सावरकरांची शत्रूता, शत्रू क्रमांक एक, शत्रू क्रमांक दोन आणि शैव हिंदुत्व श्रीधर तिळवे नाईक
सावरकरांचे संपूर्ण आयुष्य हे क्रांतिकारक सावरकर आणि अंदमान तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे हिंदुत्ववादी सावरकर अशा दोन कालखंडामध्ये विभागता येते. तुरुंगात जाण्यापूर्वी सावरकरांचा शत्रू क्रमांक एक स्पष्ट आणि स्वच्छपणाने इंग्रज आहे त्यासाठी ते अभिनव भारत नावाची संघटना काढतात स्वातंत्र्याच्या प्रचंड पुरस्कार करतात त्यासाठी पुस्तके लिहितात ती पुस्तके बॅन होतात आणि मग शेवटी त्यासाठी तुरुंगात जातात मात्र या तुरुंगात त्यांना मुस्लिम धर्मातील कैद्यांचा काही वेगळा अनुभव येतो आणि ते बदलतात अंदमान मधून बाहेर आल्यानंतर सावरकर आपला शत्रू बदलताना दिसतात 1922 पूर्वी सावरकरांचा शत्रू क्रमांक एक इंग्रज होते पण आता हा शत्रू मुस्लिम होतो आणि ते हिंदूंची विभागणी सुद्धा मुस्लिमांच्या दिशेने जाणारे हिंदू आणि मुस्लिमांच्या विरोधात असणारे हिंदू अशी करतात त्यामुळे अर्थातच मग शत्रू क्रमांक दोन ही जागा काँग्रेस आणि भाजप महात्मा गांधी यांनी घेतली कारण हे स्पष्ट पणाने मुस्लिम वादी आहेत असे त्यांचे म्हणणे होते सावरकरांनी हा जो बदल स्वीकारला तो त्यांच्या सर्व अनुयायांनी स्वीकारलेला दिसतो या काळात त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्ववादी होतो आणि इंग्रजांच्या विरोधात लढणे नाकारतो कारण आता हिंदुत्ववादाच्या दृष्टीने शत्रू क्रमांक एक इंग्रज राहिलेले नाहीत तर मुस्लिम झालेले आहेत
आता याच काळातील बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आपण पाहिले तर त्यांचा सुद्धा शत्रू क्रमांक एक इंग्रज नाहीत तर ब्राह्मण धर्म आहे हिंदू धर्म आहे आंबेडकर बौद्ध परंपरेतराहून ब्राह्मणधर्मालाच हिंदू धर्म म्हणतात आणि हिंदू धर्मालाच ब्राह्मण धर्म म्हणतात . त्यांच्या दृष्टीने हे सर्व एकच आहेत त्यात ते शैव धर्माला सुद्धा टाकतात जिथे त्यांची मूलभूत चूक झाली असे मला वाटते . याचे कारण खुद्द बौद्ध परंपरेत सुद्धा शैव धर्माला बौद्ध धर्मात वर्णन करताना नेहमीच लोकधर्म असे म्हटलेले आहे याचे कारण शैव धर्म या काळामध्ये लोकांचा धर्म होता जनतेचा धर्म होता त्याउलट जैन, बौद्ध, ब्राह्मण हे सर्व धर्म बाहेरून आलेल्या मोजक्या युरेशियन लोकांचे धर्म होते. आणि हे सर्व स्वतःला विनाकारण शैव लोकधर्माचे आचरण करणाऱ्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजत होते .
म्हणजेच या कालखंडानंतर एका अर्थाने लोक धर्माचा भाग असणारा अस्पृश्य लोकांचा धर्म बाबासाहेब आंबेडकर आता बौद्ध दिशेने नेणार होते आणि युरेशियन होणार होते .
याउलट सावरकर मात्र हिंदुत्व ही संकल्पना मांडत ब्राह्मण धर्म व्यापक करत त्यामध्ये जैन बौद्ध यांच्याबरोबरच वैष्णव ,शैव आणि शिख यांना सोबत घेऊन जाण्याची वार्ता करत होते .
यामुळेच या दोघांचा संघर्ष होणे अटळ होते कारण हिंदू धर्म ज्याला म्हटले जात होते तो ब्राह्मण धर्मच होता किंबहुना वैदिक ब्राह्मण वैष्णव यांच्या नंतरची हिंदू ही स्टेप आता डेव्हलप होत होती आणि ती प्रामुख्याने वैष्णव आणि पौराणिक होती . मूळ शैव धर्माला त्यात जागा नव्हती त्यामुळे महात्मा फुले यांना जागा मिळणे अशक्यच होते . लिंगायत यांचाही त्यामुळे सुल्लेख येत नाही
आता हे जे मित्र आणि शत्रू यांचे गणित बदललेले आहे ते विलक्षण आहे म्हणजे एका बाजूला पारंपारिक रित्या शैव असलेला पूर्वाश्रमीचा महार समाज आता बौद्ध दिशेने संक्रमण करत होता युरेशियन दिशेने नेला जात होता. प्रश्न असा होता की यांना होकार मिळणे शक्य होते का याचे कारण शेवटी हे लोक मुळचे अनेकदा डार्क होते किंवा ब्राऊन होते काही अपवादात्मक गोरे झालेले होते आज नव बौद्ध हे ना युरेशियन राहिलेत आणि ना धड शैव राहिलेत याचे कारण त्यांचे शैव मूळ सुटता सुटत नाही आणि जो नवीन भूमी प्रदेशजो युरेशियन आहे तो भूमिप्रदेश त्यांना स्वीकारायला तयार नाही म्हणजेच शैव धर्माचा त्याग केलेले आणि बौद्ध धर्मात उपरे ठरलेले अशी काहीतरी त्यांची त्रिशंकू अवस्था झालेली आहे त्यातला विरोधाभास असा आहे की महात्मा फुले यांनी दिलेला ख्रिश्चन शैव धर्म त्यांना स्वीकारायचा नाही उलट अलीकडे तर काही अति शहाणे शैव धर्म हा कसा महायानातून आलाय असा खोटा प्रचार करण्यात मग्न झालेले आहेत आणि हा प्रचार स्वीकारायला कोणीही तयार नाही कारण त्यामध्ये तथ्य नाही. याचा एक परिणाम असा झाला की 1960 पर्यंत दलितांच्या लढाईमध्ये सामील असणारा ओबीसी वर्ग आता अचानक पाठ फिरवू लागला आणि 1990 नंतर तर ओबीसी ने नव बौद्ध लोकांशी पूर्णपणेच आपली नाळ तोडलेली आहे . अगदी हरी नरके यांच्यासारखा ओबीसी विचारवंत त्यामुळेच कोपऱ्यात जाऊन पडलेला आहे कारण ओबीसी अशा कुठल्याही माणसाला स्वीकारायला तयार नाहीत जो नवबौद्धांना डोक्यावर बसवणार आहे असे त्यांना वाटते. आंबेडकरवादी लोकांना ओबीसी फक्त बौद्ध धर्मात धर्मांतर करणारेच हवे आहेत असे सध्याचे चित्र आहे आणि हे चित्र खोडून काढण्याची ताकद एकाही आंबेडकरी विचारवंतात दिसत नाही. किंबहुना या सगळ्या अजेंडाला त्यांची सहमती आहे असेच दिसते .
यामुळे झाले काय जे सावरकर एकेकाळी शत्रू वाटत होते त्या सावरकरांच्या हिंदुत्ववादाला ओबीसी वर्ग जाऊन मिळाला आणि त्याचे झपाट्याने हिंदुत्ववादाच्या नावाखाली ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला . सावरकरांची गौतम बुद्धाविषयीची मते प्रमाण मानणारे ओबीसींच्या मध्ये लोक निर्माण होऊ लागले .
याचा दुष्परिणाम असा झाला की आंबेडकर ज्या ब्राह्मण धर्माला शत्रू क्रमांक एक मानत होते तो ब्राह्मण हिंदुधर्म ओबीसींचा एक नंबरचा मित्र होऊन गेला आणि त्याचेच फळ म्हणून नरेंद्र मोदी हे नेतृत्व हरहर महादेव म्हणत उदयाला आले.
सावरकरांच्या या मांडणी मधला त्यांनी करून घेतलेला सर्वात मोठा आत्मघात मात्र हिंदू महासभेने मुस्लिम लीगशी केलेली युती होता . त्यामुळेच त्यांचा शत्रू नंबर एक ते एका बाजूला इस्लाम असे सांगत होते पण प्रत्यक्षात खरोखर इस्लाम हा त्यांचा शत्रू आहे का असा प्रश्न निर्माण झाला आणि आजही हा प्रश्न जशाचा तसा आहे कारण समान नागरी कायदा झालेला नाही आणि मुस्लिमांच्यावर लोकसंख्या नियंत्रण कायदा लादला गेलेला नाही मुळात तो निर्माण सुद्धा केला गेलेला नाही . प्रश्न असा निर्माण होतो मग हिंदुत्ववादामध्ये आणि काँग्रेसवादामध्ये फरक काय ? ही जी मुस्लिमांशी युती करण्याची ब्राह्मण धर्माची मुस्लिम काळापासून जी पद्धत आहे ती पद्धतच पुढे सावरकर आणि चालवलेली दिसते आणि आता हिंदुत्ववादी तेच करत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सर्व हेतूविषयी आता शंका निर्माण झालेली आहे हे लोक फक्त भारतीय सत्ता आणि व्यवस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी मुस्लिमांना शत्रू क्रमांक एक मानत होते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे . वाईट गोष्ट अशी की हे सर्व सावरकरांनी सुरू केलेले आहे . त्यांनी जर का हिंदू महासभेची युती मुस्लिम लीगशी होऊ दिली नसती तर कदाचित हे घडलेच नसते
यातून मग होते काय तर इंग्रज शत्रू क्रमांक एक राहत नाहीत मुस्लिम शत्रू क्रमांक एक राहत नाहीत मग या लोकांचे शत्रू कोण आहेत ? आणि मग या प्रश्नाचे उत्तर येते शत्रु क्रमांक दोन गांधी आणि त्यांची धर्मनिरपेक्षता म्हणजेच या लोकांचा खरा शत्रू धर्मनिरपेक्षता आणि महात्मा गांधी आहे . पण ही भूमिका खरी मानली तर प्रश्न असा येतो की या लोकांनी समान नागरिक कायदा किंवा लोकसंख्या नियंत्रण कायदा का आणला नाही ? संविधान बनत होते तेव्हा समान नागरी कायद्याच्या बाजूने हे का उभे राहिले नाहीत ? की हे लोक फक्त लोकांनाच नव्हे तर स्वतःलाही गंडवत होते ? की या लोकांच्याकडे मुळातच कसलीही साफ स्वच्छ दृष्टी नाही आहे ते फक्त सत्तेचे तृष्णाकारण ? तसे असेल तर हिंदुत्ववाद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ब्राह्मण धर्माचे राजकीय एक्सटेंशन बनते . सावरकर यांना हे अभिप्रेत होते का त्यांचा हा अंतस्थ हेतू होता का ? त्यांच्या सगळ्या मांडणीचे अंतिम उद्दिष्ट ब्राह्मणांची सत्ता प्रस्थापित करणे एवढाच आहे का ?
ब्राह्मण धर्माची सर्वात मोठी ताकद श्रद्धा असते . ते वेगवेगळ्या श्रद्धा निर्माण करत जातात आणि प्रत्येक श्रद्धा ही कशी सनातन आहे तेही सांगत जातात. ते वैदिक ऋषींच्याकडून वेद घेतात आणि वेदांची सत्ता अंतिम आहे असे सांगतात त्यासाठी या ऋषींच्या नावाने ब्राह्मणांची गोत्रे निर्माण करतात मग ती क्षत्रियांना उसने देतात त्यांच्यावर ती लादतात जी मुळात गोंड नावांच्या काही आदिवासी जमातीच्या राज्यांची प्रथा होती . आणि तिथे गोत्र म्हणजे गणगोत आहे . मग नंतर यज्ञ संस्था परवडत नाही आणि कोणी गिऱ्हाईक सुद्धा येत नाही म्हटल्यावर अचानक हे लोक लोकधर्मातील म्हणजेच शैव धर्मातील पूजा विधी स्वीकारतात आणि सर्व शैव मंदिरे कशी ताब्यात घेता येतील ते पाहतात मग अचानक बौद्ध आणि जैन धर्मामध्ये घुसतात आणि हे दोन्ही धर्म आपल्या ताब्यात कसे येतील हे पाहतात मग या धर्मांचा काळ ओसरतो आणि वासुदेव धर्म पुढे येतो तर त्या वासुदेव धर्माला ताब्यात घेऊन त्या धर्माला ते वैष्णव बनवतात आणि आता विष्णूच्या अवतारांची निर्मिती करतात आणि त्यांचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतात म्हणजेच श्रद्धा सतत बदलत आहेत आणि एकाही श्रद्धेशी कसलीही निष्ठा नाही अपवाद मनुस्मृतीशी असलेली निष्ठा पण ही निष्ठा सुद्धा ब्राह्मणांचे वर्चस्व मनुस्मृति मध्ये शाबूत राहते म्हणून आहे अन्यथा तिला सुद्धा या लोकांनी कचऱ्यात फेकून दिली असती .
सावरकर या ब्राह्मण धर्माच्या कैचीतून सुटत नाहीत आणि म्हणूनच मग त्यांच्या हिंदुत्ववादाला त्यांनी कितीही विज्ञाननिष्ठ म्हटले तरी अंतिमत: तो परंपरानिष्ठ राहतो आणि ही परंपरा ब्राह्मणी परंपरा आहे . या परंपरेचे संरक्षण करण्यासाठी अद्ययावत विज्ञान आवश्यक आहे तंत्रज्ञान आवश्यक आहे म्हणून त्याचा पुरस्कार केला जातो . मुळातच ब्राह्मण कधीच ईश्वरावर श्रद्धा ठेवत नसतात मोक्षावर श्रद्धा ठेवत नसतात हे सर्व कुभांड आहे हे त्यांना आतून माहिती असते याला काही अपवाद असतील पण हे अपवादच नियम सिद्ध करतात. एरवी या लोकांना फक्त या जगातली सर्व सुखे हवी असतात आणि तो प्राप्त करण्याचा मार्ग म्हणून शॉर्टकट म्हणून ते श्रद्धे कडे बघतात . श्रद्धेत मेहनत करावी लागत नाही . शारीरिक कष्ट नाहीत त्यामुळे त्यांना श्रद्धेचा मार्ग हा महत्त्वाचा वाटतो कारण शारीरिक कष्टांना कायमच या लोकांनी दुय्यम समजलेले आहे . किंबहुना शैव लोकांना जे शारीरिक कष्टाला कायक असे म्हणत मुख्य स्थान देतात ते ब्राह्मण धर्मी लोक शूद्र स्थान देतात अंग मेहनतीची कामे करणाऱ्यांना श्रमिकांची कामे करणाऱ्यांना फक्त राबवून घ्यायचे एवढेच या लोकांना माहिती आहे आणि म्हणूनच मग त्यांच्याकडून फुकट मेहनत करून घेण्याचा अधिकार ते मनु आणि इतर स्मृतिद्वारे प्राप्त करतात . ब्राह्मणाकडून पैसे घ्यायचे नाहीत असा एक अलिखित व्यवहार ते समाजात प्रस्थापित करू पाहतात. त्यासाठी दान ही संकल्पना रुजवतात आणि मंदिरातील दान राज्यसंस्थेच्या कक्षेबाहेर ठेवतात . ब्राह्मण धर्माचे हे स्वरूप आता सर्वांनाच कळून चुकलेले आहे आणि म्हणूनच ब्राह्मण धर्माच्या विरोधात सर्वच ब्राह्मणेतर उभे राहिलेले दिसतात . या ब्राह्मणेतर वर्गाला पुरोहित ब्राह्मण वर्गाविषयी कसलेही आकर्षण नाही पण ब्राह्मण धर्माविषयी जे आकर्षण आहे ते जे पुरोगामी ब्राह्मण आहेत जे आधुनिक ब्राह्मण आहेत आणि त्यांचे आधुनिक शिक्षणावर जे प्रेम आहे त्यांनी जी आधुनिक संस्कृती आत्मसात केलेली आहे त्या आधुनिकतेविषयी असलेले प्रेम आहे ब्राह्मण लोकांना वाटते की हे ब्राह्मणांच्या विषयी प्रेम आहे पण नाही सॉरी टू से तुम्हीही पुरोगामीता आणि आधुनिकता युरोप कडून आत्मसात केली आणि ब्राह्मणेतर लोक तुमच्याकडून इनडायरेक्टली ही युरोपियन संस्कृती आत्मसात करू इच्छितात ज्याला आपण ब्राह्मणीकरण म्हणतो प्रत्यक्षात हे ब्राह्मणीकरण म्हणजे व्हाया ब्राह्मण झालेले युरोपीकरण असते इंग्रजांनी ब्राह्मणांचा गवगवा केला नसता तर कदाचित हे सर्व घडले नसते पण इंग्रजांना कारकून हवे होते म्हणून त्यांनी ब्राह्मण भारतीय समाजामध्ये वरच्या स्थानी आणून ठेवले . त्यांना प्रथम पुरोगामीता आणि नंतर आधुनिकता शिकवली ब्रिटिश जिथे जिथे गेले तिथे त्यांनी प्रॉब्लेम निर्माण केले भारतामध्ये सुद्धा ब्राह्मणधर्म आणि ब्राह्मणांचे वर्चस्व हा ब्रिटिशांनी स्पॉन्सर केलेला प्रॉब्लेम आहे . सावरकर या स्पॉन्सरशिप मध्ये आलेले दिसतात.
प्रश्न असा आहे की आपण काय करायचे ? शैव हिंदुत्वाने दोन गोष्टी स्पष्टपणे स्वच्छ करून घ्याव्यात
१ पहिली जागतिक पातळीवर शैव धर्माचा सर्वात मोठा शत्रू इस्लाम आहे मी इस्लाम असे म्हणतो मुस्लिम असे म्हणत नाही . भारतातील सर्व मुस्लिमांना शैव करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. याबाबत लपवाछपवी करण्याचा थोडाही प्रयत्न आपण करू नये . घरवापसी हा आपला अजेंडा असला पाहिजे भले ब्राह्मणी वैष्णव हिंदुत्वाला त्याचा विसर पडलेला असो .
२ दुसरी भारतीय पातळीवर किंवा दक्षिणेशीय पातळीवर शैव धर्माचा सर्वात मोठा शत्रू ब्राह्मणग्रंथस्मृतीमहाकाव्यपुराण ग्रंथप्रधान ब्राह्मण धर्म आहे. आपला मुख्य शत्रू आत्ताचे अनेक ब्राह्मण नाहीत कारण मुळातच अलीकडे जवळजवळ 50 टक्के ब्राह्मणांनी ब्राह्मण धर्माचा त्याग केलेला दिसतो . ज्यांनी ब्राह्मण धर्माचा त्याग केलेला आहे त्यांना आपण शत्रू मानू नये मात्र ज्यांनी तो त्याग केलेला नाही त्यांना आपण उघडपणे सांगितले पाहिजे की तुम्ही आमचे शत्रू आहात कारण तुम्ही वर्ण जात व्यवस्था मानता. आपण या वैष्णव पंडितांना ब्राह्मणांना आता शैव पंडित बनवणे आवश्यक आहे .
प्रश्न असा आहे की आपणाला हिंदुत्व ही संकल्पना का स्वीकारावी लागते पहिले कारण स्पष्ट आहे त्यामुळे भारतात जन्मलेल्या सर्व धर्मांशी नाते जोडता येते आणि हिंदुत्व ही त्यासाठी उत्तम कल्पना आहे आणि दुसरे महत्त्वाचे कारण आपणाला हिंदुत्व ही संकल्पना स्वीकारावी लागते कारण धर्मनिरपेक्षवाद इस्लामचे खरे स्वरूप ओळखण्यात कमी पडला आणि धर्मनिरपेक्ष होऊन इस्लामला पराभूत करता येत नाही हे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळेच हिंदुत्वाची जी मूळ संकल्पना होती की इंग्रज म्हणजे पुरोगामी साम्राज्यवादी इंग्रज आणि धर्मसाम्राज्यवादी मुस्लिम हे आपले शत्रू आहेत ती आपणाला या क्षणी स्वीकारावी लागते कारण इस्लामचे आक्रमण आपल्या दारातच उभे आहे . आणि युरोपियन लोकांचा आधुनिक साम्राज्यवाद आता उत्तराधुनिक युरो अमेरिकन म्हणून आपल्या डोक्यावर नाचायला सज्ज आहे आपणाला त्याचा प्रतिकार करावाच लागेल. भले मग ब्राह्मण आणि वैष्णव हिंदुत्ववादी लोक या उत्तराधुनिक युरो अमेरिकन साम्राज्यवादापुढे लोटांगण घालोत जागतिकीकरण हवे परंतु ते आपल्या टर्म्स आणि कंडिशनवरच झाले पाहिजे .
मात्र या विरोधात लढताना ब्राह्मणी आणि वैष्णव हिंदुत्व कायम तडजोड वादी भूमिका घेत असल्याने आपणाला हे तडजोडवादी हिंदुत्व स्वीकारता येत नाही आणि म्हणूनच आपणाला स्वतःचे शैव हिंदुत्व निर्माण करावे लागते आणि गेली 40 वर्षे मी त्याची मांडणी करतच आलेलो आहे .
तिसरी गोष्ट या शैव हिंदुत्वाची एक दीर्घ सातत्यता भारतामध्ये आहे मात्र ती परंपरा नाही तर धारा आहे . कारण ती प्रवाही आहे . वर्ण जात व्यवस्थेला तिचा ठाम नकार आहे . शिव, शक्ती, संसार , जीव आणि मोक्ष ही तिची पाच मुख्यतत्वे आहेत . तिच्यामध्ये भगवान शंकर भगवती पार्वती भगवान विनायक भगवान कार्तिकेयस्कंद भगवान आनंदी पासून नकुलीश, तामिळ शैवसंत , नवनाथ ,अभिनव गुप्त व काश्मीरी शैवागम स्वीकारलेले इतर पंडित ,बसवेश्वर , अक्क महादेवी, लल्लेश्वरी ,शिवाजी महाराज , पहिला बाजीराव, सर्व होळकर ,महात्मा फुले यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश होतो . आपण ही धारा आता समाजात सातत्याने मांडली पाहिजे . कायक समाजाला आपण कायमच केंद्रस्थान दिलेले आहे ते कायमच देत राहिले पाहिजे . समाजाला जितकी गरज पंडितांची (हा शब्द मी तज्ञ या अर्थाने वापरत आहे )आहे तितकीच कायकांची (यामध्ये व्यापारी उत्पादक श्रमिक असे सर्व येतात)आहे आपण हा समतोल नेहमीच साधलेला आहे आणि हा समतोल पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक झालेले आहे.
तेव्हा सावरकरांच्याकडून ठाकरे यांच्याकडून हिंदुत्व ही संकल्पना घ्यावी परंतु तिचा प्राण शैव करावा . आणि मग मूळ जैन, मूळ बौद्ध , वर्ण जात व्यवस्था नाकारणारा नव वैष्णव, विवेकानंदांच्या विचारातून आलेले नव हिंदू, मोक्ष स्वीकारणारे नव ख्रिस्ती वगैरे सर्वांना सोबत घेऊन आपण एक नवीन राष्ट्र निर्माण करावे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment