मुंबई इंडियन्सच्या अपयशाचे खरे कारण श्रीधर तिळवे नाईक
मुंबई इंडियन्स प्ले ऑफ मधून बाजूला झाला आहे आणि त्याच्या अपयशाची चर्चा करताना कोणीच खरे बोलायला तयार नाही वस्तुस्थिती अशी आहे की आत बेदीली आहे . आणि याचे मूलभूत कारण कॅप्टन कोणी व्हायचं हा प्रश्न आहे
सर्वसाधारणपणे यामध्ये तीन चेहरे होते पहिला चेहरा बुमराहचा आहे पण तो पूर्णपणे एकटा पडलेला दिसतो वास्तविक वास्तविक तो कॅप्टन वेळेला सर्वार्थाने लायक आहे पण दुर्दैवाने आपल्याकडे निखळ बॉलर असलेल्या माणसाला कॅप्टन करण्याची प्रथा अलीकडे नाहीशी झाली आहे त्याचे ट्रॅक रेकॉर्ड पण चांगले पण रेकॉर्ड कोण बघतो? हा दोन्ही चेहऱ्यांना शत्रू वाटत असल्याने त्याला पद्धतशीरपणे संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की बुमराह बळी पडत गेला . वास्तविक त्याने फाईट आऊट करायला पाहिजे होते पण जेव्हा संपूर्ण परिस्थिती विरोधात जाते तेव्हा अवघड होऊन बसते मुख्य म्हणजे या लोकांनी त्याची ओबीसी जात काढली त्याचा त्याला चांगलाच मानसिक ताप झालेला दिसतो.
दुसरा दावेदार अर्थातच सर्वात मोठा ग्रुप आहे त्याच्याबद्दल मी अनेकदा लिहिले आहे सर्वाधिक राजकारण करणारा हा ग्रुप आहे कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेजण हा ग्रुप चालवतात यांनीच आणलेला कॅप्टन म्हणजे सूर्यकुमार होय त्याचा दावा होता आणि विश्व कप जिंकल्यामुळे तो योग्य आहे असेही वाटत होते पण सर्वाधिक प्रॉब्लेम त्याच्या फॉर्मचा होता गेली दीड वर्षे तो फॉर्ममध्ये नाही त्यामुळे अंबानींना त्याला कधीही काढता आले पाहिजे आणि कॅप्टन केले तर काढता येणार नाही म्हणून त्यांनी कॅप्टनशिप दिली नाही . याबाबतीत रोहित शर्मा काहीच करू शकला नाही कारण फॉर्म काही कोणी देऊ शकत नाही . मात्र सूर्यकुमार कॅप्टन झाल्यावर रोहित शर्मा ज्या पद्धतीने कमबॅक करत आला त्यात मला अजिबात आश्चर्य वाटले नव्हते . मुख्य म्हणजे संघर्ष आहे हे इथेही स्पष्ट झाले याचे कारण सूर्य कुमार कॅप्टन झाल्यावर हार्दिक पांड्या संघ सोडून निघून गेला होता. ज्याप्रमाणे रोहित शर्मा वरवर आजारी तसा हार्दिक पांड्या ही वरवर आजारी! तिसरा चेहरा हार्दिक पांड्याचा होता आणि नेमक्या या चेहऱ्याविषयी रोहित शर्मा राजी नव्हता याचे कारण तो रोहित शर्माचे ऐकत नाही आणि मुळातच त्याच्या बुद्धीबद्दल रोहित शर्मा ने xxबुद्धी असे एका ठिकाणी म्हटले होते त्याला त्याच्या बुद्धीबद्दल खात्री वाटत नाही मुळातच हार्दिक पांड्याचा रोहित शर्मावर विश्वास नाही तो आपल्याला चुकीचे सल्ले देईल असा संशय असल्याने हा सगळा गोंधळ निर्माण झाला
या तीन चेहऱ्यांना एकमेकांच्या विषयी वाटतअसलेला अविश्वास शेवटी संघात बेदीली घेऊन आला आणि त्या नादामध्ये संघाच्या एकात्म भावाला छेद जाऊन संघ पराभूत झाला
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment