उत्तर आधुनिक विचारवंतांचा इंटरनेट वरील स्फोट आणि चौथी नवता श्रीधर तिळवे नाईक
जगातली प्रत्येक क्रांती किंवा नवता ही मोक्षामुळे निर्माण होते किंवा मोक्षाच्या उपस्थित झालेल्या ,त्याने व्यापलेल्या एखाद्या मेंदूच्या तुकड्यातून निर्माण होते. मोक्ष ही एकमेव गोष्ट अशी आहे जी तुमच्या आतून उमलू शकते कारण ती तुम्हीच आहात पण जगाचा इतिहास साक्षी आहे की प्रत्येक वेळेला हा मोक्षाचा तुकडा किंवा संपूर्ण मोक्षच मोडीत काढण्याची उठा ठेव सामाजिक व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचे ठेकेदार करत असतात . मोक्षही एकमेव आतून नेलेली आलेली बातमी असते आणि ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मानव जात कायमचे प्रचंड मोठा मीडिया तुमच्या विरोधात उभा करत असतो हा मीडिया पुरोगामी काळात छापील आधुनिक काळामध्ये मुद्रित आणि उत्तर आधुनिक काळात फिल्मी होता आपल्या वर्चस्वाला काहीही झाले तरी ठेच लागता कामा नये याची काळजी हे Elite लोक घेत असतात त्यामुळेच जेव्हा आधुनिक बंड झाले तेव्हा त्या बंडाविरोधात त्या बंडाला नीट करू पाहणारे त्या बंडाला सामाजिक करू पाहणारे त्या बंडामधला मोक्ष काढून घेणारे प्रचंड काहीतरी निर्माण होणार याविषयी कोणाला शंका नव्हती
असे विचारवंत आहेत कोठे असे एकेकाळी भारतामध्ये विचारता येण्याची सोय होती आणि आज अवस्था अशी आहे की इंटरनेटवर इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या काळात निर्माण झालेल्या विचारवंतांची प्रचंड मोठी फौज उपस्थित आहे की ती बघून चक्कर यावी . ज्या लोकांनी आधुनिकतेला आव्हान देऊन उत्तराधुनिकता मांडली अशा किमान 300 विचारवंतांची यादी सहज करता येईल इतके हे अफाट असे वैचारिक काम आज पुढे आलेले आहे . आपण त्यासाठी इंटरनेटचे आभार मानले पाहिजेत पण त्याचबरोबर हे सर्व वाचणार कधी हा फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आपल्याला वाटत होते तसे जग चाललेले नव्हते विशेषत: दुसरे महायुद्ध संपल्यानंतर उत्तराधुनिक पद्धतीने विचार करणारे अनेक विचारवंत आपले स्वतःचे पहिले पुस्तक 1950 ते 1965 या दरम्यान लिहून मोकळे झाले होते हे आता स्पष्ट झालेले आहे. आणि यातल्या अनेकांनी नंतर किमान पाच दहा पुस्तके लिहिलेली आहेत .
सौष्ठवचे काही अंक आल्यानंतर "अरे तू ज्यांच्या विरोधात रिबेल करतोयस असे विचारवंत नेमके आहेत तरी कोण यांचा एक किमान ढाचा तरी दे अशी विनंती आली तेव्हा मनोज जोशी वर लिहिताना मी सौष्ठवच्या एका अंकात यादी टाकली होती आज ती यादी इतकी तुटपूंजी वाटत आहे की बोलता सोय नाही .
ज्या अमेरिकन समाजाला आपण अत्यंत उथळ समजत होतो तो समाज प्रत्यक्षात या काळात प्रचंड गांभीर्याने सगळ्या उत्तर आधुनिकतेचा विचार करत होता आणि नव्या अमेरिकन साम्राज्याची पायाभरणी करत होता हे आता स्पष्ट झालेले आहे आणि आपल्याकडे कम्युनिस्ट लोक सांगत होते की अमेरिकन समाज सर्वात उथळ आहे. एकंदरीत कम्युनिस्ट लोकांनी संपूर्ण भारतीय विचारविश्व चुकीच्या दिशेने नेले हे आता स्पष्ट होत आहे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या काळामध्ये जो प्रतिस्पर्धी देश होता तो रशिया याबाबतीत बिलकुल झोपलेला होता की काय अशी शंका येण्याइतपत अमेरिकन विचारवंत लोकांनी केलेले काम रशियाने पूर्णपणे दृष्टीआड केलेले दिसते याचा परिणाम भारतीय कम्युनिजमवर किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे याचा अंदाज येणे सुद्धा आता कठीण आहे मी बारावीनंतरच कम्युनिजमकडे केलेली पाठ हा त्या काळातला एक फार उत्तम निर्णय होता हे तर आता सिद्धच झाले आहे .सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कम्युनिस्ट लोकांना सुद्धा आत्ता आत्ता उत्तर आधुनिकतेचा जणूकाय पत्ता लागलेला दिसतो जणू इंटरनेटवर उत्तराधुनिक कम्युनिस्ट लोक व त्यांचे साहित्य डिजिटल फॉर्म मध्ये आणले गेले तेव्हा त्यांना कळले आणि यातले बहुतांशी लोक हे युरोप आणि अमेरिकेत होते रशियामध्ये नव्हते हे लक्षात घेण्याजोगे आहे.
या सगळ्याचा परिणाम रशियावर स्पष्टपणे झालेला आहे कारण रशिया वैचारिकतेबाबतीत जितका पुढे आलेला हवा होता तितका नव्हता आणि म्हणूनच मग रशिया कोसळला . आज या कोसळण्याचे आश्चर्य वाटत नाही . कारण नवा विचार मेला की देश पण मरतो. रशिया आपल्या कर्माने मेला . 1990 नंतर मात्र रशियामध्ये पुन्हा एक विचारवंतांची नवी फळी निर्माण होताना दिसते आहे.
या सगळ्या उत्तर आधुनिक प्रचंड मोठ्या कॅनवासमुळे नवीन पिढी उत्तर आधुनिकतेच्या पुन्हा एकदा कह्यात आलेली दिसते . उत्तराधुनिकतेने धर्म आणि संस्कृती केंद्रस्थानी आणल्या त्याचा फार मोठा प्रभाव आत्ताच्या पिढीवर आहे . त्यामुळेच चौथ्या नवतेचा विचार पुन्हा एकदा साईडलाईन झाला की काय अशी शंका येते . मला स्वतःला कायमच खात्री होती की माझ्या प्रमाणेच चौथ्या नव्हतेचा विचार करणारे अनेक विचारवंत जगभर असणारच पण दुर्दैवाने इंटरनेट वरील त्यांची उपस्थिती जवळजवळ नाहीच हे सर्व लोक आता कधी ना कधीतरी येत्या वीस पंचवीस वर्षात पुढे येतीलच . तोपर्यंत धर्माचा पुरोगामी लोकांनी केलेला विरोधच आपण साजरा करत बसायचा. एका अर्थाने उत्तर आधुनिकतेच्या पातळीवर ही पिढी खूप भाग्यवान आहे कारण जी पुस्तके मिळवायला आम्हाला अक्षरशः रस्ते रस्ते पालथे घालायला लागले शहर शहर पालथे घालायला लागले ते सर्व यांना आता आयते उपलब्ध आहे . प्रश्न असा आहे की ही सर्व वैचारिक संपदा वाचून त्याला विरोध करण्याची काही चौथ्या नवतेची प्रोसेस या लोकांच्या मध्ये ऑन होणार आहे का की हे लोक तिसऱ्या नवतेतच आणि देशीवादाच्या , परंपरेच्या आणि धर्माच्या सेलिब्रेशन मध्येच अडकत हा देश मागासलेला ठेवण्यात धन्यता मानणार आहेत ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment