पुन्हा बुमराह श्रीधर तिळवे नाईक 

मित्रा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप आणि बुमराहबाबत आधीच पोस्ट टाकली होती जसप्रीत बुमरा तिसरा पर्याय आहे हेही सांगितले होते तो आला हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनीही पाठ केली तरी त्याचे काही आडणार नाही याचा अंदाज होताच. तो मध्यम दर्जाचा संघ असला तरी त्याला घेऊन जिंकू शकतो . सचिन तेंडुलकर नंतर खेळपट्टी काय आहे हे अचूक ओळखण्यात तो फार निष्णात आहे पण सचिन सारखेच स्वतःचे ज्ञान दाखवत फिरत नाही सचिन सारखा शांत राहतो सूर्यकुमार यादव किंवा हार्दिक पांड्या यांच्याकडे ती कपॅसिटी नाही म्हणूनच मी त्यांना कधी कॅप्टन मानले नाही. हे लोक संघाच्या जीवावर जिंकणारे कॅप्टन आहेत .रोहित कडे सुद्धा ही कपॅसिटी चांगली आहे. आता त्या बाबतीत ग्रेट सचिन तेंडुलकर होता आणि अर्थात त्यानंतर त्यानेच तयार केलेला धोनी ! मॅच फिक्सिंग चे राजकारण झाले नसते तर सचिन तेंडुलकर कॅप्टन म्हणून काय आहे ते लोकांना कळाले असते त्याची थोडीफार झलक आयपीएलमध्ये मिळाली . सौरभ गांगुलीला जी टीम मिळाली ती टीम सचिन तेंडुलकरने बांधलेली होती एकंदरच नेतृत्वाचे गुण त्याच्याकडे होते याबाबतीत सर्वात बेस्ट माणूस अजित वाडेकर होता कसलाही आगापिछा नसलेला संघ घेऊन त्याने गरुड भरारी घेतली होती . पुन्हा त्याच्याविरोधात राजकारण झाले आणि संघ फाफलला 


जसप्रीत बुमराह मध्ये कॅप्टनशिपला लागणारे गुण आहेत . तो फक्त गोलंदाज असल्याने बॅटिंग मधले राजकारण करण्याची त्याला गरज भासत नाही आणि क्रिकेटमधले सर्वाधिक राजकारण हे बॅटिंगमध्ये चालते. त्याचे खरे कसब लागते ते बॉलिंगबाबत पण आश्चर्यकारकरीत्या तो याबाबत कॅप्टन असताना कमालीचा निस्वार्थी होत जातो आणि त्यामुळेच त्याच्याबद्दलचा विश्वास गोलंदाजामध्ये वाढलेला दिसतो . बुमराह आपल्यावर अन्याय करणार नाही याची प्रत्येक गोलंदाजाला खात्री असते . त्यामुळेच कॅप्टन शिपचा प्रश्न आला की मी त्याला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय