आजच्या काळात मोक्ष मिळवण्याचे प्रयत्न का फसतात? श्रीधर तिळवे नाईक
सर्वसाधारणपणे ज्याला आपण वास्तव समजतो ते अनेकदा आपल्याच मेंदू ने तयार केलेले असते अनेकदा जी चिन्ह संस्कृती असते तिनेच वास्तव बनवलेले असते आणि जी त्या चिन्ह संस्कृतीची भाग असलेली भाषा संस्कृती असते तिच्यातच तुम्ही वावरत राहता म्हणजेच एका अर्थाने सत्य जे अनंत आहे आणि जे शून्य आहे त्याच्या तुम्ही आत आहात आणि तुम्हाला तर शून्य व्हायचं आहे कारण मोक्ष मिळण्याचा अर्थ शून्य होणे आहे किंवा असणे आहे . आणि प्रत्यक्षात तुम्ही शून्याच्या आत आहात . म्हणजे तुमचे सगळे मेडिटेशन वगैरे प्रकार हे आत आहेत आणि प्रत्यक्षात मोक्ष याच्याही पेक्षा अनंत आहे आणि शून्य आहे त्यामुळे मिठीत घ्यायला हात कुठे आहेत ? हात तर मर्यादित आहे. मेंदू मर्यादित आहे . त्यामुळे जे वास्तव कळते ते फक्त प्रोजेक्शन आहे आणि प्रोजेक्शन म्हणजे मोक्ष नव्हे . म्हणजेच तुम्हाला नेटवर्क पाहिजे आहे पण प्रत्यक्षात तुम्ही नेटवर्कच्या आत आहात तुमचे नेटवर्क तुमच्याच चिन्ह व्यवस्थेचे प्रोजेक्शन आहे आणि हे प्रोजेक्शन तुम्हाला वास्तव पाहायला शिकवते तर तुम्ही ते बाहेर जाऊन हाताळणार कसे ?
आणि इथेच मग निर्विकल्प समाधीचा प्रश्न येतो ती काही ठरवून मिळत नाही तुमच्या आत जी चिन्ह संस्कृती आहे, तिने तयार केलेला संगणक आहे तिने तयार केलेला आरटीफिशियल इंटेलिजन्सचा तामझाम आहे तोच नाहीसा व्हावा लागतो शक्तिपात म्हणजे हे सर्वच्या सर्व नाहीसे होणे . त्यामुळे सर्वात प्रथम भाषा नाहीशी करायला शिका . किंबहुना धारणा म्हणजे सर्वात प्रथम भाषा नाहीशी करणे नाहीतर विचार येतच राहतात आणि विचार म्हणजे मोक्ष नव्हे ते जर अशक्य असेल तर मग ध्यानाची सुरुवात होणारच नाही . म्हणूनच मंत्रांनी मोक्ष मिळत नाही . मंत्र म्हणजे शेवटी भाषाच ! आणि लक्षात ठेवा ही फक्त सुरुवात असेल जो शून्यात जातो त्याला अनंत दिसते.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment