्रॉब्लेम सुरू होतात
प्रश्न असा आहे की मोक्षाच्या अवस्थेत असलेला माणूस वैज्ञानिक ज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये येऊ शकेल काय आणि खरे संशोधन यापुढे या अंगाने सुद्धा झाले पाहिजे.माणसाच्या मेंदूला संपूर्ण शिवांडाच्या बाहेर वैज्ञानिक पातळीवर नेता येईल का हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे . मी नेहमीच सांगतो आहे की क्वांटम संपले पोस्ट quantam क्वांटम संपायला सुरुवात झाली आहे आणि आता आपण नेटम विज्ञानामध्ये आलेलो आहोत पुढे मागे पोस्ट नेटम विज्ञान-तंत्रज्ञान अटळ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही फक्त सुरुवात आहे जर का या नेटम आणि पोस्टनेटम विज्ञानामध्ये जर का समग्रच्या बाहेर जाऊन समग्र निहारता न्याहाळता येण्याची काही शक्यता निर्माण झाली तर मग कदाचित ही वैज्ञानिक कोंडी फुटू शकते अन्यथा मोक्ष हा एकमेव मार्ग मानव जाती पुढे असणार आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment