वाल्मिकी रामायणातला महाराष्ट्र १ श्रीधर तिळवे नाईक
शिवाजी महाराजांच्या वर चर्चा झाली की आपोआपच पुन्हा जय श्रीराम वर चर्चा व्हायला लागते आणि मग त्या अंगाने पुन्हा रामावर चर्चा व्हायला लागते
सर्वसाधारणपणे वाल्मिकी रामायणाकडे ( इतर धर्मातल्या रामायणांना ज्यात जैन बौद्ध शैव रामायण पण येते मी इथे चर्चेला घेत नाही कारण त्यांचा प्रभाव नाही )बघण्याचे दोन दृष्टिकोन भारतामध्ये प्रचलित आहेत असे मानले जाते
१ वाल्मीकि रामायण आतला पहिला दृष्टिकोन हा वैष्णव उत्तरेकडचा दृष्टिकोन आहे जो रामाला विष्णूचा अवतार मानतो देव मानतो
२ वाल्मीकि रामायणातला दुसरा दृष्टिकोन हा शैव दक्षिणेकडचा दृष्टिकोन आहे जो वाल्मीकि रामायणातल्या रामाला आक्रमक म्हणून बघतो
माझ्या मते यामध्ये तिसरा दृष्टिकोन पण अस्तित्वात आहे आणि हा दृष्टिकोन मध्य भारत दृष्टिकोन आहे आणि तो प्रामुख्याने महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि दक्षिण विंध्य प्रदेशात आहे . हा दृष्टिकोन वेगळा करणे अत्यंत आवश्यक आहे याचे कारण वाल्मिकी रामायणातल्या ज्या तीन संस्कृती आहेत त्यातल्या प्रत्येक संस्कृतीचा संबंध या तीन दृष्टिकोनाशी आहे आज भाजप दक्षिणेकडे चालत नाही त्याचे सर्वात मोठे कारण भाजपला उत्तरवाद सोडायचा नाही जय श्रीराम सोडायचे नाहीत प्रॉब्लेम हाही नाही प्रॉब्लेम हा आहे की भाजपला आपल्यापेक्षा दक्षिणेकडे म्हणून काही एक वेगळा दृष्टिकोन अस्तित्वात असू शकतो हेच स्वीकारायचे नाही ही असहिष्णुता आहे आणि खरा प्रॉब्लेम तिथून सुरू होतो . मी म्हणतो तेच खरे बाकीच्यांचे करू खोबरे असा हा सगळा गुंतागुंतीचा असहिष्णु जांगडगुत्ता आहे . याचा नेमका काय परिणाम होणार आहे याचा अंदाज कोणालाच येत नाहीये . भारत स्वतंत्र होत असताना सुद्धा त्यामुळेच स्वतंत्र दक्षिण भारताची स्वतंत्र द्रविड स्थानाची मागणी नायकर यांनी केली होती जर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी लोकांनी त्यावेळी त्यांना साथ दिली असती तर महाराष्ट्र सकट द्रविड स्थान निर्माण झाले असते पण महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी ते होऊ दिले नाही आणि गांधीजी त्यांचे प्रतिनिधी असल्याने त्यांनी त्यामध्ये व्यवस्थित आड काठी आणली ती जर का मान्य झाली असती तर हे सर्व प्रश्न निर्माण झालेच नसते पण गांधीजींनी हस्तक्षेप करून द्रविड स्थान स्वतंत्र होऊ दिले नाही आणि दक्षिण भारताचा समावेश आजच्या इंडियामध्ये झाला . आज सुद्धा उत्तर भारतातले लोक त्यासाठी पेरियार यांना माफ करत नाहीत ते अनेकदा त्यांना देशद्रोही म्हणत असतात याचे कारण आपल्यापेक्षा काही वेगळा दृष्टिकोन अस्तित्वात असू शकतो हेच या लोकांना मान्य नाही . मुळात तुम्ही कितीही काहीही सांगितले तरी भारतामध्ये दोन संस्कृती अस्तित्वात आहेत दोन भारतीय भाषाघराणी अस्तित्वात आहेत एक युरेशियन इंडो युरोपियन आणि दुसरे द्रविडी जगात कुठेही इतकी भिन्न भाषाकुळे असताना सुद्धा एकत्र राहिलेले दोन तुकडे दिसत नाहीत . जोपर्यंत भाजप हे नीट समजून घेत नाही तोपर्यंत भाजपाला कसलाही शिरकाव मिळणे शक्य नाही .
अर्थातच याबाबतीत महाराष्ट्र हा नेहमीच गोंधळलेला आहे आणि त्याला जबाबदार महाराष्ट्र हा नेहमीच वाल्मिकी रामायणामध्ये वावरत असतो त्याला इतर रामायणाची कल्पना नसते आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की खुद्द वाल्मिकी रामायणामध्येच वाल्मिकी रामायण काळात महाराष्ट्र गडबडलेला होता असे वाल्मिकी रामायण सांगते प्रत्यक्षात अशी गडबड अस्तित्वात नव्हती ही गोष्ट वेगळी परंतु रामायणाद्वारे ही गडबड होती असे नेहमीच मेसेज मराठी लोकांना देण्यात येतात आणि दुर्दैवाने मराठी लोकांना कधीही हे मेसेज हिडन असतात हे कळत नाही . हे असे होते याचे कारण सांस्कृतिक दृष्ट्या रामायणमध्ये जो महाराष्ट्र येतो ज्याला दक्षिणपथ म्हटले जाते तो फार वेगळा आहे.
हे समजून घ्यायचे असेल तर सुरुवातीच्या कालखंडातले संस्कृतीचे तीन टप्पे समजून घ्यावे लागतील.
मनुष्य पहिल्या टप्प्यामध्ये संकलक होता हे सर्वांनाच आता माहित आहे . दोन दिवसासाठी का होईना पण पाणी गोळा करणे अन्न फळे गोळा करणे असा उद्योग माणसाने सुरू केला आणि माणूस त्यामुळे एकत्र राहू शकला. मात्र या काळामध्ये त्याच्याजवळ पशु नव्हते मात्र याच टप्प्यामध्ये श्रद्धेची सुरुवात होते मांत्रिकीची सुरुवात होते
संस्कृतीचा दुसरा टप्पा हा पशुपालन संस्कृती पासून सुरू होतो आणि याच टप्प्यामध्ये भगवान शंकर यांचे आगमन झालेले आहे . या काळामध्ये मौखिक संस्कृती प्रस्थापित झालेली असते . वाल्मिकी रामायणा मधले युरेशियन लोक हे भारतात आले तेव्हा याच पशुपालन टप्प्यात होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे .
संस्कृतीचा तिसरा टप्पा जो असतो तो शेती संस्कृती होय भगवान शंकर दुसरा टप्प्यात जन्मले पण त्यांनीच भारतात इसवी सन 12000 वर्षांपूर्वी तिसरा टप्पा सुरू केला आणि याचा थेट परिणाम भारतीय संस्कृतीवर झालेला आहे त्यामुळे जेव्हा युरेशियन आले तेव्हा भारतामध्ये कृषी संस्कृतीचा टप्पा आधीच सुरू झाला होता आणि तो विकसित पण झाला होता वाल्मिकी रामायण मधील रामाला याची कल्पना असल्याने त्यामुळेच तो युरेशियन असून सुद्धा शिवलिंगाची पूजा करतो आणि एका शिवलिंगाची स्थापना करतो .
अर्थातच हा जो संस्कृतीचा तिसरा शैव टप्पा आहे तो फक्त शेतीपाशी थांबला नाही तर त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झाला होता . साहजिकच या युरेशियन लोकांनी अनार्य लोकांच्याकडून शेती शिकायला सुरुवात केली आणि मग कृषी संस्कृतीमध्ये दाखल व्हायला सुरुवात केली राम हा कृषी संस्कृतीमध्ये दाखल झालेला महापुरुष आहे आणि त्याला शेती करण्यासाठी जमीन हवी आहे त्यामुळेच तो वाटेत अनेक ठिकाणी यज्ञ पार पाडतो आणि जिथे तुम्ही यज्ञ करता ती जमीन तुमची अशी आर्य लोकांची श्रद्धा असल्याने त्या श्रद्धेचा फायदा घेत आर्य लोक जमीन आपल्या ताब्यात घेत होते त्याद्वारे भारतातल्या संकलन अवस्थेत असलेल्या अनेक आदिवासी लोकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या आणि त्या आदिवासी संस्कृती नष्ट करण्यात आल्या. महाभारतातले खांडववन त्यामुळे जाळले गेलेले दिसते या संकलनात्मक संस्कृती मागासलेल्या होत्या का त्यांना तसे मानावे का हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण शेवटी शेती करणे हे जास्त प्रगतिशील आहे
म्हणजेच संकलन संस्कृती असणारा एक फार मोठा समुदाय भारतामध्ये उपस्थित होता आणि हा समुदाय प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाचा काही भाग या प्रदेशांमध्ये वावरत होता . हे लोक संकलक म्हणूनच वावरताना दिसतात . या लोकांची अशी श्रद्धा होती की शेती करणे म्हणजे भूमातेला शस्त्र लावणे तिच्या गर्भाशयाला जखमी करणे त्यामुळे साहजिकच ते शेती करायला तयार नव्हते साहजिकच युरेशियन संस्कृतीतला राम आणि अनारीय शैव संस्कृती मधला रावण या दोघांच्या दृष्टीने हा सांस्कृतिक भाग मागासलेला होता. मात्र रावण संकलक संस्कृतीला सन्मान देत होता आणि म्हणूनच त्याने आपल्या बहिणीच्या म्हणजे सुपर्णखेच्या राज्यामध्ये फारशी ढवळाढवळ केलेली दिसत नाही . त्या उलट राम मात्र संकलक असलेल्या तत्कालीन आदिवासी संस्कृतींच्या संदर्भात त्यांना मागासलेले समजत होता याचे कारण स्पष्ट होते राम आणि रावण दोघांच्याकडेही धनुष्य होते पण वाली आणि सुग्रीव यांच्याकडे मात्र धनुष्य नव्हते . हनुमानाकडे धनुष्य नव्हते . हे लोक दगड धोंडे झाडे यांचा युद्धासाठी वापर करत होते हे युद्धाच्या वर्णनावरून स्पष्ट व्हावे . अफाट शारीरिक ताकद हीच त्यांची खरी ताकद होती .
साहजिकच रामायणा मधला जो संस्कृती संघर्ष आहे तो सुरुवातीच्या कालखंडामध्ये तीन संस्कृती मधला संघर्ष आहे आणि या तीन संस्कृती पैकी महाराष्ट्र मधली जी संकलक संस्कृती आहे ती संस्कृती रामाच्या आर्य संस्कृतीला जाऊन मिळालेली आहे . वाली या युतीला नकार देत होता म्हणूनच त्याचा काटा काढला गेला . त्याच्या जागी सुग्रीव आणला गेला कारण तो रामाच्या बाजूने रावणाविरोधात उभा ठाकला.
रावणाची संस्कृती मात्र रामाच्या संस्कृती पेक्षा सुद्धा एक पाऊल पुढे होती कारण ती व्यापार करत होती म्हणजेच एका अर्थाने व्यापार करणारी कृषी संस्कृती हा संस्कृतीचा तिसरा टप्पा वाल्मिकी रामायणामध्ये रावणाकडे दिसतो आणि म्हणूनच लंका सोन्याची होती . रावणाकडे विमान असण्याचे कारण सुद्धा तो प्रगत होता हे दाखवणे आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे पहिली दंडकारण्यातली किष्किंधा मधली संकलक संस्कृती दुसरी शेती करावयास शिकलेली शेतीसाठी आता जमीन हवी होती म्हणून शेतीसाठी हपापलेली जमिनीसाठी हपापलेली युरेशियन आर्यन संस्कृती आणि तिसरी शेतीबरोबरच व्यापार सुद्धा करायला शिकलेली आंतरराष्ट्रीय पद्धतीची रावणीक शैव संस्कृती ! किंबहुना रावण मध्ये जो वण आहे तो वाणी आहे तो स्पष्ट आहे वाल्मिकी रामायणामध्ये या तीन संस्कृती मधले युद्ध आहे त्यात पहिल्या युद्धामध्ये रामाने वालीला पराभूत केलेले आहे किंवा धोका देऊन मारलेले आहे अगदी कर्मठ राम भक्त सुद्धा जे काही रामाचे दोष सांगतो त्यामधला एक दोष वालीची नि:शस्त्र केलेली हत्या आहे. ज्याच्या हाती धनुष्यबाण आहे त्याच्याच वरती बाण चालवणे ही त्या काळाची युद्धनीती होती रामाने ती पाळलेली दिसत नाही . याबाबत दिलेले स्पष्टीकरण वाली हा पशु आहे त्यामुळे मला त्याला मारण्याचा हक्क आहे हे आहे आणि हे स्पष्टीकरण क्रौर्य दाखवते . म्हणजेच राम ज्यांच्याकडून मदत घेत होता त्यांना सुद्धा तो पशु समजत होता हे आपण लक्षात ठेवले पाहिजे उत्तर भारतीय युरेशियन लोक मराठी लोकांच्यापेक्षा स्वतःला का सुसंस्कृत समजतात त्याचे उत्तर रामायणामध्ये लपलेले आहे. या संदर्भामध्ये आपण लोकमान्य टिळक यांनी केलेले विवेचन ह्यापूर्वी काही लेखांच्या मधून पाहिलेले होते त्यामध्ये हा टिपिकल युरेशियन दृष्टिकोन दिसतो . महाराष्ट्रात वाढलेला ब्राह्मण सुद्धा जर आपल्या संस्कृतीकडे असा बघत असेल आणि स्वतःच्या संस्कृती मधल्या अनार्य लोकांना अडाणी किंवा राक्षस किंवा नरभक्षक समजत असेल आणि आर्य लोकांना उद्धार कर्ता समजत असेल तर मग त्याने महात्मा फुले यांच्याकडे दुर्लक्ष केले यात आश्चर्य ते काय ? टिळक येथे विसरले की रामायणाचे लेखक वाल्मिकी आहेत आणि ते आर्य आहेत आणि अनार्य नाहीत समजा हेच लेखन एखाद्या अनार्य लेखकाने केले असते तर त्याने खूप वेगळ्या पद्धतीने ते केले असते . वाल्मीकि रामायण हा युरेशियन लोकांच्या दृष्टिकोनातून सांगितला गेलेला दंतकथात्मक महाकाव्यात्मक घटनाक्रम आहे हे आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे . भारतातल्या युरेशियन लोकांची संख्या कदाचित उत्तरेकडे ५०% असेल पण दक्षिणेकडे ती फक्त दहा टक्के आहे याचे भान युरेशियन लोकांनी ठेवावे
साहजिकच कर्नाटक आंध्र तामिळनाडू आणि केरळ हे सर्व प्रदेश मात्र महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रगत होते असे सांगते प्रत्यक्षात हे खरे आहे की नाही हे सांगणे कठीण आहे पण एक गोष्ट मात्र नक्की सातवाहन लोकांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राने घोडदौड सुरू केली आणि याला कारण सातवाहन हे पूर्णपणे दक्षिणात्यच झाले हे आहे. किंबहुना पुराणामध्ये त्यांचा उल्लेख आंध्र असाच आहे मराठी असा नाही . प्रत्यक्षात मात्र ते मराठी होते जे दाक्षिणात्य संस्कृती स्वीकारून बसले होते आणि त्यानंतरच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने दाक्षिणात्य होत गेला अन्यथा तो मधल्या मध्येच लटकत होता . आजही मराठी लोकांची मधल्या मध्ये लटकायची ही वृत्ती सुटलेली नाही आणि प्रत्येक वेळी कोणीतरी एक सातवाहन येतो शिवाजी महाराज येतात आणि आपण दक्षिणेचे आहोत दखनी आहोत असे सांगतात आणि मग महाराष्ट्राला जाग येते . फालतूचे मानापमान प्रयोग महाराष्ट्रात जेवढे चालतात तेवढे कुठेच चालत नाहीत हा मान दिल्लीचे पाय चाटताना कुठे जातो तो चाटणाऱ्यांनाच माहित ! आपल्या लोकांना ताप द्यायचा आणि परक्याला पाहुणा म्हणून ओवाळायचा ही मराठी लोकांची अत्यंत परधार्जीनी घाणेरेडी मनोवृत्ती आहे . त्यामुळे संजय गायकवाड मराठी प्रकाशकाच्या मागे लागतात पण उत्तरेकडच्या लोकांना ते काहीही बोलले तरी सोडून देतात.
प्रश्न असा आहे की ही युरेशियन संस्कृतीला व या संस्कृती मधल्या रामाला मदत करण्याची जी वृत्ती आहे ती दरवेळी रामायण प्रभावी होत जाते तेव्हा का बळावत जाते ? याचे कारणच मुळात रामायणाची निर्मिती यासाठीच केलेली आहे. या रामायणाभोवतीच क्षत्रिय नावाचे एक वर्णवलय तयार केले जाते आणि मग जो उठतो तो सूर्यवंशी आणि चंद्रवंशी होत जातो एवढे जर क्षत्रिय तेज होते तर मग ते जय श्रीराम म्हणत मुस्लिमांच्यावर त्यांनी आक्रमण केले तेव्हा का कोसळले नाही त्यावेळेला हर हर महादेवच का पाहिजे झाले ?
गीताधर्म अत्यंत जाणीवपूर्वक काँग्रेसच्या लोकांनी निर्माण केल्यानंतर अचानक भारतीयांचा लढा अहिंसक कसा काय होतो ? अगदी लोकमान्य टिळकांचे हिंदुत्व सुद्धा प्रत्यक्षात अहिंसकच लढते त्याचे काय करायचे ? राज्यकर्त्यांशी साठे लोटे जमवायचे टिपिकल वैष्णव पॉलिसी आहे तीच कशी उदयाला आली ? आणि सत्ता पदरात पाडून घ्यायची हाच या काळात काँग्रेसचा उद्योग चाललेला नाही काय ? अगदी संपूर्ण स्वातंत्र्य मागायला सुद्धा 1942 उजाडते ? भारतातल्या इंग्रजांची लोकसंख्या अशी होती किती? वस्तुस्थिती अशी आहे की शैव धर्माचा प्रभाव या गीता धर्माने संपूर्ण संपवला आणि परिणामी सर्वांनाच अहिंसक लढे द्यावेसे वाटले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सुद्धा या काळात जास्तीत जास्त काठी घेऊन फिरत होते तलवार नाही . आणि हे गांधीजींना सांगतात की अहिंसा पाळून कधी स्वातंत्र्य मिळते काय ? तुम्ही कधी शस्त्रे उचलली ? नेताजी सुभाष चंद्र बोस शाक्त होते म्हणून लढायला तयार झाले . ज्या बंगालची गॅरंटी तुम्ही आता देत आहात तो बंगाल पूर्णपणे दुर्गा आणि कालीचा आहे होता तो रामाचा कधीच नव्हता . किंबहुना तिथे कम्युनिस्ट पक्षाला वाव मिळण्याचे सर्वात मोठे कारण दुर्गा आणि कालि आहे त्यामुळे हिंसेला महत्त्व आहे आणि म्हणूनच अधून मधून हिंसेचे डोंब उसळत असतात . कम्युनिस्टांना हे कधीच कळले नाही .
हीच स्थिती महाराष्ट्राची आहे . मग फरक कुठे पडला ? बंगाली लोकांनी रामायण अंगाला लावून घेतले नाही कारण राम बंगालमध्ये गेला नाही त्यामुळे रामायणाला फार जागा देण्याची गरज कधीच भासली नाही महाराष्ट्रात मात्र रामायण डोक्यात घेऊन अनेक लोक बसले आणि याची परंपरा आपणाला थेट मध्ययुगीन संतांच्या आणि पंडितांच्या परंपरेमध्ये सापडते . या काळात अनेकांनी अनेक प्रकारची रामायणे मराठीमध्ये लिहिली आपण यामुळे संपूर्ण समाज बिघडवतो आहोत याची सुद्धा कल्पना आली नाही मला वाटते महाराष्ट्र हे एकमेव राज्य असे असेल जिथे ज्या महाकाव्याला आपण डोक्यावर घेतो त्या महाकाव्यात आपल्या माणसांना शेपूट आहे आणि ही शेपूट असलेली माणसे आपण आहोत याची जाणीव नाही . याचा सखोल परिणाम म्हणून आपोआपच रामाला रुजवण्यामध्ये भाजपला आता यश मिळत आहे . प्रश्न असा आहे की हा राम नेमके काय काय घेऊन येणार आहे ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment