हिंदुत्ववाद ही जीवन प्रणाली विचार प्रणाली नसून भाव प्रणाली आहे त्याने काही नुकसान होत आहे काय श्रीधर तिळवे नाईक 


पुरोगामी कालखंडामध्ये धर्म ही भाव प्रणाली विज्ञानाच्या उदयानंतर रिप्लेस करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि विज्ञानाच्या आधारे इंद्रियप्रामाण्यवाद म्हणजेच empiricism बुद्धीप्रमाणे वाद बुद्धि प्रामाण्यवाद म्हणजेच rationalism यांचा उदय होऊन त्यांनी धर्माच्या जागी हळूहळू विज्ञान केंद्रस्थानी आणायला सुरुवात केली. 


या सगळ्यामुळे दोन लोक अतिशय नाराज होते पहिले कलावंत आणि दुसरे धर्मगुरू हे लोक विचार प्रमाण मानत नव्हते त्यांना त्यापेक्षा त्यांच्या भावना महत्त्वाच्या वाटत होत्या आणि त्यातूनच मग भावप्रामाण्यवाद म्हणजेच romanticism उदयाला आला या लोकांनी माणूस हा विचारांच्या आधारे जगत नसून भावनांच्या आधारे जगत असतो अशी मांडणी केली. राष्ट्रवाद जर का उभा करायचा असेल तर त्याचा आधार विचार असू शकत नाही तर भाव असतो असे प्रतिपादन या लोकांनी करायला सुरुवात केली साहजिकच या विचारांच्या पासून प्रभावित होऊन दोन प्रकारचे धर्म पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्ह झाले पहिला ख्रिश्चन आणि दुसरा इस्लाम ! भारता मधल्या काही भावनाळू लोकांना ख्रिश्चन आणि इस्लाम यांचा मुकाबला करायचा असेल तर आपणाला सुद्धा असाच भाव प्रमाणे वाद प्रामाण्यवाद स्वीकारावा लागेल असे वाटू लागले आणि त्यातूनच मग हिंदुत्ववाद हळूहळू उद्या यायला येऊ लागला आपल्याकडे यामागे प्रामुख्याने धर्म ही जीवन प्रणाली होती आणि तिच्या संदर्भात हा रोमँटिसिझम ऍक्टिव्ह झाला यातूनच मग आर्य समाज आला वैष्णव वाद आला गीताधर्म आला . यातूनच आर्य समाज वैदिक हिंदुत्ववाद घेऊन आला विष्णुशास्त्री चिपळूणकर ब्राह्मणी हिंदुत्ववाद घेऊन आले लोकमान्य टिळक वैष्णव हिंदुत्ववाद घेऊन आले या सर्व हिंदुत्ववादी जीवन प्रणालीच्या मागे जीवनाचा आधार हा धर्म असतो हे मूळ गृहीतक होते . यांच्याशी महात्मा फुले आणि आगरकर यांचे वाद होणे अटळ होते कारण महात्मा फुले बुद्धि प्रामाण्यवादी होते . यातील आर्य समाज हा राजा राम मोहन राय यांच्या वैदिक हिंदूवादाला आव्हान देत होता तर टिळक यांचा वैष्णव हिंदुत्ववाद हा न्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांच्या वैष्णव हिंदूवादाला आव्हान देत होता . एका अर्थाने हिंदूवादी विचार प्रणाली होती तर हिंदुत्ववाद ही भावप्रणाली होती पण याचा एक फार मोठा दुष्परिणाम असा झाला की अर्थशास्त्राचा आणि राज्यशास्त्राचा जो सर्वांगीण विचार विचार प्रणाली मध्ये केला जातो तसा विचार हिंदुत्ववाद करत नाही आणि आज सुद्धा आपण जर पाहिले तर काहीही निश्चित असे आर्थिक आणि परराष्ट्र धोरण हिंदुत्ववादाकडे आहे का असाच प्रश्न पडावा अशा तऱ्हेने हिंदुत्ववादी सरकार चाललेले दिसते . वाजपेयी सरकारने मागील पानावरून पुढे असे करत काँग्रेसचे धोरण अधिक पुढे चालवलेले दिसते त्यामुळे फार मोठा संकट काळ आला नाही परंतु मोदी सरकार मध्ये मात्र या अंगाने फक्त आपले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सांभाळले की आर्थिक धोरण सांभाळले अशी कळत नकळत एक वर्णवादी भूमिका घेण्यात आलेली आहे आणि शुद्रांना कसे वागवायचे यासंदर्भातले जे धोरण कौटिल्याच्या युरेशियन अर्थशास्त्राने आखून दिलेले आहे ते स्वीकारण्यात आलेले त्यामुळेच खैरात वाटण्याचा प्रकार चाललेला दिसतो . त्यामागे दान विचार आहे जो भारतीय परंपरेतून आलेला आहे पण हा जो दान विचार आहे तो राजेशाहीला शोभतो लोकशाहीला शोभत नाही याचा विसरच अनेकांना पडलेला दिसतो . आपण जणू काय सम्राट आहोत किंवा आपण जणू काय देवाचे अवतार आहोत असे समजण्याचे जे उद्योग राजेशाहीत मध्ये चाललेले असतात तसाच काही उद्योग या सरकारमध्ये चाललेला दिसतो . यातली खोच अशी की राजा काही स्वतःच्या उत्पन्नातून हे सर्व करत नव्हता कारण मुळात वाटण्यासाठी टॅक्स गोळा करावा लागतो आणि हा टॅक्स कोण देतो तर जनताच देते त्यातूनच मग अधिक पैसे टॅक्सच्या रूपाने मिळवण्यासाठी नवीन जीएसटी लागू झाला पण त्यामुळे फार फायदा झाला का हा एक फार मोठा प्रश्न आहे. 


उजवे धोरण स्वीकारल्यामुळे साहजिकच उजव्या धोरणाचे जे देश आहेत त्यांच्याशी जुळवून घेणे आपोआप आले आणि यातूनच मग अमेरिका आणि इस्त्रालयांना दोस्त मानणे सुरू झाले पण उजव्या देशांचा एक प्रॉब्लेम असतो ते कधीच कोणाचे मित्र नसतात ते फक्त त्यांचे धोरण हितसंबंधांच्या आधारे ठरवत असतो मोदी यांना त्यामुळे झक मारत हितसंबंधांच्या आधारे धोरण ठरवण्याची वेळ आली आणि हे धोरण कसे राबवायचे याचा नकाशा नसल्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत झालेली दिसते . मुळात आपले हितसंबंध रशिया सारख्या डाव्या विचारसरणीच्या राष्ट्राची निगडित व्हावे राष्ट्राची निगडित व्हावे राष्ट्राशी निगडित व्हावे हा दैवदुर्वी लास होय. आता प्रॉब्लेम असा आहे की चायना आणि रशिया हे सुद्धा स्वतःचा हितसंबंध सांभाळतच परराष्ट्र धोरण आखत असतात . त्यामुळे ऐनवेळी टोपी फिरवणे हे त्यांना सुद्धा सहज शक्य असते म्हणजे एकंदरच कौटिल्याची जी राजनीती सांगितली गेलेली आहे विशेषता परराज्यांच्या बाबतीत ती इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात लागू पडते पण झाले असे की ते असे लागू पडण्याचा आपणाला महागात पडलेली दिसते पडलेले दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे आज ना उद्या जेव्हा रशियाला तेल विकणे गरजेचे वाटेल तेव्हा रशीया आपल्याला तेल पाठवतच राहील . पण रशियाला तेल विकण्याची जेव्हा गरज नसेल तेव्हा मग तेल कुठून येणार ? आणि सारा गोंधळ इथेच झालेला आहे . चायनाची इकॉनोमी बुडवायला निघालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पद्धतशीरपणे वेळेला वेनेझुएला मधल्या तेल स्रोत आपल्या ताब्यात आधीच घेतल्या . त्यामुळे जर का इराण इराक साईड मधून तेल येणार नसेल तर मग अमेरिकेकडून तेल कसे आणता येईल हाच प्रश्न निर्माण झाला . या सगळ्यांमध्ये कुठेतरी मॅनेजमेंट फसलेली दिसते . कौटिल्य वाचला तर आहे परंतु बहुदा पचवता आलेला नाही . मुळात प्रॉब्लेम असा आहे की कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार आत्ताचे जग चालत नाही . फक्त त्याचा जो स्वार्थ विचार आहे तो मात्र आजही लागू आहे आणि अनेकदा मानवी संबंध त्याच्या आधारे चालतात . त्यामुळे भारताला ते मिळणार ते कोणाच्या कोणाच्या तरी स्वार्थामुळेच मिळणार हे उघड आहे . पण या संदर्भात कुठल्या देशाची कशी नाकेबंदी करायची याचे काही धोरण स्पष्ट दिसत नाही . आपण तेलासाठी त्यांच्यावर अवलंबून असू तर ते आपल्यावर कशासाठी अवलंबून आहेत हेही तपासावे लागते . आणि असे काही आपल्याकडे नसेल जे त्यांची नाकेबंदी करेल तर मग नक्कीच गोंधळ उडू शकतो . चायना आपला मित्र कधीही होऊ शकत नाही तो आपला प्रतिद्वंद्वी आहे हीच वस्तुस्थिती आहे रशिया आपला मित्र होऊ शकतो पण रशियाला आपण हवे आहोत का हाच खरा प्रश्न आहे. त्यातूनच मग आपल्याच प्रजेला आव्हान करण्याची पाळी आलेली दिसते . इतर राष्ट्रांच्या पेक्षा आपण बरे आहोत म्हणजे नेमके काय आहोत ? आणि मुळात ज्यांच्याशी आपण तुलना करतो म्हणजे पाकिस्तानशी तर ते आपले स्टॅंडर्ड होऊ शकते काय ? स्वतःला महासत्ता बनवायचे असेल तर आपली तुलना आपण चीन रशिया अमेरिका यांच्याबरोबरच केली पाहिजे . यांच्या तुलनेत आपण कुठे पोहोचलो ? तेरा वर्षे ही काही कमी होत नाहीत . हे सर्व होण्याचे एकमेव कारण म्हणजे सगळा कारभार भावप्रणालीच्या आणि भावनांच्या आधारे चाललेला आहे आणि भावनांच्या आधारे फार काळ घर सुद्धा चालवता येत नाही प्रेम सुद्धा चालवता येत नाही तिथे राष्ट्र कसे चालणार ? वस्तुस्थिती अशी आहे की हिंदुत्ववादाशी चाललेला रोमान्स आणखीन दोन वर्षांनी संपायला लागेल आणि लोक वास्तवाकडे पुन्हा वळतील . धर्माच्या आधारे शेकडो वर्षे राज्य करून सुद्धा धर्माला शेवटी विज्ञाना पुढे शरणागती पत्करावी लागली . भारतात सुद्धा हे धर्माचे राजकारण फार काळ टिकणे शक्य नाही लोक शेवटी देवाला सुद्धा प्रश्न विचारतात तिथे ते राज्यकर्त्यांना काय सोडणार ?


वस्तुस्थिती अशी आहे की भाजपमध्ये विचार करणारे लोक आहेत परंतु त्यांना पद्धतशीरपणे मोदी आणि अमित शहा यांनी साईडलाईन केलेले आहे . अनेक निवडी इमोशनली झालेल्या आहेत आता तुम्ही असे म्हणू शकाल की हिंदुत्ववादामध्ये हे बसते पण जोपर्यंत एखादी गोष्ट जीवन प्रणाली म्हणून ऍक्टिव्ह असते तोपर्यंत ठीक आहे पण आता ती जीवन प्रणाली राहिलेली नाही तर राज्य प्रणाली सुद्धा झालेली आहे अशावेळी राज्य कसे करायचे याचा एक आडाखा याचा एक नकाशा तुम्हाला तयार करावाच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तज्ञ मंडळी बोलवावी लागते मुख्य म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला काढून लोक जर का वैचारिक पातळीवर कानाखाली वाजवत असतील तर ती सुद्धा ऐकून घ्यावी लागेल . तुम्ही विरोधक शिल्लक ठेवणार नाही म्हणता आणि तुमच्या बाजूने तर फक्त इमोशन्स आहेत असा राज्यकारभार होत नाही राज्यकारभारामध्ये विरोध त्यासाठी आवश्यक असतात कारण त्यामुळे आपल्या मांडणीला भोके आणि धोके कुठे आहेत ते नीट कळते परंतु सर्व काही इमोशनच्या पातळीवर नेणार असाल तर मग इमोशनल फुल वाट्याला येत राहील आणि हे इमोशनल फुल कधी एप्रिल फुल बनले हे कळणार सुद्धा नाही . जेव्हा राज्यकर्ते स्वतःला फसवायला लागतात तेव्हा ते फक्त जनतेची फसवणूक करत नसतात ते इतिहासाची फसवणूक करतात आणि स्वतःची ही फसवणूक करतात तेव्हा हे जर का मृगजळाचे बांधकाम असेल तर सावध राहा . आपण अनेक लोकांच्या वर अनेक राष्ट्रांच्यावर अनेक समाजांच्या वर अवलंबून असतो ही बेसिक गोष्ट प्रथम स्वीकारायला शिका मला आमक्याची गरज नाही तमक्याची गरज नाही वगैरे चालत नाही तुमचे स्वतःचे शरीर सुद्धा स्वतःचे अन्न स्वतःचा श्वास तयार करू शकत नाही त्याला तो बाहेरून घ्यावा लागतो आणि अन्न पाणी बाहेरूनच घ्यावे लागते . अगदी बाई सुद्धा परिपूर्ण आहे तरीसुद्धा तिला सुद्धा मूल जन्माला घालण्यासाठी पुरुषाकडून बाहेरून काही घ्यावे लागते .


भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर कुठले असेल तर या संस्कृतीचा इंटर डिपेंडन्स वर असणारा विश्वास ! सर्व काही परस्पर पूरक आणि परस्परांच्या वर अवलंबून असणारे असते हा मुख्य विचार भारतीय संस्कृतीचा आहे नुसतं हिंदू हिंदू म्हणून हा विचार कळत नाही . हे सतत दुसऱ्या गोष्टींना दुसऱ्या लोकांना दुसऱ्या समाजांना बहिष्कार टाकून वाळीत टाकून नामोहरम करण्याची लागलेली सवय आपण जितक्या लवकर फेटाळू तितके बरे . सर्व स्वीकार वादाला पर्याय नाही .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय