सावरकर कौटिल्य शत्रूशी वागायची नीती आणि उदाहरणार्थ जॉर्ज फर्नांडिस श्रीधर तिळवे नाईक भाग सहावा
ज्या वेळेला गांधी आणि नेहरू शत्रूंच्या बाबतीत प्रचंड भोसट होते त्या काळामध्ये शत्रूंच्या बाबतीत सतर्क असण्यासाठी लागणारा अवेअरनेस ज्या काही मोजक्या लोकांच्याकडे होता त्यापैकी एक सावरकर आहेत याबद्दल कोणालाही शंका असू नये त्यामुळेच सावरकरांना याबाबतीत काही श्रेय देणे आवश्यक आहे सावरकरांनी नेहमीच ठकाला महाठक असावे अशी भूमिका घेतलेली दिसते . प्रश्न असा आहे की पण समोरचा ठक आहे का हे कसे तपासायचे की सरसकट सर्वांनाच ठक मानून उगाचच स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी महा ठक व्हायचे ?
याच नीतीचा एक भाग अर्थातच कोणाला मित्र करावे आणि कसे करावे याबाबतीतले धोरण आहे . या संदर्भात जॉर्ज फर्नांडिस यांचे उदाहरण घेता येईल कारण आज त्यांची जयंती आहे.
काँग्रेसला पर्याय म्हणून हिंदुत्वाचा विचार करावा लागेल हे गृहीतक ज्या लोकांनी आमच्या पिढीच्या दारात आणून ठेवले त्यात नामदेव ढसाळ आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा फार मोठा वाटा आहे . आता मात्र या दोघांचे हिंदुत्ववाद्यांनी नेमके काय केले असा प्रश्न उपस्थित झाला आहे इतकी यासंदर्भातली उदासीनता भाजपकडून दाखवली जाते . जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव चौकाला देण्यासाठी त्या फंक्शनला हजर राहण्याची साधी तसदी सुद्धा हिंदुत्ववादी लोकांनी घेतलेली नाही असे दिसते वापरा आणि फेका हे धोरण फार पूर्वीपासूनच भाजपमध्ये होते की काय अशी शंका घेण्याइतपत हे सर्व आता घडले आहे विकोपाला पोहोचले आहे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सुद्धा भाजपसाठी वापरायची गोष्ट आहे का असा प्रश्न आता उपस्थित करावा लागतो .
अर्थातच सावरकरांचे जर का शत्रू विषयीचे धोरण या अंगाने आपण चिंतन वाचले तर आपणाला असेच दिसते की या सर्व गोष्टींचा पुरस्कार खुद्द सावरकर यांनी केलेला आहे म्हणजेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र किंवा वापर करता येणार असेल तर आणि आपल्या अंतिम उद्देशासाठी मदत करणार असेल तर आपला शत्रू असला तरी त्याला तात्पुरता मित्र करावा हे धोरण आहे आपण जर का याच्या मुळाशी गेलो तर आपण पाहतो की याच्या मुळाशी सुद्धा ब्राह्मण धर्म आहे ब्राह्मण धर्माचे अर्थ या पुरुषार्थाविषयी काय तत्त्वज्ञान असावे याची तपशीलवार मांडणी कौटिल्य याने दुसऱ्या शतकामध्ये अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये केलेली आहे आणि या ग्रंथांमध्ये केली गेलेली मांडणीच पुढे सावरकरांनी सुद्धा मोजक्या शब्दात पुढे नेली आहे आणि आपण जर का हिंदुत्ववादी लोकांचा जर का आत्तापर्यंतचा लोकांना वापरण्याचा आणि पक्षांना वापरण्याचा आलेख तपासला तर हे सर्व लोक कौटिल्यवादी आहेत हे स्पष्ट व्हावे साम-दाम-दंड-भेद याचा अत्यंत खुला वापर करावा असा सल्ला कौटिल्य देतो किंबहुना त्याच्या कुटिल नेतात नीतीचा हा पाया आहे यातील भेदाचा प्रत्यय आपण शिवसेनेमध्ये फूट पाडणे आणि काँग्रेस (राष्ट्रवादी)मध्ये फूट पाडणे या निमित्ताने घेतलेलाच आहे पण याचा एक विलक्षण तोटा खुद्द हिंदुत्ववादी निष्ठावान लोकांना होतो आहे तो म्हणजे हिंदुत्ववाद कळत नकळत एखाद्या मोठ्या मशीन सारखा काम करतो आहे आणि या मशीनला चालवणारे जे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त नट आणि बोल्ट ची किंमत देतो आहे.कौटिल्याने मांडलेल्या कुटीलनीतीला ही निती साजेशीच आहे अनेक लोकांना हिंदुत्ववादाकडून नैतिकतेची अपेक्षा असते परंतु स्पष्ट सांगायचे तर कौटिल्याचे अर्थशास्त्र जे नीतीशास्त्र सांगते ते नीतिशास्त्र नैतिक नाही ते सरळ सरळ व्यावहारिक आहे आणि यशकेंद्रि आहे शत्रूला कसे जिंकायचे किंवा शत्रूला कसे कोंडीत पकडायचे , नामोहरम करायचे एवढाच एक उपदेश सातत्याने कौटिल्य करताना दिसतो. त्यातूनच साम-दाम-दंड-भेद यांचा अत्यंत सखोल विचार आपणाला कौटिल्याने केलेला दिसतो इतकेच नव्हे तर त्याचे प्रॅक्टिकल आपलिकेशन सुद्धा कसे करावे हे सुद्धा कौटिल्य सांगतो साहजिकच साम-दाम-दंड-भेद यांचा प्रचंड वापर हिंदुत्ववादी लोक करत असतात ब्राह्मण धर्म करत असतो यामध्ये त्यांचे स्वतःचेसुद्धा निष्ठावान कार्यकर्ते येत असतात आणि म्हणूनच अनेकदा जो निष्ठावान आहे त्याला काही मिळण्याऐवजी बाहेरून आलेल्या पण जिंकू शकणाऱ्या माणसाला तिकीट मिळालेले दिसते . अनेकदा एखादा उमेदवार पैसा आणत असेल तर त्याला सुद्धा त्याची कसलीही नैतिक चौकशी न करता ऍडमिशन दिले जाऊ शकते हे सर्व काही साम-दाम -दंड-भेद या नीतीनुसारच चाललेले आहे आणि एका अर्थाने हे सावरकरांचेही हिंदुत्व आहे.
त्यातूनच मग सावरकरांचा सगळा विरोधाभास परस्पर विरोधी विधाने करणे वगैरे आपण समजून घेऊ शकतो
या सगळ्याचे उत्तम प्रात्यक्षिक आपणाला जॉर्ज फर्नांडिस यांच्या बाबतीत दिसते . जोपर्यंत ते हिंदुत्ववादाला पूरक होते तोपर्यंत हिंदुत्ववादाने त्यांना वापरलेले दिसते म्हणजे ते संरक्षण मंत्री असताना त्यांचा प्रचंड मोठा गवगवा आणि प्रचंड मोठी प्रतिमा हिंदुत्ववादी लोकांनी तयार केली होती पण ते जसे आजारी पडत गेले तसा मग वापर बदलत गेला त्यांचा समाजवाद मग खटकायला लागला आणि आता समाजवादी लोकांच्या नावाने जेवढा शिमगा करता येईल तेवढा शिमगा हिंदुत्ववादी करत असतात त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे की त्यांचे सर्व राजकीय करिअर जे बनवण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी उत्सुक होते त्याची सुरुवात एका समाजवादी जयप्रकाश नारायण नावाच्या माणसांमुळे झाली होती. याला कृतघ्नपणा म्हणावा का की याला कुटील नीती म्हणावी ?
मला वाटते की हिंदुत्ववादी लोकांना आता पुन्हा एकदा सर्व हिंदुत्वाचा विचार करावा लागेल कारण कौटिल्य हा फक्त ब्राह्मण धर्माचा आदर्श असू शकतो हिंदू संस्कृतीचा नाही .
आज भारतामध्ये फायनान्शिअल इन्व्हेस्टमेंट येत नाही याचे सर्वात मोठे कारण भारतातील ही जी हिंदुत्ववादी प्रवृत्ती विशेषत: कौटिल्य प्रधान प्रवृत्ती नको तितकी उजेडात आलेली आहे आणि बाहेरच्या लोकांना असे वाटते की हे लोक कधीही आपणाला घेरू शकतात आपले पैसे ताब्यात घेऊ शकतात त्यामुळेच फॉरेन इन्व्हेस्टमेंट हळूहळू ढासळत चाललेली आहे . कुठलेही राष्ट्र परदेशामध्ये काही प्रतिमा तयार करत असते तेव्हा त्या प्रतिमेत जर नैतिकतेचा कणा दिसला नाही तर ती प्रतिमा कोसळत जाते आणि हळूहळू तो देश अनैतिकतेत मृत्यू पावतो भारत या दिशेने चालला आहे का याचा अत्यंत गांभीर्याने विचार करणे आता गरजेचे झालेले आहे तेव्हा ब्राह्मणी हिंदुत्वाचा त्याग केल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा तुम्ही एका भलत्याच आर्थिक संकटात जाऊन कोसळणार आहात हे निश्चित आहे अलीकडेच वेदांत बाबत अडाणी या उद्योगपती मित्राला मदत करणारी जी भूमिका घेण्यात आलेली आहे ती फारशी चांगली आणि नैतिक नाही तुमच्या सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा तिथे उघड्या पडतात मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला शैव हिंदुत्व स्वीकारावे लागेल आणि त्याचबरोबर शैवांची जैनांची बौद्धांची द्वादशशीलता आणि पंचशीलता स्वीकारावी लागेल अन्यथा सगळा हिंदुत्ववाद स्वतःच्याच अनैतिकतेच्या ओझ्याखाली येऊन कोसळेल . कच्च्या इमारती फारश्या टिकत नसतात .
सावरकर वादाकडून काय घ्यावे आणि काय घेऊ नये हे स्पष्ट असावे. शत्रूच्या संदर्भात काही भूमिका घेणे कधीकधी सावध असणे हे योग्यच आहे किंबहुना शत्रू बाबतची सतर्कता ही आपण सावरकर यांच्यापासून शिकलीच पाहिजे आपण सतत युद्धसज्ज असलेच पाहिजे परंतु संपूर्ण तत्त्वज्ञानच कुटीलनीतीच्या आधारे उभे करायला जाल तर संपूर्ण जग तुम्हाला आता अनेक कॅमेरे वापरून पाहते आहे याचे भान ठेवा ते दिवस गेले जेव्हा कुटीलता मस्तपैकी गूढ आणि गुप्त ठेवता येत होती जमाना कौटिल्याचा राहिलेला नाही कौटिल्याच्या काळामध्ये पत्रकार नव्हते कॅमेरे नव्हते इंटरनेट नव्हते आता मात्र हे सर्व आलेले आहे आणि फक्त कौटिल्य तुमच्याकडेच आहे या भ्रमात राहू नका त्यांच्याकडेही मेक्यावली झालेला आहे चीनमध्ये तर 100 कौटिल्य झाले असतील इतके तिथे कुटीलनीती वर ग्रंथ आहेत स्वतःला महायोद्धा मांडले म्हणजे तुम्ही महायोद्धा होत नाही अमेरिका आणि चायना म्हणजे पाकिस्तान नव्हे ते तुमचेही या क्षणी बाप आहेत आणि कौटिल्य कुटील नीती म्हणाल तर ते त्या बाबतीत खूपच पुढे गेलेत तेव्हा उगाच जग सुद्धा भाबडे आहे या भ्रमात राहू नका तुम्ही दोन माराल तर समोरून चार येतील .
तेव्हा हिंदुत्ववादी लोकांनी आता स्पष्टपणे पंचशील आणि द्वादशशील स्वीकारावे या देशाचे भले त्यामध्येच आहे फक्त शत्रू बाबत अतिशय सतर्क असावे तो सुवर्ण मध्ये आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment