संस्कृती प्रधान उत्तराधुनिकता आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्नपेच श्रीधर तिळवे नाईक
मागील लेखात उत्तर आधुनिकतेचे इंटरनेटवर जवळ जवळ 300 विचारवंतांचे दाखल झालेले विचार व त्यांची प्रचंड पुस्तके याचा थोडासा आढावा घेतला होता आणि त्याचबरोबर दुसऱ्या लेखांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात काही गोष्टी बोललो होतो आता आपणाला भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्तराधुनिकतेने आणलेल्या संस्कृतीच्या प्रश्नांची चर्चा करायची आहे उत्तर आधुनिकतेचे जे कलमिनेशन झाले आणि ज्या पुस्तकांमध्ये ते सर्वाधिक अधोरेखित झाले ते पुस्तक म्हणजे सॅम्युअल हटिंगटणचे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन होय. त्या पुस्तकाच्या संदर्भामध्येच आपण अधिक चर्चा करणार आहोत
उत्तराधुनिकतेचा सर्वात मोठा जो कणा होता तो म्हणजे उत्तराधुनिकतेने आणलेली संस्कृती ! याला अर्थातच आधुनिकता जबाबदार होती कारण आधुनिकतेनेच मुळात पुरोगामी इतिहासाची संकल्पना नाकारत इतिहास हा फक्त कन्स्ट्रक्टेड असतो असे सांगत इतिहासाला रिप्लेस करत इतिहासाच्या जागी परंपरा प्रथम आणली आणि उत्तराधुनिकतेने हाच विचार पुढे नेत परंपरेतून निर्माण होणारी संस्कृती केंद्रस्थानी आणली याचा एक परिणाम असा झाला की अचानकपणे 1990 नंतर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन नावाची संकल्पना जन्मली कारण संस्कृती आली तर ती फक्त एकट्याची येत नाही तर अनेकांची येते आणि साहजिकच मग या संस्कृती आपापसात टक्करणे अटळ बनते क्लाश ऑफ सिव्हिलायझेशन मध्ये नेमकी हीच गोष्ट अंडरलाईन करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने पुढील संस्कृती होत्या त्या पुढील प्रमाणे
१ पश्चिमी ईसाई संस्कृती यामध्ये प्रामुख्याने युरो अमेरिकन देश येतात
२ पारंपारिक orthodox इसाई संस्कृती यामध्ये पारंपारिक कंजर्वेटिव्ह असलेले ख्रिश्चन देश येतात
३ इस्लामी संस्कृती यामध्ये इस्लाम स्वीकारलेले देश येतात
४ सीनोस्पियर संस्कृती यामध्ये जिथे चिनी भाषा जिथे जास्त बोलली जाते किंवा किमान समजली जाते असे देश येतात उदाहरणार्थ चीन कोरिया
५ लॅटिन अमेरिकन संस्कृती यात प्रामुख्याने उत्तर अमेरिकन संस्कृती येते जिच्यावर इंग्लिश पेक्षा स्पॅनिश आणि पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव आहे आणि जिच्यावर तिथल्या स्थानिक संस्कृतीचा प्रभाव सुद्धा थोडा बहुत पडलेला आहे
६ उप सहारा आफ्रिकन संस्कृती
७ हिंदू संस्कृती
८ बौद्ध संस्कृती
९ कॅरिबियन संस्कृती
१० ज्यू संस्कृती
११ जापानी संस्कृती
मला स्वतःला हे वर्गीकरण थोडेसे बदलून घ्यावे असे वाटते कारण जपानी संस्कृती बौद्ध संस्कृती पेक्षा कशी काय वेगळी आहे असा एक फार मोठा प्रश्न आहे चीन आणि जपान या दोघांच्यातला वाद हा एका संस्कृतीतला अंतर्गत वाद आहे त्यामुळे जपानचा समावेश सुद्धा सीनोस्पियर मध्ये करायला हरकत नाही बौद्ध संस्कृती सुद्धा त्यामध्येच टाकायला हरकत नाही म्हणजेच केवळ भाषा आधार घेऊन जिथे चिनी भाषा बोलली जाते ती संस्कृती बौद्ध संस्कृती पेक्षा वेगळी काढायची याला फार काही अर्थ असे मला वाटत नाही अर्थात प्रश्न प्रामुख्याने कोरियाचा येतो कारण दक्षिण कोरियामध्ये ख्रिश्चन धर्म मोठा प्रमाणात पसरलेला आहे ख्रिश्चन 31 टक्के आणि बौद्ध फक्त 18% आहेत त्या उलट जिला हिंदू म्हटले आहे तिथे इंडो युरेशियन आणि इंडियन अशा दोन संस्कृती आहेत . हीच गोष्ट ज्यू बद्दल आहे त्यांना ख्रिश्चन लोकांच्यापासून वेगळे काढता येईल का याबद्दल मला शंका आहे तुम्हाला त्यांना जर का ख्रिश्चन संस्कृतीत टाकता येत नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त त्यांना ऑर्थोडॉक्समध्ये टाकू शकता .
संस्कृतीला केंद्रस्थानी आणल्यामुळेच मग भारतामध्ये क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन म्हणजे इस्लामी विरुद्ध हिंदू या संस्कृती मधला किंवा सभ्यते मधला संघर्ष केंद्रस्थानी आला किंवा आणला गेला खरे तर याची बीजे मुळातच फाळणीत सुद्धा आहेत आणि फाळणी आधीच्या मुस्लिम लोकांच्या संस्कृतीत सुद्धा आहेत .ही आधुनिकतेची आणि उत्तर आधुनिकतेची देणगी आहे याची सुद्धा अनेकांना कल्पना नाही . इस्लामी संस्कृतीमध्ये इंडो इस्लामिक संस्कृती येते आणि ती कदाचित मूळ अरेबियन इस्लामिक संस्कृतीपेक्षा व्याप्तीने मोठी आहे . तरीसुद्धा त्यांना एकत्र टाकले जात असेल तर बौद्ध संस्कृतीत सुद्धा अनेकांचा समावेश करता येऊ शकतो . भारतामध्ये नव बौद्ध लोकांनी बौद्ध संस्कृती स्वीकारलेली आहे आणि स्पष्ट आणि स्वच्छ पणाने हिंदू संस्कृती विरोधात बंड केलेले आहे.
सॅम्युअल हटिंगटन हा भारत पाक यांच्या मधला संघर्ष सुद्धा संस्कृती संघर्ष मानतो सभ्यता संघर्ष मानतो . ख्रिश्चन पश्चिमी संस्कृती ही जितकी भोसट वाटते तितकी नाही उलट जागतिकतेच्या नावाखाली अनेकदा आपली मूल्ये इतरांच्या वर लादते असे तो सांगतो . यातूनच प्रेरणा घेऊन अनेक इस्लाम वादी आणि हिंदुत्ववादी विचारवंत कलोनियल इतिहास हा पाश्चात्त्य सभ्यतेचा वर्चस्ववादी इतिहास आहे असे प्रतिपादन करत या वर्चस्वाचा मागोवा घेतात आणि स्वतःच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये उभे राहण्याचा ठाम प्रयत्न करतात. माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे की या पाश्चात सभ्यतेने भारतावर अल्पसंख्यांकवाद आणि सेक्युलर वाद लादला याचे कारण या संस्कृतीतील ख्रिश्चन कम्युनिटी सुरक्षित राहावी. हा हेतू स्पष्टपणे दिसत नाही याचे कारण आपले लोक आंधळे असतात. पण गंमत म्हणजे याचा फायदा क्रिश्चन लोकांना कमी आणि मुस्लिम लोकांना जास्त झालेला आहे हा साईड इफेक्ट असतो आणि त्याचा विचार आपण नीट करत नाही. आपण आंधळेपणाने युरोपियन मूल्य व्यवस्था स्वीकारत असतो ती स्वीकारली तर आपला नेमका काय तोटा होईल हे या देशातले मेजोरिटी असलेले लोक कधीही लक्षात घेत नाहीत माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे की सर्व अल्पसंख्याकांना मिळणारे सर्व विशेष हक्क रद्द व्हावेत किंवा मग इस्लामला सेकंड मेजर मेजॉरिटी म्हणत त्यांना अल्पसंख्यांक समुदायातून वगळावे. आपल्याकडचे हिंदुत्ववादी या अंगाने काही करत नसतात नुसते मुस्लिम लोकांच्या विरोधात बोलत असतात त्याला काय अर्थ नाही . सीनिक वा सिनो आणि इस्लाम या दोन सभ्यता आता पश्चिमे सभ्यतेला आव्हान देत आहेत असे गृहीतक सॅम्युएल हटिंगटन या पुस्तकामध्ये मांडतो प्रत्यक्षामध्ये हे आव्हान उभे राहिल्यानंतर हा हायपॉथेसिस आलेला आहे . साहजिकच आता ट्रम्प या दोन्ही संस्कृतींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे पण या कोंडीत या दोन संस्कृती सापडण्यापेक्षा हिंदू आणि ज्यू संस्कृतीच अधिक सापडल्या की काय अशी आता शंका येते आहे.
सीनो संस्कृती ही प्रामुख्याने कॉन्फ्यूशियसला घेऊन चाललेली आहे आणि बुद्धाचा प्रभाव फारसा नाही असे गृहीतक या सिद्धांतात आहे त्यात तथ्य आहे की नाही ? तर जापान च्या संदर्भात तर दिसते असे की कन्फ्यूशियस कमी आणि झेन बौद्ध धर्म जास्त आहे . चायना ने मात्र बुद्ध जवळजवळ फेकून दिलेला आहे की काय अशी शंका येण्याइतपत तो कन्फ्युशियन झालेला आहे . साहजिकच सी नो संस्कृतीत व्यक्तिमत्वाचा लोप होतो पण याला कारण मूळ चीन संस्कृती नाही तर कम्युनिझमचा पडलेला खोल प्रभाव आहे . पूर्वीच्या साम्राज्यवादामध्ये तो होताच . कम्युनिझमने हा प्रभाव पुन्हा जिवंत केला आणि व्यक्तीवादाचा लोप केला . सॅम्युअल भविष्यामध्ये sino आणि इस्लाम या दोन संस्कृतींची युती होणार असे म्हणतो या पुस्तकातील विचाराच्या प्रभावाखाली अलीकडे उत्तर कोरिया आलेला दिसतो त्यामुळेच तिथला हुकूमशहा इराणला मदत करतो अर्थात त्यामागे चायनाचे फूस लावणे असणारच .
भविष्यात यामुळे भारतापुढे फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे कारण जर का सिनो संस्कृती आणि इस्लामिक संस्कृती यांची युती झाली तर भारताला झक मारत अमेरिकेशी युती करावी लागेल आणि भारतापुढे खरा पेच हाच आहे . सध्या रशिया पुढे सुद्धा हाच पेच आहे कारण रशियाची गोची अशी आहे की तो कळत नकळत ख्रिश्चन आहे त्यामुळे आज ना उद्या तो अमेरिकेशी युती करेल का असा एक प्रश्न आहे अन्यथा भारत आणि रशिया अशी युती झाली असती तर ती पारंपारिक भारतीय माहोलमध्ये योग्य आहे याचे कारण भारतामध्ये आधीच इंडोयुरोशियन आणि इंडियन यांची युती आहे . रशिया हा आपला अत्यंत नैसर्गिक सांस्कृतिक मित्र आहे भले आपापसात काहीही वाद असो पण आपण एकत्र शतकानूशतके राहिलेलो आहोत . मोदी यांना याचा का विसर पडला हा एक फार मोठा प्रश्न आहे. चायनाने यातूनच इराणला पाठिंबा दिलेला दिसतो. चायनाचा हा पाठिंबा अटळ आहे कारण इराण मुस्लिम आहे पण जर का इस्लाम तिथून हटवता आला आणि तिथे पुन्हा एकदा जुना झोराष्ट्रीयन धर्म आपण आणू शकलो तर इराणला आपण भारत रशिया युतीमध्ये आणू शकतो .
हार्टिंग्टन याने रशिया, इंडिया आणि जपान यांना स्विंगिंग सभ्यता म्हटलेले आहे. यातील जापान सुद्धा आपल्या बाजूने येऊ शकतो किंबहुना त्याने तशीच तयारी केलेली आहे. ट्रम्प यांनी निर्माण केलेला जो काही युद्धाचा पेच आहे तो या बाबतीत या पुस्तकाच्या बाबतीत या पुस्तकाला भविष्य वेधी ठरवणारा पेच आहे.
माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की भारताने ताबडतोब रशिया जापान बरोबर युती करावी . पण भारतापुढचा जो आर्थिक पेच आहे तो खरा गडबड वाला आहे मुख्य म्हणजे भारताची जवळजवळ किमान 20 टक्के निर्यात ही अमेरिकेला होते त्यामुळे अमेरिकेवर कळत नकळत आपली अर्थव्यवस्था अवलंबून राहते आणि त्याचाच फायदा ट्रंप यांनी घेतला आणि घेत आहेत . आपले अमेरिकेवरचे अवलंबून असणे जितके कमी करता येईल तितके कमी केले पाहिजे कारण आज ना उद्या अमेरिका आपल्या विरोधात ठाकणे अटळ आहे. यामध्ये अचानक झाले असे की युरोपिय ख्रिश्चन समाज अचानक अमेरिकेच्या विरोधात गेला जे सॅम्युएल हटिंगटनने गृहीत धरले नव्हते . ग्रीनलँड चा प्रश्न त्याने गृहीत धरला नव्हता . आणि त्यातूनच युरोपीय समाज विरोधात ठाकला आहे. पण हे कदाचित संपून जाईल कारण आज ना उद्या ट्रम्प यांना अक्कल येणे अटळ आहे किंवा त्यांच्यानंतर जो अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट येईल तो कदाचित ग्रीनलँड चा प्रश्न सोडून देईल त्यामुळे युरोप हा आपला मित्र राहील या भ्रमात राहण्याचे कारण नाही युरोप आपल्याकडून घेण्यापेक्षा आपल्याला देण्यातच जास्त रस घेत असल्याने युरोपचा खरोखर आपल्या आर्थिक पेचप्रसंगात काय फायदा होईल हा खरा प्रश्न आहे एकंदरच आपण अमेरिकेवर निर्यातीबाबत अवलंबून राहून झक मारलेली आहे.
सॅम्युअल हटिंग टन हा इस्लामच्या बॉर्डर्सना रक्त लांछित बॉर्डर्स म्हणतो. खरे तर केवळ बॉर्डरच नाही तर इस्लामची आतून बाहेरून पूर्ण संपूर्ण बॉडीच रक्तलांछीत आहे . जे लोक प्रेषिताच्या नातेवाईकांना सोडत नाहीत ते इतरांना काय सोडणार ? याबाबतीतले समाजवादी लोकांचे भोळसट भ्रम आणि अमेरिकन लोकांचे नारसीस्ट भ्रम आपण बाळगायचे कारण नाही .
बौद्ध काय किंवा ख्रिश्चन काय किंवा मुस्लिम काय हे सर्वच्या सर्व मिशनरी धर्म आहेत किंबहुना बौद्ध धर्माचे जगाला जे काही योगदान दिले आहे त्यातील एक म्हणजे बौद्ध धर्माने सर्वात प्रथम मिशनरी धर्म सुरू केला ख्रिश्चन हा बौद्ध धर्माचा याबाबतीत अनुयायी आहे सॅम्युअलला हे लक्षात येत नाही याचे कारण त्याने आशियाई धर्म नीट वाचलेले नाहीत त्यामुळे नव बौद्ध लोक हे मुस्लिमांच्या इतके फेनेटिक होत जाणे अटळ आहे . चीनमध्ये बौद्ध धर्म जाण्यापूर्वी कन्फ्यूशियसचा धर्म इतका मिशनरी नव्हता किंवा विस्तारवादी नव्हता तो बौद्ध धर्माचा पडलेला परिणाम आहे. आपल्याकडे त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे यांनी हिंदूंचा सुद्धा धर्म हिंदू मिशनरी धर्म झाला पाहिजे असे म्हटले होते प्रत्यक्षात तसे काही झाले नाही कारण ब्राह्मणांना असली कसली मेहनत घ्यायची नसते त्यांना फक्त मलिदा खायचा असतो आणि दक्षिणा घ्यायची असते धर्मप्रसाराचे काम ब्राह्मण करत नाहीत. किंबहुना ते काम टाळता यावे म्हणूनच ते कोणाला आपल्या धर्मात पण येऊ देत नाही हे त्यांनी फक्त ब्राह्मण धर्मापुरते ठेवले असते तर बरे झाले असते परंतु त्यांनी जे जे धर्म स्वतःच्या ताब्यात घेतले तिथे सुद्धा त्यांनी हा सगळा आळशी पणा दाखवला आणि वर आणि त्या आळसाचे समर्थन केले .
अर्थातच हे तीन धर्म काही थांबले नाहीत त्यांनी आपला प्रसार चालूच ठेवला . इस्लामविरुद्धचा जो संघर्ष निर्माण झालेला आहे तो इस्लाम मध्ये प्रत्येक मुसलमान मिशनरीच असतो त्यामुळे निर्माण झालेला आहे . आपण जर एका माणसाला जरी इस्लाम मध्ये आणले तर आपणाला स्वर्ग मिळेल ही इस्लामची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेनेच घरोघरी मिशनरी तयार केले त्यासाठी त्यांना स्वतंत्र चर्च सुद्धा निर्माण करावे लागले नाही . अर्थात मुल्ला याबाबतीत अधिक आघाडीवर असतात त्याबद्दल शंका नाही आणि मशिदी मदतच करतात . हिंदू धर्माला सुद्धा हेच करावे लागले असते पूर्वी शैव-धर्मामध्ये हे घरोघरी मिशनरी तयार करण्याचे उद्योग होते प्रत्येक जण मिशनरी होता त्यामुळेच वैदिक लोक येण्यापूर्वी संपूर्ण भारत व्यवस्थित शैव झाला होता . पुढे शैवलोक आपली ही गोष्ट विसरले.
दुसरी गोष्ट वैदिक लोक अचानक जैन धर्मामुळे अनेकांतवादी झाले सत्य अनेक बाजूचे असू शकते सत्य अनेक असतात वगैरे वगैरे पण त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की मिशनरी धर्म जसे आपल्याच धर्माचे सत्य सत्य मानतात इतर धर्म असत्य मानतात आणि ज्यामुळे धर्मप्रसाराला जास्त चेव चढतो तसा चेव कधीही इंडो युरेशियन धर्मांना चढला नाही
अस्तित्वाचा खरा अर्थ हा मुस्लिम होणे किंवा ख्रिश्चन होणे यामध्ये आहे अशा प्रकारची श्रद्धा कधीही ब्राह्मण लोकांनी आपल्यामध्ये निर्माण केली नाही जे लोक स्वतःच्या देवांनाच बाजूला काढून ठेवतात त्यांच्याकडे अशी श्रद्धा काय निर्माण होणार ? चलनात असलेले देव वापरायचे ही ब्राह्मण लोकांची फार जुनी खोड आहे . एका अर्थाने हे लोक प्रोफेशनल आहेत पण ते धर्मप्रचारक नाहीत आणि याचा फार मोठा तोटा भारतात जन्मलेल्या सर्व धर्मांना झाला अगदी बौद्ध लोक सुद्धा भारतामध्ये जे पूर्वी मिशनरी होते ते राहिले नाहीत म्हणजे चायना मधून मिशनरी आले प्रवासी आले परंतु भारतामधले किती लोक चीन जपान मध्ये गेले ? त्यांनी तिबेट मधून आणि चीनमधून आणि जपानमधून किती पुस्तके भाषांतरित केली ? याचे कारण उघड आहे कारण बौद्ध धर्म सुद्धा शेवटी ब्राह्मण लोकांनी ताब्यात घेतला . त्या उलट दक्षिण भारतातून मात्र अनेक लोक शैव मिशनरी असल्याने त्यांनी मात्र आपल्या शैव धर्माचा प्रसार संपूर्ण आशियाभर केला आणि ब्राह्मण लोकांनी फक्त त्याचा फायदा घेऊन त्या शैव लोकांना आपल्या वैष्णव धर्मात कन्व्हर्ट करून नंतर त्यांचे मुस्लिम धर्मात रूपांतर होताना मुकाट्याने पाहिले . आयत्या बिळात नागोबा तशी ही स्थिती होती म्हणजे मेहनत शैव लोकांची आणि मलिदा खायला वैष्णव लोक!
पण या सगळ्या घोटाळ्यामुळेच आज इस्लाम आणि ख्रिश्चन संस्कृती आपल्यापुढे शत्रू म्हणून उभी ठाकलेली दिसते . या संस्कृतींना आपण ग्राहक म्हणून हवे आहोत पण आपला माल मात्र नको आहे आता याला शह कसा द्यायचा हे पाहावे लागेल . कारण आपला माल नाकारण्याच्या नवीन नवीन युक्त्या हे लोक शोधणार हे अटळ आहे कधी नव्हे ते भारताला सर्व क्षेत्रात संपूर्ण स्वयंपूर्ण होणे गरजेचे बनलेले आहे. त्यामुळेच पेट्रोलला रिप्लेस करून आपणाला झक मारत आता अणूऊर्जा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करावी लागेल . इथेनॉल मध्ये पर्याय शोधणे हे कितपत शास्त्रीय वैज्ञानिक आहे याबद्दल मला शंका आहे पण असे काही शक्य झाले तरी मुळात त्याला लागणारे पाणी बघता या उपायाचे काही खरे नाही . आपल्याला सौर ऊर्जेचा पर्याय फार मोठा प्रमाणात राबवणे आणि तो वेगवेगळ्या मशीन मध्ये ऍक्टिव्ह करण्याचे नवीन तंत्रज्ञान शोधणे गरजेचे बनणे अटळ आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment