भयाविषयी: श्रीधर तिळवे नाईक
प्रश्न: आपण खरोखर भयग्रस्त असतो का ?
श्रीधर शांताराम तिळवे नाईक :नैसर्गिक भये दोन १ उंचावरून पडण्याचं २ प्रचंड मोठा ध्वनी आणि आकार आद ळण्याची शक्यता आणि त्यामुळे आपण नष्ट होणे किंवा जखमी होणे ही दोन्ही भये मोक्षा नंतर ही जिवंत ठेवली जातात कारण देह टिकवण्यासाठी ते आवश्यक आहेत .बाकी सर्व भये ही अनुभव व ज्ञाननिर्मित आहेत त्यातील अनेक ज्ञाने ही सामाजिक सिच्युएशन किंवा संस्कार यांच्याद्वारे आपल्यात पेरली जातात आणि अनेकदा आपल्याला ती नैसर्गिक वाटत राहतात प्रत्यक्षात ही सर्व अनुभवजन्य ज्ञानजन्य संस्कार जन्य आणि समाजजन्य असतात तुम्ही कुठल्या समाजात जन्माला आहात त्यावर सुद्धा यातली काही भये अवलंबून असतात . म्हणजे समजा तुमच्या भोवताली जे प्राणी आहेत त्यांच्या संदर्भातच तुमच्या आत भर निर्माण होऊ शकते भय निर्माण होऊ शकते जे प्राणी तुमच्या भोवताली अस्तित्वातच नाहीत त्यांचे भय कसे काय निर्माण होणार ?
प्रश्न: याचा अर्थ आजाराचे भय हे सुद्धा ज्ञान जन्य आहे का ?
श्रीधर तिळवे नाईक: हो समजा एखादा आजार तुम्हाला माहीतच नसेल आणि तुम्हाला तो झाला असेल तर तुम्हाला त्या आजाराचे भय वाटत नाही कारण तुम्हाला त्या आजाराचे ज्ञानच नाही ज्ञान भय वाढवते त्यामुळे आपल्याकडे अनेकदा अज्ञानात सुख असते असे जे म्हटले जाते त्याचे कारण हे आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या रोगांचा परिचय माणसाला झाला तेवढ्या प्रमाणात भय वाढत गेलेले आहे अनेक आजार आपल्या पूर्वजांना माहीतच नव्हते आणि कदाचित त्यामुळे त्यांना त्या आजाराचे साईड इफेक्ट सुद्धा झेलावे लागले नसतील कारण अनेकदा बऱ्याचशा साईड इफेक्टचे मूळ भयामध्ये असते . ज्ञान भय निर्माण करते आणि आशा सुद्धा ! माणसाच्या इतिहासामुळे त्याला अनेक प्रकारच्या ज्ञानाचा परिचय होत असतो आणि त्यामुळे साहजिकच त्या ज्ञानामुळे आशा आणि भय अशा दोन्ही गोष्टी वारसा म्हणून प्राप्त होतात आपणाला त्या लगेच कळत नाहीत पण एकदा का स्वतःचे निरीक्षण सुरू केले की मग हळूहळू सर्व काही लक्षात यायला लागते आपला जो निरीक्षक असतो तो सुद्धा अनेकदा निरीक्षणांचे बाय प्रॉडक्ट असतो . तेही हळूहळू लक्षात येते . अनुभवजन्य जे भय असते ते सर्वसाधारणपणे अनुभवाशी निगडित असते आणि ते अत्यंत वैयक्तिक होऊन जाते त्यामुळेच तर मानसशास्त्र गरजेचे बनत जाते कारण मानसशास्त्रामध्ये आपणाला मनाशी भिडावे लागते आणि मन हे वैयक्तिक असते विशेषतः त्या मनाचा अनुभवजन्य स्मृतिजन्य असा जो शारीरिक भाग असतो तो पूर्णपणे तुमच्या शरीराशी निगडित आणि तुमच्या इंद्रियांशी निगडित आणि तुमच्या स्मृतीशी निगडित असतो त्यामुळे सर्व ऑपरेशन सिस्टीम वैयक्तिक शारीरिक बनत जाते . अनेकदा ऑपरेशनची संपूर्ण व्यवस्था सुद्धा अगदी मोठ्यामोठ्या शारीरिक ऑपरेशनच्या संदर्भात सुद्धा वैयक्तिक गोष्टींच्यावर अधिक अवलंबून राहायला लागते. ऑपरेशनचे वाटणारे भय सुद्धा हे अनेकदा ज्ञानजन्यच असते कारण आपणाला ऑपरेशनचा ऑपरेशन करून घेण्याचा अनुभव नसतो अशावेळी इतरांच्या कडून प्राप्त केलेल्या ऑपरेशनच्या संदर्भातील अनुभवांच्यावर व ज्ञानावर आपण अवलंबून असतो या भयाकडे पाहता आले पाहिजे कारण ती मेंदूची नैसर्गिक प्रतिक्रिया असते
प्रश्न : म्हणजे या भयांच्या पासून मुक्त होता येते ?
श्रीधर तिळवे नाईक: हो मात्र भयामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक प्रतिक्रिया या संपूर्णपणे शरीराच्या स्वायत्त प्रतिक्रिया असतात त्यांना नीट पाहता येते शेवटी शरीराची म्हणून स्वतःची एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी कधीकधी मेंदूच्या ताब्यात असत नाही . हे सर्व ऑपरेशन टेबलवर तुम्ही नीट बघू शकता.
प्रश्न : पण आपल्याकडे मृत्यूचे वाटणारे भय हे नैसर्गिक मानले गेले आहे
श्रीधर तिळवे नाईक: ते नैसर्गिक म्हणण्यापेक्षा उपनैसर्गिक म्हणणे जास्त चांगले. अनेकदा दुसऱ्यांचा मृत्यू बघून मृत्यूचे भय वाढत जाते. अन्यथा तुमचे शरीर स्वतःच अनेक पेशींचा मृत्यू घडवत असते मृत्यू शरीराला फार सवयीचा आहे. सृजनशीलता आणि मृत्यू हे शरीराचे दोन आयाम आहेत जे निरंतर काम करत असतात पेशींचे सृजन आणि मृत्यू दोन्ही होत असते . त्यामुळे त्या अर्थाने ना सृजनाचे भय आहे ना मृत्यूचे भय आहे. एखाद्या स्त्रीने जर बाळंत होणारी स्त्री आयुष्यात कधी पाहिली नाही तर तिला बाळंत होण्याचे तितके भय वाटणार नाही पूर्वी वाटायचे पण नाही पण झाले असे की आपल्याकडे भाषा आली आणि आपण भाषेद्वारे सगळे अनुभव एकमेकाला सांगत बसतो त्यामुळे हे देवाण-घेवाण करत आपल्याकडे आलेले अनुभव हे अनेकदा ज्ञानजन्य आणि विचार जन्य अनुभव असतात. एक काळ असा होता की डिलिव्हरी करून पुन्हा चालायला लागणाऱ्या बायका होत्या आता अशा बायका मिळणे शक्य नाही कारण आपण दृकश्राव्य माध्यमातून अनेक गोष्टींच्या विषयी इतके आर्टिफिशियल अनुभवजन्य भय निर्माण केलेले आहे की बोलता सोय नाही . अनेक बायका या चिन्हसृष्टीतून प्राप्त केलेल्या भयामुळे मुलांना जन्म द्यायला तयार नाहीत .चिन्हसृष्टी ही जितकी फायद्याची आहे तितकी तोट्याची पण आहे कारण तिने आरटीफिशियल अनुभवांचा प्रचंड मोठा साठा वाढवलेला आहे आपल्याला या साठ्याची नेमकी कल्पना आता येत नाही इतका तो आपल्या आत घुसत जात असतो. सध्या फक्त चर्चा आर्टिफिशियल इंटेलिजन्स होती पण गंमत अशी आहे की आर्टिफिशियल एक्सपिरीयन्सची ही चर्चा व्हायला हवी अनुभव ज्यांना चिन्हात्मक अनुभव म्हणता येईल ते सुद्धा आपण प्रचंड वाढवून ठेवलेले आहेत आणि कलेचे ते काम आहे . ताजेपणा नष्ट करण्यात कलेचा प्रचंड मोठा वाटा आहे. कला प्रत्येक गोष्ट शिळी करत चाललेली आहे. म्हणजे समजा तुम्ही बॉलीवूड चित्रपटातून मुंबई पाहिली असेल तर प्रत्यक्ष मुंबई तुम्ही जेव्हा पाहायला याल तेव्हा त्या मुंबईचे फारसे कौतुक तुम्हाला वाटत नाही कारण तुम्ही आधीच चित्रपटातून ती पाहिलेली आहे . एका अर्थाने मॅजिक नष्ट होते . त्यामुळे कला चांगली की वाईट हा फार मोठा प्रश्न आहे. आजकाल तर अवस्था अशी आहे की कला खोटेपणाला हिंसेला व्हॅलिडीटी पुरवत आहे चोरी करणे हे सुद्धा महान काम असल्यासारखे पिक्चर मध्ये दाखवले जाते. हीच गोष्ट दारू पिणे सिगरेट ओढणे यांच्याबाबत आहे निर्व्यसनी हिरो सापडत नाही या सगळ्यामुळे नेमके काय होते आहे याची आपणाला कल्पना नाही आणि कलावंत या संदर्भात कसलीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. फक्त कलेचे स्वातंत्र्य म्हटले म्हणजे झाले. त्यामुळे साहजिकच दारू पिणे यामध्ये काय वाईट आहे असा संस्कार होत जातो कारण तो आरटीफिशियल अनुभवजन्य वारंवार इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या वारंवारतेने बिंबवला जातो की त्याचे साईड इफेक्ट कळे तोपर्यंत काल निघून गेलेला असतो द्वादशशीलतेची नित्य हत्या हा जवळजवळ सर्वच कलांचा गुणधर्म बनून गेलेला आहे . रामायण आणि महाभारत यांनी याची सुरुवात केली. यामुळे एकाच वेळी हिंसे विषयी सुप्त आकर्षण आणि भय निर्माण होते. आणि लक्षात घ्या हे नैसर्गिक नाहीये हे सर्व माणसांनी माणसांच्या जीवनात निर्माण केलेले आहे.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment